व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या निर्मितीचे आश्‍चर्यकारक नवे जग

देवाच्या निर्मितीचे आश्‍चर्यकारक नवे जग

भाग १०

देवाच्या निर्मितीचे आश्‍चर्यकारक नवे जग

१, २. आर्मगिदोन युद्धाच्या शुद्धिकरणानंतर काय होईल?

 देवाच्या आर्मगिदोन युद्धाच्या शुद्धिकरणानंतर काय? यानंतर एका नव्या वैभवी युगाची सुरुवात होईल. आर्मगिदोनातून बचावलेल्यांना देवाच्या शासनाला निष्ठावंतपणा शाबित केल्यामुळे, नव्या जगात प्रवेश दिला जाईल. मानवजातीतील कुटुंबांना देवाकडून आश्‍चर्यकारक फायदे मिळतील तेव्हा इतिहासाचा किती उत्साहवर्धक नवा काळ असेल!

ते निभावलेले लोक देवाच्या राज्याच्या मार्गदर्शनाखाली, एक नंदनवन बनविण्यास सुरवात करतील. त्यांची शक्‍ति निस्वार्थ कामासाठी वापरली जाईल, जिचा फायदा सर्व जिवंतांना होईल. पृथ्वीचे रुपांतर मानवजातीसाठी एका सुंदर, शांतीदायक, समाधानी घरात होईल.

दुष्टाईची जागा धार्मिकता घेते

३. आर्मगिदोनानंतर लागलीच कोणत्या सुटकेचा अनुभव होईल?

सैतानी जगाचा नाश केल्याने या सर्व गोष्टी साध्य होतील. यापुढे कधीही विभाजित खोटे धर्म, सामाजिक व्यवस्था, वा सरकारे नसतील. लोकांना फसविण्यासाठी सैतानी प्रचार नसेल; कारण त्यांना बनवणाऱ्‍या कर्तृत्वाचा सैतानाच्या व्यवस्थेसोबत नाश केला जाईल. जरा विचार करा: सैतानाच्या जगाच्या संपूर्ण विषारी वातावरणाला स्वच्छ केले जाईल! ती किती चांगली सुटका असेल!

४. तेव्हा शिक्षणात होणारा बदल याचे विवेचन करा.

मग, मानवी शासनाच्या नाशकारक कल्पनांची जागा देवाकडून येणारी उभारणीकारक शिकवण घेईल. “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून [यहोवा न्यू.व] शिक्षण पावतील.” (यशया ५४:१३) वर्षांनुवर्षे ह्‍या उत्तम मार्गदर्शनामुळे “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या [यहोवा न्यू.व] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) यापुढे लोक दुष्टपणा कधीच शिकणार नाहीत, परंतु “न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता” शिकतील. (यशया २६:९) त्या काळाची व्यवस्था उभारणीकारक विचार कृत्ये ही असेल.—प्रे. कृत्ये १७:३१; फिलिप्पैकर ४:८.

५. सर्व दुष्टाई व दुष्ट लोकांचे काय होईल?

अशाप्रकारे, यापुढे खून, हिंसा, बलात्कार, चोरी व इतर गुन्हेगारी नसेल. दुसऱ्‍याच्या दुष्ट कृत्यामुळे कोणालाच इजा सहन करण्याची गरज राहणार नाही. नीतीसूत्रे १०:३० म्हणते: “धार्मिक कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाही.”

परिपूर्ण आरोग्य पुन: मिळते

६, ७. (अ) कोणत्या कटु सत्यतेचा देवाचे राज्य अंत करील? (ब) येशूने हे पृथ्वीवर असताना कसे प्रदर्शित केले?

नवीन जगात, मूळ बंडखोरीच्या दुष्ट परिणामांचा पूर्णपणे उच्छेद केला जाईल. उदाहरणार्थ, राजकीय शासन आजार व वृद्धापकाळ काढून टाकेल. आज तुम्ही काही प्रमाणात चांगल्या आरोग्याचा आनंद घेत असाल, परंतु कटु सत्य हे आहे की तुम्ही म्हातारे होता, तुमच्या डोळ्यांना अंधूक दिसू लागते, तुमच्या दातांना कीड लागते, तुम्हाला ऐकायला कमी येते, तुमच्या त्वचेला सुरकुत्या पडतात, तुमचे अन्तर्गत अवयव अशक्‍त होऊ लागतात व शेवटी तुम्हाला मरण येते.

पण, आमच्या पहिल्या पालकांकडून वारशाने मिळालेले हे दु:खद परिणाम गतकाळात जमा होतील. येशू पृथ्वीवर असताना त्याने आरोग्यासंबंधाने काय प्रदर्शित केले ते तुम्हाला आठवते का? पवित्र शास्त्र म्हणते: “लोकांचे थव्यांचे थवे त्याजकडे आले; त्यांच्या बरोबर लंगडे, अंधळे, मुके, व दुसरे बहुतजण होते; त्यास त्यांनी त्याच्या पायावर आणून घातले आणि त्याने त्यांस बरे केले. हे लोकसमुदायांनी पाहून आश्‍चर्य केले आणि इस्त्राएलाच्या देवाचे गौरव केले.”—मत्तय १५:३०, ३१.

८, ९. नव्या जगात परिपूर्ण आरोग्य प्रस्थापित झाल्यावर मिळणाऱ्‍या आनंदाचे वर्णन करा.

आमचे सर्व आजार नाहीसे झाल्यावर नव्या जगात किती आनंद येईल! अस्वस्थ आरोग्याच्या परिणामातून होणारे दु:ख पुन्हा कधी आम्हाला जाणवणार नाही. “‘मी रोगी आहे’ असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” “तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील, तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३३:२४; ३५:५, ६.

प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही कालच्या दिवसापेक्षा आज अधिक सुदृढ आहात हे जाणणे स्फुर्तीदायक नसेल का? वृद्ध व्यर्क्‍तिना प्रत्येक दिवस जाईल तसे ते हळूहळू आदाम व हव्वेने ज्या परिपूर्ण शरीराचा व मनाचा आनंद लुटला त्या तारुण्यतेप्रत ते जात आहेत हे प्रत्ययास येणे संतोषविणारे नसेल का? पवित्र शास्त्राचे असे अभिवचन आहे: “त्याचे शरीर बालकापेक्षा टवटवीत होते. त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन: प्राप्त होतात.” (ईयोब ३३:२५) चष्मे, ऐकण्याची साधने, कुबड्या, चाके असलेली खुर्ची, आणि औषधे फेकून देणे किती आनंददायी असेल! दवाखाने, डॉक्टर, व दंतवैद्य यांची पुढे कधीच गरज भासणार नाही.

१०. मृत्युचे काय होईल?

१० असे आरोग्यदायी जीवन जगताना कोणा व्यक्‍तिला मरावेसे वाटणार नाही; शिवाय ते मरणारही नाहीत, कारण मानवजात आता वंशपरंपरेने मिळालेली अपूर्णता व मरणाच्या मुठीत नसेल. ख्रिस्ताच्या “पायाखाली देवाने सर्व शत्रु ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. शेवटला शत्रु जो मृत्यु तो नाहीसा केला जाईल.” “देवाचे कृपादान सर्वकालचे जीवन आहे.”—१ करिंथकर १५:२५, २६; रोमकर ६:२३; तसेच यशया २५:८ देखील पहा.

११. नव्या जगाच्या फायद्यांचे प्रकटीकरण सारांशरित्या विवरण कसे देते?

११ काळजी करणाऱ्‍या देवाकडून नंदनवनात मानवी कुटुंबाला मिळणाऱ्‍या फायद्यांच्या सारांशाबद्दल पवित्र शास्त्राचे शेवटचे पुस्तक म्हणते: “तो [देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीहि नाही. कारण पहिले होऊन गेले.”—प्रकटीकरण २१:३, ४.

मृतांचे पुनरागमन

१२. देवाने दिलेल्या पुनरुत्थानाच्या शक्‍तिचे येशूने कसे प्रदर्शन केले?

१२ येशूने फक्‍त रोग्यांना व लंगड्यांनाच बरे केले नाही. त्याने कबरेतील लोकांना परत जिवंत केले. अशाप्रकारे देवाने त्याला दिलेल्या विस्मयकारक पुनरुत्थानाच्या शक्‍तिचे त्याने प्रदर्शन केले. एकदा येशू, ज्याची मुलगी वारली होती त्या माणसाच्या घरी गेला होता ती घटना तुम्हाला आठवते का? येशू त्या मृत मुलीला म्हणाला, “मुली, मी तुला सांगतो ऊठ!” याचा परिणाम काय झाला? “लागलीच ती मुलगी ऊठून चालू लागली.” हे पाहून तेथील लोक “अत्यंत विस्मित झाले.” त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला!—मार्क ५:४१, ४२; तसेच लूक ७:११-१६; योहान ११:१-४५ हेही पहा.

१३. कोणत्या प्रकारच्या लोकांना पुनरुत्थित केले जाईल?

१३ नव्या जगात, “धार्मिकांचे व अधार्मिकांचे पुन: उठणे होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५) त्या वेळी मृतांना उठविण्यासाठी देवाने येशूला दिलेल्या सामर्थ्याचा तो उपयोग करील, कारण त्याने म्हटले होते: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्‍वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल.” (योहान ११:२५) तो असेही म्हणाला होता: “[देवाच्या स्मरणात असलेली] कबरेतील सर्व मनुष्ये त्याची [येशू] वाणी ऐकतील आणि बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.

१४. मरण नाहीसे झाल्यामुळे, कोणत्या गोष्टीही राहणार नाहीत?

१४ गटागटाने जेव्हा मृतजन उठतील व त्यांच्या प्रिय जनांना भेटतील तेव्हा सबंध पृथ्वीवर मोठा आनंद होईल! पुढे, घरातील इतरांना दु:ख देण्यासाठी मृतांसंबंधाचे रकाने वाचावयास नसतील. उलटपक्षी, अगदी उलटेच घडेल: नव्या पुनरुत्थित जणांची घोषणा असेल, जी त्यांच्या प्रियजनांना आनंद देईल. यास्तव, यापुढे प्रेतयात्रा, चिता, स्मशानभूमी, वा कबरस्थान नजरेस पडणार नाहीत!

खरोखरी एक शांतीदायक जग

१५. मीखाची भविष्यवाणी पूर्ण अर्थाने कशी पूर्ण होईल?

१५ जीवनाच्या सर्व क्षेत्रात खरी शांती अनुभवली जाईल. युद्धे, युद्धाचे पुरस्कर्ते, शस्त्रास्त्रांचे उत्पादन या सर्व गोष्टी होऊन गेलेल्या असतील. का? कारण विभाजीत राष्ट्रीयता, वंशीयता, व रंगभेद यांचा स्वार्थ नाहीसा होईल. मग, पूर्ण अर्थाने, “एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही. ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत.”—मीखा ४:३.

१६. युद्धे नाहीसे होत आहेत याकडे देव कसे लक्ष देईल?

१६ हे, मानवांच्या सतत होणाऱ्‍या युद्धांमुळे रक्‍तपिपासू बनलेल्या इतिहासापुढे विचित्रच वाटेल. परंतु मानवजात, मानवांच्या व दुरात्म्यांच्या शासनाखाली असल्यामुळे ते झाले. नव्या जगात, राज्य शासनाखाली, असे घडेल: “या परमेश्‍वराची [यहोवा न्यू.व] कृत्ये पहा . . . तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो. तो धनुष्ये मोडितो, भाला तोडून टाकितो, [युद्धाचे] रथ अग्नीत जाळून टाकितो.”—स्तोत्रसंहिता ४६:८, ९.

१७, १८. नव्या जगात, मनुष्य व प्राणी यांजमधील कोणते नातेसंबंध अस्तित्वात राहतील?

१७ एदेन बागेप्रमाणे, मनुष्य व वनपशू शांतीने राहतील. (उत्पत्ती १:२८; २:१९) देव म्हणतो: “मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव यांबरोबर करार करीन . . . ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.”—होशेय २:१८.

१८ ह्‍या शांतीची मर्यादा केवढी असेल? “लांडगा कोकऱ्‍याजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल; वासरु, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील. त्यांस लहान मूल वळील.” यापुढे कधीही मानवांना प्राण्यांची वा त्यांना स्वत:ला भीती वाटणार नाही. आणि “सिंह [देखील] बैलाप्रमाणे कडबा खाईल.”—यशया ११:६-९; ६५:२५.

पृथ्वीचे नंदनवनात रुपांतर

१९. पृथ्वीचे रुपांतर कशात केले जाईल?

१९ अखिल पृथ्वीचे रुपांतर मानवजातीसाठी नंदनवनमय घरात होईल. यास्तव, येशू एका विश्‍वास धरणाऱ्‍या मनुष्याला अभिवचन देऊ शकला: “तू मजबरोबर सुखलोकात असशील.” पवित्र शास्त्र म्हणते: “अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील. वाळवंट उल्लासेल व कमळाप्रमाणे फुलेल . . . कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.”—लूक २३:४३; यशया ३५:१, ६.

२०. मानवजातीला उपासमार पुन्हा कधी का सतावणार नाही?

२० देवाच्या राज्याखाली, लाखो लोकांना पुन्हा कधीही उपासमार सतावणार नाही. “भूमीवर पर्वतांच्या शिखरापर्यंत भरपूर पीक येवो.” “मळ्यांतली झाडे फलद्रुप होतील, भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील.”—स्तोत्रसंहिता ७२:१६; यहेज्केल ३४:२७.

२१. गरिबी, बेघर लोक, झोपडपट्टी, आणि वाईट शेजारी यांचे काय होईल?

२१ यापुढे कधीही गरिबी, बेघर लोक, झोपड्या, किंवा हिंसाप्रिय शेजारी नसतील. “ते घरे बांधून त्यात राहतील; द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही.” “ते सगळे आपआपल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यास घाबरविणार नाही.”—यशया ६५:२१, २२; मीखा ४:४.

२२. देवाच्या शासनाच्या आशीर्वादांचे वर्णन पवित्र शास्त्र कसे करते?

२२ नंदनवनात या सर्व गोष्टींद्वारे मानवांना आशीर्वाद दिला जाईल, आणि अधिक प्रमाणात तो दिला जाईल. स्तोत्रसंहिता १४५:१६ म्हणते: “तू [देव] आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पूरी करितोस.” पवित्र शास्त्र भविष्यवाणी अभिवचन देते ते नवलाईचे नसणार की: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील. ते उदंड सुखाचा उपभोग घेतील. . . . धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील, तीत ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:११, २९.

गतकाळातील गोष्टी नष्ट करणे

२३. देवाचे राज्य आम्ही अनुभवलेल्या दु:खाला कसे काढून टाकील?

२३ मानवी कुटुंबाचे सहा हजार वर्षांसाठी झालेले नुकसान देवाचे राज्य भरुन काढील. लोकांनी ज्या दु:खाचा अनुभव घेतला तो त्या वेळी झालेल्या आनंदामुळे विसरुन गेलेला असेल. गतकाळच्या दु:खाच्या वाईट आठवणींनी जीवन त्रस्त होणार नाही. लोकांचे दैनंदिन उभारणीकारक विचार व कार्य हळूहळू दु:खदायक आठवणींना पुसून टाकतील.

२४, २५. (अ) जे होणार आहे त्याबद्दल यशयाने काय भाकित केले? (ब) गतकालीन दु:खाच्या आठवणी अस्पष्ट होतील याची आम्हाला खात्री का वाटते?

२४ काळजी करणारा देव असे म्हणतो: “मी नवे आकाश [मानवजातीवर एक नवे स्वर्गीय सरकार] व नवी पृथ्वी [एक धार्मिक मानवी समाज] निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्‍न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा.” “सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे. लोक गाण्याचा गजर करीत आहेत.”—यशया १४:७; ६५:१७, १८.

२५ अशाप्रकारे, त्याच्या राज्याकरवी, देव एवढ्या वर्षांपर्यंत टिकून राहिलेली दुष्ट परिस्थिती उलटून टाकील. चिरकालापर्यंत त्याच्या आशीर्वादांचा वर्षांव करुन तो आमच्यासाठी त्याची काळजी व्यक्‍त करील, जी आमच्या गतकालीन नुकसानीला भरुन काढील. पूर्वी आम्ही अनुभवलेल्या त्रासाची आठवण केली नाही तर तो आमच्या स्मरणातून अस्पष्ट असा होईल.

२६. गतकाळाच्या कोणत्याही दु:खाची भरपाई देव का करील?

२६ अशा प्रकारे ह्‍या जगात आम्ही सहन केलेल्या दु:खाची देव आमच्यासाठी भरपाई करुन देईल. त्याला माहीत आहे की आम्ही अपूर्ण असे जन्मलो यात आमची काही चूक नव्हती, कारण आम्हाला आमच्या पहिल्या पालकांकडून अपूर्णता वारशाने मिळालेली आहे. सैतानी जगात आमचा जन्म झाला यात आमची काहीच चूक नाही, कारण जर आदाम व हव्वा विश्‍वासू राहिले असते तर आपण एका नंदनवनात जन्माला आलो असतो. यास्तव, गतकाळात आमच्यावर लादल्या गेलेल्या दु:खाला मोठ्या करूणेने देव भरून काढील.

२७. नव्या जगात कोणत्या भविष्यवाणींची विस्मयकारकतेने पूर्णता होईल?

२७ नव्या जगात, रोमकरांस पत्र ८:२१, २२ मध्ये भाकित केलेल्या स्वातंत्र्याचा अनुभव मानवजात घेईल: “सृष्टी स्वत: नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळेल. आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत व वेदना भोगीत आहे.” तेव्हा लोकांना “तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” ह्‍या प्रार्थनेची संपूर्ण पूर्णता झालेली दिसेल. (मत्तय ६:१०) नंदनवन पृथ्वीवरील विस्मयकारक परिस्थिती स्वर्गातील परिस्थितीला प्रतिबिंबित करील.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्रं]

नव्या जगात, वृद्ध पुन्हा एकदा युवकावस्थेच्या स्थितीत पोहंचतील

[२४ पानांवरील चित्रं]

नव्या जगात सर्व आजारपण व अपंगत्व काढून टाकले जाईल

[२५ पानांवरील चित्रं]

नव्या जगात मृतजनांना जीवनासाठी पुनरुत्थित केले जाईल

[२६ पानांवरील चित्रं]

‘ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत’

[२७ पानांवरील चित्रं]

नंदनवनात मनुष्ये व प्राणी पूर्णपणे शांतीत असतील

[२७ पानांवरील चित्रं]

‘देव आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पूरी करील’

[२८ पानांवरील चित्रं]

आम्ही सहन केलेल्या दु:खाला देवाचे राज्य हव्या त्यापेक्षा अधिक प्रमाणात भरुन काढील