व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची इच्छा आचरण्यास इतरांना मदत करणे

देवाची इच्छा आचरण्यास इतरांना मदत करणे

पाठ १५

देवाची इच्छा आचरण्यास इतरांना मदत करणे

तुम्ही जे शिकता त्याबद्दल इतरांना का सांगितले पाहिजे? (१)

तुम्ही कोणाला सुवार्ता सांगू शकता? (२)

तुमच्या वर्तनाचा इतरांवर कोणता परिणाम होऊ शकतो? (२)

तुम्ही मंडळीबरोबर केव्हा प्रचार करू शकता? (३)

. आतापर्यंत तुम्ही बायबलमधून पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकलात. या ज्ञानामुळे तुम्ही ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व विकसित केले पाहिजे. (इफिसकर ४:२२-२४) अशा प्रकारचे ज्ञान तुम्हाला चिरकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आवश्‍यक आहे. (योहान १७:३) परंतु, इतरांचा बचाव व्हावा म्हणून त्यांनी देखील सुवार्ता ऐकली पाहिजे. सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी इतरांना साक्ष दिली पाहिजे. ती देवाची आज्ञा आहे.—रोमकर १०:१०; १ करिंथकर ९:१६; १ तीमथ्य ४:१६.

. शिकत असलेल्या चांगल्या गोष्टी तुमच्या शेजाऱ्‍यांना सांगण्यास तुम्ही सुरवात करू शकता. तुमच्या कुटुंबाला, मित्रांना, शाळेतील सोबत्यांना आणि कामातील सोबत्यांना त्या सांगा. असे करत असताना मात्र दयाशील व सहनशील असा. (२ तीमथ्य २:२४, २५) लक्षात ठेवा की लोक, तुम्ही जे काही म्हणता ते ऐकण्यापेक्षा तुमच्या वर्तनाकडे अधिक पाहतात. यास्तव, तुमचे चांगले वर्तन, तुम्ही सांगत असलेला संदेश ऐकण्यास इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकेल.—मत्तय ५:१६; १ पेत्र ३:१, २, १६.

. कालांतराने, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीबरोबर प्रचार सुरू करण्याच्या पात्रतेचे होऊ शकता. तुमच्या प्रगतीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. (मत्तय २४:१४) एखाद्यास यहोवाचा सेवक होण्यास व चिरकालिक जीवन प्राप्त करण्यास मदत करणे किती आनंदाचे असेल!—१ थेस्सलनीकाकर २:१९, २०.