व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आम्ही “शेवटल्या दिवसात” आहोत हे कसे जाणतो

आम्ही “शेवटल्या दिवसात” आहोत हे कसे जाणतो

भाग ९

आम्ही “शेवटल्या दिवसात” आहोत हे कसे जाणतो

१, २. आम्ही शेवटल्या दिवसात आहोत हे आम्हाला कसे कळू शकते?

 देवाचे राज्य सद्य मानवी शासनाच्या व्यवस्थीकरणाविरूद्ध कारवाई करील अशा समयात आम्ही जगत आहोत याची खात्री आम्हाला कशी मिळू शकते? दुष्टता व दुःखाला देव काढून टाकील त्या वेळेच्या आम्ही अगदी समीप आलो आहोत हे आम्हाला कसे माहीत होऊ शकते?

येशूच्या शिष्यांना या गोष्टी माहीत करून घ्यावयाच्या होत्या. तो राज्यसत्तेत येईल तेव्हा त्याच्या उपस्थितीचे तसेच “युगाच्या समाप्तीचे” काय “चिन्ह” असेल हे त्यांनी विचारले. (मत्तय २४:३) येशूने याचे उत्तर, जगास हादरविणाऱ्‍या घटनांचे तसेच मानवजातीने या व्यवस्थिकरणाच्या “अंत समया”त, “शेवटल्या काळा”त प्रवेश केला त्या परिस्थितीच्या सविस्तर वर्णनाने दिले. (दानीएल ११:४०; २ तीमथ्य ३:१) आम्ही या शतकात ते संयुक्‍त चिन्ह पाहिले का? होय. ते मोठ्या प्रमाणात आम्ही पाहत आहोत!

जागतिक युद्धे

३, ४. ह्‍या शतकातील युद्धे येशूच्या भविष्यवाणीसोबत कशी जुळतात?

येशूने भाकित केले ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.’ (मत्तय २४:७) १९१४ मध्ये जग एका युद्धात गुंतले व त्याने राष्ट्रांना व राज्यांना एकत्र जमविले गेल्याचे पाहिले व हे या आधीच्या कोणत्याही युद्धापासून वेगळे होते. या वास्तविकतेला अनुसरुन इतिहासकारांनी त्याला पहिले महायुद्ध म्हटले. इतिहासातील याप्रकारचे ते पहिलेच युद्ध होते, पहिले महायुद्ध. या पूर्वीच्या कोणत्याही युद्धात या युध्दाप्रमाणे २,००,००,००० सैनिकांनी व नागरिकांनी आपला जीव गमावला नाही.

पहिल्या जागतिक युद्धाने शेवटल्या काळाची सुरवात केली. येशूने म्हटले ही व इतर घटना “वेदनांचा प्रारंभ” असतील. (मत्तय २४:८) हे सत्य शाबीत झाले कारण दुसरे महायुद्ध यापेक्षाही अधिक प्राणघातक होते. त्यात सुमारे ५,००,००,००० सैनिक व नागरिकांनी जीव गमावला. या २०व्या शतकात १०,००,००,००० पेक्षा अधिक लोक युद्धात मारले गेले, हे या पूर्वीच्या ४०० वर्षांमध्ये झालेल्या युद्धांना एकत्रित केल्यावर चार पटीने अधिक जास्त आहे! मानवी सत्तेचा केवढा प्रचंड हा दोष!

इतर पुरावे

५-७. आम्ही शेवटल्या दिवसात आहोत याचे इतर काही कोणते पुरावे आहेत?

येशूने इतर काही चिन्हांचा समावेश केला ज्या शेवटल्या दिवसांसोबत जुळतात. “मोठे भूमिकंप, जागोजागी दुष्काळ व मऱ्‍या [आजारी पीडा] होतील.” (लूक २१:११) हे १९१४ पासून घडणाऱ्‍या घटनांना जुळते, कारण त्या संकटापासून विपत्तिमध्ये अतिशय वाढ झालेली आहे.

पुष्कळांचे प्राण घेत, मोठे भूमिकंप नियमित घडतात. स्पॅनिश इन्फ्लूएन्झा या एकट्या रोगाने पहिल्या महायुध्दानंतर २,००,००,००० लोकांचा बळी घेतला—काही अंदाजानुसार हे बळी ३,००,००,००० किंवा याहीपेक्षा अधिक आहेत. एडस्‌ने लाखोंचा जीव घेतला आणि नजीकच्या भवितव्यात आणखी लाखोंचे घेईल. प्रत्येक वर्षी लाखो लोक हृदय विकार, कर्करोग, आणि इतर अशा रोगामुळे मरण पावतात. लाखो लोक भूकेने मरतात. १९१४ पासून ‘प्रकटीकरणाचे घोडेस्वार,’ त्यांच्या युद्ध, अन्‍नटंचाई आणि दुसऱ्‍या काही रोगांमुळे मानवी कुटुंबाच्या अनेकांना ठार मारत आहे यात शंका नाही.—प्रकटीकरण ६:३-८.

सर्व राष्ट्रात अनुभवल्या जाणाऱ्‍या वाढत्या गुन्हेगारीबद्दलही येशूने भाकित केले. तो म्हणाला: “अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.”—मत्तय २४:१२.

८. दुसरे तीमथ्य ३ अध्यायातील भविष्यवाणी आमच्या काळास कशी लागू होते?

पुढे, पवित्र शास्त्र भविष्यवाणीने भाकित केल्यानुसार आजच्या जगात नैतिक दर्जे ढासळल्याचे स्पष्ट दिसत आहे: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. कारण मनुष्ये स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ निंदक आईबापांस न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाड, असंयमी, क्रुर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्‍वासघातकी, हूड, मंदाध, देवावर प्रेम न करता विषयावर प्रेम करणारी, सुभक्‍तिचे केवळ स्वरुप दाखवून स्वत:वर तिचा संस्कार नाही, . . . दुष्ट व भोंदू मनुष्ये दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य ३:१-१३) आमच्या डोळ्यांदेखत हे सर्व पूर्ण होत आहे.

आणखी पुरावे

९. स्वर्गात असे काय घडले जे, पृथ्वीवरील शेवटल्या काळच्या आरंभाला घडलेल्या गोष्टींशी जुळणारे दिसले?

ह्‍या युगात वाढत्या दु:खाला आणखी एक कारण कारणीभूत आहे. १९१४ मध्ये शेवटल्या काळाबरोबर जुळणाऱ्‍या काही गोष्टीने मानवजातीस आणखी धोक्यात टाकले आहे. त्या वेळी पवित्र शास्त्रातील शेवटच्या पुस्तकातील एक भविष्यवाणी असे म्हणते: “तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मीखाएल [येशू ख्रिस्त त्याच्या स्वर्गीय अधिकारात] व त्याचे दूत अजगराबरोबर [सैतान] युद्ध करण्यास निघाले. आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत [दुरात्मे] लढले. तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला, सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्‍याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:७-९.

१०, ११. सैतान व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवर टाकण्यात आल्यामुळे मानवजातीवर काय परिणाम झाला?

१० मानवी कुटुंबावर याचे कोणते परिणाम घडले? ती भविष्यवाणी पुढे म्हणते: “पृथ्वी व समुद्र यांवर अनर्थ ओढवला आहे. कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरुन तुम्हांकडे गेला आहे.” होय, सैतानाला हे ठाऊक आहे की त्याचे व्यवस्थीकरण त्याच्या विनाशाच्या नजीक जात आहे, म्हणून तो व त्याचे जग नाहीसे होण्याआधी होता होईल तितक्या मानवांना देवाच्या विरुद्ध करण्याचा अटोकाट प्रयत्न तो करीत आहे. (प्रकटीकरण १२:१२; २०:१-३) ते आत्मिक प्राणी किती हिणकस आहेत, कारण त्यांनी त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला! विशेषेकरुन १९१४ पासून त्यांच्या प्रभावामुळे पृथ्वीवर किती भयानक परिस्थिती झाली आहे!

११ यास्तव जेव्हा येशूने आमच्या काळाबद्दल म्हटले त्यात काही आश्‍चर्य नाही की, “राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचांत पडतील. भयाने व जगावर येणाऱ्‍या गोष्टीची वाट पाहण्याने मनुष्ये मूर्च्छिंत होतील.”—लूक २१:२५, २६.

मानवी व दुरात्म्यांच्या शासनाचा अंत नजीक

१२. युगाच्या समाप्तीआधी बाकीच्या भविष्यवाण्यातील कोणत्या एका शेवटल्या भविष्यवाणीची पूर्णता होईल?

१२ देव सद्य व्यवस्थिकरणाचा नाश करण्याआधी पवित्र शास्त्राच्या किती भविष्यवाण्यांची पूर्णता अजून बाकी आहे? फारच कमी! शेवटच्या भविष्यवाणीतील एक, १ थेस्सलनीकाकरास ५:३ मधील आहे, जेथे म्हटले आहे: “‘शांती आहे, निर्भय आहे,’ असे ते म्हणत आहेत, तेव्हाच त्याजवर अकस्मात नाश येतो.” (द न्यू इंग्लिश बायबल) ह्‍यावरुन असे दिसते की ह्‍या युगाची समाप्ती “ते म्हणत आहेत” तेव्हा सुरु होईल. मानवांचे लक्ष शांती व निर्भयतेच्या आशेकडे लागलेले असेल तेव्हा जगावर आकस्मिक असा नाश कोसळेल.

१३, १४. येशूने कोणत्या विपत्तीबद्दल भाकित केले, व याची समाप्ती कशी होईल?

१३ सैतानाच्या प्रभावाखालच्या ह्‍या जगासाठी वेळ फार कमी होत आहे. लवकरच त्याचा नाश केला जाईल व अशी विपत्ति त्यांच्यावर येईल, ज्याच्याविषयी येशूने म्हटले: “जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही, असे मोठे संकट त्या काळी येईल.”—मत्तय २४:२१.

१४ “मोठे संकट” याचा कळस आर्मगिदोनाची देवाची लढाई असेल. त्याच वेळेबद्दल दानीएल संदेष्ट्याने म्हटले की देव “या सर्व राज्यांचे चूर्ण करुन त्यांस नष्ट करील.” याचा अर्थ असा होतो की, देवापासून स्वतंत्र अशा सर्व सद्य मानवी सत्ता यांचा नाश घडेल. मग स्वर्गातून त्याचे राज्य शासन, सर्व मानवी घडामोडींचा पूर्ण ताबा आपल्या हाती घेईल. यापुढे, दानीएलाने म्हटले त्याप्रमाणे राज्य करण्याचा अधिकार “दुसऱ्‍याच्या हाती” कधीही दिला जाणार नाही.—दानीएल २:४४; प्रकटीकरण १६:१४-१६.

१५. सैतान व त्याच्या दुरात्म्यांच्या प्रभावाला काय होईल?

१५ त्या वेळेला सर्व सैतानी व दुष्टात्म्यांचा प्रभाव थांबविला जाईल. त्या बंडखोर आत्मिक प्राण्यांना मार्गावरुन हटविले जाईल, जेणेकडून ते “राष्ट्रांस आणखी ठकवू” शकणार नाहीत. (प्रकटीकरण १२:९; २०:१-३) त्यांना मृत्युची शिक्षा ठोठावली आहे व ते नाशासाठी थांबलेले आहेत. त्यांच्या हिणकस प्रभावापासून मुक्‍त होण्याची मानवजातीसाठी ती केवढी सुटका असेल!

कोणाचा बचाव होईल? कोणाचा होणार नाही?

१६-१८. युगाच्या अंतापासून कोणाचा बचाव होईल, व कोणाचा होणार नाही?

१६ या जगाविरुद्ध देवाचे न्यायदंड बजावले जातील तेव्हा कोणाचा बचाव होईल? कोणाचा होणार नाही? पवित्र शास्त्र दाखवते की, ज्यांना देवाचे शासन हवे त्यांना सुरक्षित ठेवले व वाचविले जाईल. ज्यांना देवाचे राज्य नको त्यांचा बचाव होणार नाही, तर सैतानाच्या जगाबरोबर नाश केला जाईल.

१७ नीतीसूत्रे २:२१, २२ म्हणते: “कारण सरळ जनच [देवाच्या राजवटीच्या अधीन राहणारे] देशात वस्ती करतील. सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा [देवाच्या राजवटीच्या अधीन न राहणारे] देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल.”

१८ स्तोत्रसंहिता ३७:१०, ११ असेही म्हणते: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल . . . लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.” २९ वचन पुढे म्हणते: “धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील, तीत ते सर्वदा वास करतील.”

१९. कोणता सल्ला आम्ही हृदयात घेतला पाहिजे?

१९ स्तोत्रसंहिता ३७:३४ मध्ये दिलेल्या सल्ल्याला हृदयाला लावून घेतले पाहिजे, जेथे म्हटले आहे: “परमेश्‍वराची [यहोवा न्यू.व] प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.” वचन ३७ व ३८ म्हणते: “सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा. शांतीप्रिय मनुष्याची वंशपरंपरा राहील. पातकी तर एकंदरीने नष्ट होतील. दुर्जनांचा वंश छेदिला जाईल.”

२०. आम्ही ज्या काळात जगत आहोत तो उत्साहवर्धक आहे असे आम्ही का म्हणू शकतो?

२० देव खरोखरच आपली काळजी करतो व तो लवकरच सर्व दुष्टाई व दु:खाचा अंत करणार आहे हे जाणणे किती सांत्वनदायक, होय, प्रेरक आहे! ह्‍या वैभवी भविष्यवाण्यांची पूर्णता फार लवकर होईल हे जाणणे किती उत्साहवर्धक आहे!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्रं]

पवित्र शास्राने अशा घटनांविषयी भाकित केले जे शेवटल्या काळचे “चिन्ह” बनते

[२२ पानांवरील चित्रं]

लवकरच, आर्मगिदोनात जे देवाच्या शासनाधीन होत नाहीत त्यांचा उच्छेद केला जाईल. जे शासनाधीन होतील त्यांना एका धार्मिक नव्या जगात सुरक्षित ठेवले जाईल