बंडाळीचा परिणाम काय झाला?
भाग ७
बंडाळीचा परिणाम काय झाला?
१-३. यहोवा योग्य आहे हे काळाने कसे दर्शविले?
देवाने शासन करण्याच्या हक्काच्या वादविषयासंबंधी, शतकापासून देवाशिवाय स्वतंत्र अशा मानवी शासनाचा काय परिणाम दिसला आहे? देवापेक्षा मानव चांगले शासनकर्ते शाबीत झालेत का? मनुष्याने मनुष्यावर चालविलेल्या निर्दयीपणाच्या अहवालांना आम्ही लक्ष देऊन पाहिले तर कळून येते की ते मुळीच ठरले नाहीत.
२ आमच्या पहिल्या पालकांनी देवाच्या शासनाला धुडकावले, तेव्हा विपत्तिला सुरुवात झाली. त्यांनी स्वत:वर व त्यांच्यापासून येणाऱ्या सर्व मानवी कुटुंबावर दु:ख ओढविले. आणि ते स्वत: शिवाय कोणालाच दोष देऊ शकले नाहीत. देवाचे वचन म्हणते: “हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत; हा असा त्यांचा दोष आहे.”—अनुवाद ३२:५.
३ इतिहासाने आदाम व हव्वेला, देवाने दिलेल्या इशाऱ्याची अचूकता दाखवली की जर ते देवाच्या तरतुदींतून विभक्त झाले तर अधोगतीस जातील व मरण पावतील. (उत्पत्ती २:१७; ३:१९) ते देवाच्या शासनापासून विभक्त झाले, आणि कालांतराने अधोगतीस जाऊन मरण पावले.
४. आम्ही सर्वच अपूर्ण, आजार व मरण याच्या आहारी का गेलो?
४ यानंतर त्यांच्या संततिला काय झाले त्याबद्दल रोमकरांस पत्र ५:१२ स्पष्टता करते: “एका मनुष्याच्या [आदाम, मानवजातीचा कुटुंबप्रमुख] द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्व मनुष्यात मरण पसरले.” अशाप्रकारे आपल्या पालकांनी देवाच्या देखरेखीविरुद्ध बंड केल्यानंतर, ते सदोष पापी बनले. अनुवंशिकतेच्या शास्त्रानुसार, ही परिणामी अपूर्णता त्यांना त्यांच्या संततिला द्यावी लागली. यामुळेच आपण सर्व सदोष जन्मलो, आणि आजार व मरण याच्या आहारी जातो.
५, ६. खरी शांती व समृद्धता आणण्याच्या मानवाच्या प्रयत्नांबद्दल इतिहासाने काय दाखवले आहे?
५ पुष्कळ शतके निघून गेली. साम्राज्ये येऊन गेली. शक्य आहे अशा प्रत्येक सरकाराचा प्रयत्न केला गेला. तरीही, मानवजातीला भीतीदायक गोष्टी मिळत राहिल्या. एखादा विचार करील की, सहा हजार वर्षानंतर मानवाने शांती, न्याय आणि समृद्धता स्थापित करण्याइतपत प्रगती करायला हवी आणि आता पर्यंत दया, सहानुभूती, आणि सहकार या सर्व सकारात्मक मूल्यात निपुण व्हावयास हवे.
६ पण वस्तुस्थिती, याच्या विपरीत आहे. कोणत्याच प्रकारच्या सरकारने सर्वांसाठी खरी शांती आणि समृद्धता आणली नाही. ह्या २०व्या शतकातच, समूळ नाशात लाखोंची पद्धतशीर कत्तल करण्यात आली आणि युद्धात १० कोटी पेक्षा अधिक मारले गेले. आमच्या काळात राजनैतिक भेदभावांमुळे व असहिष्णुतेमुळे अगणित लोकांचा छळ, कत्तल केली गेली, व कित्येकांना तुरुंगवास मिळाला.
आजची सध्याची स्थिती
७. सध्याच्या मानवी कुटुंबाच्या परिस्थितीचे वर्णन कसे करु शकतो?
७ याबरोबरच, मानवी कुटुंबाची आजची सर्व बाजूंनी परिस्थिती पहा. अपराध व हिंसा बोकाळत आहे. मादक पदार्थांचा गैरवापर सर्वत्र पसरलेला आहे. लैगिंक संक्रमणामुळे झालेले रोग सार्वत्रिक आहेत. भयजनक एडस् रोग लाखो लोकांवर परिणामित होत आहे. दर वर्षी कोट्यावधी लोकांचा भूक किंवा आजाराने मृत्यु होत आहे, फक्त एक लहान गट अफाट श्रीमंत आहे. मानव पृथ्वीवर प्रदूषण व उकिरडा करीत आहे. कौटुंबिक जीवन व नैतिक दर्जे सर्वत्र खालावलेले आहेत. खरेच, आजचे जीवन ह्या ‘युगाचा देव’ सैतान याच्या कुरूप शासनाचे प्रतिरुप प्रतिबिंबित करीत आहे. ज्या जगाचा तो अधिकारी आहे ते करुणारहित, निष्ठुर, व अतिभ्रष्ट झाले आहे.—२ करिंथकर ४:४.
८. मानवजातीच्या साध्यतेला आम्ही खरी प्रगती का म्हणू शकत नाही?
८ देवाने मानवांना त्यांच्या वैज्ञानिक व आर्थिक प्रगतीच्या उच्चांकापर्यंत येऊ दिले. परंतु जेथे धनुष्यबाणाची जागा मशीन गन, रणगाडा, जेट बॉम्बर्स व अणुशस्त्र क्षेपणस्त्र यांनी घेतली त्याला खरी प्रगती म्हणावी का? लोक अंतराळातून प्रवास करु शकतात पण पृथ्वीवर शांतीने एकत्र राहू शकत नाहीत याला प्रगती म्हणावी का? रात्रीच्या वेळी किंवा काही ठिकाणी दिवसासुद्धा लोक रस्त्यावरुन जाताना घाबरतात याला प्रगती म्हणावी का?
काळाने काय दाखवले
९, १०. (अ) शतकांच्या गेलेल्या काळाने स्पष्टपणे काय दाखवले आहे? (ब) देव इच्छा स्वातंत्र्य का हिरावून घेणार नाही?
९ शतकांच्या काळ-परिक्षणाने दाखवले आहे की, देवाच्या शासनाविना मानवाला त्याचे पाऊले नीट टाकणे अशक्य आहे. तो खाणे, पिणे, व श्वासोच्व्छास करण्याशिवाय जसा जिवंत राहू शकत नाहीत तसेच ते आहे. याचा पुरावा स्पष्टच आहे: जसे आम्हाला अन्न, पाणी आणि हवा यावर अवलंबून राहण्यासाठी बनविले गेले आहे, त्याचप्रमाणे सृष्टीकर्त्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहण्यासाठी निर्माण करण्यात आले.
१० दुष्टाईला परवानगी देऊन, देवाने हे दर्शवून दिले आहे की, इच्छा स्वातंत्र्याचा दुरूपयोग केल्याने कोणते दु:खदायक परिणाम मिळतात. इच्छा स्वातंत्र्य ही इतकी मूल्यवान देणगी आहे की मानवांकडून हिरावून घेण्याऐवजी, त्याचा दुरूपयोग करण्याचा अर्थ काय होतो हे पाहण्यासाठी देवाने त्याला परवानगी दिली आहे. देवाचे वचन सत्य बोलते, जेव्हा ते म्हणते: “पाऊले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” आणि जेव्हा ते म्हणते की: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो,” तेव्हाही ते सत्यच सांगते.—यिर्मया १०:२३; उपदेशक ८:९.
११. मानवी शासनाच्या कोणत्याही प्रकाराने दु:खाला काढून टाकले आहे का?
११ सहा हजार वर्षांसाठी मानवाला शासन करण्यासाठी देवाची परवानगी जोरदारपणे सुचविते की मनुष्य दु:खाला थांबविण्यास असमर्थ आहे. तो हे कधीच करु शकला नाही. उदाहरणार्थ, इस्राएलचा राजा शलमोन त्याच्या दिवसात, मानवी शासनामुळे येणाऱ्या विपत्तिला त्याच्या सर्व बुद्धिने, धनाने व शक्तिने नीट करु शकला नाही. (उपदेशक ४:१-३) याचप्रकारे, आमच्या दिवसातील जागतिक नेते, आधुनिक औद्योगिक प्रगती असली तरी तिच्या साहाय्याने, दु:खाचा समूळ नाश करु शकत नाही. ह्याहूनही बिकट म्हणजे, देवाच्या शासनापासून स्वतंत्र असलेल्या मानवांनी दु:ख काढून टाकण्याएवजी ते अधिक वाढविले आहे याची ग्वाही इतिहासाने दिली आहे.
देवाचा दूरदर्शी दृष्टीकोन
१२-१४. देवाने दु:खाला दिलेल्या परवानगीच्या परिणामामुळे कोणते दूरदर्शी फायदे येतात?
१२ दु:खाला देवाने दिलेली परवानगी आमच्यासाठी इजात्मक आहे. पण त्याने दूरदर्शी दृष्टीकोन घेतला आहे. त्याला माहीत आहे की ह्या लांबच्या पल्ल्यात चांगले परिणाम होतील. देवाच्या दृष्टीकोनाचा फायदा निर्मितीला, काही वर्षांसाठी, वा हजार वर्षांसाठीच नव्हे तर लाखों वर्षांसाठी होय, चिरकालासाठी होणार आहे.
१३ भवितव्यात जर कोणी इच्छा स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन देवाच्या कार्यहालचालींच्या विरुद्ध गेल्यास त्याचा दृष्टीकोन सिद्ध करुन दाखवण्यासाठी त्याला वेळ देण्याची काहीही गरज भासणार नाही. हजारो वर्षांसाठी बंडखोरांना अनुमती देऊन, देवाने असा कायदेशीर शिरस्ता स्थापना केला ज्याचे अवलंबन संपूर्ण विश्वात चिरकालासाठी केले जाईल.
१४ यहोवाने दुष्टाईला व दु:खाला परवानगी देण्यामुळे, त्याच्या शिवाय काहीही तडीस नेले जाऊ शकत नाही हे पुरेपुर रितीने सिध्द झालेले असणार. तो पर्यंत हेही दिसून येईल की कोणतीच मानवी किंवा आत्मिक प्राण्यांची स्वतंत्र व्यवस्था चिरकालिक फायदे आणू शकत नाही. तद्वत, कोणत्याही बंडाळीला देव त्वरेने नाश करुन टाकण्यात पूर्ण न्यायी ठरेल. “दुर्जनांचा तो नाश करतो.”—स्तोत्रसंहिता १४५:२०; रोमकर ३:४.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्रं]
आमच्या पहिल्या पालकांनी देवापासून स्वतंत्रता निवडली, तेव्हा ते कालांतराने म्हातारे होऊन मरण पावले
[१६ पानांवरील चित्रं]
देवापासून विभक्त असे मानवी शासन दु:खद शाबीत झाले आहे
[चित्राचे श्रेय]
U.S. Coast Guard photo