व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘जिवे मारिलेल्या लोकांना’ प्रतिफळ दिले जाते

‘जिवे मारिलेल्या लोकांना’ प्रतिफळ दिले जाते

अध्याय १७

‘जिवे मारिलेल्या लोकांना’ प्रतिफळ दिले जाते

१. आम्ही कोणत्या काळात जगत आहोत व याबद्दलचा काय पुरावा आहे?

 देवाचे राज्य अधिकार गाजवीत आहे! पांढऱ्‍या घोड्यावरील स्वार आपली दौड संपविण्याच्या बेतात आहे! लाल, काळा व फिकट घोडा यांची सबंध पृथ्वीवर जोरदार दौड चालूच आहे! येशूने आपल्या बादशाही उपस्थितीबद्दल स्वतःच जे भविष्यवाद केले ते निर्विवादपणे पूर्ण होत आहेत. (मत्तय, अध्याय २४, २५; मार्क, अध्याय १३; लूक, अध्याय २१) होय, आम्ही या सद्य व्यवस्थीकरणाच्या अंतिम दिवसात जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) हे असे असल्यामुळे आपण कोकरा, येशू ख्रिस्त त्या गुंडाळीचा पाचवा शिक्का फोडतो तेव्हा काय घडते त्याकडे लक्ष देऊ या. आता आपण कोणत्या प्रकटीकरणात डोकावणार आहोत?

२. (अ) पाचवा शिक्का फोडल्यावर योहान काय बघतो? (ब) स्वर्गात यज्ञार्पणाच्या एका लाक्षणिक वेदीबद्दल वाचून आपल्याला नवल का वाटू नये?

योहान मन हेलावणाऱ्‍या दृष्टांताचे वर्णन देतो: “त्याने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली आत्मे [“जीव,” NW] पाहिले; ते आत्मे [“जीव,” NW] देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते.” (प्रकटीकरण ६:९) हे काय आहे? वर स्वर्गात यज्ञार्पणाची वेदी? होय! येथे योहान पहिल्यांदाच वेदीचा उल्लेख करीत आहे. योहानाने आधीच राजासनावर बसलेला यहोवा, त्याच्या सभोवतालचे करुब, काचेचा समुद्र, मशाली व धूप वाहणारे २४ वडील यांचे दिलेले वर्णन इस्राएलात यहोवाचे पवित्र स्थान, म्हणजेच पृथ्वीवरील निवासमंडप याच्याशी जुळणारे आहे. (निर्गम २५:१७, १८; ४०:२४-२७, ३०-३२; १ इतिहास २४:४) तर मग, स्वर्गात देखील यज्ञार्पणाची एक लाक्षणिक वेदी आहे हे बघून आपल्याला आश्‍चर्य वाटावे का?—निर्गम ४०:२९.

३. (अ) प्राचीन यहूदी निवासमंडपात, ‘वेदीच्या पायथ्याजवळ’ जीव कसे ओतले जात? (ब) योहानाने स्वर्गात लाक्षणिक वेदीखाली वधलेल्या साक्षीदारांचे जीव का बघितले?

या वेदीखाली “देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे” जीव होते. हा काय प्रकार आहे? हे, मूर्तिपूजक ग्रीक लोक मानीत तसे शरीरापासून वेगळे झालेले जीव निश्‍चितच नसणार. (उत्पत्ती २:७; यहेज्केल १८:४) उलट, योहानाला हे माहीत आहे की, जीव किंवा जीवन हे रक्‍ताद्वारे चित्रित केले जाते. प्राचीन यहूदी निवासमंडपात याजक प्राण्यांचे यज्ञार्पण करीत, तेव्हा त्याचे रक्‍त ते “वेदीवर सभोवती” शिंपडीत किंवा “होमवेदीच्या पायथ्यावर” ओतीत. (लेवीय ३:२, ८, १३; ४:७; १७:६, ११, १२) या कारणास्तव, प्राण्यांचे जीव यज्ञार्पणाच्या वेदीशी अगदी जवळून संबंधित होते. पण आता, स्वर्गातील लाक्षणिक वेदीखाली देवाच्या या विशिष्ट सेवकांचे जीव किंवा रक्‍त का दिसावे? कारण त्यांचे घडलेले मृत्यू यज्ञार्पित आहेत अशा दृष्टिकोनाने पाहिले जाते.

४. आत्म्याने जन्मलेल्या ख्रिश्‍चनांचा मृत्यू कोणत्या प्रकाराने यज्ञार्पित ठरतो?

ज्यांचा देवाचे आत्मिक पुत्र असा जन्म घडला आहे ते सर्व यज्ञार्पित मरणाने मरतात. यहोवाच्या स्वर्गातील राज्यात त्यांना जी भूमिका करावयाची आहे त्याच्या अनुषंगाने देवाची इच्छा ही आहे की, यांनी पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेचा त्याग व अर्पण करावे. याबाबतीत, ते यहोवाच्या सार्वभौमत्वाखातर स्वतःला यज्ञार्पित मरणासाठी सादर करतात. (फिलिप्पैकर ३:८-११; पडताळा २:१७.) हे योहानाने ज्यांना वेदीखाली बघितले त्यांच्याबाबतीत अगदी खरे आहे. हे असे अभिषिक्‍त आहेत, ज्यांना त्यांच्या काळी यहोवाचे वचन व त्याचे सार्वभौमत्व आवेशी सेवाकार्य करीत असताना उंचावून धरल्यामुळे हुतात्मिक पद्धतीने वधण्यात आले. “देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष [मारटीरिʹअन] दिली होती तिच्यामुळे” त्यांचे जीव वधण्यात आले.

५. विश्‍वासू जीव मेलेले असले तरी बदला घेण्याची ओरड कशी करीत आहेत?

देखाव्याचा पुढचा वृत्तांत याप्रकारे उलगडतो: “ते मोठ्याने ओरडून म्हणाले: ‘हे स्वामी, [“सार्वभौम प्रभो,” NW] तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांपासून आमच्या रक्‍ताचा सूड घेणार नाहीस?’” (प्रकटीकरण ६:१०) मृत हे बेशुद्धावस्थेत असतात असे बायबल सांगते तर मग, यांचे जीव किंवा रक्‍त सूडासाठी कसे ओरडू शकते? (उपदेशक ९:५) काईनाने धार्मिक हाबेलचा वध केल्यावर त्याचे रक्‍त ओरडत नव्हते काय? यहोवाने तेव्हा काईनाला म्हटले होते: “तू हे काय केले? ऐक; तुझ्या भावाचे रक्‍त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे.” (उत्पत्ती ४:१०, ११; इब्रीयांस १२:२४) हे खरे की, हाबेलचे रक्‍त अक्षरशः शब्द उच्चारीत नव्हते. उलट, हाबेल तर अजाणपणे बळी ठरला, त्यामुळे त्याचा वध करणाऱ्‍याला शिक्षा केली जावी अशी न्यायाने मागणी केली. याचप्रमाणे, ते हुतात्मिक ख्रिस्ती निरपराध होते व त्यामुळे न्याय त्यांचा बदला मिळण्याची मागणी करतो. (लूक १८:७, ८) सूड घेण्याचा आक्रोश मोठा होता, कारण अशाप्रकारचा मृत्यू हजारोंना आलेला आहे.—पडताळा यिर्मया १५:१५, १६.

६. निरपराध लोकांच्या सांडलेल्या रक्‍ताचा सूड सा.यु.पू. ६०७ मध्ये कसा घेण्यात आला?

या परिस्थितीची तुलना सा.यु.पू. ७१६ मध्ये मनश्‍शे राजा सिंहासनावर बसला तेव्हाच्या धर्मत्यागी यहूदाशी करता येईल. त्याने खूप निरपराधी जनांचा रक्‍तपात केला व कदाचित यशया संदेष्ट्यालाही “करवतीने चिरले.” (इब्रीयांस ११:३७; २ राजे २१:१६) मनश्‍शाने नंतर पश्‍चात्ताप केला व आपणात सुधारणा केली तरी तो रक्‍तदोष तसाच राहिला. सा.यु.पू. ६०७ मध्ये बाबेलोन्यांनी यहूदाच्या राज्याचा नाश केला ते “यहूदी लोकांस आपल्यासमोरुन घालवावे म्हणून निःसंशय हे सर्व परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] आज्ञेने यहूदावर आले; मनश्‍शेने केलेल्या सर्व पापकर्मांमुळे व त्याने निरपराध जनांचा रक्‍तपात केल्यामुळे असे झाले. त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्‍ताने भरून टाकिले म्हणून परमेश्‍वर [यहोवा, NW] क्षमा करीना.”—२ राजे २४:३, ४.

७. ‘पवित्र जनांचे रक्‍त’ सांडण्यात कोण प्रामुख्यत्वे जबाबदार आहे?

बायबल काळी होते तसेच, आजही ज्यांनी देवाच्या साक्षीदारांचा वध केलेला आहे ते मरुन बराच काळ लोटला आहे. पण ज्या संघटनेने हे हुतात्मिक मरण घडवून आणले होते ती अद्यापही जिवंत असून रक्‍तदोषी आहे. ती सैतानाचे संतान, त्याची पार्थिव संघटना आहे. यात मोठी बाबेल, खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा मोठा वाटा आहे. * ती “पवित्र जनांच्या रक्‍ताने व येशूच्या साक्षींच्या रक्‍ताने मस्त झालेली” असे तिचे वर्णन केले आहे. होय, “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले.” (प्रकटीकरण १७:५, ६; १८:२४; इफिसकर ४:११; १ करिंथकर १२:२८) रक्‍तदोषाचा केवढा हा भार! मोठी बाबेल जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत तिला बळी पडलेले तिचा न्याय करावा अशी ओरड करीत राहतील.—प्रकटीकरण १९:१, २.

८. (अ) योहानाच्या जीवनमानातच हुतात्मिक मरणाच्या कोणत्या घटना घडल्या? (ब) रोमी सम्राटांनी कोणत्या छळाला चिथावणी दिली?

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या वाढत्या मंडळीसोबत तो क्रूर सर्प व त्याचे पृथ्वीवरील संतान यांनी लढत दिली तेव्हा योहान स्वतः पहिल्या शतकात या हुतात्मिक मरणाचा साक्षीदार बनला. योहानाने आमच्या प्रभूला वधिलेले पाहिले व नंतर तो स्तेफन, त्याचा स्वतःचा भाऊ याकोब, तसेच पेत्र, पौल आणि इतर जवळच्या सहकाऱ्‍यांचा वध पाहण्यास जिवंत होता. (योहान १९:२६, २७; २१:१५, १८, १९; प्रेषितांची कृत्ये ७:५९, ६०; ८:२; १२:२; २ तीमथ्य १:१; ४:६, ७) सा.यु. ६४ मध्ये रोमी सम्राट निरोने शहराला आग लावण्याच्या आपल्यावरील दोषाची अफवा काढून टाकण्यासाठी, तो दोष ख्रिश्‍चनांवर ढकलून त्यांना बळीचा बकरा बनविले. टॅसिटस्‌ हा इतिहासकार कळवतो: “ते [ख्रिस्ती] टवाळकीने मेले, जसे की, काहींवर वनपशूंचे कातडे टाकले गेले व मग त्यांना कुत्र्यांपुढे भक्ष्य बनवले, काहींना [वधस्तंभी] * खिळले, काहींना रात्रीच्या वेळी मशालीप्रमाणे जाळले.” मग, सम्राट डोमिटियनच्या कारकिर्दीत (सा.यु. ८१-९६) उसळलेल्या छळाच्या लाटेने योहान पात्म बेटावर कैदी बनला. येशूने म्हटल्याप्रमाणे: “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.”—योहान १५:२०; मत्तय १०:२२.

९. (अ) सामान्य युगाच्या चवथ्या शतकापर्यंत सैतानाने फसवणूकीचे कोणते उत्कृष्ट साधन सामोरे आणले व याचा प्रमुख भाग कोण होता? (ब) पहिल्या व दुसऱ्‍या जागतिक महायुद्धांच्या दरम्यान ख्रिस्ती धर्मजगताच्या काही नेत्यांनी यहोवाच्या साक्षीदारांना कसली वागणूक दिली?

तो जुनाट साप, दियाबल सैतान याने चवथ्या शतकापर्यंत त्याच्या फसवणूकीचे उत्कृष्ट साधन, ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मत्यागी धर्म—“ख्रिस्ती” मुलाम्याखाली दडलेली बाबेलोनी व्यवस्था—याला सामोरे आणले. तो सैतानाच्या संतानाचा प्रमुख भाग आहे व त्याची वाढ, झगडणाऱ्‍या पंथात झाली आहे. प्राचीन अविश्‍वासू यहूदाप्रमाणेच ख्रिस्ती धर्मजगतावर देखील मोठा रक्‍तदोष आहे व तो म्हणजे त्याचा पहिल्या व दुसऱ्‍या जागतिक महायुद्धातील दोन्ही बाजूंचा सहभाग. ख्रिस्ती धर्मजगतातील काही राजकीय अधिपतींनी या युद्धांना एक निमित्त बनवून देवाच्या अभिषिक्‍त सेवकांचा वध घडविला. हिटरलने यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध आणलेल्या छळाविषयी कळवताना, फ्रेड्रीक झिपफेल यांच्या कर्चनकॉम्फ इन ड्युचलँड (जर्मनीतील चर्चेसची लढाई) या पुस्तकातील उजळणी म्हणते: “त्यांच्यापैकी [साक्षीदारांपैकी] एक तृतीयांशांना एकतर हत्येने, इतर हिंसाचारी कृत्यांनी, उपासमारीने, आजार किंवा गुलामगिरीच्या श्रमाने ठार करण्यात आले. या छळाच्या तीव्रतेचा पूर्वीचा कसलाही दाखला नाही व तो त्यांच्या हातमिळवणी न करणाऱ्‍या विश्‍वासामुळे घडला; त्यांना आपला विश्‍वास राष्ट्रीय समाजसत्तावादी धोरणांशी जुळवून घेता आला नाही.” या कारणामुळे ख्रिस्ती धर्मजगत व त्यांचे पाळक याबद्दल हे खरेपणाने म्हणता यईल की, “निर्दोष, दीन जनांच्या जिवांचे रक्‍त तुझ्या अंगावरील वस्त्रात सापडले आहे.”—यिर्मया २:३४. *

१०. मोठ्या लोकसमुदायातील तरुणांना अनेक राष्ट्रात कसे छळले गेले?

१० कित्येक देशात १९३५ पासून मोठ्या लोकसमुदायाच्या विश्‍वासू तरुणांनी छळाचा जोरदार धक्का सहन केलेला आहे. (प्रकटीकरण ७:९) युरोपमध्ये दुसरे महायुद्ध संपले तरी, तेथील एका शहरात १४ यहोवाच्या साक्षीदारांना गळफासाने मृत्युदंड दिला गेला. त्यांचा गुन्हा कोणता होता? ‘यापुढे युद्धकला शिकण्याचे’ त्यांनी नाकारले. (यशया २:४) अगदी अलिकडेच, याच वादविषयामुळे पूर्वेच्या आणि आफ्रिकेच्या देशातील काही तरुणांना मरेपर्यंत मारण्यात आले किंवा त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्‍या तुकड्यांनी गोळ्या झाडल्या. येशूच्या आध्यात्मिक भावांचे पाठीराखे असणाऱ्‍या या तरुण हुतात्म्यांना, वचन देण्यात आलेल्या नव्या पृथ्वीत निश्‍चये पुनरुत्थान लाभेल.—२ पेत्र ३:१३; पडताळा स्तोत्र ११०:३; मत्तय २५:३४-४०; लूक २०:३७, ३८.

शुभ्र झगा

११. हुतात्मिक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कोणत्या अर्थी “शुभ्र झगा” मिळतो?

११ प्राचीन काळच्या सचोटी रक्षकाच्या विश्‍वासाची नोंद केल्यावर प्रेषित पौलाने म्हटले: “ह्‍या सर्वांबाबत, त्यांच्या विश्‍वासाविषयी चांगली साक्ष दिली असताहि त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ति झाली नाही; त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमिले होते.” (इब्रीयांस ११:३९, ४०) “जे अधिक चांगले” अशा कशाची पौल व इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी अपेक्षा धरली? ते, योहान येथे दृष्टांतात बघतो: “तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांस असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधु तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांति घ्या.” (प्रकटीकरण ६:११) त्यांना “शुभ्र झगा” देण्यात येतो हे, त्यांना अमर आत्मिक प्राणी असे पुनरुत्थान मिळते त्याला सूचित आहे. मग, त्यांना वधिलेले जीव असे वेदीखाली राहण्याची जरुरी नाही, तर स्वर्गातील देवाच्या राजासनापुढे बसलेल्या २४ वडिलांच्या गटामध्ये येण्यासाठी त्यांचे पुनरुत्थान घडते. तेथे त्यांनाही सिंहासन मिळते, हे त्यांना बादशाही हक्कात प्रवेश मिळतो असे दाखवते. त्यांनी “शुभ्र वस्त्रे परिधान केलेले” आहेत हे त्यांना नीतीमान असे गृहीत धरले जाऊन स्वर्गीय न्यायालयात यहोवापुढे एक सन्मानीत जागेला पात्र असल्याचे निदर्शक आहे. हे सार्दीस मंडळीतील विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना येशूने जे अभिवचन दिले त्याच्या पूर्णतेत आहे: “जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल.”—प्रकटीकरण ३:५; ४:४; १ पेत्र १:४.

१२. पुनरुत्थित अभिषिक्‍त जन कोणत्या अर्थी ‘आणखी थोडा वेळ विश्रांति घेतात’ व केव्हापर्यंत?

१२ येशू १९१४ मध्ये सिंहासनाधिष्ट झाल्यावर तसेच त्याने सैतान व दुरात्म्यांना काढून टाकून स्वर्ग स्वच्छ करण्यामुळे आपला राजेशाही विजय संपादित केल्यावर १९१८ मध्ये त्या स्वर्गीय पुनरुत्थानास आरंभ झाल्याचा पुष्कळ पुरावा आहे. तरीदेखील, त्या पुनरुत्थित अभिषिक्‍तांना “सोबतीचे दास . . . त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत . . . आणखी थोडा वेळ विश्रांति घ्या,” असे सांगण्यात आले. पृथ्वीवर हयात असलेल्या योहान वर्गाच्या सदस्यांना आपली सचोटी परीक्षा व छळ याद्वारे सिद्ध करून दाखवायची आहे; यापैकी काहींना कदाचित ठार व्हावे लागेल. पण शेवटी, मोठी बाबेल व तिच्या राजकीय चाहत्यांनी धार्मिकांचा जो रक्‍तपात घडवून आणला आहे त्याचा सूड घेतला जाईल. मध्यंतरात, पुनरुत्थान झालेले आपल्या स्वर्गीय कर्तव्यात निश्‍चये मग्न राहतील. ते स्वस्थ आहेत ते शाश्‍वत सुखाच्या क्रियाविना परिस्थितीत नव्हे, तर यहोवाचा सूड घेण्याचा दिवस कधी येतो हे सहनशीलपणे स्वस्थ राहून बघत आहेत. (यशया ३४:८; रोमकर १२:१९) खोट्या धर्माचा नाश झाल्याचे ते पाहतील तसेच “पाचारण केलेले, निवडलेले व विश्‍वासू” या नात्याने ते आपला प्रभु येशू ख्रिस्त यासोबत सैतानाच्या पृथ्वीवरील इतर दुष्ट संततीच्या इतर भागांवर न्यायदंडाची अंमलबजावणी करण्यात सहभाग घेतील तेव्हा त्यांची स्वस्थता संपेल.—प्रकटीकरण २:२६, २७; १७:१४; रोमकर १६:२०.

“जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील”

१३, १४. (अ) प्रेषित पौलाच्या मते स्वर्गीय पुनरुत्थान केव्हा सुरु होते आणि कोणाचे पुनरुत्थान होते? (ब) प्रभूच्या दिवसात बचावून राहणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांचे स्वर्गात केव्हा पुनरुत्थान होते?

१३ पाचवा शिक्का फोडल्यामुळे जी अंतर्दृष्टी मिळाली ती स्वर्गीय पुनरुत्थानासंबंधाने इतर शास्त्रवचनात जी माहिती आहे तिच्या पूर्ण सहमतात आहे. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने लिहिले: “प्रभूच्या [यहोवा, NW] वचनावरुन आम्ही हे तुम्हाला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनि आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभु स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील; नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.”—१ थेस्सलनीकाकर ४:१५-१७.

१४ ही वचने किती भारावलेली गोष्ट सांगतात! येशूच्या उपस्थितीपर्यंत बचावून राहणाऱ्‍या त्याच्या अभिषिक्‍त बांधवाआधी, म्हणजे त्याच्या उपस्थितीमध्ये पृथ्वीवर अद्याप जिवंत राहणाऱ्‍यांआधी, जे आधीच मेलेले आहेत ते आधी स्वर्गात जातात. ख्रिस्तामध्ये मेलेल्या अशा लोकांचे प्रथम पुनरुत्थान घडते. येशू उत्तरतो, म्हणजे तो आपले लक्ष अशांकडे वळवतो, त्यांचे आत्मिक जीवनासाठी पुनरुत्थान करतो व त्यांना “शुभ्र झगा” देतो. यानंतर, जे मानव म्हणून अद्याप जिवंत आहेत ते आपली पृथ्वीवरील यात्रा, बहुतेक विरोधकांच्या हाती हिंसाचारी मरणाद्वारे संपवतात. ते आधीच्या विश्‍वासू जनांप्रमाणे मरणात निद्रा घेत राहात नाहीत. उलटपक्षी, ते मरतात त्याच क्षणी एकाएकी “क्षणात, निमिषात” बदल होऊन ते, येशू व ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार असणाऱ्‍या इतर सदस्यांना स्वर्गात जाऊन मिळतात. (१ करिंथकर १५:५०-५२; पडताळा प्रकटीकरण १४:१३.) अशाप्रकारे, प्रकटीकरणातील चार घोडेस्वार आपल्या दौडीस आरंभ करतात तेव्हा लगेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे पुनरुत्थान सुरु होते.

१५. (अ) पाचव्या शिक्क्याच्या फोडण्याने कोणती सुवार्ता दिली गेली? (ब) पांढऱ्‍या घोड्यावरील विजेत्याची दौड कशी संपुष्टात येते?

१५ गुंडाळीचा पाचवा शिक्का फोडल्यामुळे, मरणापर्यंत विश्‍वासू राहणाऱ्‍या, विजयी होणाऱ्‍या अभिषिक्‍त अशा सचोटी रक्षकांसाठी सुवार्ता मिळू शकली. पण याने सैतान व त्याच्या संततीला कसलीही आनंदाची बातमी दिली नाही. पांढऱ्‍या घोड्यावरील विजेत्याची दौड अविरतपणे सुरु आहे व ती, जे “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे” त्याचा हिशोब घेण्यापर्यंत चालत राहील. (१ योहान ५:१९) हेच, कोकरा सहावा शिक्का उघडतो तेव्हा दाखविले जाते.

[तळटीपा]

^ मोठ्या बाबेलची ओळख ३३ व्या अध्यायात सविस्तरपणे चर्चिलेली आहे.

^ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, पृष्ठ १५७७ वरील, सूची ५सी, “वधस्तंभ” ही माहिती पडताळा.

^ धर्माच्या रक्‍तदोषाबद्दल ३६ व्या अध्यायात अधिक सविस्तर माहिती आढळते.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१०२ पानांवरील चौकट]

‘वधिलेले जीव’

फ्रेंच हुगुनोट पालकांस जन्मलेल्या १८ व्या शतकाच्या जॉन जॉर्टीन या इंग्लिश प्रॉटेस्टंट व्यक्‍तीचे म्हणणे मॅक्लीनटॉक व स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ असे अवतरीत करतो: “जेथे छळ सुरु होतो तेथे ख्रिस्तीयत्व संपते. . . . ख्रिस्ती धर्म [रोमी] साम्राज्याचा धर्म बनल्यावर आणि त्याच्या उपाध्यायांना सन्मान व संपत्ती बहाल करण्यात आल्यानंतर, छळाच्या राक्षसाने आपले प्रचंड बळ दाखवले आणि त्याने आपली झडप शुभवर्तमानाच्या धर्मावर घातली.”

[१०३ पानांवरील चित्रे]

“त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला”