व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप जाणे

प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप जाणे

पाठ ७

प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप जाणे

नित्याने प्रार्थना करणे महत्त्वपूर्ण का आहे? (१)

आपण कोणाला प्रार्थना करावी, व कशी करावी? (२, ३)

प्रार्थनेसाठी उचित विषय कोणते? (४)

तुम्ही प्रार्थना कधी करावी? (५, ६)

देव सर्वच प्रार्थना ऐकतो का? (७)

. प्रार्थना म्हणजे, नम्रतेने देवाबरोबर बोलणे. तुम्ही नित्याने देवाला प्रार्थना केली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला एखाद्या प्रिय मित्राप्रमाणे त्याच्या समीप असल्यासारखे वाटेल. यहोवा इतका महान आणि शक्‍तिमान आहे तरीदेखील, तो आपल्या प्रार्थना ऐकतो! तुम्ही देवाला नियमाने प्रार्थना करता का?—स्तोत्र ६५:२; १ थेस्सलनीकाकर ५:१७.

. प्रार्थना आपल्या उपासनेचा एक भाग आहे. म्हणूनच आपण केवळ देवाला, यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. येशू पृथ्वीवर असताना, त्याने नेहमी, इतर कोणाला नव्हे तर त्याच्या पित्याला प्रार्थना केली. आपणही तेच केले पाहिजे. (मत्तय ४:१०; ६:९) परंतु, आपण सर्व प्रार्थना येशूच्या नावाने केल्या पाहिजेत. यावरून आपण येशूच्या हुद्याचा आदर करतो व त्याच्या खंडणी बलिदानावर आपला विश्‍वास आहे हे दाखवतो.—योहान १४:६; १ योहान २:१, २.

. आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाबरोबर मनापासून बोलले पाहिजे. आपण आपल्या प्रार्थना पाठ करून अथवा एखाद्या प्रार्थना पुस्तकातून वाचून दाखवू नयेत. (मत्तय ६:७, ८) आपण कोणत्याही आदरणीय स्थितीत, कोणत्याही समयी, व कोठेही प्रार्थना करू शकतो. आपण मनात केलेल्या प्रार्थना देखील देव ऐकू शकतो. (१ शमुवेल १:१२, १३) आपल्या व्यक्‍तिगत प्रार्थना करण्यासाठी इतर लोकांपासून वेगळे असे एकांत ठिकाण शोधणे बरे असेल.—मार्क १:३५.

. तुम्ही कोणकोणत्या गोष्टींविषयी प्रार्थना करू शकता? त्याच्या सोबतच्या तुमच्या मित्रत्वावर प्रभाव पाडू शकतील अशा कोणत्याही गोष्टीविषयी तुम्ही प्रार्थना करू शकता. (फिलिप्पैकर ४:६, ७) आदर्श प्रार्थना दाखवून देते, की आपण यहोवाचे नाव आणि त्याचे उद्देश यांबद्दल प्रार्थना केली पाहिजे. आपल्या भौतिक गरजा पुरवण्याविषयी, आपल्या पापांची क्षमा होण्याविषयी व प्रलोभनांचा प्रतिकार करण्याविषयी देखील आपण मदत मागू शकतो. (मत्तय ६:९-१३) आपल्या प्रार्थना स्वार्थी नसाव्यात. देवाच्या इच्छेनुरूप असणाऱ्‍या गोष्टींबद्दलच केवळ आपण प्रार्थना केली पाहिजे.—१ योहान ५:१४.

. तुम्हाला जेव्हाजेव्हा देवाचे आभार मानण्यास किंवा त्याची स्तुती करण्यास इच्छा होते तेव्हातेव्हा तुम्ही त्याला प्रार्थना करू शकता. (१ इतिहास २९:१०-१३) तुमच्या समोर समस्या येतात तेव्हा व तुमच्या विश्‍वासाची परीक्षा घेतली जात असते तेव्हाही तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. (स्तोत्र ५५:२२; १२०:१) भोजन करण्याआधी प्रार्थना करणे उचित आहे. (मत्तय १४:१९) यहोवा आपल्याला “सर्व प्रसंगी” प्रार्थना करण्याचे आमंत्रण देतो.—इफिसकर ६:१८.

. विशेषपणे आपण, एखादे गंभीर पाप केल्यास प्रार्थना केली पाहिजे. अशा वेळी आपण यहोवाच्या दयेची आणि क्षमेची याचना केली पाहिजे. आपण त्याला आपल्या पापांची कबुली दिली व त्यांची पुनरावृत्ती न करण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केल्यास देव ‘क्षमा करण्यास तयार’ असतो.—स्तोत्र ८६:५; नीतिसूत्रे २८:१३.

. यहोवा केवळ धार्मिक लोकांच्या प्रार्थना ऐकतो. देवाने तुमच्या प्रार्थना ऐकाव्यात असे तुम्हाला वाटत आहे तर त्याच्या नियमांप्रमाणे जगण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. (नीतिसूत्रे १५:२९; २८:९) प्रार्थना करताना तुम्ही नम्र असले पाहिजे. (लूक १८:९-१४) तुम्ही जशी प्रार्थना करता तसेच जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याद्वारे तुम्हाठायी विश्‍वास आहे आणि तुम्ही जे काही म्हणता त्याप्रमाणे कार्य करता हे शाबीत कराल. तेव्हाच काय यहोवा तुमच्या प्रार्थना ऐकेल.—इब्री लोकांस ११:६.