व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचा उद्देश पूर्णतेप्रत जातो

देवाचा उद्देश पूर्णतेप्रत जातो

भाग ८

देवाचा उद्देश पूर्णतेप्रत जातो

१, २. दुःखाला काढण्यासाठी देव कोणत्या योजना करीत आहे?

 बंडखोर मानवजातीच्या व दुरात्म्यांच्या शासनाने मानवी कुटुंबाला अनेक शतकांपासून फरफटत आणले आहे. तरीही देवाने आमच्या दु:खाकडे दुर्लक्ष केले नाही. परंतु, शतकांपासून तो मानवजातीला दुष्टाई व दु:खाच्या तावडीतून मुक्‍त करण्यासाठी तरतूद करत आहे.

एदेनातील बंडाळीच्या समयी, देव एक शासन बनविण्याच्या त्याच्या उद्देशास प्रकट करु लागला, जे सर्व लोकांसाठी ह्‍या पृथ्वीला नंदनवनासारखे एक घर बनवील. (उत्पत्ती ३:१५) यानंतर, देवाचा प्रमुख प्रतिनिधी, येशूने देवाच्या येणाऱ्‍या सरकाराला त्याच्या शिकवणीचा विषय बनविला. ते मानवजातीची एकमेव आशा असेल असे त्याने म्हटले.—दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०; १२:२१.

३. पृथ्वीवर येणाऱ्‍या सरकाराला येशूने काय संबोधले व का?

येशूने देवाच्या येणाऱ्‍या सरकाराला “स्वर्गाचे राज्य” असे संबोधिले, कारण ते स्वर्गातून राज्य करणार आहे. (मत्तय ४:१७) त्याने याला “देवाचे राज्य” असेही म्हटले कारण देव त्याचा जनक आहे. (लूक १७:२०) शतकांपासून देवाने त्याच्या लेखकांना ते सरकार कोणाचे मिळून बनेल व ते काय साध्य करील या सर्व भविष्यवाण्या लिहिण्यासाठी प्रेरित केले.

पृथ्वीचा नवा राजा

४, ५. येशू त्याचा मान्यताप्राप्त राजा होता हे देवाने कसे दाखविले?

देवाच्या राज्याचा राजा कोण असेल याविषयीच्या अनेक भविष्यवाण्यांची पूर्णता येशूने दोन हजार वर्षांपूर्वी केली. मानवजातीवर त्या स्वर्गीय सरकाराचा राजा म्हणून देवाच्या निवडीनुसार असणारा तोच ठरला. आणि त्याच्या मरणानंतर, देवाने येशूचे स्वर्गीय जीवनासाठी एक शक्‍तिशाली, अमर प्राणी असे पुनरुत्थान केले. त्याच्या पुनरुत्थानाला पुष्कळ साक्षी होते.—प्रे. कृत्ये ४:१०; ९:१-९; रोमकर १:१-४; १ करिंथकर १५:३-८.

येशू मग “देवाच्या उजवीकडे बसला.” (इब्रीकर १०:१२) तेथे देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून देव त्याला अधिष्ठित करीपर्यंत तो थांबून राहिला. यावेळी स्तोत्रसंहिता ११०:१ मधील भविष्यवाणीची पूर्णता झाली, जेथे देव त्याला म्हणतो: “तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”

६. देवाच्या राज्याचा राजा होण्यासाठी योग्य असल्याचे येशूने कसे दाखविले?

पृथ्वीवर असताना, येशूने दाखवले की तो ह्‍या स्थितीच्या योग्यतेचा आहे. छळाचा सामना करीत असताना सुद्धा, देवाला सात्विकता दाखवण्याची निवड त्याने केली. असे केल्यामुळे त्याने दाखवले की परिक्षेत असताना मनुष्य देवाला विश्‍वासू राहणार नाही असा सैतानाने केलेला दावा खोटा होता. येशू परिपूर्ण मानव, ‘शेवटला आदाम’ याने दाखवून दिले की परिपूर्ण मानवांना निर्माण करण्यात देवाने चूक केली नाही.—१ करिंथकर १५:२२, ४५; मत्तय ४:१-११.

७, ८. पृथ्वीवर असताना येशूने कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याने काय प्रदर्शित केले?

येशूने त्याच्या सेवकपणाच्या थोड्या काळात जे साध्य केले त्यापेक्षा चांगले इतर कोणा शासनकर्त्याने केले का? देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने येशूने रोग्यांना, लंगड्यांना, अंधळ्यांना, बहिऱ्‍यांना, व मुक्यांना बरे केले. त्याने मेलेल्यांनाही उठविले! तो राज्य अधिकारात येईल तेव्हा मानवजातीसाठी संपूर्ण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर काय करील हे त्याने छोट्या प्रमाणावर याचे प्रदर्शन करुन दाखवले.—मत्तय १५:३०, ३१; लूक ७:११-१६.

येशू पृथ्वीवर असताना त्याने इतकी काही चांगली कामे केली की त्याचा शिष्य योहान म्हणाला: “येशूने केलेली दुसरीही बहुत कृत्ये आहेत. ती सर्व एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्‍या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.”—योहान २१:२५. *

९. नम्र अंतःकरणाच्या लोकांनी येशूकडे का धाव घेतली?

येशूची लोकांवर गाढ प्रीती होती, तो दयाळु व कनवाळू होता. त्याने दीनांना व भाराक्रांत लोकांना मदत केली, परंतु जे धनवान किंवा उच्च पदावर आहेत त्यांच्यात तफावत केली नाही. “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व मजपासून शिका, म्हणजे तुमच्या जिवास विश्रांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे” या येशूच्या प्रेमळ निमंत्रणास प्रामाणिक अंतकरणाच्या लोकांनी प्रतिसाद दिला (मत्तय ११:२८-३०) देव-भिरु लोक त्याच्याकडे आले व त्याच्या शासनाची वाट पाहू लागले.—योहान १२:१९.

सह राजे

१०, ११. पृथ्वीवर शासन करण्यासाठी येशूसोबत कोण सहभाग घेतील?

१० मानवी सरकारांना जसे सह राज्यकर्ते असतात, तसेच देवाच्या स्वर्गीय राज्याचे देखील सह राजे आहेत. येशू व्यतिरिक्‍त दुसऱ्‍यांना पृथ्वीवर राज्य करण्यात सहभाग मिळणार कारण, येशूने त्याच्या निकटच्या सहकर्म्यांना अभिवचन दिले की ते त्याच्या बरोबर मानवजातीवर सहराजे या नात्याने राज्य करतील.—योहान १४:२, ३; प्रकटीकरण ५:१०; २०:६.

११ तद्वत, येशूसारखेच, मर्यादित संख्येच्या मानवांना देखील स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केले जाईल. ह्‍यांनी देवाचे राज्य बनलेले आहे जे मानवजातीसाठी चिरकाल आशीर्वाद देतील. (२ करिंथकर ४:१४; प्रकटीकरण १४:१-३) अशा प्रकारे अनेक काळापासून, मानवी कुटुंबाच्या सार्वकालिक आशीर्वादासाठी यहोवाने त्याच्या राज्याधिकाराचा पाया घालून ठेवला आहे.

स्वतंत्र शासनाचा अंत

१२, १३. देवाचे राज्य आता काय करण्यासाठी सज्ज झाले आहे?

१२ ह्‍या शतकात देवाने पृथ्वीवरील कारभारात प्रत्यक्षपणे हात घातला आहे. या माहितीपत्रकाच्या ९व्या भागात चर्चा केल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या अधीन देवाचे राज्य १९१४ला स्थापित झाले आणि आता ते सैतानाच्या संपूर्ण व्यवस्थेला चिरडून टाकण्यासाठी सज्ज झाले आहे. ते राज्य ख्रिस्ताच्या “शत्रूंवर प्रभूत्व कर”ण्यास तयार झाले आहे.—स्तोत्रसंहिता ११०:२.

१३ यासंबंधाने दानीएल २:४४ मधील भविष्यवाणी म्हणते: “त्या राजांच्या [आता अस्तित्वात असणाऱ्‍या] आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची [स्वर्गात] स्थापना करील त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभूत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही. [मनुष्याच्या शासनाला पुन्हा कधीही परवानगी दिली जाणार नाही] तर ते [देवाचे राज्य] या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—रिवाइज्ड स्टँडर्ड व्हर्शन.

१४. मानवाच्या शासनाचा अंत झाल्यावर त्याच्या परिणामस्वरुप काही आशीर्वाद कोणते येतील?

१४ देवाच्या सरकारापासून मुक्‍त असलेली सर्व सरकारे त्याच्या मार्गापासून दूर केली जातील व देवाचे राज्य पूर्णपणे पृथ्वीवर राज्य करील. ते स्वर्गातून राज्य करीत असल्यामुळे मानव त्याला भ्रष्ट करू शकणार नाहीत. त्याची शासन करण्याची शक्‍ती देवाकडे स्वर्गात प्रथम स्थानी असेल. देवाचे आधिपत्य पृथ्वीवर नियंत्रण ठेवत असल्यामुळे कोणालाही तेथून पुढे खोट्या धर्माकरवी किंवा असमाधानकारक मानवाचे तत्त्वज्ञान व राजकारणीय सिद्धान्ताकरवी पतभ्रष्ट केले जाणार नाही. यातील कोणत्याही गोष्टीला राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.—मत्तय ७:१५-२३; प्रकटीकरण अध्याय १७ ते १९.

[तळटीपा]

^ परि. 8 येशूच्या संपूर्ण जीवनाच्या माहितीसाठी वॉचटावर संस्थेने १९९१ मध्ये प्रकाशित केलेले द ग्रेटस्ट मॅन हू एव्हर लिव्हड हे पुस्तक पहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्रं]

नवीन जगात तो काय करील हे दाखविण्यासाठी येशूने पृथ्वीवर असताना आजाऱ्‍यांना बरे केले व मृतांना उठवले

[१९ पानांवरील चित्रं]

देवाचे राज्य त्याच्यापासून स्वतंत्रपणे अस्तित्वात असणाऱ्‍या सर्व प्रकारच्या शासनाचे चूर्ण करील