व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?

पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?

पाठ ५

पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?

यहोवाने पृथ्वीला निर्माण का केले? (१, २)

पृथ्वी सध्या परादीस का नाही? (३)

दुष्ट लोकांचे काय होईल? (४)

भवितव्यामध्ये येशू रोग्यांसाठी, वृद्ध जनांसाठी, व मृतांसाठी काय करील? (५, ६)

भावी आशीर्वादांमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? (७)

. मानव पृथ्वीवर कायम जगण्याचा आनंद लुटू शकतील, या कारणासाठी यहोवाने या पृथ्वीला निर्माण केले. पृथ्वीवर नेहमीच धार्मिक, आनंदी लोक असावेत अशी त्याचा इच्छा होती. (स्तोत्र ११५:१६; यशया ४५:१८) पृथ्वीचा केव्हाही नाश केला जाणार नाही; ती कायम राहील.—स्तोत्र १०४:५; उपदेशक १:४.

. मानवाला निर्माण करण्याआधी, देवाने पृथ्वीचा एक लहानसा भाग निवडून त्याला परादीस बनवले. त्याला त्याने एदेन बाग म्हटले. याच बागेत त्याने पहिला पुरुष आणि स्त्री, आदाम आणि हव्वेला ठेवले होते. त्यांना मुले व्हावीत व त्यांनी संपूर्ण पृथ्वीला व्यापून टाकावे असा देवाचा उद्देश होता. क्रमशः त्यांनी संपूर्ण पृथ्वीला परादीस बनवले असते.—उत्पत्ति १:२८; २:८, १५.

. आदाम आणि हव्वेने देवाच्या नियमांचे जाणूनबुजून उल्लंघन करून पाप केले. याकारणास्तव यहोवाने त्यांना एदेन बागेतून हाकलून लावले. त्यांनी परादीस गमावले. (उत्पत्ति ३:१-६, २३) पण पृथ्वीबद्दल असलेला यहोवाचा उद्देश तो विसरलेला नाही. मानव अनंतकाळसाठी जेथे राहतील असे परादीस करण्याचे तो अभिवचन देतो. हे तो कसे करील?—स्तोत्र ३७:२९.

. या पृथ्वीला परादीस बनवण्याआधी, दुष्ट लोकांना काढले पाहिले. (स्तोत्र ३७:३८) हे हर्मगिदोनमध्ये घडेल; ते दुष्टाईचा अंत करणारे देवाचे युद्ध आहे. त्यानंतर, सैतानाला १,००० वर्षांसाठी कैद करण्यात येईल. याचा अर्थ पृथ्वीची नासाडी करण्यासाठी कोणी दुष्ट राहणार नाही. केवळ देवाच्या लोकांचा बचाव होईल.—प्रकटीकरण १६:१४, १६; २०:१-३.

. मग येशू ख्रिस्त या पृथ्वीवर १,००० वर्षांसाठी राज्य करील. (प्रकटीकरण २०:६) क्रमशः तो आपल्या मनांतून आणि शरीरांतून पाप काढून टाकील. पाप करण्याआधी आदाम आणि हव्वा जसे होते तसे आपण परिपूर्ण मानव होऊ. तेव्हा आजारपण, वृद्धापकाळ आणि मृत्यू नसेल. रोग्यांना बरे केले जाईल, वृद्ध पुन्हा एकवार तरुण होतील.—ईयोब ३३:२५; यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:३, ४.

. येशूच्या हजार वर्षीय राजवटीदरम्यान, विश्‍वासू मानव पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करतील. (लूक २३:४३) तसेच, लाखो मृत जनांना पृथ्वीवर मानवी जीवन जगण्यासाठी पुनरुत्थित केले जाईल. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) देव त्यांच्याकडून जी अपेक्षा करतो ती जर त्यांनी पूर्ण केली तर ते पृथ्वीवर अनंतकाळपर्यंत जगतील. नाहीतर, त्यांचा कायमचा नाश केला जाईल.—योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २०:११-१५.

. अशा प्रकारे पृथ्वीबद्दलचा देवाचा मूळ उद्देश यशस्वी होईल. या भावी आशीर्वादांमध्ये तुम्हीही भाग घेऊ इच्छिता का? तर मग, तुम्हाला यहोवाबद्दल शिकत राहावे लागेल आणि त्याच्या अपेक्षांना निरंतर पूर्ण करावे लागेल. यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहात भरणाऱ्‍या सभांना उपस्थित राहिल्याने असे करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.—यशया ११:९; इब्री लोकांस १०:२४, २५.

[१० पानांवरील चित्र]

परादीस गमावले

[११ पानांवरील चित्र]

हर्मगिदोननंतर, पृथ्वीला परादीस बनवण्यात येईल