व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची सेवा करण्याचा तुमचा निर्णय

देवाची सेवा करण्याचा तुमचा निर्णय

पाठ १६

देवाची सेवा करण्याचा तुमचा निर्णय

देवाचा मित्र होण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? (१, २)

तुम्ही देवाला तुमचे समर्पण कसे करता? (१)

तुम्ही बाप्तिस्मा केव्हा घ्यावा? (२)

देवाशी विश्‍वासू राहण्याचे सामर्थ्य तुम्ही कसे प्राप्त करू शकता? (३)

. देवाचा मित्र होण्यासाठी तुम्ही बायबल सत्याचे चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त केले पाहिजे (१ तीमथ्य २:३, ४), शिकलेल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवला पाहिजे (इब्री लोकांस ११:६), पापांबद्दल पश्‍चात्ताप केला पाहिजे (प्रेषितांची कृत्ये १७:३०, ३१) आणि जीवनशैली पासून मागे फिरले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) मग देवाबद्दलच्या तुमच्या प्रीतीने स्वतःला त्याला समर्पण करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. याचा अर्थ, व्यक्‍तिगत, खासगी प्रार्थनेद्वारे तुम्ही त्याला सांगता, की आता तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्याच्या हवाली करत आहात.—मत्तय १६:२४; २२:३७.

. देवाला समर्पण केल्यानंतर, तुम्ही बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) तुम्ही यहोवाला तुमचे समर्पण केले आहे हे बाप्तिस्म्याद्वारे सर्वांना कळून येते. यास्तव, देवाची सेवा करण्याचा निर्णय करणारे प्रौढच केवळ बाप्तिस्मा घेऊ शकतात. एखाद्याचा बाप्तिस्मा होतो तेव्हा, काही क्षणासाठी त्याचे संपूर्ण शरीर पाण्याखाली असले पाहिजे. aमार्क १:९, १०; प्रेषितांची कृत्ये ८:३६.

. यहोवाला समर्पण केल्यानंतर, तुम्ही त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे जगावे अशी तो तुमच्याकडून अपेक्षा करील. (स्तोत्र ५०:१४; उपदेशक ५:४, ५) यहोवाची सेवा करण्यापासून दियाबल तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करील. (१ पेत्र ५:८) पण प्रार्थनेद्वारे यहोवाच्या समीप जा. (फिलिप्पैकर ४:६, ७) दर दिवशी त्याच्या वचनाचा अभ्यास करा. (स्तोत्र १:१-३) मंडळीशी निकट जडून राहा. (इब्री लोकांस १३:१७) हे सर्व केल्याने, देवाशी विश्‍वासू राहण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य मिळेल. अशा प्रकारे, देव तुमच्याकडून जे अपेक्षितो ते तुम्ही चिरकालासाठी करू शकता!

[तळटीपा]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान किंवा त्यासारख्या दुसऱ्‍या पुस्तकाचा अभ्यास, बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांच्या तयारीसाठी सुचवला जातो.