चार घोडेस्वारांची भरधाव दौड!
अध्याय १६
चार घोडेस्वारांची भरधाव दौड!
दृष्टांत ३—प्रकटीकरण ६:१-१७
विषय: चार घोडेस्वारांची दौड, वेदीखाली हुतात्मिक मरण आलेले साक्षीदार आणि क्रोधाचा मोठा दिवस
पूर्णतेचा काळ: १९१४ पासून या व्यवस्थीकरणाच्या नाशापर्यंत
१. येशू त्या जिज्ञासा चेतविणाऱ्या गुंडाळीचे शिक्के उघडतो तेव्हा योहानाला त्यातील मजकूर यहोवा कसा प्रकटवितो?
सध्याच्या संकटग्रस्त दिवसात, “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत” त्याबद्दल आम्ही अत्यंत आस्थेवाईक नाहीत का? होय, नक्कीच आहोत, कारण यात आमचाही समावेश आहे! यासाठीच, आता येशू जिज्ञासा चेतविणारे त्या गुंडाळीवरील शिक्के उघडतो ते पाहण्यासाठी आपण योहानासोबत जाऊ या. योहानाला या गुंडाळीचे वाचन करायचे नाही ही लक्षणीय गोष्ट आहे. पण का नाही? कारण त्यातील मजकूर त्याला ‘चिन्हांद्वारे’ चैतन्यशील हालचालींनी युक्त अशा दृश्यांच्या मालिकेने कळविण्यात आला आहे.—प्रकटीकरण १:१, १०.
२. (अ) योहान काय बघतो व ऐकतो आणि करुबाचे स्वरुप काय सुचविते? (ब) पहिल्या करुबाची आज्ञा कोणास अनुलक्षून आहे व तुम्ही तसे उत्तर का देता?
२ येशू गुंडाळीवरील पहिला शिक्का उघडतो तेव्हा काय घडते ते योहानाकडून ऐका: “मग कोकऱ्याने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले तेव्हा, चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, ‘ये,’ असे म्हणाला, ते मी ऐकले.” (प्रकटीकरण ६:१) हा पहिल्या करुबाचा आवाज होय. त्याचे सिंहासारखे स्वरुप, यहोवाची संस्था त्याचे नीतीमान न्यायदंड बजावण्यात धैर्यवान कृती आचरेल हे योहानाच्या लक्षात आणून देते. पण ती आज्ञा कोणाला अनुलक्षून केलेली आहे? ती योहानाला असू शकणार नाही, कारण योहानाला तेथे भविष्यवादित दृश्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित राहण्याचे आधीच निमंत्रण मिळाले होते. (प्रकटीकरण ४:१) तर तो, ‘मेघगर्जनेसारखा ध्वनी’ चार प्रक्षुब्ध अशा मालिकेतील पहिल्या भागात सहभागी होणाऱ्यांना बोलावीत होता.
पांढरा घोडा व त्याचा नामांकित स्वार
३. (अ) योहान आता कशाचे वर्णन देतो? (ब) बायबलमधील चिन्हांच्या सहमतात हा पांढरा घोडा कशाचे प्रतीक ठरतो?
३ योहान, त्याच्यासोबत असणारा योहान वर्ग व त्यांचे आजचे सोबती यांना जलदगतीचे नाटक पाहण्याची संधी मिळते! योहान म्हणतो: “मग, मी पाहिले तो एक पांढरा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुगूट देण्यात आला; तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला.” (प्रकटीकरण ६:२) होय, त्या गर्जनेसारख्या वाणीच्या “ये!” या हाकेला उत्तर म्हणून पांढरा घोडा सरसावून पुढे येतो. बायबलमध्ये, घोडा हा बहुधा युद्धास चित्रित करतो. (स्तोत्र २०:७; नीतीसूत्रे २१:३१; यशया ३१:१) हा घोडा, एखाद्या वळू घोड्याप्रमाणे शुभ्रतेने चकाकत आहे व ते निर्दोष पावित्र्यास सूचित करते. (पडताळा प्रकटीकरण १:१४; ४:४; ७:९; २०:११.) हे किती योग्य आहे, कारण ते यहोवाच्या पवित्र दृष्टीत धार्मिक व शुद्ध अशा युद्धाचे वर्णन देते!—तसेच प्रकटीकरण १९:११, १४ देखील पहा.
४. पांढऱ्या घोड्यावरील स्वार कोण आहे? स्पष्ट करा.
४ या घोड्याचा स्वार कोण आहे? त्याच्याजवळ धनुष्य, युद्धाचे मोठे घातक शस्त्र आहे; पण या स्वाराला मुकुट देखील देण्यात आला आहे. प्रभूच्या दिवसात ज्या नीतीमानांना मुकुट परिधान केलेले असे दाखविले आहेत, ते येशू व २४ वडिलांद्वारे प्रतिनिधीत्व केला जाणारा वर्ग, इतकेच आहेत. (दानीएल ७:१३, १४, २७; लूक १:३१-३३; प्रकटीकरण ४:४, १०; १४:१४) * आपल्या पुण्याईवर २४ वडीलांपैकीचे सदस्य हा मुकुट प्राप्त करीत आहेत, हे अशक्य असणार. यास्तव, हा एकमेव स्वार येशू ख्रिस्त याजशिवाय आणखी कोणी नसणार. योहान त्याला १९१४ च्या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात बघतो, जेव्हा यहोवा घोषित करतो की, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे,” आणि म्हणतो की, “मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन,” हा त्याचा उद्देश आहे. (स्तोत्र २:६-८) * अशाप्रकारे, पहिला शिक्का फोडण्याद्वारे, येशू स्वतःला, नव्यानेच अधिष्ठित झालेला मुकुटधारी राजा या नात्याने तो देवाच्या नियुक्त वेळी युद्ध करण्यासाठी बाहेर पडला असल्याचे दाखवितो.
५. स्तोत्रकर्ता स्वाराचे वर्णन प्रकटीकरण ६:२ प्रमाणेच कसे करतो?
५ हे दृश्य स्तोत्र ४५:४-७ शी सुंदरपणे जुळते, जेथे यहोवा राजासनावर बसलेल्या राजाला म्हणतो: “सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो. म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करावयास शिकवील. तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात. तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगीचे आहे. तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.” या भविष्यवादित वर्णनासोबत परिचित असल्यामुळे ते राजा या नात्याच्या येशूच्या हालचालीस लागू होते हे योहान जाणून असणार.—पडताळा इब्रीयांस १:१, २, ८, ९.
जिंकावयाला निघणे
६. (अ) स्वाराने विजय मिळवित पुढे का गेले पाहिजे? (ब) ही विजयाची दौड कोणत्या वर्षांत देखील चालू आहे?
६ नव्यानेच मुकुटमंडित झालेला हा राजा युद्धास पुढे का सरसावला पाहिजे? कारण यहोवाचा आद्य शत्रू दियाबल सैतान, तसेच पृथ्वीवर त्याच्या हेतूंची हेतुपुरस्सर किंवा अजाणतेत सेवा करणाऱ्या लोकांच्या कट्टर विरोधात त्याचे राजत्व प्रस्थापित झाले आहे. राज्याचा जन्म होताच स्वर्गात युद्ध पेटते. मीखाएल (ज्या नावाचा अर्थ, “देवासारखा कोण आहे?”) या नावाने येशू लढत देऊन सैतान व त्याचे दुरात्मे यांजवर विजय मिळवितो व त्यांना पृथ्वीवर ढकलून देतो. (प्रकटीकरण १२:७-१२) येशूची ही विजयी दौड प्रभूच्या दिवसातील सुरवातीच्या दशकात चालूच राहते व याचवेळी पृथ्वीवरील राष्ट्रे व लोक यांचा न्याय केला जात असून मेंढरासमान लोकांना राजाच्या बाजूला तारणप्राप्तीकरता एकत्रित केले जात आहे. सबंध जग “त्या दुष्टाला वश झाले” असले तरी, येशू आपल्या अभिषिक्त भावांवर तसेच त्यांच्या सोबत्यांवर प्रेमळ देखरेख करीत असून तो त्या प्रत्येकाला विश्वासात विजयी बनण्यास मदत देत आहे.—१ योहान ५:१९; मत्तय २५:३१-३३.
७. प्रभूच्या दिवसातील पहिल्या दशकात येशूने कोणता विजय मिळविलेला आहे आणि आमचा कोणता निश्चय असावा?
७ प्रभूच्या दिवसातील गेल्या ७० व त्यापेक्षा अधिक वर्षांत येशूने आणखी कोणती विजयी दौड आक्रमली आहे? प्रेषित पौलाने आपल्या सेवकपणाबद्दलचा पुरावा देण्यासाठी ज्या गोष्टींचे वर्णन दिले आहे त्याचप्रमाणे, यहोवाच्या लोकांनी जगभर मंडळी किंवा वैयक्तिक सदस्य या नात्याने पुष्कळ त्रास, दबाव व छळ यांचा अनुभव घेतला आहे. (२ करिंथकर ११:२३-२८) यहोवाच्या साक्षीदारांना खासपणे युद्ध व हिंसाचार यांच्या दहशतीमध्ये टिकून राहण्यासाठी “सामर्थ्याची पराकोटी” जरुरीची भासली. (२ करिंथकर ४:७) तथापि, अत्यंत खडतर परिस्थितीत देखील यहोवाचे साक्षीदार प्रेषित पौलाप्रमाणे असे म्हणू शकले की, “प्रभु माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी . . . म्हणून त्याने मला शक्ति दिली.” (२ तीमथ्य ४:१७) होय, येशूने त्यांच्या वतीने विजय मिळवला. तसेच तो आम्हासाठी देखील, जर आपण आपल्या विश्वासाची लढत पूर्ण करण्याचा निर्धार राखू तर हा विजय मिळवीत राहील.—१ योहान ५:४.
८, ९. (अ) यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील मंडळीने कोणत्या विजयात सहभाग घेतला आहे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांची वाढ लक्षणीयरित्या कोठे दिसून आली?
८ यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील मंडळीने आपल्या विजयी राजाच्या मार्गदर्शनाखाली कित्येक विजय मिळवले आहेत. प्रामुख्याने १९१८ मध्ये जेव्हा सैतानाच्या राजकीय संघटनेने त्यांच्यावर तात्पुरता ‘विजय’ मिळवला तेव्हा, संपूर्ण नष्ट होण्यापासून राजाने त्यांचा बचाव केला. १९१९ मध्ये, त्याने त्यांना वाचवण्यासाठी तुरुंगाचे दरवाजे मोडून काढले व मग, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी त्यांना पुन्हा सचेतन केले.—प्रकटीकरण १३:७; प्रेषितांची कृत्ये १:८.
९ दुसऱ्या जागतिक महायुद्धापूर्वी तसेच त्या दरम्यानच्या काळात हुकूमशहा ॲक्सीस सत्तेने यहोवाच्या साक्षीदारांचा कित्येक देशातून निःपात करण्याचा प्रयत्न केला. येथे रोमन कॅथलिक अधिकाऱ्यांनी त्या जुलमी हुकूमशहाला उघडपणे वा मूकपणे पाठिंबा दर्शविला होता. तथापि, १९३९ मध्ये युद्ध सुरु झाले तेव्हा ७१,५०९ साक्षीदार प्रचार करीत होते, ते १९४५ मध्ये युद्ध संपल्यावर १,४१,६०६ इतके झाले. यांच्यापैकी १०,००० जण तुरुंगात कित्येक वर्षे होते व इतर हजारोंना ठार मारण्यात आले. आता सबंध जगात क्रियाशील साक्षीदारांची संख्या चाळीस लाखांपेक्षाही पुढे गेली आहे. कॅथलिक देश तसेच जेथे छळ अतिउग्र स्वरुप धारण करून होता तेथेच, म्हणजे, जर्मनी, इटली, जपान येथे लक्षणीय वाढ झाली. या प्रत्येक देशात आता १,००,००० पेक्षा अधिक साक्षीदार, कार्याचा अहवाल देत आहेत.—यशया ५४:१७; यिर्मया १:१७-१९.
१०. विजेत्या राजाने आपल्या लोकांना “सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व [कायदेशीर] समर्थनात” समर्थन करून विजयी होण्याचा आशीर्वाद कसा दिला?
१० आमच्या विजयी राजाने, आपल्या आवेशी लोकांना कायदा-न्यायालयात तसेच अधिपतींसमोर “सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व [कायदेशीर] समर्थनात” समर्थन करून विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. (फिलिप्पैकर १:७; मत्तय १०:१८; २४:९) हे आंतरराष्ट्रीय स्तरावर, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, कॅनडा, ग्रीस, भारत, स्वाझीलंड, स्विट्झर्लंड, तुर्की व इतर देशात घडले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात यहोवाच्या साक्षीदारांना जे २३ कायदेशीर विजय प्राप्त झाले, त्यामध्ये सुवार्तेची “चार लोकात व घरोघरी” घोषणा करावी आणि मूर्तिपूजक राष्ट्रवादी समारंभापासून वेगळे राहावे यांची खात्री देण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये ५:४२; २०:२०; १ करिंथकर १०:१४) अशाप्रकारे, जगव्याप्त रुपात साक्ष देण्याचा मार्ग उघड झाला.
११. (अ) स्वार ‘आपली दौड कशी पूर्ण करतो’? (ब) दुसरा, तिसरा व चौथा शिक्का फोडण्याचा आम्हावर काय परिणाम होण्यास हवा?
११ येशू आपली “दौड कशी पूर्ण” करतो? * आम्ही पाहू शकतो की, हे तो, यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनात, खोट्या धर्मास उघड करण्याद्वारे व सैतानाच्या दृश्य संस्थेच्या बाकीच्या घटकांना नाशाच्या लाक्षणिक “अग्निसरोवरात” टाकून करतो. आम्ही मोठ्या आत्मविश्वासाने हर्मगिदोनाच्या त्या दिवसाकडे पाहात आहोत, जेव्हा आमचा “राजांचा राजा” सैतानाच्या जुलमी राजकीय संस्थेवर आपला अंतिम विजय मिळवील! (प्रकटीकरण १६:१६; १७:१४; १९:२, १४-२१; यहेज्केल २५:१७) दरम्यानच्या काळात, यहोवा पृथ्वीवरील आपल्या नीतीमान राष्ट्रामध्ये प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांची भर घालीत असता पांढऱ्या घोड्यावरील हा अजिंक्य स्वार आपली दौड पुढे नेत आहे. (यशया २६:२; ६०:२२) या आनंदी राज्य वाढीत तुम्ही अभिषिक्त योहान वर्गाबरोबर सहभागी होत आहात का? तसे आहे तर मग, पुढील तीन शिक्के उघडल्यावर योहान जे पाहतो ते बघून तुम्हाला आजच्या काळी यहोवाच्या कार्यात अधिक सहभाग घेण्याची नक्कीच चालना मिळत राहील.
पाहा, तो अग्नीवर्ण घोडा!
१२. राजा या नात्याने त्याच्या अदृश्य उपस्थितीला चिन्हांकित करील असे येशूने काय म्हटले?
१२ येशूच्या पृथ्वीवरील सेवकपणाच्या अंताला त्याच्या शिष्यांनी त्याला एकांतात विचारले: “आपल्या येण्याचे [“आपल्या उपस्थितीचे,” NW] व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” याच्या उत्तरात त्याने काही विपत्तींचा उल्लेख केला, ज्या “वेदनांचा प्रारंभ” होणार होत्या. येशूने म्हटले: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मऱ्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.” (मत्तय २४:३, ७, ८; लूक २१:१०, ११) गुंडाळीचे उरलेले शिक्के फोडल्यावर ज्या गोष्टी योहान पाहतो, त्या या भविष्यवादाची अपूर्व समांतरता दाखवितात. वैभवी येशू आता दुसरा शिक्का फोडतो तेव्हा काय घडते ते पाहा!
१३. योहानास आता कोणता विरोधात्मक पुरावा पाहावयास मिळणार आहे?
१३ “त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी ‘ये,’ असे म्हणाला ते मी ऐकले.” (प्रकटीकरण ६:३) ती आज्ञा देणारा, दिसण्यात गोऱ्ह्यासारखा असा दुसरा करुब आहे. येथे सामर्थ्य हा गुण चित्रित केलेला आहे; पण हे सामर्थ्य धार्मिकतेने उपयोगात आणले जाते. याउलट, येथे योहानाला एक भयंकर, मरणप्राय शक्तीचे दर्शन घडते.
१४. आता योहान कोणता घोडा व स्वार बघतो आणि हा दृष्टांत कशाचे चित्र देतो?
१४ आता ही जी दुसरी “ये!” अशी हाक दिलेली आहे त्याला काय उत्तर मिळते? याप्रकारे: “तेव्हा दुसरा घोडा निघाला; तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.” (प्रकटीकरण ६:४) खरोखरीच उग्र प्रकारचा एक दृष्टांत! आणि ते कशाला सूचक आहे यात कसलीही शंका राहात नाही: युद्ध! हे यहोवाच्या विजेत्या राजाचे धार्मिक व विजयी युद्ध नव्हे, तर मानवनिर्मित क्रुर व आंतरराष्ट्रीय युद्ध आहे, ज्यात निरर्थक रक्त सांडले गेले व यातना मिळाल्या. या कारणास्तव हा स्वार अग्निवर्ण घोड्यावर बसला होता हे केवढे समर्पक आहे!
१५. दुसऱ्या स्वाराच्या मागे दौड करण्याची आमची का इच्छा नसावी?
१५ या घोडेस्वाराच्या व त्याच्या भयानक दौडीच्या मागे जाणे हे खचितच योहानास आवडणार नाही, कारण देवाच्या लोकांच्या बाबतीत, “ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत,” असे भाकीत करण्यात आले होते. (यशया २:४) योहान तसेच योहान वर्ग व मोठा लोकसमुदाय हे “जगात आहेत,” तरी या रक्तपाती व्यवस्थेचे “भाग नाहीत.” आमची शस्त्रसामुग्री आध्यात्मिक असून ती वैषयिक युद्धापेक्षा, सत्याची क्रियाशील घोषणा करण्यासाठी “देवाच्या दृष्टीने समर्थ” आहे.—योहान १७:११, १४; २ करिंथकर १०:३, ४.
१६. अग्निवर्ण घोड्याच्या स्वाराला “मोठी तरवार” केव्हा व कशी देण्यात आली?
१६ १९१४ मध्ये जेव्हा पांढऱ्या घोड्याच्या स्वाराला मुकुट मिळाला, त्या आधी बरीच युद्धे झाली होती. पण आता अग्निवर्ण घोड्याच्या स्वाराला “एक मोठी तरवार” देण्यात आली होती. ही कशाची सूचकता आहे? पहिल्या जागतिक महायुद्धाच्या आरंभापासून मानवी युद्धे पूर्वीपेक्षा अधिक रक्तपाती व अधिक विनाशकारी बनतात. १९१४-१८ च्या रक्तपातात रणगाडे, विषारी वायू, विमाने, पाणबुड्या, अवाढव्य तोफा आणि स्वयंचलित अस्त्रे यांचा वापर प्रथमच अपूर्व प्रमाणात करण्यात आला. साधारण २८ राष्ट्रांत केवळ प्रशिक्षित सैनिकांनाच नव्हे तर एकंदरीत सर्व लोकांना या युद्धप्रयत्नात ओढण्यात आले. मृतांची संख्या भयानक होती. नव्वद लक्ष सैनिक ठार झाले आणि मुलकी मृतांची संख्या तर अगणित होती. युद्ध संपले तरीही पृथ्वीवर खरी शांती येऊ शकली नाही. या युद्धाच्या ५० वर्षानंतर कोनार्ड ॲडन्यूअर या जर्मन मुत्सद्याने म्हटले: “१९१४ पासून लोकांच्या जीवनातून सुरक्षितता व शांतता ही गायब झाली.” खरोखरीच, अग्निवर्ण घोड्याच्या स्वाराला पृथ्वीची शांती हरण करण्याचे काम सोपविले होते!
१७. “मोठी तरवार” हिचा वापर पहिल्या महायुद्धानंतर देखील पुढे कसा चालू राहिला?
१७ यानंतर त्या अग्निवर्ण घोड्याच्या स्वाराची तृष्णा अधिक वाढल्याने त्याने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. या युद्धातील शस्त्रे तर अधिकच सैतानी बनली आणि पहिल्या महायुद्धापेक्षा येथील मृतांची संख्या चौपट झाली. १९४५ मध्ये जपानवर दोन अणुबॉम्ब टाकण्यात आले व त्या प्रत्येकाने हजारोंचा बळी घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अग्निवर्ण घोड्याच्या स्वाराने ५ कोटी ५० लक्ष जिवांची मोठी कापणी केली होती आणि तरी त्याची तृप्ती झाली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर त्या ‘मोठ्या तरवारीने’ निदान १ कोटी ९० लाख जिवांची कत्तल केल्याचे कळविले गेले आहे.
१८, १९. (अ) दुसऱ्या जागतिक महायुद्धापासून घडलेली हत्या लष्करी तंत्रज्ञानाचा विजय ठरण्यापेक्षा कशाची साक्ष देते? (ब) मानवजातीपुढे कोणता विनाश उभा आहे पण पांढऱ्या घोड्यावरील स्वार त्याचे उच्चाटन करण्यासाठी काय करील?
१८ याला आम्ही लष्करी तंत्रज्ञानाचा विजय म्हणू शकतो का? त्याऐवजी त्या निर्दयी घोड्याची दौड पुढे चालू आहे याची ती साक्ष आहे. ही दौड केव्हा संपेल? काही शास्त्रज्ञ गणिताच्या आधारे असा अंदाज व्यक्त करीत आहेत की, पुढील २५ वर्षात अपघाती आण्विक युद्ध निश्चितच घडेल—ती पूर्वनियोजित आण्विक आग आहे! पण याबद्दल पांढऱ्या घोड्यावरील विजयी स्वाराच्या मनात वेगळेच विचार आहेत हे आनंदाचे आहे.
१९ समाज जोपर्यंत राष्ट्रवाद व द्वेष यांच्यावर आधारलेला असेल तोपर्यंत, तो आण्विक नाशाच्या जणू पिंपावर बसलेला आहे. जरी राष्ट्रांनी त्रासून सर्व आण्विक शस्त्रास्त्रांचा साठा खरडून काढून टाकला तरी ती शस्त्रास्त्रे करण्याचे ज्ञान मात्र त्यांच्यापाशी राहणारच. काही अल्पावधीतच ते पुन्हा प्राणघातक आण्विक अस्त्रे बनवू शकतील; यामुळेच नाविन्य नसलेल्या शस्त्रास्त्रांनी युक्त असे युद्ध लवकरच मोठ्या नाशाचा झपाट्याने बहर आणू शकते. होय, पांढऱ्या घोड्यावरील स्वार, त्या अग्निवर्ण घोड्यावर बसलेल्या आणि वेडापिसा झालेल्या स्वाराचे डोके उडवीत नाही तर, आज राष्ट्रांना गुरफटून असणारा गर्व व द्वेष यामुळे मानवजातीला आत्महत्या करण्याप्रत निरवले जाईल. यास्तव, आपण आत्मविश्वास बाळगू या की, ख्रिस्त राजा, सैतानाने वर्चस्व राखलेल्या जगावर आपली दौड पूर्ण करून विजय मिळवील आणि देव व शेजाऱ्यावरील प्रीतीवर आधारलेली अशी नव्या पृथ्वीवरील सामाजिक वसाहत प्रस्थापित करील. ते प्रेम, आमच्या काळातील वेडेपणाच्या अस्थिर अशा आण्विक शस्त्रास्त्रांच्या भीतीपेक्षा खूपच प्रबळ आहे.—स्तोत्र ३७:९-११; मार्क १२:२९-३१; प्रकटीकरण २१:१-५.
काळा घोडा पुढे निघतो
२०. पांढऱ्या घोड्यावरील स्वार कसल्याही विनाशी परिस्थितीचा सामना करील याची आम्हाला कशी खात्री आहे?
२० येशू आता तिसरा शिक्का फोडतो! हे योहाना, आता तुला काय दिसते? “त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी ‘ये,’ असे म्हणाला ते मी ऐकले.” (प्रकटीकरण ६:५अ) या तिसऱ्या करुबाला “माणसाच्या तोंडासारखे” तोंड आहे व ते प्रीतीच्या गुणाचे प्रदर्शन करते. हे तत्त्वबद्ध प्रेम, आज यहोवाच्या संघटनेच्या सर्व प्रकारात भरलेले आहे, तेच देवाच्या नव्या जगात मुबलकपणे असेल. (प्रकटीकरण ४:७; १ योहान ४:१६) ज्याला देवाने ‘आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत राज्य केले पाहिजे,’ तो पांढऱ्या घोड्यावरील स्वार, योहानाने त्याच्या परीक्षणार्थ पुढे जे काही दाखवण्यात आले त्या सर्व विनाशी परिस्थितीचा अंत करील अशी आपण खात्री राखू शकतो.—१ करिंथकर १५:२५.
२१. (अ) काळा घोडा व त्यावरील स्वार यामुळे काय चित्रित होते? (ब) काळा घोडा अद्यापही पुढे जात आहे हे कशामुळे सिद्ध होते?
२१ जेव्हा तिसरा “ये!” असे म्हणतो तेव्हा जे उत्तर मिळते, त्याबद्दल योहान काय बघतो? “मग मी पाहिले तो एक काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते.” (प्रकटीकरण ६:५ब) कडक दुष्काळ! हाच या भविष्यवादित दृश्याचा तीव्र संदेश आहे. तो प्रभूच्या दिवसात आरंभाला जेव्हा धान्य तराजूने विकले जाईल त्याकडे निर्देश करतो. १९१४ पासून पुढे दुष्काळ ही सतत जागतिक समस्या बनली आहे. आधुनिक युद्धे, दुष्काळ अधिक जागृत करतो, कारण भुकेलेल्यांना तृप्त करण्यासाठी वापरण्यात येणारी साधनसंपत्ती युद्धाची शस्त्रे पुरविण्याच्या कामी वापरण्यात येते. शेतात काम करणाऱ्यांना सक्तीने लष्करात भरती व्हावे लागते आणि युद्धामुळे उजाड झालेली व होरपळलेली जमीन अन्न देण्याचे बंद करते. हेच पहिल्या महायुद्धात जेव्हा लाखोंना उपासमार सहन करुन ते मेले तेव्हा केवढे खरे घडले! पण युद्ध संपले तेव्हा काळ्या घोड्यावरील उपासमारीच्या स्वाराने विश्रांती घेतली नाही. १९३० शीच्या काळात एकट्या युक्रेन येथे दुष्काळाने पन्नास लाख लोकांचा बळी घेतला. दुसऱ्या जागतिक महायुद्धाने अन्नटंचाई व दुष्काळ यांना अधिक जागे केले. काळ्या घोड्यावरील स्वार आपली दौड पुढे नेत असता, द वर्ल्ड फूड कौन्सिलने कळवले की, १९८७ च्या मध्याला ५१ कोटी २० लाख लोकांची उपासमार होत होती आणि दर दिवशी ४०,००० मुले उपासमारीच्या कारणांमुळे मरत होती!
२२. (अ) एक वाणी काय म्हणते व ती कोणती गरज दाखवते? (ब) एक शेर गहू तसेच तीन शेर जवाच्या किंमतीमुळे काय सूचित होते?
२२ योहानाला आम्हास आणखी सांगायचे आहे: “चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: ‘रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची खराबी करू नको.’” (प्रकटीकरण ६:६) मागे, सा.यु.पू. ६०७ मध्ये यरुशलेमेचा नाश होण्याआधी लोकांना “कष्टी होऊन भाकर तोलून” खावी लागली. त्याप्रमाणे आताही उपलब्ध असणारा अन्नसाठा जपून वापरावा याबद्दल चारही करुब एकमतात आहेत. (यहेज्केल ४:१६) योहानाच्या काळी शेरभर गहू सैनिकाच्या एका दिवसाची शिधा होती. ही शिधा केवढ्या किंमतीची होती? एक रुपया, किंवा दिनारी—एका दिवसाचा पगार! (मत्तय २०:२) * या माणसाला जर कुटुंब असेल तर काय? तर, गव्हाऐवजी तो तीनशेर तकाकी न आणलेले जव घेऊ शकत होता. पण त्यामुळे लहानशा कुटुंबाचीच भरवणूक होऊ शकत होती. त्याकाळी जवाला गव्हाप्रमाणे सकस अन्न म्हणून समजले जात नव्हते.
२३. “तेल व द्राक्षारस ह्यांची खराबी करू नको,” या विधानामुळे काय सूचित होते?
२३ “तेल व द्राक्षारस ह्यांची खराबी करू नको,” या विधानाद्वारे काय सूचित होते? काहींनी असे प्रतिपादिले आहे की, पुष्कळांना जरी अन्नटंचाई व उपासमारी यांना तोंड द्यावे लागले तरी यामुळे श्रीमंतांच्या चैनीला आळा बसणार नाही. तथापि, मध्यपूर्वेत तेल व द्राक्षारस या खऱ्या चैनीच्या वस्तू नाहीत. बायबल काळी भाकर, तेल व द्राक्षारस या गोष्टी सर्वसाधारण प्राथमिक जरुरीच्या वस्तू समजल्या जात. (पडताळा उत्पत्ती १४:१८; स्तोत्र १०४:१४, १५.) पाणी हे नेहमीच चांगले नव्हते, त्यामुळे द्राक्षारस हा पिण्यासाठी व कधी कधी औषधासाठी वापरला जाई. (१ तीमथ्य ५:२३) तेलाबद्दल पाहू जाता, एलियाच्या काळातील सारफथच्या विधवेकडे, ती गरीब होती तरी, थोडासा तेलाचा साठा होता, ज्यामुळे तिला उरलेल्या पिठाची भाकर करता येऊ शकत होती. (१ राजे १७:१२) या कारणामुळे, “तेल व द्राक्षारस ह्यांची खराबी करू नको” या आज्ञेचा अर्थ, या प्राथमिक गोष्टींना उधळेपणाने न वापरता काटकसरीने वापरावे असा ध्वनित होत होता. तसे न केल्यास त्यांची “खराबी” होणार होती; म्हणजे दुष्काळ संपण्यापूर्वीच त्यांचा साठा संपणार होता.
२४. काळा घोडा आपली दौड अधिक काळासाठी का पुढे चालू ठेवू शकणार नाही?
२४ त्या वेगाने दौडणाऱ्या काळ्या घोड्याच्या स्वारावर, पांढऱ्या घोड्यावरील स्वार लवकरच लगाम घालील तेव्हा आम्हाला किती आनंद होईल! कारण, तो जी नव्या जगासंबंधाने तरतूद करणार आहे त्याविषयी असे लिहिले आहे: “त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो. . . . भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरापर्यंत ते डोलो.”—स्तोत्र ७२:७, १६; तसेच यशया २५:६-८ पाहा.
फिकट रंगाचा घोडा व त्यावरील स्वार
२५. येशू चवथा शिक्का उघडतो तेव्हा योहान कोणाची वाणी ऐकतो व त्याकडून काय सूचना मिळते?
२५ अद्याप कहाणी संपूर्ण सांगून झालेली नाही. येशू चवथा शिक्का उघडतो आणि योहान आम्हाला त्याचा परिणाम सांगतो: “त्याने चौथा शिक्का फोडला तेव्हा चौथा प्राणी ‘ये!’ असे म्हणाला, ते मी ऐकले.” (प्रकटीकरण ६:७) हा उडणाऱ्या गरुडाचे स्वरुप असणाऱ्या करुबाचा आवाज आहे. याकरवी दूरदृष्टीचे ज्ञान सूचित केलेले आहे. खरेच, येथे जे वर्णिण्यात आले आहे त्यानुसार योहान, योहान वर्ग व देवाच्या इतर सर्व सेवकांना निरीक्षण व सूक्ष्मदृष्टिने हालचाल करण्याची गरज आहे. असे केल्यामुळे, आजच्या गर्विष्ठ व अनैतिक पिढीचे जागतिक ज्ञानी यांना जो शाप पीडा देत आहे त्यापासून आपले रक्षण होईल.—१ करिंथकर १:२०, २१.
२६. (अ) चवथा घोडेस्वार कोण आहे व त्याच्या घोड्याचा रंग उचित का आहे? (ब) चवथ्या घोडेस्वारामागून कोण येतो आणि त्याने घेतलेल्या बळींचे काय घडते?
२६ चौथा घोडेस्वार हाकेस प्रतिसाद देतो तेव्हा, कोणते भीतीग्रस्त दृश्य समोर झळकते? योहान आम्हास सांगतो: “मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव मृत्यु आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता.” (प्रकटीकरण ६:८अ) शेवटल्या घोडेस्वाराचे नाव आहे: मृत्यू. प्रकटीकरणातील चार घोडेस्वारांपैकी हा एकटाच असा आहे, जो इतक्या सरळपणे आपली ओळख प्रकट करतो. मृत्यू फिकट घोड्यावर स्वार आहे हे योग्यच आहे, कारण ग्रीक लिखाणात फिकट या शब्दाचे (ग्रीक, ख्लो․रॉसʹ) एखाद्या आजाराने जणू फिकट झालेले चेहरे असे वर्णन देण्यात आले आहे. याचप्रमाणे मृत्यूच्या पाठोपाठ कोणत्या तरी पद्धतीने हेडीज (अधोलोक, कबर) चालला होता हे उचित आहे, कारण चवथ्या घोडेस्वाराच्या विध्वंसकारी परिणामामुळे जे बळी पडतात त्या मोठ्या संख्येला हेडीज आपणाकडे घेत असतो. अशांसाठी, जेव्हा ‘मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडल्यावर’ पुनरुत्थान आहे ही आनंदाची गोष्ट आहे. (प्रकटीकरण २०:१३) पण मृत्यू आपला बळी कसा मिळवतो?
२७. (अ) मृत्यू हा स्वार आपले बळी कसे मिळवतो? (ब) जेथे मृत्यूचा अधिकार आहे त्या ‘पृथ्वीच्या चवथ्या भागाचा’ कोणता अर्थ आहे?
२७ तो दृष्टांत बळी मिळवण्याच्या पद्धतींचे काहीसे वर्णन देतो: “त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरीने [“प्राणघातक पीडांनी,” NW] व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला” होता. (प्रकटीकरण ६:८ब) पृथ्वीच्या लोकसंख्येचा तंतोतंत चवथा हिस्सा गृहीत धरण्याची आवश्यकता नाही, तर पृथ्वीवरील बराच मोठा भाग जो दाट वस्तीचा किंवा तुरकळपणे भरलेला असो, येथे या घोडेस्वाराच्या दौडीचा परिणाम होणार होता. हा घोडेस्वार, दुसऱ्या घोडेस्वाराकडील मोठ्या तरवारीने वधिलेले तसेच तिसऱ्या घोडेस्वाराच्या दुष्काळ व अन्नटंचाईने घेतलेले बळी आपणाकडे घेतो. तो प्राणघातक पीडा तसेच लूक २१:१०, ११ मध्ये दर्शविण्यात आलेले भूकंप यामुळे स्वतःचे बळी मिळवतो.
२८. (अ) ‘प्राणघातक पीडेबद्दल’ असणारा भविष्यवाद कसा पूर्ण झाला? (ब) यहोवाच्या लोकांना अशा भयानक आजारांपासून कसे संरक्षण लाभले आहे?
२८ ‘प्राणघातक पीडा’ ही अलिकडे महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पहिल्या जागतिक महायुद्धाचे बळी पडल्यावर, १९१८-१९ च्या काही महिन्यातच स्पॅनिश फ्ल्युने २ कोटी जिवांची कापणी केली. या आपत्तीपासून बचावलेला पृथ्वीवरील एकच प्रदेश होता व तो म्हणजे सेंट हेलेनाचे छोटे बेट. जेथे मोठ्या संख्येने लोक मेले तेथे मृतांचे ढीग करून त्यांच्या चिता जाळल्या गेल्या. आज तंबाखूच्या प्रदुषणामुळे कर्करोग व हृदयविकार असे भयंकर आजार जडत आहेत. “अत्यंत भयानक दशक” असे ज्याचे वर्णन करण्यात येते त्या १९८० च्या दशकात, बायबलने बेकायदेशीर मानलेले आचरण अनुसरल्यामुळे एडस्च्या पीडेने या ‘प्राणघातक पीडेत’ आपली भर टाकली. आतापर्यंत या रोगाने पछाडलेले सर्व रोगी दगावले आहेत आणि १९९० मध्ये, केवळ उत्तर अमेरिकेत एडस्च्या विषाणूने १० लाख लोक संसर्गित झाल्याचे अनुमान काढण्यात आले होते. आफ्रिकेत तर लाखोंचा असा नाश झालेला आहे. ज्यामुळे अशा प्रकारातील अनेक आजार संक्रमित होतात त्या जारकर्म व रक्ताचा गैरवापर याबद्दल देवाच्या वचनातील सुज्ञ सल्ला पाळल्यामुळे आज यापासून दूर राहता आले म्हणून यहोवाचे लोक किती धन्यवादित आहेत!—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; पडताळा १ करिंथकर ६:९-११.
२९, ३०. (अ) यहेज्केल १४:२१ मधील “चारी उग्र शासने” यांचा आज कसा अवलंब दिसत आहे? (ब) प्रकटीकरण ६:८ मध्ये सांगण्यात आलेली ‘श्वापदे’ यांचा आम्ही कसा अर्थ घ्यावा? (क) या भविष्यवादित दृश्याचा प्रमुख मुद्दा काय आहे असे दिसते?
२९ योहानाचा दृष्टांत अकाली मृत्यू येण्याचे चवथे कारण, जंगली श्वापद असल्याचे सांगतो. खरे म्हणजे, चवथा शिक्का फोडल्यावर ज्या चार गोष्टी दाखवण्यात आल्या—युद्धे, दुष्काळ, रोग व श्वापदे—त्या प्राचीन काळी अकाली मृत्यूचे कारण दर्शविणाऱ्या होत्या. त्याच आज सर्व अकाली मृत्यूच्या कारणांच्या पडछाया ठरतात. यहोवाने याबद्दल इस्राएलांना आधीच ताकीद दिली होती: “तर मग मी तरवार, दुष्काळ, हिंस्र पशू व मरी ही माझी चारी उग्र शासने यरुशलेमेतील मनुष्य व पशू यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन.”—यहेज्केल १४:२१.
३० आधुनिक काळी हिंस्र श्वापदांनी घडविलेले मृत्यू वृत्तपत्रात क्वचितच ठळक बातम्या म्हणून प्रसिद्ध होतात; वस्तुतः, उष्ण कटिबंधातील प्रदेशात जंगली पशूंनी या २० व्या शतकात आपले बळी मिळविले आहेत. भविष्यकाळात युद्धामुळे अधिक जमीन उद्ध्वस्त झाली व लोक दुष्काळामुळे अधिक जर्जर झाले तर ते क्षुधित पशुंपुढे लढा देता देता त्यांचे भक्ष्य ठरण्याची शक्यता आहे. तसेच आज कित्येक लोक निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणे पशुवृत्ती दाखवीत आहेत. हे यशया ११:६-९ मधील वर्णनाच्या अगदी विपरीत आहे. हेच लोक जगभरातील वाढीच्या लैंगिक आचरणाशी संबंधित असणारे गुन्हे, खून, दहशतवाद आणि आधुनिक जगातील बॉम्बची वृष्टी याला अधिकांश रितीने कारणीभूत आहेत. (पडताळा यहेज्केल २१:३१; रोमकर १:२८-३१; २ पेत्र २:१२.) चवथा घोडेस्वार याकडून देखील आपले बळी मिळवतो. खरेच, या भविष्यवादित दृष्टांताचा प्रमुख मुद्दा असा दिसतो की, फिकट घोड्यावर बसलेला स्वार मानवजातीतून विविध मार्गांनी अकाली मृत्यूद्वारे आपली कापणी मिळवीत आहे.
३१. लाल, काळ्या व फिकट घोड्यांच्या स्वारांनी विध्वंसकारी परिणाम घडवून आणले आहेत तरी, आपण उत्तेजित का असले पाहिजे?
३१ पहिले चार शिक्के फोडल्यामुळे प्रकटविलेली माहिती आपल्याला सांत्वनदायक आहे, कारण ती आम्हाला, आम्ही आज मुबलक असणारी युद्धे, उपासमार, रोग, अकाली मरण घडवून आणणारी कित्येक कारणे यामुळे विचलित होऊ नये असे शिकवते. शिवाय सध्याच्या समस्या सोडविण्याच्या बाबतीत मानवी नेते अपयशी ठरल्यामुळे आपण आपली आशा गमावू नये. जागतिक परिस्थिती लाल, काळ्या व फिकट घोड्यांचे स्वार आपली घोडदौड आक्रमित असल्याचा स्पष्ट पुरावा देत असल्याचे दिसते, तर त्या आधी पांढऱ्या घोड्यावरील स्वाराने आपली दौड सुरु केली आहे हे विसरु नका. येशू राजा झालेला आहे व त्याने आधीच सैतानाला स्वर्गातून काढून टाकून विजय संपादिला आहे. त्याच्या पुढच्या विजयांनी आध्यात्मिक इस्राएलांच्या पुत्रांपैकी बाकी राहिलेले आणि संख्येने लाखो असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मोठ्या जमावाचे एकत्रीकरण, मोठ्या संकटातून बचावण्यासाठी साध्य केले आहे. (प्रकटीकरण ७:४, ९, १४) त्याने आपला संपूर्ण विजय मिळवेपर्यंत त्याची दौड चालू ठेवली पाहिजे.
३२. पहिले चार शिक्के फोडल्यावर प्रत्येक वेळेला काय घडते?
३२ पहिले चार शिक्के उघडताना प्रत्येक वेळी “ये!” अशी आज्ञा देण्यात आली होती. प्रत्येक वेळेला घोडा व त्यावरील स्वार जोराची दौड करीत पुढे आला. पण पाचवा शिक्का फोडल्यानंतर अशी आज्ञा आपण ऐकत नाही. तथापि, ते घोडेस्वार अद्याप आपली दौड करीत आहेत आणि या व्यवस्थीकरणाची समाप्ती घडेपर्यंत ते आपली ही दौड चालूच ठेवतील. (पडताळा मत्तय २८:२०.) पण येशू उरलेले तीन शिक्के फोडतो तेव्हा आणखी कोणत्या महत्त्वपूर्ण घटना सामोऱ्या येतात? यापैकीच्या काही घटना मानवी नेत्रांस अदृश्य आहेत. इतर जरी दृश्य असल्या तरी त्या भावी काळच्या आहेत. तरीपण त्यांची पूर्णता खात्रीची आहे. त्या काय आहेत हे आपण पाहू या.
[तळटीपा]
^ तथापि, प्रकटीकरण १२:१ मधील “स्त्री” ही “बारा ताऱ्यांचा [लाक्षणिक] मुगूट” घालून होती हे लक्षात घ्या.
^ येशू १९१४ मध्ये आपल्या राज्यात आला, याबद्दलच्या सविस्तर पुराव्यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “तुझे राज्य येवो” या पुस्तकातील १४ वा अध्याय तसेच परिशिष्ट बघा.
^ कित्येक भाषांतरे ही संज्ञा “जिंकावयाला निघाला,” (रिव्हाईज्ड स्टँडर्ड, द न्यू इंग्लिश बायबल, किंग जेम्स व्हर्शन) किंवा “विजयी होण्याकडे जात राहिला,” (फिलिप्स, न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) असे देतात; तरी मूळ ग्रीक भाषेतील मथितार्थ येथे ती गोष्ट पूर्ण करण्याचा वा तिचा शेवट गाठण्याचा अर्थ देतो. या कारणास्तव, रॉबर्टसन यांचे वर्ड पिक्चर्स इन द न्यू टेस्टमेंट हे विवेचन देते: “येथील मथितार्थ सर्वतोपरी विजयाची सूचकता देतो.”
^ पाहा, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.
[अभ्यासाचे प्रश्न]
[९२ पानांवरील चौकट]
राजा विजयाने दौड करतो
१९३० व १९४० शीच्या काळात यहोवाच्या साक्षीदारांचे सेवकपण बेकायदेशीर, कायदा मोडणारे शिवाय विध्वंसक असल्याचे दाखवण्याचा शत्रूंनी जोरदार प्रयत्न केला. (स्तोत्र ९४:२०) १९३६ या एकाच वर्षात अमेरिकेत १,१४९ धरपकडी झाल्याची नोंद झाली. साक्षीदारांनी ही सर्व कायदेशीर प्रकरणे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली आणि पुढे प्राप्त झालेले उल्लेखनीय विजय दिले आहेत.
मे ३, १९४३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मरडॉक विरुद्ध पेन्सिल्वेनिया हे प्रकरण निकालात काढले आणि हा निर्वाळा दिला की, साक्षीदार जी प्रकाशने देतात त्याचे मूल्य घेण्यासाठी त्यांना परवाना काढण्याची जरुरी नाही. त्याच दिवशी मार्टीन विरुद्ध सिटी ऑफ स्ट्रुथर्स या प्रकरणात हे ठरविले गेले की, हस्तपत्रिका तसेच इतर जाहिरातींची सामग्री घरोघरी वाटताना दरवाजावरील घंटी वाजविणे बेकायदेशीर ठरत नाही.
जून १४, १९४३ रोजी टेलर विरुद्ध मिसिसीपी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ठरविले की, साक्षीदारांनी आपल्या प्रचारकार्याद्वारे सरकारला बेईमानी करण्याचे उत्तेजन दर्शविले नाही. त्याच दिवशी वेस्ट व्हर्जिनिया स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन विरुद्ध बर्नेट या प्रकरणात न्यायालयाने ठरविले की, शाळेच्या मंडळाला ध्वजवंदन करण्याचे नाकारणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा अधिकार नाही. याच्याच दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या सबंध उच्च न्यायालयाने, यहोवाचे साक्षीदार “जुलमी, छंदिष्ट व जाचक” आहेत असे म्हणून त्यांच्यावर देशभर जी बंदी लादली होती ती काढून टाकली.
[९४ पानांवरील चौकट]
“पृथ्वीची शांती हरण करण्याचे काम”
तंत्रज्ञान कोठे निरवीत आहे? इंटरनॅशनल डेव्हलपमेंट रिसर्च सेंटरचे अध्यक्ष इव्हान एल. हेड यांनी जे भाषण दिले व ज्याचे वृत्त टोरंटो, कॅनडाच्या द ग्लोब ॲण्ड मेल या वृत्तपत्रात जानेवारी २२, १९८७ मध्ये दिले गेले त्यातील काही भाग पुढीलप्रमाणे:
“संशोधन व विकास याबाबतीत काम करणारे जगातील प्रत्येक चार शास्त्रज्ञ व तंत्रवैज्ञानिकामागील एकजण, शस्त्रांवर काम करीत असतो हा खात्रीलायकपणे अनुमान काढला आहे. . . . १९८६ मध्ये हा खर्च दर मिनिटामागे १.५० लक्ष डॉलर्सच्याही पुढे गेला होता. . . . तंत्रज्ञानावर हा इतका भर देण्यामुळे आपण सुरक्षित झालो आहोत का? प्रबळ सत्तांनी आपणापाशी राखलेल्या आण्विक अस्त्रांची स्फोटक शक्ती ही सबंध दुसऱ्या जागतिक महायुद्धात सर्व योद्ध्यांनी खर्च केलेल्या दारुगोळ्यापेक्षाही ६,००० पटीने अधिक क्षमता राखून आहे. सहा हजार दुसरी जागतिक युद्धे! १९४५ पासून पुढे जग लष्करी हालचालींपासून मुक्त असल्याचे सातपेक्षाही कमी आठवडी दिसले. १५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय किंवा मुलकी स्वरुपाची युद्धे घडली असून त्यामध्ये १ कोटी ९३ लक्ष जीवितहानी झाल्याचा अंदाज काढण्यात आला. यापैकीची बहुतेक हानी या अमेरिकी युगात जे कार्यक्षम नवे तंत्रज्ञान शिरले त्याच्या परिणामामुळे आहे.”
[९८, ९९ पानांवरील चौकट]
प्रकटीकरणाच्या पुस्तकाची मांडणी
प्रकटीकरण पुस्तकाच्या चर्चेत येथपर्यंत येऊन पोहंचल्यावर आपल्याला या पुस्तकाची मांडणी चांगल्या प्रकाराने लक्षात येऊ लागेल. त्याच्या उत्तेजक प्रस्तावनेनंतर (प्रकटीकरण १:१-९), प्रकटीकरणाला पुढील १६ दृष्टांतामध्ये विभागलेले पाहता येईल:
१ला दृष्टांत (१:१०–३:२२): योहान, प्रेरणेने वैभवी येशूला बघतो. येशू सात मंडळ्यांना सूचनेचा उबदार संदेश पाठवतो.
२रा दृष्टांत (४:१–५:१४): यहोवा देवाच्या राजासनाचा वैभवी दृष्टांत. तो कोकऱ्याला गुंडाळीचे पुस्तक देतो.
३रा दृष्टांत (६:१-१७): पुस्तकाचे पहिले सहा शिक्के फोडणे, प्रभूच्या दिवसात घडतील अशा घटनांचा संयुक्त दृष्टांत कोकरा प्रगतीशीलपणे प्रकटवितो. प्रकटीकरणाच्या चार घोडेस्वारांची दौड सुरु होते, देवाच्या हुतात्मिक दासांना पांढरे झगे देण्यात येतात आणि क्रोधाच्या मोठ्या दिवसाचे वर्णन देण्यात आले.
४था दृष्टांत (७:१-१७): १,४४,००० पैकीच्या आध्यात्मिक इस्राएलांवर शिक्का मारुन होईपर्यंत देवदूत नाशाचे वारे अडवून धरतात. सर्व राष्ट्रातील मोठा लोकसमुदाय देव व कोकरा यांना आपल्या तारणाचे श्रेय देतो व याला मोठ्या संकटातून वाचण्यासाठी एकत्रित करण्यात येते.
५वा दृष्टांत (८:१–९:२१): सातवा शिक्का फोडल्यावर सात कर्ण्यांचा निनाद होतो, यापैकीच्या सहा कर्ण्यांचे मिळून पाचवा दृष्टांत तयार होतो. या सहा कर्ण्यांचा निनाद मानवजातीवर येणाऱ्या यहोवाच्या न्यायदंडाचे वक्तव्य करतो. पाचव्या व सहाव्या कर्ण्याचा नाद पहिल्या व दुसऱ्या अनर्थाची प्रस्तावना करतो.
६वा दृष्टांत (१०:१–११:१९): एक बलवान देवदूत योहानाला एक छोटे पुस्तक देतो, मंदिराचे मोजमाप केले जाते आणि आपल्याला दोन साक्षीदारांचे अनुभव समजतात याचा कळस सातव्या कर्ण्याच्या नादाने होतो, ज्यात देवाच्या शत्रूंसाठी तिसऱ्या अनर्थाची घोषणा आहे—यहोवा व त्याच्या ख्रिस्ताचे येणारे राज्य.
७वा दृष्टांत (१२:१-१७): हा, राज्याच्या जन्माचे वर्णन देतो, यामुळे मीखाएल अजगर, सैतानाला खाली पृथ्वीवर टाकतो.
८वा दृष्टांत (१३:१-१८): समुद्रातून एक प्रबळ श्वापद बाहेर येते आणि कोकऱ्यासारखे दिसणारे दोन शिंगाचे श्वापद मानवजातीला पहिल्या श्वापदाची भक्ती करायला सांगते.
९वा दृष्टांत (१४:१-२०): सीयोन डोंगरावरील १,४४,००० यांचा दैदिप्यमान पूर्वदृष्टांत. पृथ्वीभरात देवदूतांचे संदेश ऐकविण्यात येतात, पृथ्वीवरील द्राक्षीचे घड तोडले जातात आणि देवाच्या क्रोधाचे द्राक्षकुंड तुडविण्यात येते.
१०वा दृष्टांत (१५:१–१६:२१): स्वर्गीय न्यायालयाचे आणखी एक दृश्य, यानंतर यहोवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओतण्यात येतात. हा विभाग देखील सैतानी व्यवस्थीकरणाच्या नाशाच्या भविष्यवादित वर्णनाने संपतो.
११वा दृष्टांत (१७:१-१८): मोठी वेश्या, मोठी बाबेल किरमिजी रंगाच्या श्वापदावर आरुढ आहे, हे श्वापद काही काळासाठी अगाधकूपात जाते व नंतर पुन्हा बाहेर येऊन तिला उद्ध्वस्त करते.
१२वा दृष्टांत (१८:१–१९:१०): मोठ्या बाबेलचे पतन व शेवटला नाश घोषित होतो. तिच्या हत्येनंतर काही शोक करतात, तर इतर यहोवाची स्तुती गातात; कोकऱ्याच्या लग्नाची घोषणा होते.
१३वा दृष्टांत (१९:११-२१): सैतानी व्यवस्था, त्याचे सैन्य व त्याचे पाठीराखे या सर्वांवर येशू, यहोवाच्या क्रोधाच्या न्यायाची अमंल बजावणी करण्यासाठी स्वर्गातील सैन्याचे नेतृत्व करतो; शवांवर आकाशातील पक्षी आपली मेजवानी करतात.
१४वा दृष्टांत (२०:१-१०): दियाबल सैतानाला अगाधकूपात टाकणे, ख्रिस्त व त्याचे सहराजे यांची हजार वर्षांची कारकीर्द, मानवजातीची शेवटली परीक्षा आणि सैतान व त्याच्या दुरात्म्यांचा नाश.
१५वा दृष्टांत (२०:११–२१:८): सर्वसाधारण पुनरुत्थान व थोर न्यायाचा दिवस; धार्मिक मानवजातीवर चिरकालिक आशीर्वादासाठी नवे आकाश व नवी पृथ्वी दिसते.
१६वा दृष्टांत (२१:९–२२:५): नवे यरुशलेम, कोकऱ्याची वधू हिच्या वैभवी दृष्टांताने प्रकटीकरणाचा कळस गाठला जातो. या शहरातून मानवजातीला बरे करण्याची व जीवन देण्याची देवाकडील तरतूद वाहत येते.
प्रकटीकरणाचा समारोप यहोवा, येशू, देवदूत व स्वतः योहान यांच्याकडील उबदार शुभेच्छा तसेच सूचना यांनी होतो. सर्वांना ‘या!’ हे आंमत्रण आहे.—प्रकटीकरण २२:६-२१.