व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे का?

तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे का?

अध्याय ११

तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे का?

सार्दीस

१. सार्दीस येथील मंडळीची आध्यात्मिक स्थिती काय आहे आणि येशू त्याच्या संदेशाची कशी सुरवात करतो?

 सध्याच्या अखिसार (थुवतीरा) याच्या साधारण ३० मैल दक्षिणेकडे पुढच्या मंडळीची जागा आहे, जिला वैभवी येशूकडून संदेश मिळत आहे. ती आहे, सार्दीस. आमच्या सामान्य युगाच्या सहाव्या शतकात हे शहर लिदियाच्या प्राचीन साम्राज्याची अहंमन्य राजधानी आणि अत्यंत धनसंपन्‍न असा राजा क्रोएसस याचे आसन होते. तथापि, योहानाच्या काळापर्यंत तिच्यावर अत्यंत कठीण वेळ गुदरली आहे आणि त्याचे क्रोएसस राजाच्या काळातील पूर्वीचे वैभव इतिहास जमा झाले आहे. याचप्रमाणे तेथील ख्रिस्ती मंडळी आध्यात्मिक रितीने दरिद्री झाली आहे. आता प्रथमतःच येशू त्याच्या संदेशाची सुरवात प्रशंसोद्‌गाराने करीत नाही; उलट तो असे म्हणतो: “सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत व सात तारे आहेत तो असे म्हणतो: तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस.”—प्रकटीकरण ३:१.

२. (अ) येशूकडे “सात आत्मे” आहेत याची सार्दीस येथील ख्रिश्‍चनांसाठी कोणती अभूतपूर्वता आहे? (ब) सार्दीस मंडळी कशासाठी प्रसिद्ध होती, पण वस्तुस्थिती काय होती?

येशू आपली ओळख, “ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत,” अशी का देतो? कारण हे आत्मे, पूर्ण रुपाने वाहत असलेल्या यहोवाच्या पवित्र आत्म्याचे प्रतिनिधीत्व करतात. नंतर, योहान यांचे वर्णन “सात डोळे,” असेही करतो ते या अर्थी की, देवाचा पवित्र आत्मा येशूला एक अत्यंत भेदक अशा दृष्टांताचा वर्षाव करतो. (प्रकटीकरण ५:६) अशाप्रकारे, अस्तित्वात असणारी कोणतीही स्थिती उघड करण्यास व तिला हाताळण्यास तो समर्थ आहे. (मत्तय १०:२६; १ करिंथकर ४:५) सार्दीस येथील मंडळी जिवंत, क्रियाशील असण्याबद्दल प्रसिद्ध आहे. परंतु ती आध्यात्मिकतेत मृत आहे हे येशू पाहू शकतो. हे स्पष्ट आहे की, तिचे बहुसंख्य सदस्य, ते ख्रिस्ती होण्याआधी ज्या स्थितीत होते, त्याच उदासीन स्थितीत परतले आहेत.—पडताळा इफिसकर २:१-३; इब्रीयांस ५:११-१४.

३. (अ) येशूजवळ “सात तारे” आहेत, याची “सार्दीस येथील मंडळीच्या दूताने” का विशेष दखल घेतली पाहिजे? (ब) सार्दीसमधील मंडळीला येशू कोणता जोरदार सल्ला देतो?

“सार्दीस येथील मंडळीच्या दूताला” येशू याचीही आठवण देतो की, त्याच्यापाशी “सात तारे” आहेत. त्या मंडळीच्या वडिलांना तो आपल्या उजव्या हाती यासाठी धरतो की, तो त्यांच्या मेंढपाळकत्वाच्या कामात मार्गदर्शन देण्याचा हक्क राखून आहे. यासाठी ‘कळपाची स्थिती जाणून घेण्यासाठी’ त्यांनी या कामी आपले अंतःकरण लावण्यास हवे. (नीतीसूत्रे २७:२३) यास्तव, त्यांनी येशूचे पुढचे शब्द ऐकून घेतलेले बरे: “जागृत हो, आणि जे मरणाच्या पंथास लागलेले आहे ते सावरून धर; कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले ह्‍याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्‍चात्ताप कर; कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही.”—प्रकटीकरण ३:२, ३.

४. पेत्राचे शब्द सार्दीसच्या मंडळीला ‘मरणाच्या पंथास लागले आहेत त्यांना सावरून धरण्यात’ कशी मदत देणार होते?

सार्दीस येथील वडिलांनी, सत्य शिकले तेव्हाचा प्राथमिक आनंद तसेच त्यांना तेव्हा मिळालेले आशीर्वाद यांचे स्मरण ठेवायचे होते. पण आता तर ते आध्यात्मिक कार्याच्या बाबतीत मृतवत्‌ झाले होते. विश्‍वासाची कामे करीत नसल्यामुळे त्यांच्या मंडळीचा दिवा लुकलुकत होता. कित्येक वर्षांआधी प्रेषित पेत्राने आशियातील मंडळ्यांना (ज्यात सार्दीसचाही समावेश असावा), ख्रिश्‍चनांनी स्वीकारलेल्या तसेच ज्याची घोषणा, योहानाच्या दृष्टांतात चित्रित करण्यात आलेल्या सात आत्म्याद्वारे, “स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे” करण्यात आली होती त्या वैभवी सुवार्तेबद्दलची रसिकता वाढवावी म्हणून उद्देशून लिहिले होते. पेत्राने त्या आशियाई ख्रिश्‍चनांना याचेही स्मरण दिले होते की, ते ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र व देवाचे स्वतःचे लोक असून त्यांनी, ज्यांना त्याने अंधकारातून काढून अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले होते, त्याचे गुण प्रसिद्ध करायचे होते.’ (१ पेत्र १:१२, २५; २:९) अशा आध्यात्मिक सत्यावर मनन करण्याद्वारे सार्दीस येथील मंडळीला पश्‍चात्ताप करण्यास व ‘मरणाच्या पंथास लागलेले आहेत त्यांना सावरून धरण्यास’ मदत मिळणार होती.—पडताळा २ पेत्र ३:९.

५. (अ) सार्दीसमधील ख्रिश्‍चनांच्या गुणग्राहकतेबद्दल काय झाले होते? (ब) सार्दीसमधील ख्रिस्ती, येशूच्या सल्ल्यानुरुप वागले नाही तर काय घडेल?

त्या क्षणाला सत्यासाठी त्यांची प्रीती व गुणग्राहकता ही पालवलेल्या अग्नीसारखी होती. केवळ काही जण निखाऱ्‍यासारखे बनले होते. आता येशू त्यांना हा निखारा फुलविण्यास व तो अग्नी प्रज्वलित करण्याचे उत्तेजन देतो. याचा अर्थ हा की, त्यांनी आपल्या दुर्लक्षितपणामुळे घडलेल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करायचा होता व पुन्हा एकदा आध्यात्मिक रुपात जिवंत असणारी मंडळी बनायचे होते. (पडताळा २ तीमथ्य १:६, ७.) तसे न केल्यास, येशू न्यायदंड बजावण्यासाठी जेव्हा एकाएकी—“चोरासारखा”—येईल तेव्हा सार्दीसची मंडळी तयारीत नसल्याचे दिसून येईल.—मत्तय २४:४३, ४४.

“चोरासारखा” येतो

६. येशू १९१८ मध्ये “चोरासारखा” कसा आला आणि त्याच्या अनुयायांचा दावा करणाऱ्‍यांमध्ये त्याला कोणती स्थिती आढळली?

येशूने “चोरासारखा” येण्याबद्दल जो इशारा दिला होता, तो आज आमच्या आधुनिक काळापर्यंत पोहंचतो. प्रभूच्या दिवसात जे ख्रिस्ती बचावून राहिले त्यांच्यासाठी याचा खास अवलंब आहे. १९१४ च्या नंतर लगेचच मलाखीच्या या भविष्यवादाची पूर्णता झाली: “‘ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा तो येत आहे,’ असे सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो.” (मलाखी ३:१; प्रकटीकरण १:१०) ‘करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्या’ या नात्याने येशू, त्याचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्‍यांची पाहणी व निरीक्षण करण्यासाठी आला. (१ पेत्र ४:१७) त्या वेळी, १९१८ मध्ये, ख्रिस्ती धर्मजगत पहिल्या जागतिक युद्धात रक्‍त सांडण्यात गुंतले होते व ते आध्यात्मिक दृष्ट्या पूर्णपणे मृतवत्‌ बनले होते. खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत सुद्धा हे दिसते की, जे युद्धाआधीच्या काळात इतक्या आवेशाने प्रचार करीत होते, ते आता आध्यात्मिक झोपेच्या गुंगीत पडले होते. यांच्यापैकी काही प्रमुख वडिलांना तुरुंगात टाकण्यात आले होते आणि प्रचाराचे कार्य बहुधा बंदच पडले होते. पुढल्या वर्षी यहोवाच्या आत्म्याने त्यांना जेव्हा जागे केले तेव्हा सर्वच तयार नव्हते. येशूच्या दाखल्यातील मूर्ख कुमारींप्रमाणे यहोवाची सेवा करण्याच्या हक्कासाठी काही तयार झाले नव्हते. तरीपण, अनेकांनी शहाण्या कुमारींप्रमाणे येशूच्या या इशाऱ्‍याकडे लक्ष दिले की, “जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”—मत्तय २५:१-१३.

७. आज ख्रिश्‍चनांना जागृत राहण्याची का गरज आहे?

ख्रिश्‍चनांनी जागृत राहण्याची गरज, प्रभूच्या दिवसाच्या आरंभालाच संपली नाही. त्याच्या “ह्‍या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल” त्याबद्दलच्या थोर भविष्यवादात येशूने हा जोरदार इशारा दिला: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही . . . सावध असा, जागृत राहा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.” (मार्क १३:४, ३२, ३३, ३७) होय, आम्ही अभिषिक्‍त असो किंवा मोठ्या लोकसमुदायातील असो, आम्ही प्रत्येकाने, या घटकेला सुद्धा, जागृत राहण्याची व आध्यात्मिक झोपेत वाहवत जाण्याविरुद्ध लढत देण्याची गरज आहे. जेव्हा यहोवाचा दिवस “रात्रीच्या चोरासारखा” येईल तेव्हा आपण अनुकूल न्याय प्राप्त करण्यासाठी पूर्णपणे जागृत असलेले आढळावे.—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३; लूक २१:३४-३६; प्रकटीकरण ७:९.

८. आज योहान वर्गाने देवाच्या लोकांना आध्यात्मिकरित्या जिवंत राहण्यासाठी कसे उत्तेजित केले आहे?

आज स्वतः योहान वर्ग, देवाच्या लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या जागृत राहण्यासाठी उत्तेजन देण्याच्या गरजेबाबत तयारीत आहे. यासाठीच, दर वर्षी अनेक वेळा पृथ्वीभर खास मेळावे आयोजित करण्यात आले. अलिकडील वर्षात १,५१३ अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्यांची संख्या ७४,८८,२६६ होती व १,३१,८७० नव्या विश्‍वासूंचा बाप्तिस्मा झाला. योहान वर्गाने वॉचटावर नियतकालिकाचा गेल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ यहोवाचे नाम व त्याचे उद्देश घोषित करण्यासाठी उपयोग केला. दोन महायुद्धातील दुःखद छळाच्या जबाबात द वॉचटावर नियतकालिकाने “ब्लेस्ड्‌ आर द फिअरलेस” (१९१९), “ए कॉल टू ॲक्शन” (१९२५) आणि “डिफिट ऑफ पर्सीक्यूशन” (१९४२) अशा प्रकारचे लेख प्रकाशित करून यहोवाच्या साक्षीदारांठायी नवा आवेश जागृत केला.

९. (अ) सर्व ख्रिश्‍चनांनी स्वतःबाबतीत काय विचारले पाहिजे? (ब) द वॉचटावरने कोणते उत्तेजन दिलेले आहे?

सार्दीसप्रमाणे आजच्याही मंडळ्यात सर्व ख्रिश्‍चनांनी स्वतःचे परीक्षण करीत राहण्याची गरज आहे. आम्ही सर्वांनीच स्वतःला हे विचारले पाहिजे की, आमची कृत्ये “देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी” दिसत आहेत का? इतरांचा न्याय न करता, आम्ही स्वतःच स्वार्थत्यागाचा आत्मा व्यक्‍तिशः प्रदर्शित करतो का व देवाला पूर्ण जिवाची सेवा सादर करतो का? या बाबतीत वॉचटावर नियतकालिकाने “आर यु सेल्फ इंडलजन्ट—ऑर सेल्फ सॅक्रिफायझिंग?” तसेच “एक्झर्ट युवरसेल्फ विगरसली” अशा विषयांची चर्चा करून उत्तेजन दिले आहे. * अशी ही शास्त्रवचनीय मदत मिळालेली असताना, आपण आपल्या अंतर्यामाचे परीक्षण करु या व यहोवासमोर सचोटी राखून नम्रपणे व प्रार्थनाशीलपणे चालू या.—स्तोत्र २६:१-३; १३९:२३, २४.

“थोडकी नावे”

१०. सार्दीस येथील मंडळीत कोणत्या उत्तेजनात्मक वैशिष्ट्याची येशूने नोंद घेतली आणि याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

१० येशूचे सार्दीस येथील मंडळीस पुढील शब्द फारच उत्तेजनात्मक आहेत. तो म्हणतो: “तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत, अशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत; ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवितो तो अशा रितीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल; मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन.” (प्रकटीकरण ३:४, ५) हे शब्द आम्हास विश्‍वासू राहण्यास व आमचा निश्‍चय बळकट करण्यासाठी उत्तेजित करीत नाही का? वडीलवर्गाच्या दुर्लक्षितपणामुळे सबंध मंडळी, आध्यात्मिक गाढ निद्रेत जाऊ शकते. तरी देखील तिच्यातील काही व्यक्‍ती, आपली ख्रिस्ती ओळख शुद्ध व निष्कलंक ठेवण्यास धैर्याने प्रयत्न करतील व अशाप्रकारे यहोवासोबत चांगले नाव टिकवून ठेवतील.—नीतीसूत्रे २२:१.

११, १२. (अ) मोठ्या धर्मत्यागाच्या काळात देखील सार्दीस येथील “थोडकी नावे” यांजसारखे काही विश्‍वासू ख्रिस्ती कसे राहिले असतील? (ब) प्रभूच्या दिवसात गव्हासमान ख्रिश्‍चनांना कोणती मुक्‍तता मिळाली?

११ होय, ती बाह्‍य “वस्त्रे” एखाद्या व्यक्‍तीच्या ख्रिस्ती या नात्याने नीतीमान ओळखीचा पुरावा देतात. (पडताळा प्रकटीकरण १६:१५; १९:८.) सार्दीसमध्ये बहुसंख्य लोक उदासीन अवस्थेत असताना देखील काही “थोडकी नावे,” थोडे अभिषिक्‍त ख्रिस्तीजन यांनी अद्याप आपली ओळख टिकवून ठेवली आहे हे पाहण्यात येशूला किती आनंद झाला असेल. याचप्रमाणे मोठ्या धर्मत्यागाच्या अनेक प्रदीर्घ शतकात नामधारी ख्रिस्ती, मोठी बाबेल या खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्यात शोषले गेले होते तेव्हा, निश्‍चितपणे असे काही थोडे जण राहिले असतील ज्यांनी मोठी वितुष्टता असताना देखील यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला असेल. हे लोक, फुटीर गटाच्या विपुल निदणात लपलेल्या गव्हाप्रमाणे धार्मिक होते.—प्रकटीकरण १७:३-६; मत्तय १३:२४-२९.

१२ या गव्हासमान ख्रिश्‍चनांसोबत, येशूने ‘युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस’ राहण्याचे अभिवचन दिले. ते कोण आहेत तसेच यांनी कोणते चांगले नाव मिळविले आहे हेही त्याला ठाऊक आहे. (मत्तय २८:२०; उपदेशक ७:१) प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला जे ‘थोडके’ अद्याप जिवंत होते, त्या विश्‍वासू जणांना केवढा आनंद झाला असावा याची कल्पना करा! अशांना आध्यात्मिकरित्या मृत बनलेल्या ख्रिस्ती धर्मजगतातून वेगळे करण्यात आले व स्मुर्णासारख्या नीतीमान मंडळीत एकत्रित करण्यात आले.—मत्तय १३:४०-४३.

१३. ‘जे आपली वस्त्रे विटाळवत नाहीत’ अशा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी कोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत?

१३ सार्दीसमध्ये, शेवटपर्यंत विश्‍वासू राहणाऱ्‍या व आपली ख्रिस्ती ओळख न डागळविणाऱ्‍या लोकांना अद्‌भुत आशेची पूर्तता मिळते. येशूच्या मशीही राज्याची १९१४ मध्ये प्रस्थापना झाल्यावर अशांचे, विजेते या अर्थी आत्मिक जीवनासाठी पुनरुत्थान केले जाते व अशांना त्यांच्या निर्दोष, निष्कलंक धार्मिकतेचे चिन्ह म्हणून शुभ्र असे बाह्‍य वस्त्र दिले जाते. जीवनाकडे नेणाऱ्‍या संकुचित मार्गाने चालल्यामुळे त्यांना चिरकालिक बक्षीसाचा अनुभव घेता येईल.—मत्तय ७:१४; तसेच प्रकटीकरण ६:९-११ पहा.

जीवनाच्या पुस्तकात सदासर्वदा!

१४. ‘जीवनाचे पुस्तक’ काय आहे व तेथे कोणाची नावे लिहिली जातात?

१४ हे ‘जीवनाचे पुस्तक’ काय आहे व त्यामध्ये कोणाची नावे राखून ठेवली जातील? सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांच्या अहवालास अनुलक्षून ते पुस्तक किंवा गुंडाळी आहे. (मलाखी ३:१६) येथे प्रकटीकरणात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या नावांचा विशिष्ट उल्लेख केला आहे. तरीपण, जे पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळविण्याच्या मार्गावर आहेत अशांची नावे देखील यात लिखित आहेत. शिवाय या पुस्तकातून नावे ‘खोडली जाऊ’ शकतात. (निर्गम ३२:३२, ३३) तरीपण, योहान वर्गातील ज्यांची नावे त्यांच्या मृत्युपर्यंत जीवनाच्या पुस्तकात राहतात अशांना स्वर्गातील अमर जीवन मिळते. (प्रकटीकरण २:१०) या नावांना येशू खासपणे त्याचा पिता व देवदूत यांजसमोर आपली मान्यता दर्शवितो. हे बक्षीस केवढे भव्य आहे!

१५. मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांना आपली नावे त्या जीवनी पुस्तकात कायमची कशी लिहिता येतील?

१५ ज्यांची नावे त्या जीवनी पुस्तकात लिहिली आहेत, अशा मोठ्या लोकसमुदायाचे लोक मोठ्या संकटातून जिवंतपणे पार होतील. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या काळात व त्यानंतरच्या निर्णायक कसोटीत आपला विश्‍वास राखून यांना नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकाळचे जीवन प्राप्त होते. (दानीएल १२:१; प्रकटीकरण ७:९, १४; २०:१५; २१:४) मग, त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात कायमची लिहिलेली राहतील. येथे हे जे पवित्र आत्म्याच्या माध्यमाने प्रकटविण्यात आले आहे त्याबद्दल येशूच्या पुनरुच्चित सल्ल्याला तुम्ही उत्साहाने प्रतिसाद देणार नाही का की, “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको”?—प्रकटीकरण ३:६.

[तळटीपा]

^ पाहा, द वॉचटावर, ऑगस्ट १, १९७८ व जानेवारी १५, १९८६.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५७ पानांवरील चित्रे]

तुमची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली राहोत