व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इच्छा स्वातंत्र्याची विस्मयकारक देणगी

इच्छा स्वातंत्र्याची विस्मयकारक देणगी

भाग ५

इच्छा स्वातंत्र्याची विस्मयकारक देणगी

१, २. कोणते सर्वोत्तम बक्षीस आमच्या घडणीचा एक भाग आहे?

 देवाने दु:खाला परवानगी का दिली, व याविषयी तो काय करणार आहे हे समजण्यासाठी, आम्हाला त्याने कसे बनविले याबद्दल गुणग्राहकता दाखवली पाहिजे. त्याने आमची सृष्टी केवळ एक शरीर व मेंदू देऊनच केली नाही. त्याने आम्हाला विशेष मानसिक व भावनिक गुणांसहित निर्माण केले आहे.

आमच्या मानसिक व भावनिक घडणीचा मुख्य भाग आहे इच्छा स्वातंत्र्य. होय देवाने आमच्यामध्ये निवड करण्याच्या स्वातंत्र्याची नैसर्गिक शक्‍ति खोलवर रुजवली आहे. त्याच्याकडून ती खरोखरच एक सर्वोच्च देणगी आहे.

आम्हाला कसे बनविले गेले

३-५. इच्छा स्वातंत्र्याची आम्ही गुणग्राहकता का बाळगतो?

इच्छा स्वातंत्र्य देवाने दु:खाला दिलेल्या परवानगीत कसे गोवलेले आहे ते आपण पाहू या. प्रथमत:, याचा विचार करा: तुम्ही काय करणार व बोलणार, तुम्ही काय खाणार व कोणते कपडे घालणार, कोणत्या प्रकारचे काम तुम्ही करणार, तसेच तुम्ही कोठे व कसे राहता या सर्वांची निवड करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या स्वातंत्र्याची गुणग्राहकता बाळगता का? किंवा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर व कृतीवर कोणीतरी हुकुमशाही केलेली आवडेल?

कोणत्याही साधारण व्यक्‍तिला त्याच्या जीवनावरचा ताबा पूर्णपणे हिरावून घेतलेला आवडणार नाही. असे का बरे? कारण देवाने आम्हाला तशाप्रकारे बनविले आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने मानवाला त्याच्या “प्रतिरुपाचा व सदृश्‍य” असे बनविले आहे आणि देवाच्या स्वत:च्या नैसर्गिक शर्क्‍तिमधील एक, निवड करण्याचे स्वातंत्र्य हे आहे. (उत्पत्ती १:२६; अनुवाद ७:६) त्याने मानवाला बनविले, तेव्हा हीच नैसर्गिक शक्‍ति—इच्छा स्वातंत्र्याची देणगी दिली. आणि म्हणूनच निष्ठुर शासकांच्या दास्यत्वात राहिल्यामुळे आम्हाला निराश का वाटते त्याचे हे एक कारण आहे.

यास्तव, स्वातंत्र्याची इच्छा ही आकस्मिक घटना नाही, कारण देव स्वातंत्र्याचा देव आहे. पवित्र शास्त्र म्हणते: “जेथे प्रभूचा [यहोवा न्यू.व] आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.” (२ करिंथकर ३:१७) यास्तव, आपल्या घडणीचा एक भाग म्हणून देवाने इच्छा स्वातंत्र्य दिले. त्याला आपले मन व भावना कसे काम करतील याविषयी माहीत होते व ह्‍यामुळे आम्ही इच्छा स्वातंत्र्यानेच आनंदी होऊ शकू हेही त्याला ठाऊक होते.

६. इच्छा स्वातंत्र्यानुसार चालण्यासाठी देवाने आमच्या मेंदूला कसे निर्माण केले?

इच्छा स्वातंत्र्याबरोबर देवाने आम्हाला विचार करण्याची, परिस्थितीला तोलण्याची, निर्णय करण्याची, आणि बरोबर व चूक हे ओळखण्याची क्षमता दिली आहे. (इब्रीकर ५:१४) म्हणूनच, इच्छा स्वातंत्र्य बुद्धिमान निवडीवर अवलंबून असणे आवश्‍यक होते. आम्हाला निर्बुद्ध यंत्रमानवांप्रमाणे बनवलेले नाही, ज्यांना स्वत:ची कोणतीच इच्छा नसते. याचप्रमाणे प्राण्यांप्रमाणे उपजतबुद्धिने काम करण्यासाठी आमची सृष्टी केली नाही. उलट, आमचा उत्कृष्ट मेंदू आमच्या इच्छा स्वातंत्र्याच्या एकोप्यात काम करण्यासाठी रचला गेला होता.

एक उत्तम सुरवात

७, ८. आमच्या पहिल्या पालकांना देवाने कोणती एक उत्तम सुरवात दिली?

देव किती काळजी घेणारा आहे हे दाखवण्यासाठी, आमच्या पहिल्या पालकांना, आदाम व हव्वेला, इच्छा स्वातंत्र्य यासोबत एखाद्याला जे लागते ते सर्वकाही दिले होते. त्यांना एका मोठ्या उद्यानासारख्या नंदनवनात ठेवले होते. त्यांना भौतिक गोष्टी विपुलतेत होत्या. त्यांचे शरीर व मन परिपूर्ण होते, व यामुळे ते म्हातारे होऊन किंवा आजारी पडून मरण पावले नसते—ते अनंतकाळासाठी जिवंत राहिले असते. त्यांना परिपूर्ण मुले झाली असती व त्यांचेही आनंदी, अनंतकाळचे भविष्य असते. तसेच विस्तृत होत जाणाऱ्‍या लोकसंख्येला पृथ्वीचे रुपांतर नंदनवनात करण्याचे समाधानकारक काम मिळाले असते.—उत्पत्ती १:२६-३०; २:१५.

जे काही पुरविले होते त्याविषयी पवित्र शास्त्र म्हणते: “आपण निर्माण केलेले सर्व बहुत चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ती १:३१) पवित्र शास्त्र देवाबद्दल असेही म्हणते: “त्याची कृती अव्यंग आहे.” (अनुवाद ३२:४) होय, सृष्टिकर्त्याने मानवजातीला एक उत्तम सुरुवात दिली. यापेक्षा दुसरी सुरुवात उत्तम अशी ठरु शकली नसती. तो किती काळजी घेणारा देव ठरला!

चाकोरीतील स्वातंत्र्य

९, १०. इच्छा स्वातंत्र्याला योग्य शिस्त का लावली पाहिजे?

तथापि, देवाने इच्छा स्वातंत्र्य अमर्यादित असण्याचे उद्देशिले का? कल्पना करा, वाहतुकीच्या कायद्याविना एक गजबजलेले शहर, जेथे सर्वजण कोणत्याही दिशेने कोणत्याही वेगाने वाहने चालवू शकतात. अशा अटींवर तुम्हाला आपले वाहन चालवायला आवडेल का? नाही, तेथे कायद्याचा गोंधळ असेल व परिणामी नक्कीच पुष्कळ दुर्घटना होतील.

१० देवाच्या इच्छा स्वातंत्र्याच्या देणगीचे असेच आहे. चाकोरी बाहेरील स्वातंत्र्य म्हणजे समाजात गोंधळ. मानवी कार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियमांची गरज आहे. देवाचे वचन म्हणते: “आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करिता तुम्ही स्वतंत्र असे असा.” (१ पेत्र २:१६, जे.बी.) सार्वजनिक कल्याणासाठी स्वातंत्र्याचे नियम असावेत अशी देवाची इच्छा आहे. त्याने आमच्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य नव्हे तर कायद्यांच्या नियमांना अधीन राहणारे सापेक्ष स्वातंत्र्य उद्देशिले आहे.

कोणाचे नियम?

११. कोणाच्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्हाला बनवले आहे?

११ कोणाच्या नियमांचे पालन आम्ही करावे अशी योजना होती? १ पेत्र २:१६ (जे.बी.) वचनाच्या दुसऱ्‍या भागात म्हटले आहे: “तुम्ही दास इतर कोणाचे नव्हे तर देवाचे आहा.” याचा अर्थ जुलमी दास्यत्व असा होत नाही. परंतु, त्याचा अर्थ होतो की, आम्हाला देवाच्या नियमांच्या अधीन राहिल्याने आनंद मिळेल असे बनवलेले होतो. (मत्तय २२:३५-४०) मानवाने कल्पिलेल्या नियमांपेक्षा त्याचे नियम सर्वोत्तम मागदर्शन पुरवितात. “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर [यहोवा न्यू.व] तुझा देव तुला शिकवितो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.

१२. देवाच्या नियमांच्या आत कोणत्या निवडीचे स्वातंत्र्य आम्हाला आहे?

१२ याबरोबरच, देवाचे नियम चाकोरीच्या आत निवड करण्याच्या अमाप स्वातंत्र्याला परवानगी देतात. ह्‍याचा परिणाम विविधतेत व मानवी कुटुंबाला मोहक बनविण्यात होतो. जगातील अन्‍नाची, वस्त्रांची, संगीत, कला व घरे यांच्यातील विविधतेचा विचार करा. अशा बाबतीत आपल्यासाठी कोणा इतराने निर्णय घेण्यापेक्षा आम्हाला आमची निवड करण्यासाठी आवडेल.

१३. आमच्या कल्याणाकरिता कोणत्या नैसर्गिक नियमांचे पालन आम्ही केले पाहिजे?

१३ या कारणास्तव, मानवी वर्तणूकीसाठी देवाच्या नियमांच्या अधीन असल्याने आम्ही आनंदी व्हावे असे आम्हाला बनवले आहे. ही गोष्ट देवाच्या नैसर्गिक नियमांच्या अधीन होण्यासारखेच आहे. उदाहरणार्थ, गुरूत्वाकर्षणाच्या नियमांकडे आम्ही दुर्लक्ष केले व एका उंच ठिकाणाहून उडी टाकली, तर आम्हाला दुखापत होईल व कदाचित मारले जाऊ. आम्ही जर आमच्या शरीराबद्दलच्या अन्तर्गत नियमांचे उल्लंघन केले आणि अन्‍न खाण्यास, पाणी पिण्यास, वा श्‍वासोच्व्छास करण्यास थांबविले तर आम्ही मरुन जाऊ.

१४. मानवांना देवापासून स्वतंत्र निर्मिले नाही हे आम्हाला कसे माहीत होते?

१४ जसे आम्हाला देवाच्या नैसर्गिक नियमांच्या अधीन असण्याच्या गरजेसह निर्माण केले आहे तितकेच आम्हाला देवाच्या नैतिक व सामाजिक नियमांच्याही अधीन असण्यासाठी निर्मिले गेले आहे. (मत्तय ४:४) मानवांना त्यांच्या निर्माणकर्त्यापासून स्वतंत्र राहून यशस्वी होण्यासाठी निर्माण केले नाही. यिर्मया संदेष्ट्याने म्हटले: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही, हे परमेश्‍वरा [यहोवा न्यू.व] मला शिक्षा कर.” (यिर्मया १०:२३, २४) अशा प्रकारे, प्रत्येक मार्गाने मानवांना त्यांच्याच विचारानुसार नव्हे तर देवाच्या शासनाखाली अधीनतेत राहण्यासाठी बनविले आहे.

१५. आदाम व हव्वेला देवाचे नियम फार कठीण होणार होते का?

१५ आमच्या पहिल्या पालकांना देवाच्या नियमांच्या अधीन राहणे एवढे कठीण नव्हते. उलट, त्यामुळे त्यांचे व संपूर्ण मानवी कुटुंबाचे कल्याण झाले असते. पहिले जोडपे देवाच्या नियमांच्या चाकोरीत राहिले असते तर सर्व काही ठीक झाले असते. आम्ही कदाचित, एका सुंदर नंदनवनात प्रेमळ व एकवटलेले मानवी कुटुंब या नात्याने जिवंत राहिलो असतो! येथे दुष्टाई, दु:ख व मरण नसते.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्रं]

सृष्टिकर्त्याने मानवांना एक उत्तम सुरवात दिली

[१२ पानांवरील चित्रं]

जेथे वाहतुकीचे नियम नाहीत अशा रस्त्यावर तुम्हाला वाहन चालवायला आवडेल का?