व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन आणि रक्‍त यांचा आदर करणे

जीवन आणि रक्‍त यांचा आदर करणे

पाठ १२

जीवन आणि रक्‍त यांचा आदर करणे

जीवन, (१) गर्भपात, (१) यांना आपण कसे लेखले पाहिजे?

ख्रिस्ती जनांना सुरक्षिततेची जाणीव आहे हे ते कशावरून दाखवतात? (२)

प्राण्यांना ठार मारणे चुकीचे आहे का? (३)

जीवनाला अनादर दाखवणाऱ्‍या काही प्रथा कोणत्या आहेत?(४)

रक्‍ताविषयी देवाचा नियम काय आहे? (५)

यामध्ये रक्‍त संक्रमणाचा समावेश होतो का? (६)

. यहोवा जीवनाचा उगम आहे. सर्व जीवित प्राणी त्यांच्या जीवनाबद्दल देवाचे ऋणी आहेत. (स्तोत्र ३६:९) जीवन देवाला पवित्र आहे. मातेच्या गर्भातील बाळ देखील यहोवाला मौल्यवान वाटते. अशा बाळाला हेतुतः ठार मारणे देवाच्या नजरेत चुकीचे आहे.—निर्गम २१:२२, २३; स्तोत्र १२७:३.

. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना सुरक्षिततेची जाणीव असते. त्यांची घरे आणि वहाने सुस्थितीत आहेत याची ते खात्री करतात. (अनुवाद २२:८) देवाचे सेवक केवळ आनंदासाठी किंवा मौजमजेसाठी त्यांचे जीवन अनावश्‍यकपणे धोक्यात घालत नाहीत. म्हणूनच ते, मुद्दामहून लोकांना इजा पोहंचवणाऱ्‍या हिंसक खेळांमध्ये भाग घेत नाहीत. हिंसेला उत्तेजन देणारे मनोरंजन ते टाळतात.—स्तोत्र ११:५; योहान १३:३५.

. प्राण्यांचे जीवन देखील निर्माणकर्त्याला मौल्यवान आहे. एखादा ख्रिस्ती, अन्‍न, वस्त्र यासाठी किंवा रोगराई व धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्राण्यांची हत्या करू शकतो. (उत्पत्ति ३:२१; ९:३; निर्गम २१:२८) पण, खेळासाठी किंवा मनोरंजनासाठी प्राण्यांना गैरवागणूक देणे किंवा त्यांना ठार मारणे चुकीचे आहे.—नीतिसूत्रे १२:१०.

. धूम्रपान, सुपारी चघळणे व मौज म्हणून अमली पदार्थांचे सेवन करणे ख्रिश्‍चनांसाठी नव्हेत. या गोष्टी चुकीच्या आहेत कारण त्या (१) आपल्याला त्यांचे गुलाम करतात, (२) आपल्या शरीराला इजा पोहंचवतात व (३) त्या अशुद्ध आहेत. (रोमकर ६:१९; १२:१; २ करिंथकर ७:१) या सवयी सोडण्यास अतिशय कठीण वाटेल. पण यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला हे केलेच पाहिजे.

. रक्‍त सुद्धा देवाच्या नजरेत पवित्र आहे. रक्‍तात जीव किंवा जीवन आहे, असे देव म्हणतो. यास्तव रक्‍त सेवन करणे चुकीचे आहे. योग्यप्रकारे कत्तल न केलेल्या प्राण्याचे मांस खाणे देखील चुकीचे आहे. जर एखाद्या प्राण्याचा गळा आवळला किंवा तो प्राणी सापळ्यातच मरण पावला तर अशा प्राण्यांना खाऊ नये. त्याची जर बाणाने अथवा बंदुकीने शिकार करण्यात आली आहे व ते खावयाचे आहे तर लवकरात लवकर त्याची कत्तल केली पाहिजे.—उत्पत्ति ९:३, ४; लेवीय १७:१३, १४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

. रक्‍त संक्रमण स्वीकारणे चुकीचे आहे का? लक्षात ठेवा, आपण रक्‍त वर्ज्य करावे असे यहोवा अपेक्षितो. याचा अर्थ, आपण कोणत्याही मार्गाने इतर लोकांचे रक्‍त किंवा साठवून ठेवलेले आपले स्वतःचे रक्‍त आपल्या शरीरात घेता कामा नये. (प्रेषितांची कृत्ये २१:२५) यास्तव, खरे ख्रिश्‍चन रक्‍त संक्रमण स्वीकारणार नाहीत. रक्‍त नसलेल्या औषधांचे संक्रमण यांसारखे इतर वैद्यकीय उपचार ते स्वीकारतील. त्यांनाही जगावेसे वाटते, पण देवाच्या नियमाचे उल्लंघन करून ते आपले जीवन वाचवण्याचा प्रयत्न करणार नाहीत.—मत्तय १६:२५.

[२५ पानांवरील चित्रं]

देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण रक्‍त संक्रमण, अशुद्ध सवयी व अनावश्‍यक धोके टाळले पाहिजेत