व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन

देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन

पाठ ८

देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन

कुटुंबामध्ये पतीचे कोणते स्थान आहे? (१)

पतीने आपल्या पत्नीशी कसा व्यवहार करावा? (२)

पित्याच्या कोणत्या जबाबदाऱ्‍या आहेत? (३)

कुटुंबामध्ये पत्नीची भूमिका काय आहे? (४)

पालक आणि मुलांकडून देव काय अपेक्षितो? (५)

विभक्‍तता व घटस्फोट यांविषयी बायबलचा दृष्टिकोन काय आहे? (६, ७)

. पती कुटुंबाचा प्रमुख आहे, असे बायबल म्हणते. (१ करिंथकर ११:३) पतीला केवळ एकच पत्नी असावी. कायद्यानुसार त्यांचा योग्यप्रकारे विवाह झालेला हवा.—१ तीमथ्य ३:२; तीत ३:१.

. पतीने आपल्या पत्नीवर स्वतःप्रमाणेच प्रेम करावे. येशू आपल्या अनुयायांना ज्याप्रमाणे वागवतो त्याचप्रकारे त्याने तिला वागवले पाहिजे. (इफिसकर ५:२५, २८, २९) त्याने कधीच तिला मारहाण किंवा कोणत्याही प्रकारे तिच्याशी गैरव्यवहार करू नये. उलट, त्याने तिला आदर व सन्मान दाखवावा.—कलस्सैकर ३:१९; १ पेत्र ३:७.

. पित्याने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कष्ट केले पाहिजे. त्याने आपल्या पत्नीला व मुलांना अन्‍न, वस्त्र आणि निवारा पुरवला पाहिजे. त्याने त्याच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांना देखील पूर्ण केले पाहिजे. (१ तीमथ्य ५:८) देव आणि त्याचे उद्देश यांबद्दल शिकण्यासाठी तो आपल्या कुटुंबाला मदत करण्यात पुढाकार घेतो.—अनुवाद ६:४-९; इफिसकर ६:४.

. पत्नी आपल्या पतीची चांगली मदतनीस असली पाहिजे. (उत्पत्ति २:१८) तिने त्याला, मुलांना शिकवण्यात व प्रशिक्षण देण्यात हातभार लावला पाहिजे. (नीतिसूत्रे १:८) पत्नीने आपल्या कुटुंबाची काळजी प्रेमळपणे घ्यावी अशी यहोवा तिच्याकडून अपेक्षा करतो. (नीतिसूत्रे ३१:१०, १५, २६, २७; तीत २:४, ५) आपल्या पतीबद्दल तिला गाढ आदर असला पाहिजे.—इफिसकर ५:२२, २३, ३३.

. मुलांनी आपल्या पालकांच्या अधीन राहावे असे यहोवा अपेक्षितो. (इफिसकर ६:१-३) पालकांनी आपल्या मुलांना प्रशिक्षण द्यावे व त्यांची सुधारणूक करावी अशी अपेक्षा तो त्यांच्याकडून करतो. पालकांनी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवला पाहिजे, त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्या आध्यात्मिक व भावनिक गरजा पुरवल्या पाहिजेत. (अनुवाद ११:१८, १९; नीतिसूत्रे २२:६, १५) पालकांनी आपल्या मुलांना केव्हाही कठोरपणे अथवा क्रूरपणे शिक्षा देऊ नये.—कलस्सैकर ३:२१.

. वैवाहिक सोबत्यांमध्ये समस्या उद्‌भवतात तेव्हा त्यांनी बायबल सल्ला लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बायबल आपल्याला प्रीती दाखवण्यास व क्षमाशील असण्यास आर्जवते. (कलस्सैकर ३:१२-१४) लहानसहान समस्यांवर तोडगा म्हणजे विभक्‍त होणे, या गोष्टीला बायबल उत्तेजन देत नाही. पण एखादी पत्नी आपल्या पतीला, (१) जर तो त्याच्या कुटुंबाची काळजी घेतच नाही, (२) तो तिच्याशी इतका हिंसक आहे, की त्याच्यापासून तिच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका आहे किंवा (३) तो तिचा इतका विरोध करतो की तिला यहोवाची सेवाच करता येत नाही, केवळ अशा प्रसंगीच त्याला सोडण्याचा ती विचार करू शकते.—१ करिंथकर ७:१२, १३.

. वैवाहिक सोबत्यांनी एकमेकांशी विश्‍वासू असले पाहिजे. व्यभिचार, देव आणि एखाद्याच्या वैवाहिक सोबत्याविरुद्ध पाप आहे. (इब्री लोकांस १३:४) विवाह बाह्‍य लैंगिक संबंध, पुनर्विवाहास अनुमती देणाऱ्‍या घटस्फोटासाठी असलेला एकमेव शास्त्रीय आधार आहे. (मत्तय १९:६-९; रोमकर ७:२, ३) अशास्त्रीय आधारावर लोक घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करतात तेव्हा यहोवाला त्यांचा वीट येतो.—मलाखी २:१४-१६.

[१६, १७ पानांवरील चित्रं]

पालकांनी आपल्या मुलांना प्रशिक्षण द्यावे आणि त्यांची सुधारणूक करावी अशी अपेक्षा देव त्यांच्याकडून करतो

[१७ पानांवरील चित्र]

एक प्रेमळ पिता आपल्या कुटुंबाच्या भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो