अग्नीने शुद्ध केलेले सोने विकत घे
अध्याय १३
अग्नीने शुद्ध केलेले सोने विकत घे
लावदिकीया
१, २. वैभवी येशूकडून संदेश मिळणाऱ्या शेवटल्या मंडळीचे ठिकाण कोठे आहे आणि या शहराची काही वैशिष्ट्ये कोणती आहेत?
लावदिकीया ही पुनरुत्थित येशूकडून संदेश प्राप्त करणाऱ्या मंडळ्यातील शेवटली मंडळी आहे. तो संदेश केवढा डोळे उघडणारा व उत्तेजक आहे!
२ अलसेहीरच्या आग्नेयेस सुमारे ८८ किलोमीटर्सवर डेनिझिलजवळ आज लावदिकीयाचे अवशेष तुम्हाला आढळू शकतील. पहिल्या शतकात, लावदिकीया हे समृद्ध शहर होते. ते प्रमुख रस्त्यांच्या संगमावर वसलेले असल्यामुळे सावकारी पेढी तसेच व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सुपरिचित अशा डोळ्यांच्या अंजनाच्या विक्रीमुळे ते त्याच्या संपत्तीत अधिक भर घालत होते. तसेच, अत्युत्कृष्ट अशा काळ्या लोकरीपासून तेथेच तयार केल्या जाणाऱ्या उच्च प्रतीच्या कपड्यांसाठी ते प्रसिद्ध होते. या शहराची प्रमुख समस्या, पाण्याचा तुटवडा ही होती; त्यासाठी जवळच्याच उष्ण पाण्याच्या झऱ्यातून, कालव्याद्वारे पाणी आणून या समस्येवर मात करण्यात आली होती. अशाप्रकारे हे पाणी शहरात येईपर्यंत कोमट झालेले असे.
३. लावदिकीया येथील मंडळीला दिलेल्या संदेशाची सुरवात येशू कशी करतो?
३ लावदिकीया कलस्सैच्या जवळ होते. कलस्सैकरांना लिहिताना पौल, लावदिकीयाकरांना पत्र पाठवले असा उल्लेख करतो. (कलस्सैकर ४:१५, १६) त्या पत्रात पौलाने काय लिहिले हे आम्हास ज्ञात नाही; पण येशू आता लावदिकीयाकरांना जो संदेश पाठवतो, त्यावरुन ते मोठ्या दुःखदायक आध्यात्मिक स्थितीत सापडले होते असे दिसते. तरी देखील, येशू आपली शिफारस सुरवातीला याप्रकारे देतो: “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो.”—प्रकटीकरण ३:१४.
४. येशू हा “आमेन” कसा आहे?
४ येशू स्वतःला “आमेन” असे का म्हणतो? ही पदवी त्याच्या संदेशात न्यायालयीन वजनाची भर घालते. ज्या इब्री शब्दाचा अर्थ, “खात्रीने,” “तसेच होवो,” असा आहे; त्याचा दुसऱ्या भाषेच्या लिपीत लिहिलेला “आमेन” हा शब्द आहे. तो प्रार्थनेत म्हटल्या गेलेल्या गोष्टींच्या पुष्टीप्रीत्यर्थ शेवटी उच्चारला जातो. (१ करिंथकर १४:१६) येशू “आमेन” आहे, कारण त्याची निर्दोष सचोटी व यज्ञार्पित मृत्यू, यांनी यहोवाच्या सर्व मोलवान अभिवचनांची खात्री पुरवून त्यांस बळकटी आणली आहे. (२ करिंथकर १:२०) तेव्हापासून, सर्व प्रार्थना येशूद्वारे यहोवास योग्यपणे उद्देशून केल्या जातात.—योहान १५:१६; १६:२३, २४.
५. येशू कशाप्रकारे “विश्वसनीय व खरा साक्षी” आहे?
५ याचप्रमाणे, येशू हा “विश्वसनीय व खरा साक्षी” आहे. भविष्यवादात त्याचा संबंध नेहमी विश्वासूपणा, सत्य आणि नीतीमत्तेशी जोडण्यात आला आहे; कारण तो यहोवा देवाचा संपूर्ण विश्वसनीय सेवक आहे. (स्तोत्र ४५:४; यशया ११:४, ५; प्रकटीकरण १:५; १९:११) तो यहोवाचा सर्वथोर साक्षीदार आहे. खरे म्हणजे, “देवाच्या सृष्टीचे आदिकारण” या अर्थी, येशूने देवाच्या गौरवाची घोषणा सुरवातीपासूनच केली आहे. (नीतीसूत्रे ८:२२-३०) तो मनुष्य म्हणून पृथ्वीवर असताना, त्याने सत्याबद्दल साक्ष दिली. (योहान १८:३६, ३७; १ तीमथ्य ६:१३) त्याच्या पुनरुत्थानानंतर, शिष्यांवर पवित्र आत्मा येण्याचे त्याने अभिवचन दिले व त्यांना म्हटले: “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” मग, सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टपासून पुढे येशूने या अभिषिक्त ख्रिश्चनांना “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेची घोषणा करण्यासाठी मार्गदर्शन दिले. (प्रेषितांची कृत्ये १:६-८; कलस्सैकर १:२३) खरेच, येशू विश्वासयोग्य व खरा साक्षी असे संबोधण्याच्या योग्यतेचा आहे. लावदिकीयातील अभिषिक्त ख्रिस्ती त्याची वचने ऐकून लाभ मिळवू शकतात.
६. (अ) लावदिकीया मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीचे वर्णन येशू कसे देतो? (ब) येशूचे कोणते सुंदर उदाहरण पाळण्यात लावदिकीयातील ख्रिश्चनांनी अपयश दाखविले होते?
६ लावदिकीयासाठी येशूजवळ कोणता संदेश आहे? त्यांच्यासाठी त्याच्यापाशी प्रशंसेचे शब्द नाहीत. तो उघडपणे त्यांना सांगतो: “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.” (प्रकटीकरण ३:१५, १६) प्रभु येशू ख्रिस्ताकडील अशा प्रकारच्या संदेशाला तुमचा काय प्रतिसाद असणार? तुम्ही जागृत होऊन स्वतःचे परीक्षण करणार नाही का? त्या लावदिकीयाकरांनी खरेच स्वतः जागृत होण्याची गरज होती, कारण ते आध्यात्मिकरित्या आळशी झाले होते, ते सर्व गोष्टींना खूपच गृहीत धरीत होते हे उघड आहे. (पडताळा २ करिंथकर ६:१.) ज्याचे त्यांनी अनुकरण करायचे होते, त्या येशूने तर यहोवा व त्याच्या कार्यासाठी नेहमीच अत्युत्कट आवेश दाखवला होता. (योहान २:१७) याखेरीज, नम्र जनांना तो नेहमीच सौम्य व लीन आणि कडक उन्हात मिळणाऱ्या गार पाण्याच्या पेल्यासारखा उत्साहवर्धक वाटला. (मत्तय ११:२८, २९) पण लावदिकीयातील ख्रिस्ती तर उष्ण नाहीत आणि शीतही नाहीत. त्यांच्या शहरात वाहत येणाऱ्या पाण्याप्रमाणे ते कोमट झालेले होते. यामुळे ते येशूकडून पूर्णपणे नाकारले जाण्याच्या, ‘त्याच्या तोंडातून ओकले जाण्याच्या’ बेतात आले होते! यास्तव, आपण आपल्यापरीने येशूप्रमाणेच दुसऱ्यांना आध्यात्मिक तजेला देण्यासाठी आपला कार्यभाग आवेशाने पूर्ण करीत राहू या.—मत्तय ९:३५-३८.
“‘मी श्रीमंत आहे, . . . ’ असे तू म्हणतोस”
७. (अ) लावदिकीयातील ख्रिश्चनांच्या समस्येचे मूळ येशू कसे दाखवितो? (ब) लावदिकीयातील ख्रिस्ती ‘अंधळे व उघडेवाघडे’ आहेत असे येशू का म्हणतो?
७ तर मग, लावदिकीयाकरांच्या समस्येचे खरे मूळ काय असावे? येशूच्या त्यापुढील शब्दांवरुन आम्हाला याची चांगली कल्पना मिळते: “मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.” (प्रकटीकरण ३:१७; पडताळा लूक १२:१६-२१.) धनवान नगरात राहात असल्यामुळे, त्यांना आपल्या श्रीमंतीचा मोठा आत्मविश्वास वाटत असावा. त्यांच्या दैनंदिन जीवनावर आखाडा, नाटकगृहे आणि व्यायामशाळा यांजमुळे परिणाम घडला असावा हे साहजिक आहे व यामुळेच ते “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड” धरणारे बनले होते. * (२ तीमथ्य ३:४) पण हे भौतिकदृष्ट्या धनवान असणारे लावदिकीयाकर, आध्यात्मिक रितीने दरिद्री झाले होते. त्यांच्यापाशी ‘स्वर्गात साठविली जाणारी संपत्ती’ असलीच तर ती खूप कमी आहे. (मत्तय ६:१९-२१) त्यांनी आपली दृष्टी साधी व सरळ ठेवून देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिले स्थान दिले नाही. ते खरेच अंधःकारात, अंधळ्या दशेत आहेत व त्यांना आध्यात्मिक दृष्टी नाही. (मत्तय ६:२२, २३, ३३) त्यांनी आपल्या भौतिक संपत्तीने कितीही सुंदर व भारी कपडे विकत घेऊन अंगावर घातले असले तरीही येशूच्या दृष्टीने ते नागवेच आहेत. ख्रिस्ती या नात्याने आपली ओळख देण्याकरता त्यांच्यापाशी आध्यात्मिक वस्त्रे नाहीत.—पडताळा प्रकटीकरण १६:१५.
८. (अ) लावदिकीयातील परिस्थिती आजही कशाप्रकारे अस्तित्वात आहे? (ब) सध्याच्या लोभिष्ट जगात काही ख्रिश्चनांनी आपली कशी फसवणूक करून घेतली आहे?
८ केवढी ही धक्कादायक स्थिती! पण आम्हाला आजही अशाच प्रकारची परिस्थिती दिसत नाही का? तर याचे मूळ कारण काय असावे? भौतिक ठेवा व मानवी स्रोत यांजवर विसंबून राहण्यामुळे निर्माण होणारा आत्मविश्वासाचा गुण, याचे कारण आहे. ख्रिस्ती धर्मजगतात चर्चला जाणाऱ्यांप्रमाणे यहोवाच्या लोकांपैकी काहींनी स्वतःची भूलवणूक होऊ दिली आहे आणि आपली अशी समज करून घेतली आहे की, अधूनमधून सभेला उपस्थित राहिले तर देवाला संतुष्ट करता येते. मग, ते “वचनाप्रमाणे [नाममात्र] आचरण करणारे” बनून पळवाट शोधतात. (याकोब १:२२) योहान वर्गाने वारंवार सूचना देऊन देखील यांनी आपले अंतःकरण भपकेबाज पोशाख, मोटारगाड्या, घरे आणि करमणूक व सुखविलास या भोवती केंद्रित असणारे जीवन यावर जडविलेले आहे. (१ तीमथ्य ६:९, १०; १ योहान २:१५-१७) हे सर्व आध्यात्मिक तारतम्य मंद बनविण्यास कारणीभूत ठरले आहे. (इब्रीयांस ५:११, १२) अशांनी उदास व कोमट असण्याऐवजी ‘आत्म्याचा अग्नी’ पुनः चेतविला पाहिजे व ‘वचनाची घोषणा करण्याकरता’ उत्सुकतेचा ताजेपणा आणला पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ५:१९; २ तीमथ्य ४:२, ५.
९. (अ) कोमट ख्रिश्चनांना येशूच्या कोणत्या शब्दांनी हलवून सोडण्यास हवे व का? (ब) भटकलेल्या ‘मेंढरांना’ मंडळी कशी मदत करू शकते?
९ अशा कोमट ख्रिश्चनांकडे येशू कोणत्या दृष्टीने बघतो? त्याच्या निष्कपट शब्दांनी त्यांना हेलावून सोडले पाहिजे: “तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.” (पडताळा नीतीसूत्रे १६:२; २१:२.) मंडळीतील ही गंभीर स्थिती अशी सहजासहजी बाजूला सारता येणार नाही. आवेशाचे चांगले उदाहरण मांडून व प्रेमाने देखरेख करून वडील व त्यांच्याकरवी नियुक्ती लाभलेले जण, अशा भटकलेल्या ‘मेंढरांना’ पूर्णहृदयी सेवेच्या त्यांच्या पूर्वीच्या आनंदाकडे जागृतीने निरवू शकतात.—लूक १५:३-७.
“श्रीमंत होण्यासाठी” सल्ला
१०. येशू लावदिकीयातील ख्रिश्चनांना त्याच्याकडून कोणते “सोने” विकत घेण्यास सांगतो?
१० लावदिकीया येथील दुःखद परिस्थिती बरी करण्यासाठी काही उपाय आहे का? होय, त्या ख्रिश्चनांनी येशूचा सल्ला मान्य केला तर ते घडू शकते: “म्हणून मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे.” (प्रकटीकरण ३:१८अ) अग्नीने शुद्ध करण्यात आलेले व सर्व डाग काढून टाकलेले खरे ख्रिस्ती “सोने” त्यांना “देवविषयक बाबतीत धनवान” बनवू शकेल. (लूक १२:२१) असे हे सोने त्यांना कोठून विकत घेता येईल? स्थानिक पतपेढीमधून नव्हे, तर येशूकडून! हे सोने काय आहे त्याचे स्पष्टीकरण प्रेषित पौलाने केले. त्याने तीमथ्याला धनवान ख्रिश्चनांना अशी आज्ञा देण्यास सांगितले की, त्यांनी “चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. . . . पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा.” अशाप्रकारे स्वतःला वागवल्यामुळेच ते, ‘खरे जीवन बळकट’ धरू शकत होते. (१ तीमथ्य ६:१७-१९) भौतिकदृष्ट्या धनाढ्य असणाऱ्या लावदिकीयाकरांनी पौलाचा सल्ला अनुसरण्यास हवा होता व याद्वारे आध्यात्मिक दृष्ट्या धनवान होण्यास हवे होते.—तसेच नीतीसूत्रे ३:१३-१८ देखील पहा.
११. “अग्नीने शुद्ध केलेले सोने” विकत घेणाऱ्यांची कोणती आधुनिक उदाहरणे आम्हापाशी आहेत?
११ “अग्नीने शुद्ध केलेले सोने” विकत घेणाऱ्यांची आधुनिक उदाहरणे आहेत का? होय, आहेत! प्रभूचा दिवस जवळ येत असताना ख्रिस्ती धर्मजगताच्या कित्येक बाबेलोनी शिकवणींची लबाडी, जसे की, त्रैक्य, जीवाचे अमरत्व, अग्नीनरकाच्या यातना, बालकांचा बाप्तिस्मा आणि (क्रूस व मेरी यांच्या) मूर्तींची भक्ती समाविष्ट आहे त्याबद्दल बायबल विद्यार्थ्यांचा एक लहानसा गट जागृत होत होता. बायबलच्या सत्याच्या बाजूने बोलताना या ख्रिश्चनांनी, यहोवाचे राज्य हीच मानवजातीची एकमेव आशा आहे आणि येशूचे यज्ञार्पण तारणासाठी आधार आहे असे प्रतिपादित केले. साधारण ४० वर्षांच्या आधीच त्यांनी १९१४ कडे बायबल भविष्यवादात चिन्हीत करण्यात आलेल्या विदेश्यांच्या काळाची समाप्ती होणारे वर्ष व सोबत पृथ्वीवर आश्चर्यावह घटना घडण्याचा काळ असा निर्देश केला.—प्रकटीकरण १:१०; लूक २१:२४-२६, किंग जेम्स व्हर्शन.
१२. जागृत होत असलेल्या ख्रिश्चनांमध्ये कोणी पुढाकार घेतला आणि यांनी स्वर्गात आपली संपत्ती साठविण्याचे उल्लेखनीय उदाहरण कसे मांडले?
१२ या जागृत होत असलेल्या ख्रिश्चनांमध्ये पुढाकार घेणारे चार्ल्स टेझ रसेल हे होते. यांनी १८७० च्या दशकाच्या आरंभाला अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनियात अलेघनी (सध्या पिटस्बर्गचा भाग) येथे बायबलच्या अभ्यासाच्या वर्गाची प्रस्थापना केली. त्यांनी सत्याचा शोध सुरु केला तेव्हा ते आपल्या वडिलांसोबत भागीदारीत होते आणि लक्षाधीश बनण्याच्या मार्गावर होते. तथापि, त्यांनी पारंपारिक व्यापारी आस्था विकून टाकली आणि सबंध पृथ्वीवर देव राज्याचे प्रसिद्धीकरण करण्यासाठी आपल्या संपत्तीचा उपयोग केला. सध्याच्या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया या अधिकृत संस्थेचे ते १८८४ मध्ये पहिले अध्यक्ष झाले. १९१६ मध्ये ते पश्चिम अमेरिकेत आपल्या प्रचाराचा शेवटला दौरा संपवून थकलेल्या स्थितीत रेल्वेमधून प्रवास करीत असता, न्यूयॉर्ककडे येणाऱ्या पांपाजवळ टेक्सस येथे मरण पावले. स्वर्गात आध्यात्मिक संपत्ती साठविण्याच्या बाबतीत त्यांनी आपले उल्लेखनीय उदाहरण समोर मांडले. हेच उदाहरण आता १९०० च्या उत्तरार्धात शेकडो-हजारो स्वार्थत्यागी पायनियर सेवकांनी अनुसरले आहे.—इब्रीयांस १३:७; लूक १२:३३, ३४; पडताळा १ करिंथकर ९:१६; ११:१.
आध्यात्मिक अंजन लावणे
१३. (अ) आध्यात्मिक अंजन लावदिकीयाकरांची परिस्थिती कशी सुधरवणार होते? (ब) येशू कोणत्या प्रकारच्या वस्त्रांची शिफारस करतो व का?
१३ लावदिकीयाकरांना येशू आणखी कडकपणे हा सल्ला देतो: “तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.” (प्रकटीकरण ३:१८ब) त्यांच्या आध्यात्मिक अंधत्वासाठी त्यांनी उपायकारक डोळ्यांचे अंजन लावून बरे करण्याचा प्रयत्न करावयास हवा. हे अंजन स्थानिक विक्रेत्याकडून नव्हे तर, केवळ येशू जे देतो तेच घेणे जरुरीचे होते. यामुळे त्यांना आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होण्यास, ‘धार्मिकांच्या मार्गानुरुप’ चालत राहण्यात आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यात आपली दृष्टी केंद्रित करण्यासाठी मदतगार ठरणार होते. (नीतीसूत्रे ४:१८, २५-२७) अशाप्रकारे, ते, लावदिकीयामध्ये स्थानिकरित्या काळ्या लोकरीने विणलेली भारी वस्त्रेच नव्हे तर, सोबत सुंदर अशी “शुभ्र वस्त्रे,” जी ते येशू ख्रिस्ताचे अनुयायी असल्याची ओळख देणार होते, तीही परिधान करणारे बनतील.—पडताळा १ तीमथ्य २:९, १०; १ पेत्र ३:३-५.
१४. (अ) कोणते आध्यात्मिक अंजन १८७९ पासून उपलब्ध आहे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांच्या आर्थिक आधाराचा एकमेव स्रोत कोणता आहे? (क) अनुदानाच्या वापरासंबंधाने यहोवाचे साक्षीदार इतरांपेक्षा कसे वेगळे दिसतात?
१४ हे आध्यात्मिक अंजन सध्याच्या काळी उपलब्ध आहे का? होय, खात्रीने! प्रेमाने म्हटल्या जाणाऱ्या पास्टर रसेल यांनी १८७९ मध्ये सत्याच्या समर्थनात एका नियतकालिकाचे प्रकाशन सुरु केले, ज्याला सध्या जागतिकपणे द वॉचटावर अनाऊंसिंग जेहोवाज किंग्डम असे ओळखण्यात येते. याच्या दुसऱ्याच अंकात त्यांनी घोषित केले: “आमचा असा विश्वास आहे की, यहोवा [या नियतकालिकाचा] पाठीराखा आहे. असे असल्यामुळे, ते लोकांकडे आधारासाठी कधीच हात पसरणार नाही किंवा याचना करणार नाही. जो असे म्हणतो: ‘पर्वतावरील सर्व सोने व रुपे माझे आहे,’ त्याने या नियतकालिकासाठी आवश्यक असणारा निधी देण्याचे बंद केले तर आम्ही हे समजू की, हे प्रकाशन आता बंद करायची वेळ झाली आहे.” सध्याच्या २० व्या शतकातील काही दूरदर्शन सुवार्तिकांनी अमाप संपत्ती साठविली आहे व लज्जास्पद (व कधीकधी अनैतिक) जीवन व्यतीत केले आहे. (पडताळा प्रकटीकरण १८:३.) उलटपक्षी, बायबल विद्यार्थी, सध्याचे यहोवाचे साक्षीदार यांनी, स्वयंस्फूर्तिने प्राप्त झालेले सर्व अनुदान, संघटन बनवण्याच्या कामी व यहोवाच्या आगामी राज्याचा जगभर प्रचार वाढविण्यासाठी वापरले आहे. योहान वर्ग आजपर्यंत द वॉचटावर व अवेक! नियतकालिकांच्या प्रकाशनांचे मार्गदर्शन करीत आलेला आहे आणि १९९३ मध्ये याची एकंदर छपाई २ कोटी ९० लाखांच्याही पुढे गेली. द वॉचटावर हे आज ११५ पेक्षा अधिक भाषेत उपलब्ध आहे. ते चाळीस लाखांपेक्षा अधिक ख्रिश्चनांच्या मंडळीचे अधिकृत नियतकालिक आहे व या आध्यात्मिक अंजनाचा या ख्रिश्चनांनी खोट्या धर्माच्या बाबतीत आणि सर्व राष्ट्रात राज्याची सुवार्ता प्रचार करण्याच्या निकडीस्तव आपले डोळे उघडण्यासाठी उपयोग केला आहे.—मार्क १३:१०.
वाग्दंड व शिस्त यापासून बोध घेणे
१५. लावदिकीया येथील ख्रिश्चनांना येशू इतका कडक सल्ला का देत आहे आणि मंडळीने याबद्दल कोणती प्रतिक्रिया दाखवण्यास हवी?
१५ आता आपण परत लावदिकीया येथे जाऊ. येशूने दिलेल्या कडक सल्ल्याच्या बाबतीत ते कशी प्रतिक्रिया दाखवणार? त्यांनी निराश व्हावे व असे वाटू द्यावे का की, त्यांनी त्याचे अनुयायी राहू नये अशी येशूची इच्छा आहे? नाही. ही अशी गोष्ट कधीच नव्हती. संदेश पुढे म्हणतो: “जितक्यांवर मी प्रेम करितो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करितो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर.” (प्रकटीकरण ३:१९) यहोवाचा शिस्त लावण्याचा जो प्रकार आहे त्याचप्रमाणे, येशूची शिस्त, त्याच्या प्रेमाचे एक चिन्ह आहे. (इब्रीयांस १२:४-७) त्याच्या कळवळ्याच्या चिंतेची दखल घेऊन या लावदिकीयाच्या मंडळीने त्याच्या सूचनेचा अवलंब केला पाहिजे. त्यांनी पश्चात्ताप केला पाहिजे व हे जाणले पाहिजे की, त्यांचा कोमटपणा हा पाप करण्यासमान आहे. (इब्रीयांस ३:१२, १३; याकोब ४:१७) त्यांच्या वडिलांनी भौतिक गोष्टींचा पाठलाग मागे ठेवून देवाकडून त्यांना मिळत असलेल्या बक्षीसाबद्दल अग्नीप्रमाणे “प्रज्वलित” होण्यास हवे. आध्यात्मिक नेत्रांजन परिणाम करीत असता मंडळीतील सर्वांना थंड पाण्याच्या झऱ्यामुळे मिळणारा तजेला मिळत राहो.—२ तीमथ्य १:६; नीतीसूत्रे ३:५-८; लूक २१:३४.
१६. (अ) येशूची प्रीती व कळवळा आज कसा दिसून येतो? (ब) आपल्याला कडक सल्ला मिळाला तर त्याबद्दल आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी?
१६ मग, आज आमच्याबद्दल काय? येशूला ‘आपल्या स्वकीयांवर प्रीती आहे.’ हे तो “युगाच्या समाप्तीपर्यंत . . . सर्व दिवस” करीत राहणार आहे. (योहान १३:१; मत्तय २८:२०) त्याची प्रीती व कनवाळूपणा हा योहान वर्ग व ख्रिस्ती मंडळीतील तारे किंवा वडीलजन याद्वारे प्रदर्शित होत असतो. (प्रकटीकरण १:२०) सध्याच्या या बिकट काळात वडिलांची आपल्या सर्वांना, वृद्धांना व तरुणांना मदत करण्याची, आम्हाला आपल्या चाकोरीत ठेवण्याची, स्वैराचार, भौतिक गोष्टींचा लोभ आणि या जगाच्या अनैतिक गोष्टींच्या प्रतिकारासाठी साहाय्य देण्याची अती उत्कट इच्छा आहे. आम्हाला कधी कधी कडक सल्ला किंवा शिस्त मिळालीच, तर हे ध्यानात असू द्या की, “बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे.” (नीतीसूत्रे ६:२३) आम्ही सर्वच अपूर्ण आहोत आणि जरुरीप्रमाणे पश्चात्ताप दाखविण्याची आपण तयारी ठेवावी की, ज्यामुळे आपली सुधारणा होऊन आपण देवाच्या प्रेमात राहू शकू.—२ करिंथकर १३:११.
१७. धनसंपत्ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून कशी धोकादायक ठरू शकते?
१७ आम्ही भौतिक गोष्टी, धनसंपत्ती किंवा यांच्या उणीवेने आपल्याला कोमट बनवू नये. पैसा हा सेवेची नवी दालने उघडू शकतो; पण तो घातक देखील आहे. (मत्तय १९:२४) चांगले राहणीमान असणाऱ्या एखाद्या व्यक्तिला कदाचित असे वाटेल की, जोपर्यंत तो अधूनमधून मोठमोठ्या रकमा देणगी म्हणून देत आहे तोपर्यंत त्याने प्रचार कार्यात इतरांसारखे आवेशी राहण्याची तितकी गरज नाही, किंवा आपण धनवान आहोत म्हणून इतरांनी आपल्याला मोठे म्हणावे असेही त्याला वाटत असेल. याखेरीज, धनवानांस असा अनेक प्रकारचा सुखविलास व मौजेखातर असणाऱ्या गोष्टी असतात, ज्या इतरांना परवडत नाहीत. पण त्या गोष्टी वेळ खातात व थकवा आणून ख्रिस्ती सेवेपासून दूर ठेवतात व मग त्याला कोमट बनवतात. आम्ही असे सर्व पाश टाळावेत व सार्वकालिक जीवन दृष्टीपथात ठेवून पूर्ण अंतःकरणाने “श्रम व खटपट” करीत राहावे.—१ तीमथ्य ४:८-१०; ६:९-१२.
‘सायंकाळचे भोजन घेणे’
१८. येशू लावदिकीयातील ख्रिश्चनांपुढे कोणती संधी ठेवतो?
१८ येशू पुढे म्हणतो: “पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याजबरोबर जेवीन [“सायंकाळचे जेवण करीन,” NW], आणि तो माझ्याबरोबर जेवील.” (प्रकटीकरण ३:२०) लावदिकीयातील ख्रिश्चनांनी येशूचे आपल्या मंडळीत स्वागत केले तर, तो त्यांच्या कोमटपणावर मात करण्यास मदत करील!—मत्तय १८:२०.
१९. लावदिकीयाच्या मंडळीसोबत सायंकाळचे भोजन करणार असल्याचे येशूने जे म्हटले, त्याचा काय अर्थ होतो?
१९ येशूने जो सायंकाळच्या जेवणाचा उल्लेख केला तो, लावदिकीयाकरांना, त्याने आपल्या शिष्यांसोबत जे भोजन केले होते, त्याची नक्कीच आठवण देणारा ठरला असावा. (योहान १२:१-८) अशा प्रसंगांनी उपस्थितांसाठी नेहमीच आध्यात्मिक आशीर्वाद दिले. याखेरीज, येशूचे पुनरुत्थान झाल्यावर देखील तो आपल्या शिष्यांसोबत जेवताना उपस्थित असल्यामुळे त्यांना मोठे उत्तेजन मिळू शकले. (लूक २४:२८-३२; योहान २१:९-१९) यास्तव, त्याने लावदिकीयाच्या मंडळीत येऊन त्यांच्याबरोबर सायंकाळचे भोजन करण्याचे जे वचन दिले ते, त्यांनी त्याला आत घेतले तरच त्यांच्यासाठी समृद्ध आध्यात्मिक आशीर्वाद आणणार होते.
२०. (अ) प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला ख्रिस्ती धर्मजगताच्या कोमटपणापासून काय परिणाम घडला? (ब) येशूने केलेला न्यायदंड ख्रिस्ती धर्मजगतावर कसा परिणामित झाला आहे?
२० येशूने लावदिकीयाकरांना दिलेला प्रेमळ सल्ला आज शेष अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी खराच अभूतपूर्व आहे. काही जण आठवतात की, प्रभूचा दिवस सुरु झाला तेव्हा, ख्रिस्ती धर्मजगतातील धर्माधिकारी खूपच मोठ्या प्रमाणात कोमट झाले होते. १९१४ मध्ये आमच्या प्रभूच्या परतण्याचे स्वागत करण्याऐवजी त्याचे धर्मपुढारी तर पहिल्या जागतिक युद्धामध्ये कत्तल करण्यात दंग झाले होते. यातील २८ पैकीची २४ राष्ट्रे स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणारी होती. त्यांनी केलेला रक्तपात केवढा भयानक होता! पुन्हा ख्रिस्ती धर्मजगतात लढविण्यात आलेल्या दुसऱ्या महायुद्धात खोट्या धर्माच्या “पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली.” (प्रकटीकरण १८:५) पुढे लिग ऑफ नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रांच्या क्रांतीकारी चळवळींमध्ये भाग घेऊन धर्मपुढाऱ्यांनी यहोवाच्या येणाऱ्या राज्याकडे आपली पाठ फिरविली आहे. वस्तुतः, त्या गोष्टी मानवाच्या समस्या सोडवू शकत नाहीत. येशूने तर आधीच या धर्मपुढाऱ्यांना धिक्कारले आहे, त्यांचा प्रतिकूल न्याय करुन त्यांना, जाळ्यात आलेल्या निरुपयोगी माश्यांना कोळी जसे फेकून देतात तसे काढून टाकले आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसची सध्याची शोचनीय स्थिती त्याच्या या न्यायाची साक्ष देते. त्याला लवकरच मिळणारा दंड आपल्याला सर्वदा इशारा ठरो!—मत्तय १३:४७-५०.
२१. लावदिकीयातील ख्रिश्चनांना उद्देशून येशूने जे काही म्हटले त्याबद्दल १९१९ पासून पुढे खऱ्या मंडळीतील ख्रिश्चनांनी कसा प्रतिसाद दाखविला?
२१ खऱ्या मंडळीत देखील काही जण कोमट पाण्यासारखे आहेत, जे एकतर उत्तेजक उष्णतेचे किंवा उत्साहवर्धक थंडावा देणारे नाहीत. तरीपण, येशूची आपल्या मंडळीवर उबदार प्रीती आहे. स्वागत करु इच्छिणाऱ्या ख्रिश्चनांसाठी तो स्वतःस देऊ करावयास तयार आहे आणि कित्येकांनी त्याच्याबरोबर सायंकाळचे जेवण घेण्याच्या उद्देशाने त्याचे स्वागत केले आहे. याचा परिणाम, १९१९ पासून पुढे त्यांचे डोळे बायबलच्या भविष्यवादांच्या अर्थाच्या बाबतीत उघडण्यात आले. त्यांना प्रज्वलित होण्याचा काळ मोठा थरारक वाटला.—स्तोत्र ९७:११; २ पेत्र १:१९.
२२. येशूच्या मनात कोणती भावी सायंकाळची जेवणावळ असावी व त्यात कोण सहभागी होतील?
२२ लावदिकीयाकरांना संबोधताना येशूच्या मनात आणखी एक सायंकाळचे जेवण असावे. प्रकटीकरणात नंतर आम्ही वाचतो: “कोकऱ्याच्या लग्नाच्या [“सायंकाळच्या,” NW] मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” ही ती भव्य विजयाची मेजवानी आहे जी, तो, खोट्या धर्मावर दंडाज्ञा बजावल्यावर यहोवाच्या गौरवाप्रीत्यर्थ देतो. स्वर्गातील या मेजवानीत ख्रिस्त व त्याची १,४४,००० सदस्यांची मिळून बनलेली वधू सहभागी होते. (प्रकटीकरण १९:१-९) प्राचीन लावदिकीया मंडळीतील प्रतिसाद देणारे सदस्य, तसेच ख्रिस्त येशूचे आजचे विश्वासू बांधव, ज्या सर्वांनी खरे अभिषिक्त ख्रिस्ती असल्याचे जे ओळखचिन्ह शुभ्र वस्त्रांच्या रुपात परिधान केले आहे ते आपल्या वरासोबत हे सायंकाळचे जेवण घेतील. (मत्तय २२:२-१३) हे आवेशी राहण्यात व पश्चात्ताप दर्शविण्यात केवढे प्रेरक बळ आहे!
विजेत्यांसाठी राजासन
२३, २४. (अ) येशू आणखी कोणत्या बक्षीसाबद्दल बोलतो? (ब) येशू आपल्या मशीही राजासनावर कधी बसला आणि त्याने ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांचा न्याय कधी सुरु केला? (क) येशूने आपल्या मृत्युच्या स्मारकाची स्थापना केली तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना कोणते अद्भुत अभिवचन दिले?
२३ येशू आणखी एका बक्षीसाबद्दल बोलतो. तो म्हणतो: “मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.” (प्रकटीकरण ३:२१) स्तोत्र ११०:१, २ मधील दाविदाच्या शब्दांच्या पूर्णतेला अनुलक्षून, सचोटी रक्षक येशूने जगाला जिंकल्यामुळे, त्याचे सा.यु. ३३ मध्ये पुनरुत्थान झाले व त्याला उंचावण्यात येऊन तो आपल्या पित्याच्या सोबत त्याच्या स्वर्गीय राजासनावर बसला. (प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३) आणखी एका निर्णायक वर्षी, म्हणजे १९१४ मध्ये येशू आपल्या मशीही राजासनावर राजा व न्यायाधीश म्हणून बसण्यासाठी आला. ख्रिस्ती म्हणविणाऱ्यांचा न्याय १९१८ पासून सुरु झाला. या काळाआधी ज्या अभिषिक्त विजेत्यांचे मरण घडले होते अशांना, पुनरुत्थित करण्यात येऊन ते त्याच्या राज्यात त्याला जाऊन मिळाले. (मत्तय २५:३१; १ पेत्र ४:१७) पृथ्वीवर आपल्या मृत्युच्या स्मारकाची प्रस्थापना करताना त्याने शिष्यांना याबद्दलचे अभिवचन दिले होते व म्हटले होते: “जसे माझ्या बापाने मजसोबत राज्याचा करार केला आहे तसाच मी तुम्हासोबत देखील करतो; यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि तुम्ही राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”—लूक २२:२८-३०, NW.
२४ राज्य करणाऱ्या राजासोबत “पुनरुत्पत्तीत” बसावे व त्याच्या परिपूर्ण यज्ञार्पणाच्या आधारावर आज्ञाधारक मानवजातीचे एदेनातील पूर्णतेप्रत उत्थान करण्यामध्ये त्याच्याबरोबर सहभागी व्हावे, ही केवढी अद्भुत नेमणूक! (मत्तय १९:२८; २०:२८) योहान आम्हास कळवतो त्याप्रमाणे, येशू या विजेत्यांना “राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक” असे बनवतो आणि यांना यहोवाच्या स्वतःच्या दैदिप्यमान स्वर्गीय आसनाभोवती राजासने देतो. (प्रकटीकरण १:६; ४:४) तर आम्ही सर्वांनी, अभिषिक्त किंवा नंदनवनाची पुनर्स्थापना करण्यात सहभागी होण्याची आशा बाळगणाऱ्या नव्या जगाच्या समाजाने, येशूने लावदिकीयाकरांना म्हटलेले शब्द आपल्या अंतःकरणी लावावे!—२ पेत्र ३:१३; प्रेषितांची कृत्ये ३:१९-२१.
२५. (अ) पूर्वीच्या संदेशांप्रमाणेच येथेही येशू लावदिकीयाच्या संदेशाचा कसा समारोप करतो? (ब) येशूने लावदिकीया मंडळीस म्हटलेल्या शब्दांच्या बाबतीत ख्रिश्चनाने व्यक्तिगतपणे कसा प्रतिसाद दाखविण्यास हवा?
२५ मागील संदेशांप्रमाणे, येथेही येशू या आर्जवी शब्दांद्वारे आपला समारोप करतो: “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.” (प्रकटीकरण ३:२२) आपण अंतसमयाच्या अगदी समाप्तीला आलो आहोत. आम्हाभोवती हा भरपूर पुरावा आहे की, ख्रिस्ती धर्मजगत प्रीतीच्या बाबतीत थंड बनले आहे. उलटपक्षी, आपण खरे ख्रिस्ती या नात्याने येशूने लावदिकीया मंडळीला, होय, मंडळ्यांना देण्यात आलेल्या प्रभूच्या सर्व सात संदेशांना कळकळीचा प्रतिसाद देऊ या. हे आपण, येशूने आमच्या काळासाठी जो थोर भविष्यवाद दिलेला आहे त्याची पूर्णता करण्यासाठी स्फुर्तीने आपला सहभाग देऊन करू या: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१२-१४.
२६. येशू योहानासोबत पुन्हा केव्हा थेटपणे बोलतो पण तो कशामध्ये सहभाग घेतो?
२६ येशूने सात मंडळ्यांना दिलेला सल्ला येथे संपतो. तो येथून पुढे प्रकटीकरणातील शेवटला अध्याय येईपर्यंत योहानाशी थेट बोलत नाही; पण तो कित्येक दृश्यात सहभागी होतो. उदाहरणार्थ, यहोवाच्या न्यायदंडाची अंमलबजावणी करणे हा त्यातील एक सहभाग आहे. तर आता, प्रभु येशू ख्रिस्ताने जो दुसरा अप्रतिम दृष्टांत प्रकट केला आहे, त्याचे आपण योहान वर्गासोबत मिळून परीक्षण करू.
[तळटीपा]
^ लावदिकीया होते त्या ठिकाणची स्थळे भूगर्भ संशोधकांनी खोदली आहेत.
[अभ्यासाचे प्रश्न]
[७३ पानांवरील चौकट]
भौतिकतेविरुद्ध सुज्ञपणा
मागे १९५६ मध्ये, एका वृत्तपत्राच्या स्तंभलेखकाने लिहिले: “साधारण एका शतकाआधी मानवाच्या सरासरी ७२ गरजा होत्या व त्यात १६ आवश्यक मानल्या जात होत्या असे अनुमान काढण्यात आले. तथापि, आज साधारण माणसाच्या ४७४ गरजा असल्याचे अनुमान काढले जाते, ज्यापैकी ९४ अत्यावश्यक असल्याचे समजले जाते. एका शतकाआधी विक्रेते, साधारण माणसाला २०० जिनसांबाबत आकर्षण दाखवीत होते. पण आज अशा ३२,००० जिनसा आहेत ज्यांची विक्री करण्यावर प्रतिबंध लावला जाण्यास हवा. माणसाच्या अत्यावश्यक गोष्टी थोड्याच आहेत; पण त्याच्या गरजा मात्र भरपूर बनल्या आहेत.” आज लोकांवर, भौतिक संपत्ती आणि जमीनजुमला ह्याच जीवनात प्रमुख गोष्टी असणाऱ्या कल्पनांचा भडिमार होत आहे. यामुळे पुष्कळ जण उपदेशक ७:१२ मधील सल्ल्याकडे सहजपणे दुर्लक्ष करीत आहेत: “ज्ञान [बुद्धी, NW] आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे. तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.”
[६७ पानांवरील चित्रे]
लावदिकीयात आलेले पाणी नकोसे वाटण्याजोगे कोमट होते. लावदिकीया येथील ख्रिश्चनांनी देखील अशाच असमाधानी स्वरुपाच्या कोमटपणाचा आत्मा दाखविला