व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दियाबल कोण आहे?

दियाबल कोण आहे?

पाठ ४

दियाबल कोण आहे?

दियाबल सैतान—तो कोठून आला? (१, २)

सैतान लोकांची दिशाभूल कशी करतो? (३-७)

तुम्ही दियाबलाचा प्रतिकार का केला पाहिजे? (७)

. “दियाबल,” या शब्दाचा अर्थ दुसऱ्‍याबद्दल वाईट लबाडी सांगणारा, असा होतो. “सैतान” म्हणजे, शत्रू किंवा विरोधक. देवाच्या प्रमुख शत्रूसाठी ही नावे देण्यात आली आहेत. सुरवातीला तो स्वर्गामध्ये देवाबरोबर एक परिपूर्ण देवदूत होता. परंतु, नंतर त्याने स्वतःबद्दल फार आढ्यता बाळगली व देवाच्या मालकीची उपासना स्वतःसाठी घेण्याचा विचार करू लागला.—मत्तय ४:८-१०.

. हा देवदूत, सैतान, हव्वेसोबत एका सर्पाद्वारे बोलला. तिला लबाड गोष्टी सांगून त्याने तिला देवाची अवज्ञा करण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारे सैताने, ज्याला देवाचे “सार्वभौम” म्हटले जाते त्यावर किंवा परात्पर देवाच्या हुद्द्‌यावर हल्ला चढवला. देव योग्य प्रकारे व त्याच्या प्रजेच्या हितासाठी शासन करतो का याविषयी सैतानाने शंका केली. कोणताही मानव देवाशी एकनिष्ठ राहू शकतो का याबद्दलही त्याने शंका व्यक्‍त केली. अशा वागणुकीमुळे त्याने स्वतःला देवाचा शत्रू बनवले. आणि म्हणूनच त्याला दियाबल सैतान हे नाव पडले.—उत्पत्ति ३:१-५; ईयोब १:८-११; प्रकटीकरण १२:९.

. सैतान अतिशय कावेबाजपणे लोकांना त्याची उपासना करण्यास लावतो. (२ करिंथकर ११:३, १४) लोकांची दिशाभूल करण्याचा त्याचा एक मार्ग आहे खोटा धर्म. एखादा धर्म जर देवाबद्दलच्या लबाड शिकवणी देत असेल तर तो नक्कीच सैतानाचा हेतू पूर्ण करतो. (योहान ८:४४) खोट्या धर्माच्या सदस्यांना मनापासून वाटत असेल, की ते खऱ्‍या देवाची उपासना करत आहेत. पण खरे पाहता ते सैतानाची उपासना करत असतात. तो ‘या जगाचा देव’ आहे.—२ करिंथकर ४:४.

. भूतविद्या, हा आणखी एक मार्ग आहे ज्याच्याद्वारे सैतान लोकांना आपल्या सत्तेखाली आणतो. लोक, आत्मिक व्यक्‍तींकडून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, इतरांना इजा पोहंचवण्यासाठी, भविष्य सांगण्यासाठी किंवा चमत्कार करण्यासाठी साहाय्य मागू शकतात. या सर्व प्रथांमागे सैतान ही दुष्ट शक्‍ती आहे. देवाला संतुष्ट करण्यासाठी भूतविद्येशी आपला कोणताही संबंध नसावा.—अनुवाद १८:१०-१२; प्रेषितांची कृत्ये १९:१८, १९.

. सैतान जातीबद्दलचा अवास्तव गर्व आणि राजकीय संघटनांची उपासना यांच्याद्वारे देखील लोकांची दिशाभूल करतो. काहींना वाटते, की त्यांचे राष्ट्र किंवा त्यांचा वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण हे खरे नाही. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) इतर लोक मानवाच्या समस्यांना सोडवण्यासाठी राजकीय संघटनांकडे आशेने पाहतात. असे केल्याने, ते देवाच्या राज्याला नाकारतात. केवळ तेच आपल्या समस्यांचा एकमात्र उपाय आहे.—दानीएल २:४४.

. लोकांना पापी वासनांच्या मोहात पाडून त्यांची दिशाभूल करण्याचा सैतानाचा आणखी एक मार्ग आहे. पापी मार्गाक्रमण टाळा असे यहोवा म्हणतो कारण त्यामुळे आपली हानी होईल हे त्याला माहीत आहे. (गलतीकर ६:७, ८) तुम्हीही अशा गोष्टी त्यांच्यासोबत कराव्यात असे काही लोकांना वाटेल. परंतु लक्षात ठेवा, खरे पाहता तुम्ही असे करावे ही सैतानाची इच्छा असते.—१ करिंथकर ६:९, १०; १५:३३.

. यहोवाला सोडून देण्यासाठी सैतान कदाचित छळ किंवा विरोध यांचा उपयोग करील. तुम्ही बायबलचा अभ्यास करत आहात म्हणून तुमचे काही प्रिय जन तुमच्यावर भयंकर रागावतील. दुसरे काही तुमची थट्टा करतील. पण तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल कोणाचे ऋणी आहात? तुम्ही यहोवाबद्दल शिकण्याचे थांबवावे म्हणून सैतान तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. परंतु सैतानाला तुमच्यावर मात करू देऊ नका! (मत्तय १०:३४-३९; १ पेत्र ५:८, ९) दियाबलाचा प्रतिकार केल्याने तुम्ही यहोवाला खूष करू शकता व तुम्ही त्याच्या सार्वभौमत्वाला उंचावत आहात हे दाखवू शकता.—नीतिसूत्रे २७:११.

[९ पानांवरील चित्र]

खोटा धर्म, भूतविद्या आणि राष्ट्रवाद लोकांची दिशाभूल करतात

[९ पानांवरील चित्र]

यहोवाबद्दल सातत्याने शिकत राहून सैतानाचा प्रतिकार करा