व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १०

बायबलमध्ये भविष्याबद्दल काय सांगण्यात आले आहे?

बायबलमध्ये भविष्याबद्दल काय सांगण्यात आले आहे?

“नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”

स्तोत्र ३७:२९

“पृथ्वी . . . सदा कायम राहते.”

उपदेशक १:४

“तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रू पुसतो.”

यशया २५:८

“तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारेल, मुक्याची जीभ गजर करेल; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.”

यशया ३५:५, ६

“तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट हे नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”

प्रकटीकरण २१:४

“ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.”

यशया ६५:२१, २२