नव्या जगाचा पाया आत्ताच रचला जात आहे
भाग ११
नव्या जगाचा पाया आत्ताच रचला जात आहे
१, २. पवित्र शास्त्र भविष्यवाणीच्या पूर्णतेत, आमच्या डोळ्यांदेखत काय होत आहे?
सैतानाचे जुने जग अधोगतीला जात असता देवाच्या नव्या जगाचा पाया आता रचला जात आहे ही सत्यता सुद्धा विस्मयकारक आहे. आमच्या डोळ्यांदेखत, देव सर्व राष्ट्रांतील लोकांना एकत्रित करत आहे आणि त्यांना त्याने नव्या पार्थिव संघटनेचा पाया असे केले आहे, जो लवकरात लवकर आजच्या विभक्त जगाची जागा घेईल. पवित्र शास्त्रात, २ पेत्र ३:१३, मध्ये ह्या नव्या समाजाला “नवी पृथ्वी” असे संबोधिले आहे.
२ पवित्र शास्त्र भविष्यवाणी अशीही म्हणते: “शेवटल्या दिवसांत [आम्ही राहत असलेल्या काळात] . . . लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील: ‘चला आपण परमेश्वराच्या [यहोवा न्यू.व] पर्वतावर [त्याच्या खऱ्या भक्तिसाठी] . . . चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.’”—यशया २:२-३.
३. (अ) यशयाची भविष्यवाणी कोणामध्ये पूर्ण होत आहे? (ब) पवित्र शास्त्राचे शेवटचे पुस्तक यावर काय भाष्य करते?
३ ‘देवाचे मार्ग व त्याच्या पथांना’ जे अधीनता दाखवतात त्यांच्या विषयी ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे. पवित्र शास्त्राचे शेवटचे पुस्तक ह्या शांती-प्रिय आंतरराष्ट्रीय लोकांच्या समाजाविषयी “सर्व राष्ट्रे, वंश, लोक, व भाषा यापैकी मोठा लोकसमुदाय” असे म्हणते जे खरोखरी विश्वव्यापी बंधुत्व राखून देवाची सेवा ऐक्यतेने करतात. आणि पवित्र शास्त्र असेही म्हणते: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत.” म्हणजेच, ते ह्या दुष्ट व्यवस्थेच्या नाशातून वाचतील.—प्रकटीकरण ७:९, १४; मत्तय २४:३.
खरोखरचे आंतरराष्ट्रीय बंधुत्व
४, ५. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये जगव्याप्त बंधुत्व का शक्य आहे?
४ लाखो यहोवाचे साक्षीदार देवाचे नियम व मार्गानुसार जगण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांची चिरकालिक जीवनाची आशा देवाच्या नव्या जगावर स्तंभित आहे. देवाच्या नियमांनुसार दैनंदिन जीवन व्यतित केल्यामुळे ते त्याला आता व नव्या जगात त्याच्या शासनाला अधीनता दाखवण्याचा कल राखून आहेत. त्यांचे राष्ट्रीयत्व व वर्ण कोणताही असो ते सर्व ठिकाणी—देवाने त्याच्या वचनात जे दर्जे घालून दिले आहेत—त्याचे पालन करतात. या कारणास्तव त्यांचे खरोखरी एक आंतरराष्ट्रीय बंधुत्व, देवाच्या सृष्टीचा एक नवा जागतिक समाज आहे.—यशया ५४:१३; मत्तय २२:३७, ३८; योहान १५:९, १४.
५ यहोवाचे साक्षीदार त्यांच्या अतुल्य विश्वव्यापी बंधुत्वाचे श्रेय स्व:तकडे घेत नाहीत. त्यांना हे माहीत आहे की देवाचा शक्तिमान आत्मा अशा लोकांवर कार्य करतो जे त्याच्या नियमांच्या अधीन होतात त्याचा हा परिणाम आहे. (प्रे. कृत्ये ५:२९, ३२; गलतीकर ५:२२, २३) हे देवाचे कृत्य आहे. जसे येशूने म्हटले: “ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य त्या देवाला शक्य आहेत.” (लूक १८:२७) यास्तव, ज्या देवाने ह्या टिकणाऱ्या विश्वाला बनविले तोच नव्या जागतिक समाजालाही टिकवण्याची शक्यता देऊ शकतो.
६. यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त बंधुत्वाला एक आधुनिक चमत्कार असे का म्हटले जाऊ शकते?
६ यास्तव, नवीन जगात यहोवाचे अधिपत्य करण्याची रीत आता तो तयार होत असलेल्या नवीन जगाचा पाया ज्या प्रकाराने घालीत आहे त्याद्वारे आधीच दिसून येत आहे. त्याने त्याच्या साक्षीदारांच्या बाबतीत जे केले, ते एका अर्थाने आधुनिक चमत्कारच आहे. का बरे? कारण त्याने यहोवाच्या साक्षीदारांची खरोखरी एका जगव्याप्त बंधुत्वात बांधणी केली आहे, जी कधीही विभाजित राष्ट्रीयता, वर्णभेद, किंवा धार्मिक स्वार्थ यांनी तुटणार नाही. साक्षीदारांची संख्या लाखात आहे व ते २०० राष्ट्रात आहेत, तरी एका अतुट बंधनाप्रमाणे बांधलेले आहेत. हे जगव्याप्त बंधुत्व, देवाच्या कृतीचा—एक आधुनिक चमत्कार या नात्याने इतिहासात अतुल्य ठरत आहे.—यशया ४३:१०, ११, २१; प्रे. कृत्ये १०:३४, ३५; गलतीकर ३:२८.
देवाच्या लोकांना ओळखणे
७. येशूने त्याच्या शिष्यांची खरी ओळख कशी होईल ते म्हटले?
७ देवाच्या नव्या जगाचा पाया म्हणून तो ज्या लोकांचा उपयोग करीत आहे त्यांच्याबद्दल आपल्याला आणखी खात्री कशी करता येईल? बरे, योहान १३:३४, ३५ मधील येशूच्या शब्दांची कोण पूर्णता करतात? तो म्हणाला: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो, की तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी. जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.” यहोवाचे साक्षीदार येशूच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवतात व त्याप्रमाणे चालतात. देवाचे वचन मार्गदर्शन करते त्याप्रमाणे, ते “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति” करतात. (१ पेत्र ४:८) यासोबतच, त्यांनी “[स्वत:वर] पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति” तिचे लेणे धारण केले आहे. (कलसैकर ३:१४) अशाप्रकारे, बंधुप्रेम त्यांना जगव्याप्त कटिबंधनात “जोडणारे” आहे.
८. पहिले योहान ३:१०-१२ देवाच्या लोकांची कशी ओळख देते?
८ याचप्रमाणे १ योहान ३:१०-१२ म्हणतेः “यावरुन देवाची मुले व सैतानाची मुले उघड होतात: जो कोणी नीतीने वागत नाही तो देवापासून नाही व जो आपल्या बंधुवर प्रीति करीत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीति करावी. जसा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला तसे आपण नसावे.” या कारणास्तव, देवाच्या लोकांचे अहिंसक जगव्याप्त बंधुत्व आहे.
ओळखण्याचे आणखी एक चिन्ह
९, १०. (अ) शेवटल्या दिवसात कोणत्या कामामुळे देवाच्या सेवकांची ओळख होते? (ब) यहोवाच्या साक्षीदारांनी मत्तय २४:१४ ला कसे पूर्ण केले आहे?
९ देवाच्या सेवकांना ओळखण्याचा आणखी एक मार्ग आहे. जगाच्या अंताविषयीच्या त्याच्या भविष्यवाणीत, येशूने शेवटले दिवस म्हटल्या जाणाऱ्या विशिष्ट काळास संबोधणाऱ्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या होत्या. (ह्या माहितीपत्रकाचा भाग ९ पहा.) ह्या भविष्यवाणीचे मुलभूत चिन्ह मत्तय २४:१४ मध्ये त्याच्या शब्दात सांगितले आहे: “सर्व राष्ट्रास साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल.”
१० त्या भविष्यवाणीच्या पूर्णतेला आम्ही पाहिले आहे का? होय. शेवटले दिवस १९१४ पासून सुरु झाल्यापासून, यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा येशूने सांगितल्याप्रमाणे, विशेषेकरुन लोकांच्या घरी जाऊन संपूर्ण जगभरात प्रचार करण्यास सुरवात केली आहे. (मत्तय १०:७, १२; प्रे. कृत्ये २०:२०) लाखो साक्षीदार प्रत्येक राष्ट्रात लोकांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर नव्या जगाबद्दल बोलतात. ह्यामुळेच तुम्हाला हे माहितीपत्रक मिळाले असेल, कारण यहोवाच्या साक्षीदारांच्या कामात, छपाई करणे आणि देवाच्या राज्याविषयीच्या करोडो प्रकाशनांचे वितरण करणे यांचाही समावेश आहे. संपूर्ण जगभरात घरोघरी जाऊन देवाच्या राज्याबद्दल प्रचार करणाऱ्यांपैकी कोणाला तुम्ही ओळखता का? आणि मार्क १३:१० दाखवते की हे प्रचार व शिकवण्याचे कार्य अंत येण्याआधी “प्रथम” केले पाहिजे.
दुसऱ्या मोठ्या वादविषयाला उत्तर देणे
११. देवाच्या शासनाधीन होऊन यहोवाचे साक्षीदार आणखी काय साध्य करतात?
११ देवाच्या नियमांच्या व तत्वांच्या अधीन होऊन यहोवाचे साक्षीदार आणखी काहीतरी साध्य करतात. ते हे दाखवून देतात की, सैतानाने मानव परिक्षेत असताना देवास विश्वासू राहू शकत नाहीत या केलेल्या दाव्यात तो लबाड ठरला. (ईयोब २:१-५) सर्व राष्ट्रातील लाखो लोकांची संघटना असल्याने, हे साक्षीदार, देवाच्या शासनाला एकजूटीने निष्ठा प्रदर्शित करतात. ते अपूर्ण मानव असले तरी विश्वव्यापी सार्वभौमतेच्या वादविषयाला, सैतानी दबावांना सहन करत असता, देवाच्या बाजूला उंचावून धरतात.
१२. यहोवाचे साक्षीदार, त्यांच्या विश्वासाद्वारे कोणाचे अनुकरण करतात?
१२ गतकाळात यहोवाला निष्ठा दाखवलेल्या साक्षीदारांच्या यादीत आज, हेच लाखो यहोवाचे साक्षीदार आपली साथ जोडतात. यातील काही थोडक्यात सांगायचे म्हणजे हाबेल, नोहा, ईयोब, अब्राहाम, सारा, इसहाक, याकोब, दबोरा, रुथ, दाविद आणि दानीएल हे होते. (इब्रीकर ११ अध्याय) पवित्र शास्त्र म्हणते तसे ते ‘साक्षीरुपी मेघ’ आहेत. (इब्रीकर १२:१) हे व सर्व आणि इतर ज्यामध्ये येशू व त्याच्या शिष्यांचा समावेश होता त्यांनी देवाबरोबर सात्विकता टिकवली.
१३. सैतानाबद्दलचे येशूचे कोणते शब्द खरे ठरले?
१३ येशूने सैतानाविषयी धार्मिक पुढाऱ्यांना जे म्हटले ते अगदी सत्य आहे याला हे शाबीत करते. तो म्हणाला: “ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्याला, तुम्ही आता जिवे मारावयास पाहता . . . तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहा आणि आपल्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे आणि तो सत्यात टिकला नाही. कारण त्याजमध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो ते स्वत: होऊनच; बोलतो कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे.”—योहान ८:४०, ४४.
तुमची निवड काय आहे?
१४. नव्या जगाचा पाया याला आता काय होत आहे?
१४ यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय समाजाचा देवाद्वारे आता रचत असलेला नव्या जगाचा पाया दिवसेंदिवस बळकट होत चालला आहे. प्रत्येक वर्षी लाखो लोक देवाच्या शासनाला स्वीकार करण्यासाठी, अचूक ज्ञानावर आधारीत, त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याचा उपयोग करीत आहेत. ते नव्या जागतिक समाजाचे एक भाग असे बनले आहेत, विश्वव्यापी सार्वभौमत्वाच्या वादविषयाला, देवाच्या बाजूने उंचावून धरत आहेत, आणि सैतानाला लबाड ठरवत आहे.
१५. आमच्या दिवसात येशू कोणते वेगळे करण्याचे काम करीत आहे?
१५ देवाच्या शासनाची निवड केल्याने, ते येशू “शेरडांपासून” “मेंढरे” वेगळी करीत असता त्याच्या “उजवीकडे” असण्याच्या योग्यतेचे बनले आहेत. शेवटच्या दिवसांविषयीच्या त्याच्या भविष्यवाणीत, येशूने भाकित केले की, “त्याजपुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील. मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवील व शेरडांस डावीकडे ठेवील.” मेंढरे ही नम्र लोक आहेत जे देवाच्या शासनाधीन होऊन येशूच्या बांधवांसोबत संगत ठेवतात व पाठिंबा देतात. शेरडे हे हट्टी लोक आहेत जे येशूच्या बांधवांचा नकार करतात व देवाच्या शासनाला पाठिंबा देण्याजोगे काहीच करत नाहीत. याचा परिणाम काय होईल? येशूने म्हटले: “ते [शेरडे] तर सार्वकालिक दंड भोगावयास जातील आणि धार्मिक लोक [मेंढरे] सार्वकालिक जीवन भोगावयास जातील.”—मत्तय २५:३१-४६.
१६. येणाऱ्या नंदनवनात तुम्हाला जगायचे आहे तर तुम्ही काय केले पाहिजे?
१६ खरेच, देव आमची काळजी करतो! अगदी लवकर तो एक आनंदी पार्थिव नंदनवन पुरवील. तुम्हाला त्या नंदनवनात राहण्यास आवडेल का? असे आहे तर, यहोवाने केलेल्या तरतुदींना गुणग्राहकता दाखवून त्याच्याविषयी शिकून व जे शिकता त्याप्रमाणे वागून दाखवू शकता. “परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे [यहोवा न्यू.व] वळो म्हणजे तो त्याजवर दया करील.”—यशया ५५:६, ७.
१७. कोणाची सेवा करावी हे निवडण्यास आता वेळ का वाया घालू शकत नाही?
१७ निरर्थक गोष्टींसाठी वेळ नाही. ह्या जुन्या युगाची समाप्ती जवळ आली आहे. देवाचे वचन असा सल्ला देते: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करु नका. जर कोणी जगावर प्रीति करितो तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. जग व त्याची वासना ही नाहीतशी होत आहेत. पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१५-१७.
१८. देवाच्या विस्मयकारक नव्या जगात अनंतकाळ जगण्यासाठी कोणते कार्य खात्रीने तुम्हाला वाट पाहण्यासाठी मदत करु शकेल?
१८ देवाच्या लोकांना नव्या जगातील सार्वकालिक जीवनासाठी आता प्रशिक्षण दिले जात आहे. नंदनवन बनविण्यासाठी लागणारी आध्यात्मिक व इतर कला ते शिकत आहेत. देवास शासनकर्ता म्हणून निवडून आणि तो संपूर्ण पृथ्वीभरात आज जीवन वाचविण्याचे काम करवून घेत आहे त्याला पाठिंबा देण्यास आम्ही तुम्हाला आर्जवितो. यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास करा, व जो देव तुमची काळजी करतो व दु:खाचा अंत करील त्याला ओळखा. अशाप्रकारे तुम्हीसुद्धा नव्या जगाच्या पायाचा एक भाग होऊ शकाल. आणि मग देवाची संमती प्राप्त करण्यासाठी व त्या विस्मयकारक नव्या जगात अनंतकाळ जगण्यासाठी खात्रीने तुम्ही वाट पाहू शकता.
[अभ्यासाचे प्रश्न]
[३१ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांमध्ये खरोखरी एक आंतरराष्ट्रीय बंधुत्व आहे
[३२ पानांवरील चित्रं]
देवाच्या नव्या जगाचा पाया आत्ताच रचला जात आहे