व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दु:खातून मुक्‍त अशी पृथ्वी

दु:खातून मुक्‍त अशी पृथ्वी

भाग २

दु:खातून मुक्‍त अशी पृथ्वी

१, २. अनेक लोकांचे कोणते वेगवेगळे दृष्टिकोन आहेत?

 तथापि, जगातील लाखो लोकांचा वेगळाच दृष्टीकोन आहे. ते मानवजातीसाठी एक विस्मयकारक भवितव्य पाहत आहेत. ते म्हणतात की ह्‍याच पृथ्वीवर दु:ख व दुष्टता यातून पूर्णपणे मुक्‍त असे हे जग होणार आहे. जे वाईट आहे ते लवकरच काढून संपूर्णतया एका नव्या जगाची स्थापना केली जाईल असा आत्मविश्‍वास ते बाळगतात. ह्‍या नव्या जगाचा पाया आता घातला जात आहे असेही ते म्हणतात!

या लोकांचा विश्‍वास आहे की ते नवे जग युद्ध, निष्ठुरता, हिंसा, अन्याय, व गरिबी या पासून मुक्‍त असेल. त्या जगात आजार, दु:ख, अश्रु व मरण हेही नसणार. त्यावेळेस लोक पूर्णतेप्रत पोंहचतील आणि पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळ आनंदात जगतील. होय, जे मरण पावलेले आहेत त्यांचे पुनरुत्थान होऊन त्यांनाही अनंतकाळ जगण्याची संधी प्राप्त होईल!

३, ४. ह्‍या व्यर्क्‍तिना त्यांच्या दृष्टिकोनाची एवढी खात्री का वाटते?

भवितव्यातील हा दृष्टीकोन केवळ एक स्वप्न, काल्पनिक विचार आहेत का? नाही, निश्‍चितच नाही. हे येणारे नंदनवन अपरिहार्य अशा मजबूत विश्‍वासावर आधारीत आहे. (इब्रीकर ११:१) त्यांना एवढी खात्री का वाटते? कारण ह्‍या विश्‍वाच्या सर्वशक्‍तिमान सृष्टिकर्त्याने हे अभिवचन दिले आहे.

देवाच्या अभिवचनांविषयी, पवित्र शास्त्र असे म्हणते: “आपला देव [यहोवा न्यू.व.] याने आपल्यासंबंधाने ज्या ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही कमी पडली नाही. त्या सर्व तुम्हासंबंधाने झाल्या, एकही गोष्ट कमी पडली नाही.” “देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी . . . तो बोलला तसे तो करावयाचा नाही काय? भाक देऊन ती तो पुरी करावयाचा नाही काय?” “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा न्यू.व] शपथ वाहून म्हणाला आहे की, ‘मी कल्पिले तसे होईलच मी योजिले तसे घडेलच.’”—यहोशवा २३:१४; गणना २३:१९; यशया १४:२४.

५. कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याची गरज आहे?

तथापि, दु:खातून मुक्‍त अशा पृथ्वीवरील नंदनवनाचा देवाचा उद्देश होता तर मग त्याने पहिल्याच घटनेत वाईट गोष्टी घडण्यास परवानगी का दिली? जे चुकीचे आहे ते सुधरविण्यासाठी तो आजपर्यंत सहा हजार वर्षे का थांबून राहिला? दु:खाच्या त्या सर्व शतकांचा कदाचित असा अर्थ होता का की देवाला खरोखरच आपली काळजी नाही वा तो अस्तित्त्वातच नाही?

[अभ्यासाचे प्रश्‍न]