व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ६

बायबलमध्ये मशीहाबद्दल कोणत्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या?

बायबलमध्ये मशीहाबद्दल कोणत्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या?

भविष्यवाणी

“हे बेथलेहेम एफ्राथा, . . . तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल.”

मीखा ५:२

पूर्णता

“हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस” आले.

मत्तय २:१

भविष्यवाणी

“ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.”

स्तोत्र २२:१८

पूर्णता

“शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि . . . चार वाटे केले; . . . [पण] अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, ‘हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्या टाकून पाहावे.’”

योहान १९:२३, २४

भविष्यवाणी

“त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही.”

स्तोत्र ३४:२०

पूर्णता

“येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.”

योहान १९:३३

भविष्यवाणी

“तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला.”

यशया ५३:५

पूर्णता

“शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्‍त व पाणी बाहेर निघाले.”

योहान १९:३४

भविष्यवाणी

“त्यांनी मला माझे वेतन तीस रुपये तोलून दिले.”

जखऱ्‍या ११:१२, १३

पूर्णता

“तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकांकडे जाऊन म्हटले, ‘मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?’ त्यांनी त्याला तीस रुपये तोलून दिले.”

मत्तय २६:१४, १५; २७:५