वायदा केलेले परादीस कोठे असेल?
वायदा केलेले परादीस कोठे असेल? सूरह २१, अल्अंबिया (नबी) आयत १०५ येथे आपण वाचतो: “जबूरमध्ये तौरातनंतर आम्ही हे लिहून ठेवले आहे की, ‘पृथ्वीचे वारस आमचे नेक बंदे ठरतील.’”
सूरह ३९, अज़ज़ुमर (सैन्ये), आयत ७३ आणि ७४ यांच्याशी तुलना करावी.
होय, स्तोत्र (जबूर) ३७:२९ यात कितीतरी शतकांपूर्वी असे जाहीर केले होते की वायदा केलेले परादीस हे पृथ्वीवर असेल. तेथे असे लिहिले आहे: “नीतिमान [नेक] पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”
परादीसमधील जिंदगी
पवित्र शास्त्रवचने याहूनही अधिक माहिती देतात, ती परादीसमधील जिंदगीचे वर्णन करतात.
◆ मनुष्य आणि जनावरांत सलोखा: “लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, . . . त्यांस लहान मूल वळील.”—यशया ११:६; यशया ६५:२५ यासोबत तुलना करा.
◆ लढाया आणि हिंसाचार नाही: “तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४; स्तोत्र ४६:९ यासोबत तुलना करा.
◆ इंसानी कुटुंब प्रेमाच्या बंधनात बांधले जाईल: “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.
◆ मुबलक अन्न आणि सर्वांना राहायला घरे: “ते घरे बांधून त्यात राहतील; . . . ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.”—यशया ६५:२१, २२; स्तोत्र ६७:६; १४५:१६ यासोबत तुलना करा.
◆ आजार व मृत्यू नाहीत: “तो [खुदा] ‘त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट ही नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
◆ मृतांचे पुन्हा जिंदा होणे: “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—पवित्र बायबलमध्ये फेरफार करण्यात आले हे खरे नाही का?
सर्वशक्तिमान खुदा हे कधीही बर्दास्त करणार नाही.
कुरआन स्पष्टपणे सांगते: “अल्लाहच्या गोष्टींना बदलण्याची ताकद कोणातच नाही.”—सूरह ६, अल्अनआम (गुरे), आयत ३४.
पवित्र बायबल देखील एक मिळतेजुळते सत्य जाहीर करते: “गवत सुकते; फूल कोमेजते, पण आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”—यशया ४०:८.
काहींनी देवाच्या वचनात तबदिली करण्याचा प्रयत्न केला, पण ते कामयाब झाले नाहीत. उदाहरणार्थ, योहानाच्या पहिल्या पत्रात, ५ व्या अध्यायातील ७ व्या आयतीत पुढील शब्द एकेकाळी जोडण्यात आले होते: “स्वर्गात पिता, वचन आणि पवित्र आत्मा आहेत: आणि हे तीन एक आहेत.”—किंग जेम्स व्हर्शन.
हे शब्द जुन्या बायबल हस्तलिखितांत कोठेही मौजूद नव्हते, त्रैक्याच्या खोट्या सिद्धान्ताचे समर्थन करण्यासाठी ते नंतर सामील करण्यात आले. तथापि, विद्वानांना माहीत आहे की हे शब्द बनावटी आहेत; आणि म्हणूनच अलीकडच्या बायबल भाषांतरांत ते सामील करण्यात आलेले नाहीत.
कुरआनच्या तुलनेत चारशे ते पाचशे वर्षे जुनी असलेली बायबल हस्तलिखिते आज वस्तू-संग्रहालयात पाहायला मिळतात. आपल्या हातात असलेले बायबल आणि ती जुनी हस्तलिखिते, यांत तुलना केल्यास, स्पष्टपणे हे दिसून येते की आपल्याजवळ आज तोच मजकूर आहे जो लिहिण्यास खुदाने आपल्या प्राचीन काळच्या दासांना प्रेरित केले होते.
सूरह १०, यूनुस (योना), ९४ व्या आयतीशी तुलना करून पाहा: “जर तुला या मार्गदर्शनासंबंधी जरा देखील शंका असेल जे आम्ही तुझ्यावर उतरविले आहे तर तू त्या लोकांना विचारून घे जे अगोदरपासून ग्रंथ वाचीत आहेत.”
पवित्र बायबलविषयी तुम्हाला काय माहीत असावे
◆ खुदा हा एकच खरा खुदा आहे, तो सर्वशक्तीमान असून त्याच्या बरोबरीचा कोणीच नाही.—अनुवाद ६:४; यशया ४४:६.
◆ पुत्र होण्यासाठी खुदाने एखाद्या स्त्रीशी विवाह केला ही कल्पनाही नामुमकिन आहे.—स्तोत्र ३६:९; ईयोब ३८:७; लूक ३:३८; उत्पत्ति २:७.
◆ कोणत्याही व्यक्तीची किंवा वस्तूची (प्रतिमा व कोरीव मूर्तींचा यात समावेश आहे) इबादत करण्याला पवित्र बायबल जोरदारपणे विरोध करते. केवळ खुदाचीच उपासना केली पाहिजे.—मत्तय ४:१० लेवीय २६:१ स्तोत्र ११५:४-८.
◆ खुदा सर्व मानवजातीचा शासक आहे, आणि त्याचे वचन हे सर्व मानवांसाठी, पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी लिहिण्यात आले होते.—उत्पत्ति २२:१८; १ तीमथ्य २:४; इफिसकर ५:३३.
◆ खुदाने वायदा केलेल्या परादीसमध्ये प्रवेश मिळणे हे कोणाच्या कुळावर, राष्ट्रीयत्वावर, किंवा आईवडिलांकडून मिळालेल्या धर्मावर अवलंबून नाही.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ प्रकटीकरण ७:९, १०.
◆ पवित्र बायबल मनुष्याला विचार करण्यास प्रवृत्त करते आणि अज्ञानाचा विरोध करते.—नीतिसूत्रे २:३-६; स्तोत्र ११९:३३, ३४.
आपण खुदाच्या परादीसच्या दहेलीजवर उभे आहोत—कशावरून?
भविष्य केवळ खुदा जाणतो आणि त्याच्या वचनात त्याने अशा काही घटना पूर्वीच सांगितल्या होत्या ज्या परादीस जवळ आल्याचे आसार असतील.
त्याने जिक्र केलेल्या काही घटना या आहेत:
◆ लढाया, भूकंप, आजार, आणि दुष्काळ.—लूक २१:१०, ११.
◆ अंधाधुंदी—मत्तय २४:१२.
◆ खुदगर्जी, आईबापांचा आज्ञाभंग, धर्मांत दिखावटीपणा.—२ तीमथ्य ३:१-५.
या भविष्यवाण्या आज पूर्ण होताना तुम्हाला दिसतात का?
खुदाच्या परादीसमध्ये जगायचे असल्यास आपण काय केले पाहिजे?
आपण देवाच्या वचनातील सत्ये जाणून घेतली पाहिजेत, कारण या अचूक ज्ञानाची गुप्त खजिन्याशी तुलना करण्यात आली आहे.—नीतिसूत्रे २:४.
शिकलेल्या गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजे; आपला निर्माता आपल्याला फर्मावतो: “हाच मार्ग आहे; याने चला.”—यशया ३०:२१.
पुन्हा तुमच्याकडे येऊन, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या ३२-पानी माहितीपत्रकाच्या साहाय्याने तुमच्यासोबत पवित्र बायबलविषयी चर्चा करायला आम्हाला आवडेल.
[तळटीपा]
a या प्रकाशनात आढळणाऱ्या कुरआनमधील सर्व आयती एन. जे. दावूद यांच्या इंग्रजी भाषांतरातून घेतलेल्या आहेत.
[४ पानांवरील चित्राचे श्रेय]
भुकेने व्याकूळ मूल: Based on WHO photo by W. Cutting