व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव आहे हे आपल्याला कसे समजू शकते

देव आहे हे आपल्याला कसे समजू शकते

भाग ३

देव आहे हे आपल्याला कसे समजू शकते

१, २. देव आहे की नाही हे ठरविण्यासाठी कोणते तत्त्व आपल्याला मदत देते?

 देव आहे का हे ठरविण्यासाठी सुप्रसिद्ध तत्त्वाचे सूत्र लावण्यास हवेः घडलेल्या गोष्टींचा कर्ता असतो. एखादी गोष्ट जितकी अधिक गुंतागुंतीची असेल तितक्या अधिकपणे तिचा घडविणारा हा समर्थ असतो.

उदाहरणार्थ, तुमच्या घरात सर्वत्र नजर फिरवून बघा. तुम्हाला दिसणाऱ्‍या गोष्टी म्हणजे टेबल, खुर्च्या, मेज, पलंग, कुंड्या, भांडी, ताटे व इतर सर्व भोजनसामग्री या सर्वांचा बनविणारा कोणी आहे, तसेच भिंती, जमीन व छत यांचाही घडविणारा कोणी आहे. तरीपण, या सर्व गोष्टी तर बनवण्यास अगदी सोप्या आहेत. साध्या गोष्टींना घडविणाऱ्‍याची गरज आहे तर, गुंतागुंतीच्या गोष्टींना देखील अधिक बुद्धिमान कर्ता असावयास पाहिजे हे व्यवहार्य नाही का?

आमचे भयप्रेरित विश्‍व

३, ४. देव अस्तित्वात आहे हे समजण्यास हे विश्‍व कशी मदत देते?

घड्याळाचाही बनवणारा आहे. तर, ज्यामध्ये सूर्य व त्याच्याभोवती शतकानुशतके तंतोतंतपणे फिरणारे ग्रह आहेत, त्या आमच्या प्रचंड व गुंतागुंतीच्या सौर मालिकेबद्दल काय? आम्ही राहतो त्या दहा हजार कोटी तारे असणाऱ्‍या भयप्रेरित आकाशगंगेबद्दल काय? तुम्ही रात्रीच्या वेळी थोडेसे थांबून आकाशगंगेचे निरिक्षण केले आहे का? तुम्हाला अचंबा वाटला का? तर मग, विश्‍वास बसू शकणार नाही असे विस्तीर्ण विश्‍व, ज्यात आम्हाप्रमाणेच अगणित अशा कितीतरी कोटी आकाशगंगा आहेत त्यांच्याबद्दलचा विचार करा! याखेरीज हे आकाशातील ग्रह आपल्या वाटचालीत इतके विश्‍वासार्ह आहेत की, शतकामागून शतकांनी त्यांची तंतोतंत अशा घड्याळासोबत तुलना करता आली.

साधे घड्याळ त्याच्या बनविणाऱ्‍याच्या अस्तित्वाची सूचकता देते तर अमर्याद असे गुंतागुंतीने भरलेले भयप्रेरित विश्‍व देखील एका रचनाकाराच्या व बनविणाऱ्‍याच्या अस्तित्वाचा संकेत देते. या कारणामुळे, पवित्र शास्त्र आपल्याला “आपले डोळे वर करून पाह”ण्याचे निमंत्रण देते व पुढे असे विचारतेः “ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले?” याचे उत्तर आहेः “तो [देव] त्यांच्या सैन्यांची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो; तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.” (यशया ४०:२६) अशाप्रकारे, विश्‍व आपले अस्तित्त्व एका अदृश्‍य, नियंत्रक व बुद्धिमानी शक्‍तीवर विसंबून असल्याचे स्पष्ट करते, व तो देव आहे.

पृथ्वीची घडण देखील अपूर्व रितीने झाली

५-७. पृथ्वीबद्दल कोणती माहिती, तिचा कोणी रचनाकार आहे हे स्पष्ट करते?

शास्त्रज्ञ पृथ्वीबद्दल जितका अभ्यास करतात तितके त्यांना अधिकपणे कळू लागले आहे की तिची रचना मानवी वस्तीसाठी अपूर्व पद्धतीने करण्यात आली. सूर्यापासून योग्य प्रमाणात उजेड व उर्जा मिळण्यासाठी तिला योग्य अंतरावर ठेवण्यात आले आहे. ती सूर्याभोवती एका वर्षभरात एक फेरी मारते आणि तिचा अक्षांश कलता असल्यामुळे पृथ्वीच्या विविध भागांवर ऋतु होतात. पृथ्वी देखील आपल्या आसावर दर २४ तासाला फिरते व त्यामुळे प्रकाश व अंधार यांचा नियमित कालावधी देते. तिचे वातावरण वायुच्या अचूक मिश्रणांनी भरले आहे, यामुळे आम्हाला श्‍वासोच्व्छास करता येतो आणि आमचे अंतराळातील घातक उत्सर्जित किरणांपासून रक्षण केले जाते. शिवाय पृथ्वीजवळ अन्‍नाची वाढ करण्याकरता पाण्याचा पुरेसा साठा व जमीन उपलब्ध आहे.

या सर्व तसेच आणखी इतर कार्यवाहित होणाऱ्‍या गोष्टींशिवाय आमचे जीवन अशक्यप्राय झाले असते. तर मग, हे सर्व आकस्मिकपणे घडले का? सायन्स न्यूज असे म्हणतेः “असे दिसते की, या विशिष्ठ तसेच अचूक परिस्थिती सहजगत्या निर्माण होणे अशक्य आहेत.” नाही, त्या उद्‌भवल्या नाहीत. याला नामी रचनाकाराची उद्देशपूर्ण रचना जबाबदार होती.

तुम्ही एखाद्या चांगल्या घरात गेला व तुम्हाला दिसले की, त्यात भरपूर अन्‍नसाठा आहे, शिवाय उष्णता देणारी व वातानुकुलित यंत्रणासुद्धा आहे. तसेच पाण्यासाठी उत्तम योजना केलेली आहे. हे सर्व बघून तुम्ही कोणत्या निर्णयाला येणार? हे सगळे एकाएकी घडून आले असे समजणार? नाही. तर एका बुद्धिमान मनुष्याने या सर्व गोष्टींची रचना मोठ्या काळजीने केली आहे असेच तुम्ही म्हणणार. याचप्रमाणे, पृथ्वीची रचना देखील काळजीपूर्वक रितीने, तिजवरील रहिवाश्‍यांच्या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी केली आहे. ही पृथ्वी कोणा घरापेक्षा अधिक गुंतागुंतीची आणि सर्व गोष्टींनी युक्‍त अशी आहे.

८. पृथ्वीबद्दल आणखी असे काय आहे जे, देवाला आम्हाबद्दल केवढी प्रेमळ काळजी वाटते ते प्रकट करते?

याखेरीज, जीवनाचा आनंद द्विगुणित करणाऱ्‍या आणखी काही गोष्टींचा विचार करा. विविध रंगांची डोलणारी सुंदर फुले पहा; त्यांचा दरवळणारा सुगंध मानवाला किती आल्हाद देतो. याशिवाय विविध प्रकारातील अन्‍न आमच्या रुचिला चविष्ट वाटते. तसेच, जंगले, डोंगर, तळी व इतर निर्मिती डोळ्यांना सुख देतात. आणि तो सुंदर सूर्यास्त आमच्या आनंदात भर घालीत नाही का? ते वन्य वातावरण पहा, पशूंचा खेळकरपणा तसेच लहान पिलांचा, व लहान जनावरांचा प्रिय स्वभाव यामुळे आम्ही आनंदी होत नाही का? अशाप्रकारे, जीवनास अत्त्यावश्‍यक नसणाऱ्‍या अशा कितीतरी विलोभनीय गोष्टी ही पृथ्वी आम्हाला देऊ करते. याद्वारे, या पृथ्वीची रचना प्रेमयुक्‍त काळजी आणि मानवांचा विचार राखून केली होती हे स्पष्ट दिसते व यामुळे आम्हाला आमचे नुसते अस्तित्वच नव्हे तर जीवनाचा आनंद देखील उपभोगता येतो.

९. पृथ्वीला कोणी बनवले, व त्याने ती का बनवली?

या कारणास्तव, व्यवहार्य निर्वाळा हाच निघतो की, सर्व गोष्टी पुरवणाऱ्‍या दात्याचे आपण आभार मानावेत. एका पवित्र शास्त्र लेखकाने यहोवा देवाबद्दल जे म्हटले त्याच शब्दात आपणही हे म्हणू शकतोः “तूच आकाश व पृथ्वी निर्माण केली.” कोणत्या उद्देशास्तव? तो देवाबद्दल वर्णन देऊन याचे हे उत्तर देतोः “आकाशाचा उत्पन्‍नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच, त्याने तिची स्थापना केली. त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.”—यशया ३७:१६; ४५:१८.

आश्‍चर्यकारक पेशी

१०, ११. जिवंत पेशी इतकी आश्‍चर्यावह का आहे?

१० पण जिवंत गोष्टींबद्दल काय? यांना देखील कोणी निर्माता नको का? उदाहरणार्थ, जिवंत पेशीचे हे काही आश्‍चर्यकारक प्रकार बघा. अणुकणाचा अभ्यास केलेले जीवनशास्त्रवेत्ता मीखाएल डेन्टन आपल्या इव्होल्युशनः ए थिअरी इन क्रिसिस्‌ या पुस्तकात म्हणतातः “आज पृथ्वीवर जिवंत असणाऱ्‍या पेशीत, सूक्ष्म जंतु ही अत्यंत साधी पेशी देखील अत्यंत गुंतागुंतीची आहे. अत्यंत लहानातील लहान वानू किंवा बॅक्टेरिआ पेशी देखील विश्‍वास बसणार नाही इतकी लहान असते. . . . प्रत्येक पेशी ही अतिशय लहान केलेला लंब-काटकोनी जणू कारखानाच आहे व यात गुंतागुंतीच्या अणुकणांची रचना असणारे हजारो तीव्र लहान लहान तुकडे आहेत. . . . हे तर मानवाने उभारलेल्या कसल्याही यंत्रापेक्षाही अधिक गुंतागुंतीचे आणि अजीवधारी जगात कशाशी देखील समांतरीत नसणारे आहे.”

११ प्रत्येक पेशीतील जनन विज्ञानाबद्दल ते म्हणतातः “डीएनए मध्ये साठवल्या जाणाऱ्‍या माहितीचा विस्तार, माहीत असलेल्या इतर कोणाही व्यवस्थेच्या पलिकडला आहे. ही इतकी कार्यक्षम आहे की त्या सेंद्रिय वस्तुचे वजन मानवाच्या परिमाणाच्या एका ग्रामच्या काही हजार-कोटींचा भाग इतके भरेल. . . . अशा या कुशल व गुंतागुंतीचे दर्शन घडवणाऱ्‍या जीवनाच्या आमच्या अणुकणांच्या यंत्रांपुढे आमचे अत्यंत प्रगत असणारे उत्पादन देखील ओबडधोबड दिसू लागेल. खरेच आम्हाला नमते घ्यावेच लागेल.”

१२. पेशीच्या उगमाबद्दल एका विज्ञान शास्त्रज्ञाने काय म्हटले?

१२ डेन्टन पुढे म्हणतातः “साध्यातल्या साध्या पेशीतील गुंतागुंत इतकी मोठी आहे की, अशी ही पेशी, कोणा चमत्कारिक, असंभाव्य घटनेमुळे एकाएकी सामोरी आली हे स्वीकारणे अशक्य कोटीतील वाटते.” तिच्यासाठी देखील कोणीतरी रचनाकार व कर्ता असलाच पाहिजे.

आमचा विलक्षण मेंदू

१३, १४. मेंदू हा जिवंत पेशीपेक्षा देखील अधिक आश्‍चर्यावह का आहे?

१३ यानंतर तेच विज्ञानशास्त्रज्ञ पुढे म्हणतातः “जेव्हा गुंतागुंतीबद्दल आपण विचार करतो तेव्हा सस्तन प्राण्याच्या मेंदूतील व्यवस्थेपुढे पेशी अगदी फिकी वाटते. मानवी मेंदूमध्ये साधारणपणे दहा अरब मज्जातंतू आहेत. यातील प्रत्येक मज्जातंतू साधारण दहा हजार ते लाखापर्यंत जोडतंतू निर्माण करतात, जे मेंदूतील इतर मज्जातंतूना जोड देतात. मानवी मेंदूतील हे जोड साधारणपणे . . . दहा हजार खरबच्या जवळपास जातात.”

१४ डेन्टन पुढे म्हणतातः “मेंदूतील एक-शंभरांश इतके जोड जरी विशिष्टरित्या संघटीत केले तरी हे, पृथ्वीवर पसरलेल्या दळणवळणाच्या सबंध जाळ्याच्या देखील अधिक संख्येने पुढे जाऊ शकेल.” मग ते विचारतातः “तर मग, कसल्या तरी ओबडधोबड पद्धतीने ही सगळी व्यवस्था संघटित झाली असणार का?” याचे उघड व स्पष्ट उत्तर ‘नाही,’ हेच आहे. मेंदूला देखील कोणी काळजीपूर्वक रचना करणारा व कर्ता असणार.

१५. मेंदूबद्दल आणखी काहींचे कोणते अभिप्राय आहे?

१५ मेंदूपुढे तर अत्यंत प्रगत असा संगणक अगदीच जुनाट दिसतो. मॉर्टन हंट या विज्ञान लेखकांनी म्हटलेः “आमची जागृत स्मरणशक्‍ती आजच्या काळातील संशोधन करणाऱ्‍या संगणकापेक्षा कितीतरी कोट्यवधी पटीने अधिक माहिती संग्रहीत करते.” यामुळेच मेंदूचे शस्त्रवैद्य डॉ. रॉबर्ट जे. व्हाईट यांनी असा निर्वाळा दिलाः “अविश्‍वासनीय वाटणाऱ्‍या मेंदू-मनातील संयोजकाची रचना व वाढ ही सर्वोच्च बुद्धिमान व्यक्‍तीने केली आहे हे मानण्याखेरीज मला दुसरी कोणतीही निवड नाही. त्याची कृति मानवाच्या समजशक्‍तीपलिकडे आहे. . . . या सर्वांना बुद्धिमान आरंभ आहे, आणि कोणीतरी ही सुरवात लावून दिली आहे असा मला विश्‍वास वाटतो.” काळजी करणारा कोणीतरी निश्‍चित आहे.

रक्‍ताची रचनाबद्ध संस्था

१६-१८. (अ) रक्‍ताची रचनाबद्ध संस्था अप्रतिम का आहे? (ब) आम्हाला कोणत्या निर्वाळ्यापर्यंत आणले जाते?

१६ याशिवाय, पोषक द्रव्ये व प्राणवायु वाहून नेणाऱ्‍या आणि संसर्ग लागण्यापासून मज्जाव करणाऱ्‍या रक्‍ताची रचनाबद्ध संस्था विचारात घ्या. या संस्थेतील प्रमुख घटक, लाल रक्‍त पेशींबद्दल एबीसीस्‌ ऑफ द ह्‍युमन बॉडी हे पुस्तक म्हणतेः “रक्‍ताच्या एका थेंबात २५ कोटी भिन्‍न लाल पेशी असतात. . . . शरीरात कदाचित २५० खरब इतक्या लाल पेशी असू शकतील; आणि या सर्व पसरविल्या तर टेनिसची चार पटांगणे भरून जातील. . . . दर सेकंदाला ३० लाख नव्या पेशींची निर्मिती होते.”

१७ रक्‍ताच्या रचनाबद्ध संस्थेतील दुसरा घटक पांढऱ्‍या पेशींबद्दल तेच पुस्तक म्हणतेः “रक्‍ताची लाल पेशी एकाच प्रकारची असते, पण पांढऱ्‍या पेशी विविध प्रकारच्या असतात. यातील प्रत्येक प्रकार, शरीराची रोगप्रतिकारक शक्‍ती वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. उदाहरणार्थ, एक प्रकार मेलेल्या पेशींना काढून टाकतो. दुसरा विषाणु, बाहेरील रोगजन्तु यांच्यासाठी रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवतो किंवा सूक्ष्म जंतूंचे सरळ पचन करतो.”

१८ खरेच, किती आश्‍चर्याची व उच्च कोटीतील संघटना! अशाप्रकारे संघटित केलेली व पूर्ण रुपाने सुरक्षित असणाऱ्‍या संघटनेला अत्यंत बुद्धिमान व काळजी घेणारा संघटक जरुर असला पाहिजे. तो देव आहे.

आणखी काही नवलाई

१९. डोळ्याची मानवनिर्मित उत्पादनासोबत कशी तुलना बसते?

१९ मानवी शरीरात आणखी काही नवलाई आहेत. यापैकी एक डोळा होय. त्याची रचना इतकी अप्रतिम आहे की, कोणताही कॅमेरा त्याची नकल करू शकत नाही. खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट जेस्ट्रो यांनी म्हटलेः “डोळ्याची रचना करण्यात आली आहे असे कळते; कोणा दुर्बिण बनवणाऱ्‍याला यापेक्षा अधिक असे चांगले करणे जमले नसते.” याचप्रमाणे, पॉप्युलर फोटोग्राफी या प्रकाशनात म्हटले आहेः “फिल्मवर जितकी माहिती खेचली जाते त्यापेक्षा डोळा अधिक विस्तारास बघू शकतो. तो तीन आकारमानात, विस्तारीत कोनात, कोठल्याही विकृतीशिवाय, सलग गतीमध्ये . . . पाहू शकतो. कॅमेऱ्‍याचे डोळ्यासोबत स्पष्ट साम्य होऊ शकत नाही. मानवी डोळा हा अविश्‍वासनीय असा प्रगत उच्च संगणक आहे, ज्यात अशी कृत्रिम बुद्धिमत्ता, माहितीचे विश्‍लेषण करण्याची क्षमता, वेग, आणि कार्यपद्धत आहे जी कोणा मानवाच्या संगणक किंवा कॅमेऱ्‍यापेक्षा खूपच पलिकडे आहे.”

२०. मानवी शरीराच्या आणखी काही अद्‌भुत गोष्टी कोणत्या आहेत?

२० याचप्रमाणे, आम्हाला जाणीव न होता आमच्या शरीरातील गुंतागुंतीचे अवयव एकमेकांना कसे सहकार्य देतात त्याचाही विचार करा. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे अन्‍न व पेये आमच्या पोटात उतरतात; तरी आमचे शरीर त्या सर्वांना पचविते व उर्जा निर्माण करते. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी एखाद्या वाहनाच्या टाकीत घालून बघा की, ते वाहन किती दूरवर तुम्हाला नेते! तसेच, जन्म घडविण्याचा अद्‌भुत चमत्कार, लोभस बाळाची निर्मिती, पालकांची हुबेहुब प्रतिमा केवळ नऊ महिन्याच्या कालावधीत साकार होते. तसेच, बाळाने काही वर्षातच अवघड भाषा बोलण्याची कला शिकून घेण्याबद्दल देखील कसे वाटते?

२१. शरीराच्या इतक्या अद्‌भुत गोष्टी जाणल्यावर एखादा समंजस मनुष्य काय म्हणेल?

२१ होय, शरीराच्या आश्‍चर्यकारक व गुंतागुंतीच्या गोष्टी आम्हाला अवाक्‌ करतात. या गोष्टींची कोणा यंत्रज्ञाला नकल करता येणार नाही. तर मग, या सर्व गोष्टी केवळ अंध दैवयोगाने आल्या का? निश्‍चितच नाही. उलट, मानवी शरीराच्या या सर्व गोष्टी जाणल्यावर कोणीही समंजस मनुष्य स्तोत्रकर्त्याप्रमाणे असे म्हणेलः “भयजनक व आश्‍चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे, म्हणून मी तुझे [देवाचे] उपकारस्मरण करितो.”—स्तोत्रसंहिता १३९:१४.

सर्वश्रेष्ठ बांधणीकर्ता

२२, २३. (अ) निर्माणकर्त्याच्या अस्तित्वास आम्ही का मान्य केलेच पाहिजे? (ब) पवित्र शास्त्र देवाबद्दल योग्यपणे काय म्हणते?

२२ पवित्र शास्त्र म्हणतेः “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; आणि सर्व वस्तु करणारा देव आहे.” (इब्रीकर ३:४, द जरुसलेम बायबल) एखादे घर कितीही साधे असले तरी त्याला बांधणारा असतोच, तर मग, हे प्रचंड विश्‍व आणि पृथ्वीवरील विविध प्रकारचे जीवन यांचा देखील बांधणारा असलाच पाहिजे. आपण विमाने, दूरदर्शन, संगणक इत्यादि वस्तुंना शोधून काढणाऱ्‍या मानवांचे अस्तित्व मान्य करतो, तेव्हा ज्याने मानवाला या सर्व गोष्टी करण्याचा मेंदू बहाल केला आहे त्याच्या अस्तित्वाला देखील मानू नये का?

२३ पवित्र शास्त्र ती मान्यता देते व म्हणतेः “आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्‍यांस जीवित देणारा देव, परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.].” (यशया ४२:५) पवित्र शास्त्र अगदी योग्यपणे घोषित करतेः “हे प्रभो [यहोवा, न्यू.व.], आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहेत, असे म्हणवून घ्यावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही उत्पन्‍न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.

२४. देव आहे हे आपल्याला कसे कळू शकते?

२४ होय, देव आहे हे आपल्याला त्याने घडविलेल्या गोष्टींद्वारे कळून येते. “त्याचे [देवाचे] अदृश्‍य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्तीकालापासून स्पष्ट दिसत आहेत; यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे.”—रोमकर १:२०.

२५, २६. एखाद्या गोष्टीचा गैरवापर होतो ही गोष्ट तिचा कोणी निर्माता नाही असा विवाद करण्यास कारण का होऊ शकत नाही?

२५ एखाद्या बनवलेल्या गोष्टीचा दुरुपयोग केला जातो याचा अर्थ त्याला बनवणाराच नाही, असा मुळीच होत नाही. विमानाचा वापर, उतारूंना ने-आण करण्याच्या कामी शांतीदायक रितीने करता येऊ शकतो. पण त्याचाच क्षेपणास्त्रे फेकून नाश घडवून आणण्यासाठी देखील उपयोग करता येऊ शकतो. त्याचा मरणप्राय मार्गाने वापर केला जातो ही गोष्ट त्याचा कोणी निर्माता नाही असे सुचवीत नाही.

२६ याचप्रमाणे, लोक वेळोवेळी दुर्मार्गाने वागले याचा अर्थ, त्यांना घडवणारा कोणी नाही, देव नाही असा होत नाही. पवित्र शास्त्राने केलेले हे परीक्षण योग्यच आहे की, “धिक्कार असो तुमच्या उलट्या समजाला! माती कुंभाराशी समान असे गणतील काय? ‘तू मला केले नाही,’ असे कर्त्याला कर्म म्हणेल काय? ‘तुला अक्कल नाही,’ असे घडलेली वस्तु घडणाऱ्‍यास म्हणेल काय?”—यशया २९:१६.

२७. आमच्या दुःखाबद्दल देव उत्तर देण्याची अपेक्षा आम्हाला का बाळगता येईल?

२७ निर्मात्याने जे घडविले त्यातील आश्‍चर्यकारक गुंतागुंतीद्वारे त्याने आपले सुज्ञान प्रकटविले आहे. जगण्यासाठी पृथ्वीला योग्य तऱ्‍हेने सुसज्जित करून, आमचे मन व शरीर अद्‌भुतरितीने घडवून, आणि आनंदाचा उपभोग घेण्यासाठी इतक्या चांगल्या गोष्टी प्रदान करून त्याला आपल्याबद्दलची काळजी वाटते आहे हे त्याने दाखवून दिले आहे. तेव्हा, देवाने दुःखाला परवानगी का दिली? तो त्याबद्दल काय करणार आहे? या प्रश्‍नांना उत्तर देण्याद्वारे तो त्याला आम्हाबद्दल वाटणारी काळजी व सुज्ञान निश्‍चितपणे प्रकट करू शकेल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्रं]

संरक्षक वातावरणासहित असणारी ही पृथ्वी आम्हासाठी असे अद्वितीय घर आहे जे काळजी करणाऱ्‍या देवाने आम्हाला दिले आहे

[६ पानांवरील चित्रं]

पृथ्वीची घडण इतक्या प्रेमयुक्‍त काळजीने करण्यात आली की ज्यामुळे आम्हाला तिचा पूर्ण आनंद घेता येऊ शकतो

[७ पानांवरील चित्रं]

‘पृथ्वीवर पसरलेल्या दळणवळणाच्या सबंध जाळ्याच्या देखील अधिक संख्येने पुढे जाऊ शकतील इतके जोड मेंदूत भरलेले आहेत.’ —अणुकणाचे जीवशास्त्रज्ञ

[८ पानांवरील चित्रं]

“डोळ्याची रचना करण्यात आली आहे असे कळते; कोणा दुर्बिण बनवणाऱ्‍याला यापेक्षा अधिक असे चांगले करणे जमले नसते.”—खगोलशास्त्रज्ञ