व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव खरोखरी आपली काळजी करतो का?

देव खरोखरी आपली काळजी करतो का?

भाग १

देव खरोखरी आपली काळजी करतो का?

१, २. देवाविषयी लोक कोणता प्रश्‍न विचारतात, व का?

 तुमच्या जीवनामध्ये कधी तरी, तुम्ही असे विचारले असावे: ‘आमची काळजी वाहणारा देव आहे तर, त्याने दु:खाला परवानगी का दिली?’ आम्ही सर्वांनी दु:खाचा अनुभव घेतला आहे किंवा ज्यांना दु:ख आहे अशा काहींना ओळखत असू.

वस्तुत:, सबंध इतिहासात लोकांनी युद्धे, निष्ठुरता, हिंसा, अप्रामाणिकता, गरिबी, आजार व प्रिय जनांच्या मृत्युने दु:ख आणि हृदययातना सहन केल्या आहेत. आमच्या २०व्या शतकातच, युद्धांनी दहा कोटी लोकांना ठार मारले आहे. इतर करोडो जखमी झाले किंवा त्यांची घरे व मालमत्ता ही गमावली गेली. आमच्या काळात पुष्कळ अशा भयंकर घटना घडल्या, ज्याचा परिणाम अति शोक, अश्रुधारा, आणि अगणित लोकांच्या समोर आशाहीनता यात दिसला आहे.

३, ४. देवाने दु:खाला दिलेल्या परवानगीबद्दल अनेकांना कसे वाटते?

काही लोक दु:खी व रागीट होतात आणि त्यांना वाटते की देव आहे, तर तो आपली काळजी खरोखरच घेत नाही. किंवा त्यांना वाटते की देवच नाही. उदाहरणार्थ, एक माणूस, ज्याने पहिल्या महायुद्धात वंशीय छळामुळे त्याच्या मित्रांचा आणि कुटुंबाचा मृत्यू सहन केला, त्याने विचारले: “आम्हाला देवाची गरज होती तेव्हा तो कोठे होता?” आणखीन एक व्यक्‍ति, नाझींनी दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी केलेल्या लाखोंच्या कत्तलीतून वाचला, त्याने पाहिलेल्या त्रासामुळे अत्यंत दु:खीत झाला, तो म्हणाला: “तुम्ही माझे हृदय चाटले तर विषबाधा होईल.”

यास्तव एक चांगला देव दुष्ट गोष्टींना का घडू देतो हे पुष्कळांना समजत नाही. उलटपक्षी, ते असा प्रश्‍न विचारतात की तो अस्तित्त्वात आहे का किंवा त्याला खरोखरच आपली काळजी आहे का. बहुतेकांना असेही वाटते की दु:ख हे मानवी अस्तित्त्वाचाच एक भाग नेहमी असेल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२, ३ पानांवरील चित्र]

दुःखापासून मुक्‍त असे नवे जग जवळ आहे का?