व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला नाखूष करणारे विश्‍वास आणि रूढी

देवाला नाखूष करणारे विश्‍वास आणि रूढी

पाठ ११

देवाला नाखूष करणारे विश्‍वास आणि रूढी

कोणत्या प्रकारचे विश्‍वास आणि रूढी चुकीच्या आहेत? (१)

देव त्रैक्य आहे असा ख्रिश्‍चनांनी विश्‍वास धरावा का? (२)

खरे ख्रिश्‍चन नाताळ, ईस्टर किंवा वाढदिवस का साजरा करीत नाहीत? (३, ४)

मृत जिवंतांना इजा पोहंचवू शकतात का? (५) येशूचा मृत्यू क्रुसावर झाला का? (६) देवाला संतुष्ट करणे किती महत्त्वपूर्ण आहे? (७)

. सर्वच विश्‍वास किंवा रूढी वाईट नाहीत. परंतु जर त्या खोट्या धर्मातून येतात किंवा बायबल शिकवणींच्या विरुद्ध आहेत तर देव त्यांना स्वीकृती दर्शवीत नाही.—मत्तय १५:६.

. त्रैक्य: यहोवा, त्रैक्य—एका देवात तीन व्यक्‍ती, असा आहे का? नाही! यहोवा पिता, “एकच खरा देव” आहे. (योहान १७:३; मार्क १२:२९) येशू त्याचा ज्येष्ठ पुत्र आहे आणि तो देवाच्या अधीन आहे. (१ करिंथकर ११:३) पिता पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. (योहान १४:२८) पवित्र आत्मा व्यक्‍ती नसून देवाची कार्यकारी शक्‍ती आहे.—उत्पत्ति १:२; प्रेषितांची कृत्ये २:१८.

. नाताळ आणि ईस्टर: येशू डिसेंबर २५ रोजी जन्मला नव्हता. तो ऑक्टोबर १ च्या सुमारास, मेंढपाळ आपला कळप रात्रीच्या वेळी बाहेर ठेवत त्या वर्षाच्या वेळी तो जन्मला होता. (लूक २:८-१२) येशूने ख्रिश्‍चनांना त्याचा वाढदिवस साजरा करण्यास कधीही सांगितले नाही. उलट त्याने आपल्या शिष्यांना त्याच्या मृत्यूचे स्मरण किंवा आठवण करण्यास सांगितले. (लूक २२:१९, २०) नाताळ आणि त्याच्या रूढी प्राचीन खोट्या धर्मातून येतात. ईस्टर रूढींबद्दल सुद्धा हीच गोष्ट खरी आहे, जसे की अंड्यांचा आणि सशांचा उपयोग. आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी नाताळ अथवा ईस्टर साजरा केला नाही आणि आजचे खरे ख्रिश्‍चन देखील करीत नाहीत.

. वाढदिवस: बायबलमध्ये सांगितलेले केवळ दोन वाढदिवस आहेत जे यहोवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांकरवी साजरे करण्यात आले. (उत्पत्ति ४०:२०-२२; मार्क ६:२१, २२, २४-२७) आरंभीच्या ख्रिस्ती लोकांनी वाढदिवस साजरे केले नाहीत. वाढदिवस साजरा करण्याची रूढी प्राचीन खोट्या धर्मांतली आहे. खरे ख्रिस्ती वर्षातील इतर दिवशी भेटवस्तू देतात व मनोरंजन करतात.

. मृतांविषयी भय: मृत लोक काहीच करू शकत नाहीत अथवा त्यांना भावना नसतात. आपण त्यांना मदत करू शकत नाही, आणि ते आपल्याला इजा पोहंचवू शकत नाहीत. (स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५, १०) जीव मरतो; मृत्यूनंतर तो जिवंत राहत नाही. (यहेज्केल १८:४) परंतु काही वेळा दुष्ट देवदूत, ज्यांना दुरात्मे म्हटले जाते, मृत लोकांचे जीव असल्याचे सोंग घेतात. मृतांचे भय अथवा त्यांची उपासना यांजशी संबंधित असलेल्या कोणत्याही रूढी चुकीच्या आहेत.—यशया ८:१९.

. क्रुस: येशूचा मृत्यू क्रुसावर झाला नाही. तो एका खांबावर किंवा स्तंभावर मरण पावला. अनेक बायबलमध्ये भाषांतरीत केलेला “क्रुस” या शब्दाचा अर्थ, लाकडाचा केवळ एक तुकडा असा होतो. क्रुसाच्या चिन्हाचा उगम प्राचीन खोट्या धर्मांतून होतो. आरंभीचे ख्रिस्ती क्रुसाची उपासना किंवा त्याचा वापर करत नव्हते. तेव्हा उपासनेमध्ये क्रुसाचा उपयोग करणे तुम्हाला योग्य वाटते का?—अनुवाद ७:२६; १ करिंथकर १०:१४.

. असे विश्‍वास आणि अशा रूढींचा त्याग करणे अत्यंत कठीण होईल. तुमचा विश्‍वास बदलू नये असे नातेवाईक आणि मित्रजन तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतील. पण लोकांना खूष करण्यापेक्षा देवाला खूष करणे अधिक महत्त्वपूर्ण आहे.—नीतिसूत्रे २९:२५; मत्तय १०:३६, ३७.

[२२ पानांवरील चित्र]

देव त्रैक्य नाही

[२३ पानांवरील चित्र]

नाताळ आणि ईस्टर प्राचीन खोट्या धर्मांतून येतात

[२३ पानांवरील चित्र]

मृतांची उपासना करण्याची अथवा त्यांना भिण्याचे काही एक कारण नाही