व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ख्रिस्त कोण आहे?

येशू ख्रिस्त कोण आहे?

पाठ ३

येशू ख्रिस्त कोण आहे?

येशूला देवाचा “ज्येष्ठ” पुत्र का म्हटले आहे? (१)

त्याला “शब्द” का म्हटले आहे? (१)

येशू पृथ्वीवर मानव म्हणून का आला? (२-४)

त्याने चमत्कार का केले? (५)

येशू नजीकच्या भवितव्यात काय करणार आहे? (६)

. पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गामध्ये आत्मिक व्यक्‍ती होता. तो देवाची पहिली सृष्टी होता आणि म्हणूनच त्याला देवाचा “ज्येष्ठ” पुत्र असे म्हटले आहे. (कलस्सैकर १:१५; प्रकटीकरण ३:१४) देवाने स्वतः निर्माण केलेला येशू हा एकमेव पुत्र आहे. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील इतर सर्व गोष्टी निर्माण करताना यहोवाने “कुशल कारागीर” या नात्याने मानवपूर्व येशूचा उपयोग केला. (नीतिसूत्रे ८:२२-३१; कलस्सैकर १:१६, १७) देवाने, आपला प्रमुख प्रवक्‍ता या नात्याने देखील त्याचा उपयोग केला. म्हणूनच, येशूला “शब्द” असे संबोधले आहे.—योहान १:१-३; प्रकटीकरण १९:१३.

. देवाने आपल्या पुत्राच्या जीवनाचे मरियाच्या गर्भाशयात स्थलांतर करून त्याला पृथ्वीवर पाठवले. यास्तव त्याचा मानवी पिता नव्हता. म्हणूनच त्याला कोणतेही पाप किंवा अपरिपूर्णता वारशाने प्राप्त झाली नाही. देवाने तीन कारणांसाठी येशूला पृथ्वीवर पाठवले: (१) देवाविषयीचे सत्य आपल्याला शिकवण्यासाठी (योहान १८:३७), (२) परिपूर्ण सत्त्वनिष्ठा राखण्यासाठी व आपल्या अनुसरणासाठी आदर्श घालून देण्यासाठी, (१ पेत्र २:२१) व (३) पाप आणि मृत्यूतून आपली सुटका व्हावी म्हणून त्याचे जीवन अर्पण करण्यासाठी. याची काय आवश्‍यकता होती?—मत्तय २०:२८.

. देवाची आज्ञा मोडून पहिला मानव आदाम याने बायबल ज्याला “पाप” म्हणते ते केले. म्हणून देवाने त्याला मृत्युदंड दिला. (उत्पत्ति ३:१७-१९) आता तो देवाच्या दर्जांनुरूप नसल्यामुळे परिपूर्ण राहिला नाही. कालांतराने तो म्हातारा होऊन मरण पावला. आदामाने त्याच्या सर्व संततीला वारशाने पाप दिले. म्हणूनच तर आपण म्हातारे होतो, आजारी पडतो आणि मग मरण पावतो. मानवजातीचा बचाव कसा होणार होता?—रोमकर ३:२३; ५:१२.

. येशू आदामासारखाच परिपूर्ण मानव होता. परंतु एका गोष्टीत तो आदामासारखा नव्हता, तो सर्वात मोठ्या परीक्षेत देवाच्या पूर्ण आज्ञेत राहिला. म्हणूनच, आदामाच्या पापांची भरपाई करण्यासाठी तो आपल्या परिपूर्ण जीवनाचे अर्पण देऊ शकला. यालाच बायबल “खंडणी” म्हणते. अशा प्रकारे आदामाची मुले मृत्यूच्या दंडापासून मुक्‍त होऊ शकत होती. येशूवर विश्‍वास ठेवणारे सर्व जण त्यांच्या पापातून मुक्‍त होऊन सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतात.—१ तीमथ्य २:५, ६; योहान ३:१६; रोमकर ५:१८, १९.

. पृथ्वीवर असताना येशूने रोग्यांना बरे केले, भुकेलेल्यांना खाऊ घातले आणि वादळाला शांत केले. त्याने मेलेल्यांनाही जिवंत केले. त्याने हे चमत्कार का केले? (१) पीडित लोकांबद्दल त्याला दया वाटली, व तो त्यांना मदत करू इच्छित होता. (२) तो देवाचा पुत्र होता हे त्याच्या चमत्कारांनी शाबीत केले. (३) पृथ्वीवर तो राजा या नात्याने राज्य करील तेव्हा आज्ञाधारक मानवजातीसाठी तो काय करील हे त्या चमत्कारांनी दाखवले.—मत्तय १४:१४; मार्क २:१०-१२; योहान ५:२८, २९.

. येशूचा मृत्यू झाला व देवाने त्याला आत्मिक प्राणी या नात्याने पुनरुत्थित केले आणि तो पुन्हा स्वर्गात गेला. (१ पेत्र ३:१८) तेव्हापासून देवाने त्याला राजा बनवले आहे. लवकरच येशू या पृथ्वीवरून सर्व दुष्टाई आणि दुःख काढून टाकणार आहे.—स्तोत्र ३७:९-११; नीतिसूत्रे २:२१, २२.

[७ पानांवरील चित्रं]

येशूच्या सेवाकार्यात शिक्षण देणे, चमत्कार करणे तसेच आपल्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणे समाविष्ट होते