व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तेजस्वी नगरी

तेजस्वी नगरी

अध्याय ४३

तेजस्वी नगरी

दृष्टांत १६​—प्रकटीकरण २१:९-२२:५

विषय: नव्या यरुशलेमेचे वर्णन

पूर्णतेचा काळ: मोठ्या संकटानंतर आणि सैतानाला अथांग डोहात टाकल्यानंतर

१, २. (अ) नवे यरुशलेम पाहण्यासाठी देवदूत योहानाला कोठे नेतो आणि येथे आपल्याला कोणता फरक दिसतो? (ब) प्रकटीकरणाचा हा भव्य कळस आहे असे का म्हणता येईल?

 एक देवदूत योहानाला अरण्यात मोठी बाबेल दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. आता देवदूतांच्या त्याच समूहातील एकजण योहानाला एका उंच डोंगरावर नेतो. येथे त्याला किती वेगळे दृश्‍य दिसते! येथे बाबेली कलावंतिणीसारखी अशुद्ध व अनैतिक नगरी नाही, तर नवी यरुशलेम, शुद्ध, आध्यात्मिक व पवित्र अशी नगरी आहे व ती स्वर्गातून खाली येते.—प्रकटीकरण १७:१, ५.

पृथ्वीवरील यरुशलेमेला देखील इतका तेजस्वीपणा नव्हता. योहान आम्हाला कळवतोः “नंतर शेवटल्या सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला; तो म्हणालाः ‘ये, नवरी म्हणजे कोकऱ्‍याची स्त्री मी तुला दाखवितो.’ तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. तिच्या ठायी देवाचे तेज होते.” (प्रकटीकरण २१:९-११अ) उंच अशा डोंगराच्या माथ्यावरुन योहान त्या सुंदर नगरीची आणि तिच्या मनोहर परिसराची पाहणी करतो. मानवजातीवर पाप व मृत्यू आल्यानंतर विश्‍वासू माणसांनी या नगरीच्या येण्याची अपेक्षा धरली होती. आता, सरतेशवेटी ती आली आहे! (रोमकर ८:१९; १ करिंथकर १५:२२, २३; इब्रीयांस ११:३९, ४०) ही, १,४४,००० निष्ठावंत सचोटी रक्षकांनी मिळून बनलेली भव्य आध्यात्मिक नगरी आहे, ती तिच्या पवित्रपणात तेजस्वी आहे व यहोवाचे तेज ती प्रतिबिंबिंत करीत आहे. हाच तो प्रकटीकरणाचा भव्य कळस आहे!

३. योहान नव्या यरुशलेमेच्या सुंदरतेचे कसे वर्णन देतो?

नव्या यरुशलेमेची सुंदरता अतिशय श्‍वास रोखून धरायला लावणारी आहे. “तिची कांति अति मोलवान्‌ रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्‍या यास्फे खड्यासारखी होती; तिला मोठा उंच तट होता; त्याला बारा वेशी होत्या आणि वेशीजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती, ती इस्राएलाच्या संतानाच्या बारा वंशांची होती. पूर्वेकडे तीन वेशी, उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी; व पश्‍चिमेकडे तीन वेशी होत्या. नगरीच्या तटाला बारा पाये [पायांचे धोंडे, NW] होते, त्यांवर कोकऱ्‍याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.” (प्रकटीकरण २१:११ब-१४) चकाकणाऱ्‍या तेजस्वीपणाचे दर्शन योहान प्रथमतःच वर्णन करतो हे किती योग्य आहे! नववधूप्रमाणे प्रफुल्लित असणारी नवी यरुशलेम ख्रिस्ताची योग्य सोबतीण ठरते. ती तेजस्वी आहे कारण ती ज्याची निर्मिती आहे तो ‘ज्योतिमंडळाचा पिता’ आहे.—याकोब १:१७.

४. नवे यरुशलेम हे इस्राएलाचे दैहिक राष्ट्र नाही हे कशाद्वारे सूचित होते?

तिच्या १२ वेशींवर इस्राएलाच्या १२ वंशांची नावे आहेत. या कारणास्तव, ही लाक्षणिक नगरी १,४४,००० यांची बनलेली असून “इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी” त्यांजवर शिक्का मारलेला आहे. (प्रकटीकरण ७:४-८) याच्याच सहमतात, पायांच्या धोंड्यांवर कोकऱ्‍याच्या १२ प्रेषितांची नावे आहेत. होय, नवे यरुशलेम याकोबाच्या १२ पुत्रांवर आधारलेले इस्राएलाचे दैहिक राष्ट्र नव्हे. ते तर आध्यात्मिक इस्राएल राष्ट्र असून “प्रेषित व संदेष्टे” यांच्या पायावर रचलेले आहे.—इफिसकर २:२०.

५. नव्या यरुशलेमेचा “मोठा उंच तट” तसेच प्रत्येक प्रवेशापाशी दूतांना ठेवण्यात आले होते याद्वारे काय स्पष्ट होते?

लाक्षणिक नगराला उंच तट आहे. प्राचीन काळी नगराला शत्रूंपासून संरक्षण मिळावे यासाठी तट बांधत असत. नव्या यरुशलेमेचा “मोठा उंच तट” ती आध्यात्मिक दृष्टीने सुरक्षित असल्याचे सूचित करते. धार्मिकतेचा शत्रू, कोणताही अशुद्ध किंवा अप्रामाणिक माणूस यात प्रवेश मिळवू शकणार नाही. (प्रकटीकरण २१:२७) पण ज्यांना या सुंदर नगरीत प्रवेश मिळतो अशांना जणू नंदनवनातच प्रवेश मिळाल्यासारखे आहे. (प्रकटीकरण २:७) आदामाला मूळच्या नंदनवनातून बाहेर हाकलून दिल्यावर त्याच्या प्रवेशद्वारापाशी, अशुद्ध माणसांचा शिरकाव होऊ नये यासाठी करुबांना ठेवण्यात आले होते. (उत्पत्ती ३:२४) याचप्रमाणे यरुशलेमेच्या पवित्र नगरात प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ दूतांना नगराची आध्यात्मिक सुरक्षितता ठेवावी यासाठी नेमण्यात आले आहे. खरेच, या सर्व शेवटल्या दिवसात ज्यांचे मिळून नवे यरुशलेम बनलेले आहे अशा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळ्यांना बाबेलोनी प्रदूषितपणापासून देवदूतांनी संरक्षण दिले आहे.—मत्तय १३:४१.

नगराचे मोजमाप

६. (अ) योहान नगराच्या मोजमापाचे वर्णन कसे देतो व ते मोजमाप काय सुचविते? (ब) “मनुष्याचा हात म्हणजे देवदूताचा हात” या मोजमापाद्वारे कोणती स्पष्टता मिळते? (तळटीप पहा.)

योहान आपला अहवाल पुढे कळवतोः “जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्याजवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा बोरू होता. नगरी चौरस होती; तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते सहाशे कोस [“बारा हजार फर्लांग,” NW] भरले. तिची लांबी, रुंदी व उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले, ते माणसाच्या हाताने एकशे चव्वेचाळीस हात भरले. माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात.” (प्रकटीकरण २१:१५-१७) मंदिराच्या पवित्रस्थानाचे मोजमाप झाले तेव्हा यहोवाच्या त्यासंबंधाने असणाऱ्‍या उद्देशांची पूर्णता होण्याची खात्री मिळाली. (प्रकटीकरण ११:१) आता देवदूताने नव्या यरुशलेमेचे घेतलेले मोजमाप, यहोवाचे या वैभवी नगराबद्दल असणारे उद्देश केवढे अटळ आहेत ते दाखवले गेले. *

७. नगराच्या मोजमापाबद्दल कोणती गोष्ट लक्षणीय आहे?

हे नगर केवढे अप्रतिम आहे! परिमितीत १२,००० फर्लांग (सुमारे १,३८० मैल) घन आणि १४४ हात किंवा २१० फूट उंचीचा तट—हे केवढे परिपूर्ण प्रमाण. कोणत्याही खऱ्‍या नगराचे असे मोजमाप होणार नाही. अशा क्षेत्रात सध्याच्या इस्राएलाचा प्रदेश १४ वेळा बसेल आणि तो अंतराळात ३५० मैल इतका उंच जाईल! प्रकटीकरण चिन्हांनी देण्यात आले होते. तेव्हा यात स्वर्गीय यरुशलेमेचे दाखविण्यात आलेले प्रमाण काय सूचित करीत असावे?

८. (अ) नगराचा १४४ हात उंचीचा तट, (ब) नगराचे १२,००० फर्लांग मोजमाप आणि (क) नगर आकारात पूर्ण हाताचे होते या गोष्टी कशाला सूचित करतात?

तटाची १४४ हात उंची आपल्याला हे शहर देवाच्या दत्तक पुत्रांच्या १,४४,००० जणांचे मिळून बनलेले आहे याचे स्मरण देते. या नगराची लांबी, रुंदी व उंची समान असून ती १२,००० फर्लांग भरली यात जो १२ हा आकडा आलेला आहे तो बायबलच्या भविष्यवादातील संघटनात्मक रचनेला अनुलक्षून लाक्षणिकरित्या वापरलेला आहे. या कारणास्तव नव्या यरुशलेमेची संघटनात्मक व्यवस्था इतक्या सुंदरपणे देवाचा चिरकालिक उद्देश पूर्ण करता येण्यासाठी करण्यात आली आहे. नवे यरुशलेम व त्यासोबत असणारा राजा येशू ख्रिस्त ही यहोवाची राज्य संघटना आहे. शिवाय नगराचा आकार देखील पूर्ण हाताचा होता. शलमोनाच्या मंदिरात यहोवाच्या सान्‍निध्याचे लाक्षणिकपणे प्रतिनिधीत्व करणारे एक परमपवित्र स्थान होते व ते देखील पूर्ण हाताचे होते. (१ राजे ६:१९, २०) यास्तव, यहोवाच्या वैभवाने प्रज्वलित झालेले नवे यरुशलेम हे परिपूर्ण व मोठे प्रमाणबद्ध होते हे केवढे उचित आहे बरे! त्याचे सर्व मोजमाप प्रमाणशीर आहे. हे नगर कोणतीही अपूर्णता किंवा दोष नसलेले आहे.—प्रकटीकरण २१:२२.

मोलवान बांधणी साहित्य

९. योहान नगराच्या बांधणी साहित्याचे कसे वर्णन देतो?

योहान आणखी पुढे त्याचे वर्णन देतोः “तिचा तट यास्फे रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. नगरीच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान्‌ रत्नांनी शृंगारलेले होते: पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाच, पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्‌मराग अशा रत्नांचे ते होते. बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; एकेक वेस एकेका मोत्याची होती; नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता.”—प्रकटीकरण २१:१८-२१.

१०. नगराची रचना ही यास्फे, सोने व “वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी” झाली होती हे काय दाखवते?

१० नगराची बांधणी खरोखरच वैभवी आहे. ती पार्थिव, माती व दगड यासारख्या साहित्यांनी बांधण्याऐवजी यास्फे, शुद्ध सोने आणि “वेगवेगळ्या मूल्यवान्‌ रत्नांनी” बांधण्यात आल्याचे आपण वाचतो. वैभवी इमारतीचे हे किती सुंदर चित्र देतात! यापेक्षा आणखी दैदिप्यमान काहीच असू शकणार नाही. प्राचीन काळी कराराच्या कोशावर शुद्ध सोन्याची मढणी होती आणि बायबलमध्ये हा धातू चांगल्या व मोलवान गोष्टींची प्रतिमा देतो. (निर्गम २५:११; नीतीसूत्रे २५:११; यशया ६०:६, १७) तथापि, सबंध नवे यरुशलेम व त्यामधील प्रशस्त रस्ता देखील ‘पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोन्याने’ बांधला होता, जे सौंदर्य व खरे स्वभावदर्शन घडवते व विचाराला चक्रावून सोडते.

११. ज्यांचे मिळून नवे यरुशलेम तयार होते ते आध्यात्मिक शुद्धतेच्या अत्युच्च पातळीने भरलेले असतील याची खात्री कशी मिळते?

११ इतके शुद्ध सोने कोणाही धातू गाळणाऱ्‍याला निर्माण करता येणार नाही. पण यहोवा तर थोर शुद्धिकर्ता आहे. तो “रुपे गाळून शुद्ध करणाऱ्‍यासारखा” बसतो व आध्यात्मिक इस्राएलाच्या विश्‍वासू लोकांपैकीच्या प्रत्येक सदस्याला “सोन्यारुप्याप्रमाणे” शुद्ध करून त्यांच्यातील सर्व अशुद्धता काढून टाकतो. ज्या सदस्यांचे पूर्ण रुपाने शुद्धीकरण घडले आहे अशांचेच मिळून शेवटी नवे यरूशलेम बनेल. अशाप्रकारे यहोवा या नगराची बांधणी आध्यात्मिक शुद्धतेची अत्युच्च पातळी असणाऱ्‍या जिवंत अशा बांधणी साहित्याद्वारे करतो.—मलाखी ३:३, ४.

१२. (अ) नगराचे पाये १२ मोलवान रत्नांनी घातलेले होते; (ब) नगराच्या वेशी मोत्याच्या होत्या याद्वारे काय सूचित होते?

१२ नगराचे पाये देखील सुंदर आहेत, ते १२ मोलवान रत्नांनी बांधण्यात आलेले आहेत. यामुळे आम्हाला समारंभाच्या दिवशी एफोद धारण करणाऱ्‍या प्राचीन यहूदी प्रमुख याजकाचे स्मरण होते. या एफोदात येथे वर्णिण्यात आल्याप्रमाणे १२ वेगवेगळे मोलवान पाषाण कोंदलेले असत. (निर्गम २८:१५-२१) हा निश्‍चितच योगायोग नाही! उलटपक्षी, हे नव्या यरुशलेमेच्या याजकीय कार्याला सूचित करते, ज्याचा प्रमुख याजक येशू हा “दीप” आहे. (प्रकटीकरण २०:६; २१:२३; इब्रीयांस ८:१) तसेच याच नव्या यरुशलेमेद्वारे येशूच्या प्रमुख याजकाच्या कार्याचे लाभ मानवजातीपर्यंत आणले जातात. (प्रकटीकरण २२:१, २) नगराच्या १२ वेशी प्रत्येकी सुंदर मोत्याने मढलेल्या होत्या हे येशूने, देवाच्या राज्याला एका मोलवान मोत्याची उपमा दिली होती त्याची आठवण करुन देते. जे या वेशीतून आत जातात त्या सर्वांनी आध्यात्मिक मूल्याबाबत आपली खरी रसिकता दाखवली असणार.—मत्तय १३:४५, ४६; पडताळा ईयोब २८:१२, १७, १८.

प्रकाशाचे नगर

१३. नव्या यरुशलेमेबाबत योहान पुढे काय म्हणतो आणि त्या नगराला वास्तविक मंदिराची गरज का नाही?

१३ शलमोनाच्या दिवसात, नगराच्या उत्तरेकडील मोरियाच्या उत्तुंग डोंगरावर मंदिर बांधलेले होते व ते यरुशलेमेवर अधिपत्य करीत होते. पण नव्या यरुशलेमेचे काय? योहान म्हणतो: “त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभु [यहोवा, NW] देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्‍यकता नाही; कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप.” (प्रकटीकरण २१:२२, २३) खरे पाहिल्यास, येथे एक वास्तविक मंदिर बांधण्याची काहीच गरज नाही. पुरातन यहूदी मंदिर फक्‍त एक नमुना होते आणि त्या नमुन्याची खरी वास्तविकता, मोठे आध्यात्मिक मंदिर सा. यु. २९ मध्ये यहोवाने येशूला महायाजक म्हणून नियुक्‍त केले तेव्हापासून अस्तित्वात आले आहे. (मत्तय ३:१६, १७; इब्रीयांस ९:११, १२, २३, २४) मंदिर म्हणजे लोकांच्या वतीने यहोवाला अर्पणे वाहणारा याजकीय वर्ग असेही गृहीत धरले जाते. पण नव्या यरुशलेमेचे जे कोणी भाग आहेत ते सर्वच याजक आहेत. (प्रकटीकरण २०:६) आणि मोठे अर्पण, येशूचे परिपूर्ण मानवी जीवन, एकदाच अर्पिले गेले. (इब्रीयांस ९:२७, २८) आणखी, त्या नगरात राहणाऱ्‍यांना यहोवाकडे व्यक्‍तिगतपणे जाता येते.

१४. (अ) नव्या यरुशलेमेला त्याच्यावर चमकण्यासाठी सूर्य व चंद्राची का गरज नाही? (ब) यहोवाच्या सार्वभौम संघटनेविषयी यशयाच्या भविष्यवाणीने काय भाकीत केले व यात नव्या यरुशलेमेचा कसा समावेश आहे?

१४ सीनाय पर्वतावर यहोवाचे तेज मोशे जवळून गेले तेव्हा, मोशेचे मुख इतके तेजस्वी झाले की त्याला सहइस्राएलांच्या समोर तोंडावर आच्छादन घालावे लागले. (निर्गम ३४:४-७, २९, ३०, ३३) मग, जे नगर यहोवाच्या तेजाने कायम प्रज्वलित राहते त्याचा प्रकाश किती असेल त्याची कल्पना तुम्हाला करता येईल का? अशा ह्‍या नगराला रात्रच मुळी नसेल. त्याला अक्षरशः सूर्याची किंवा चंद्राची गरज नसणार. ते सर्व काळ उजेड परावर्तित करीत राहील. (पडताळा १ तीमथ्य ६:१६.) नवे यरुशलेम याचप्रकारच्या चमकणाऱ्‍या तेजात न्हाऊन निघाले आहे. खरे म्हणजे, ही वधू व तिचा वरराजा यहोवाच्या सार्वभौम संघटनेचे—त्याची, ‘स्त्रीची,’ “वरील यरुशलेम”—याची राजधानी बनतात, ज्याबद्दल यशयाने असे भाकीत केलेः “यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, उजेडासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही, कारण परमेश्‍वर [यहोवा NW] तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझा देव [यहोवा NW] तुझे तेज होईल. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही; तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्‍वर [यहोवा NW] तुझा सार्वकालिक दीप होईल; तुझे शोकाचे दिवस संपले आहेत.”—यशया ६०:१, १९, २०; गलतीकर ४:२६.

राष्ट्रांकरता प्रकाश

१५. नव्या यरुशलेमेबाबत प्रकटीकरणातील कोणते शब्द यशयाच्या भविष्यवाणीसोबत जुळतात?

१५ ह्‍याच भविष्यवाणीने पुढे असे भाकीत केले: “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.” (यशया ६०:३) प्रकटीकरण दाखवते की हे शब्द नव्या यरुशलेमेसाठी सुद्धा आहेत: “राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्रांचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील.”—प्रकटीकरण २१:२४-२६.

१६. नव्या यरुशलेमेच्या प्रकाशाने चालतील ती “राष्ट्रे” कोण आहेत?

१६ नव्या यरुशलेमेच्या प्रकाशाने चालणारी ही कोणती “राष्ट्रे” आहेत? ते लोक एकेकाळी ह्‍या दुष्ट जगाच्या राष्ट्रांचे एक भाग होते व ह्‍या भव्य स्वर्गीय नगराद्वारे पाडलेल्या प्रकाशाला त्यांनी प्रतिसाद दिला. यांच्यामध्ये सर्वात पुढे मोठा लोकसमुदाय आहे, जो अगोदरच “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा” यातून आला असून, तो योहान वर्गासोबत देवाची उपासना अहोरात्र करत आहे. (प्रकटीकरण ७:९, १५) नवे यरुशलेम स्वर्गातून खाली आल्यावर आणि येशू, मरण व अधोलोकाच्या किल्ल्यांचा वापर मेलेल्यांना पुनरुत्थित करण्यासाठी करतो, तेव्हा मोठ्या लोकसमुदायासोबत आणखी लाखो असतील, जे पूर्वी ‘राष्ट्रांतील’ होते, ते यहोवावर व नव्या यरुशलेमेचा कोकऱ्‍यासमान पती, त्याचा पुत्र यांच्यावर प्रेम करू लागतील.—प्रकटीकरण १:१८.

१७. जे आपले “वैभव” नव्या यरुशलेमेत आणतात ते “पृथ्वीवरील राजे” कोण आहेत?

१७ यास्तव “पृथ्वीवरील राजे” कोण आहेत जे “आपले वैभव त्यात आणतात”? ते पृथ्वीवरील खरोखरच्या राजांच्या गटातील नव्हेत, कारण हर्मगिदोनाच्या लढाईत यांनी देवाच्या राज्याच्या विरुद्ध युद्ध केल्यामुळे ते नाशाकडे जातात. (प्रकटीकरण १६:१४, १६; १९:१७, १८) मग, हे राजे कदाचित राष्ट्रातील काही उच्च-दर्जाचे जन असतील का, जे मोठ्या लोकसमुदायाचे भाग बनले वा ते पुनरुत्थित राजे आहेत जे नव्या जगात देवाच्या राज्याच्या अधीन होतील? (मत्तय १२:४२) क्वचितच, कारण ह्‍या राजांची किर्ती बहुतांशी ऐहिक होती व आता ती कोमेजून गेली आहे. यास्तव, जे आपले वैभव नव्या यरुशलेमेत आणतात ते “पृथ्वीवरील राजे” १,४४,०००, असू शकतील ज्यांना “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्‍यामधून” कोकरा येशू ख्रिस्तासोबत राजे म्हणून राज्य करण्यासाठी “विकत घेतले आहेत.” (प्रकटीकरण ५:९, १०; २२:५) ते त्यांच्या समवेत देवाने दिलेले वैभव त्या नगरात त्याच्या तेजात भर पडावी म्हणून आणतात.

१८. (अ) नव्या यरुशलेमेमधून कोणाला बाहेर काढले जाईल? (ब) आणि फक्‍त कोणाला त्या नगरात प्रवेश दिला जाईल?

१८ योहान पुढे सांगतो: “तिच्यात कोणत्याहि निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्‍यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल.” (प्रकटीकरण २१:२७) सैतानी व्यवस्थेने कलंकित असे कोणीही नव्या यरुशलेमेचा भाग होऊ शकणार नाही. त्याच्या वेशी नेहमीच खुल्या असल्या तरी, कोणाही “अमंगळपणा व असत्य आचरणारा” याला प्रवेश दिला जाणार नाही. त्या नगरात कोणीही धर्मत्यागी नसेल वा मोठ्या बाबेलचा कोणी सदस्यही नसेल. याशिवाय जर कोणी पृथ्वीवर असलेल्या भावी सदस्यांना भ्रष्ट करुन त्या नगरास अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जातील. (मत्तय १३:४१-४३) फक्‍त ज्या कोणाची नावे ‘कोकऱ्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ आहेत ते १,४४,०००, शेवटी नव्या यरुशलेमेत प्रवेश करतील. *प्रकटीकरण १३:८; दानीएल १२:३.

जीवनाच्या पाण्याची नदी

१९. (अ) मानवजातीला आशीर्वाद देण्यामध्ये नवे यरुशलेम या माध्यमाचे योहान कसे वर्णन देतो? (ब) ‘जीवनाच्या पाण्याची नदी’ कधी वाहू लागते व हे आम्हाला कसे कळते?

१९ नव्या तेजस्वी यरुशलेमेच्या माध्यमाने पृथ्वीवरील मानवजातीला भव्य आशीर्वाद मिळतील. हेच काय ते योहानाला आता कळते: “नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्‍याच्या राजासनातून निघालेली, नगरीच्या मार्गावरुन वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली.” (प्रकटीकरण २२:१) ही “नदी” कधी वाहते? ती “देवाच्या व कोकऱ्‍याच्या राजासनातून” वाहते म्हणजेच १९१४ मध्ये प्रभूच्या दिवसानंतर तिची सुरवात होऊ शकते. तीच ती वेळ होती जेव्हा सातव्या कर्ण्याच्या निनादाची घटना घडली आणि अशी जोरदार घोषणा झाली: “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत.” (प्रकटीकरण ११:१५; १२:१०) त्या तारखेआधी, “कोकरा” मशीही राजा म्हणून अधिष्टित झाला नव्हता. याशिवाय, ही नदी नव्या यरुशलेमेच्या महामार्गावरुन वाहत असल्याने, ह्‍या दृष्टांताच्या पूर्णतेचा काळ सैतानी जगाच्या नाशानंतर असला पाहिजे व तेव्हाच नवे यरुशलेम ‘देवापासून स्वर्गातून उतरते’.—प्रकटीकरण २१:२.

२०. जीवनाचे पाणी आताही उपलब्ध आहे हे कशावरुन सूचित होते?

२० मानवजातीला जीवनरुपी पाणी बहाल करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. पृथ्वीवर असताना, येशू सार्वकालिक जीवन देणाऱ्‍या पाण्याविषयी बोलला होता. (योहान ४:१०-१४; ७:३७, ३८) पुढे, योहान असे एक प्रेमळ आमंत्रण ऐकण्याच्या बेतात आहे: “आत्मा व वधू ही म्हणतात: ‘ये!’ ऐकणाराहि म्हणो ‘ये!’ आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (प्रकटीकरण २२:१७) हे आमंत्रण आजही दिले जात आहे व यामुळे हे सूचित होते की आजही जीवनाचे पाणी उपलब्ध आहे. पण नव्या जगात, हे पाणी देवाच्या राजासनातून व नव्या यरुशलेमेतून खरोखरीच्या नदीप्रमाणे वाहील.

२१. ‘जीवनाच्या पाण्याची नदी’ कशाला चित्रित करते व ह्‍या नदीविषयी यहेज्केलचा दृष्टांत त्याबद्दल आम्हाला कशी मदत पुरवितो?

२१ ही ‘जीवनाच्या पाण्याची नदी’ काय आहे? खरोखरचे पाणी जीवनासाठी महत्त्वाचा घटक आहे. एक व्यक्‍ती आहाराविना पुष्कळ आठवडे जगू शकते; परंतु पाण्याशिवाय ती एका आठवड्यात मरेल. पाणी हे स्वच्छ करणारे साधन व आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अशाप्रकारे, जीवनाचे पाणी जीवनासाठी व मानवजातीच्या आरोग्यासाठी आवश्‍यक असलेल्या कशाचे तरी प्रतिनिधीत्व करते. ‘जीवनाच्या पाण्याच्या नदीचे’ दृश्‍य यहेज्केल संदेष्ट्यालाही पाहण्याची संधी दिली गेली आणि त्याच्या दृष्टांतात, ती नदी यरुशलेमेच्या मंदिरातून बाहेर मृत समुद्रापर्यंत वाहत होती. मग चमत्कारच चमत्कार! त्या निर्जीव, रासायनिक साठलेल्या पाण्याचे रुपांतर ताज्या पाण्यात झाले व त्यात विपुल मासे झाले! (यहेज्केल ४७:१-१२) होय, ती काल्पनिक नदी पूर्वी जे मृत होते त्याला पुन्हा जिवंत करते आणि याला पुष्टी देते की जीवनाच्या पाण्याची नदी, “मृत” मानवजातीला येशू ख्रिस्ताकरवी परिपूर्ण मानवी जीवन बहाल करण्याच्या देवाच्या तरतूदीला चित्रित करते. ही नदी “स्फटीकासारखी नितळ” आहे व हे दाखवते की देवाच्या तरतूदी शुध्द व पवित्र आहेत. ती ख्रिस्ती धर्मजगताच्या रक्‍तलांच्छित व प्राणघातक ‘पाण्यासारखी’ नाही.—प्रकटीकरण ८:१०, ११.

२२. (अ) ह्‍या नदीचा उगम कोठून आहे व हे उचित का आहे? (ब) जीवनाच्या पाण्यात काय सामील आहे व ह्‍या लाक्षणिक नदीत काय समाविष्ट आहे?

२२ त्या नदीचा उगम “देवाच्या व कोकऱ्‍याच्या राजासनातून” आहे हे अगदी उचित आहे, कारण यहोवाच्या जीवन देणाऱ्‍या तरतूदींचा आधार खंडणीरुपी बलिदान आहे व ते, यहोवाने “जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” म्हणून देण्यात आले. (योहान ३:१६) जीवनाच्या पाण्यात देवाच्या वचनांचाही समावेश आहे, ज्याचा उल्लेख बायबलमध्ये पाणी असा केला आहे. (इफिसकर ५:२६) तथापि, जीवनी पाण्याच्या नदीत केवळ सत्यच समाविष्ट नाही तर यहोवाने दिलेल्या इतर सर्व तरतूदी आहेत, ज्या येशूच्या बलिदानावर आधारित आहेत, ज्यामुळे आज्ञाधारक मानवजातीला पाप आणि मृत्यूतून सुटका व सार्वकालिक जीवन प्रदान करण्याचे समाविष्ट आहे.—योहान १:२९; १ योहान २:१, २.

२३. (अ) जीवनाच्या पाण्याची नदी नव्या यरुशलेमेच्या मधून महामार्गावर वाहत आहे हे अगदी योग्य का आहे? (ब) जीवनाचे पाणी भरपूर वाहू लागेल तेव्हा अब्राहामाला दिलेले कोणते अभिवचन पूर्ण होईल?

२३ हजार वर्षीय राजवटीत, खंडणीचे लाभ येशूच्या याजकपदाद्वारे व त्याच्या १,४४,००० सहयाजकांद्वारे पूर्णपणे लागू करण्यात येतील. तेव्हा जीवनाच्या पाण्याची नदी नव्या यरुशलेमेच्या मधून महामार्गावर उचितपणे वाहू लागेल. ते नवे यरुशलेम आध्यात्मिक इस्राएल यांनी बनलेले आहे, जे, येशूसोबत मिळून अब्राहामाचे खरे संतान तयार होते. (गलतीकर ३:१६, २९) यास्तव, जीवनाचे पाणी लाक्षणिक नगराच्या मध्यभागातून भरपूर वाहील, तेव्हा “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे” अब्राहामाच्या संतानाद्वारे स्वतःला आशीर्वाद मिळवून घेण्याची पूर्ण संधी प्राप्त करतील. यहोवाने अब्राहामाला दिलेल्या अभिवचनाची संपूर्णतः पूर्तता होईल.—उत्पत्ती २२:१७, १८.

जीवनाची झाडी

२४. जीवनी पाण्याच्या नदीच्या दोन्ही बाजूला योहान काय पाहतो व ते कशाला चित्रित करतात?

२४ यहेज्केलच्या दृष्टांतात, ती नदी दुथडी भरून वाहते आणि संदेष्ट्याने तिच्या दोन्ही तीरांवर फळे देणारी हरतऱ्‍हेची झाडे वाढलेली पाहिली. (यहेज्केल ४७:१२) पण योहान काय पाहतो? हेच की: “नदीच्या दोन्ही बाजूस बारा जातींची फळे देणारी जीवनाची झाडी होती, ती दर महिन्यास आपली फळे देतात आणि त्या झाडांची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.” (प्रकटीकरण २२:२, NW) ही “जीवनाची झाडी” देखील आज्ञाधारक मानवजातीला अनंतकालिक जीवन देण्याच्या यहोवाच्या तरतूदीला चित्रित करतात.

२५. विश्‍वव्यापी नंदनवनात प्रतिसादात्मक मानवजातीसाठी यहोवा कोणत्या उदार तरतूदी करतो?

२५ प्रतिसाद देणाऱ्‍या मानवजातीसाठी यहोवा किती उदात्त तरतूदी करतो! ते त्या तजेला देणाऱ्‍या पाण्याची सहभागिता करु शकतात एवढेच नव्हे तर त्या झाडांवर निरंतर विविधतेत बहरणारी कायम स्वरुपी फळे देखील तोडू शकतात. आपले मूळ माता पिता याचप्रकारच्या एदेनाच्या नंदनवनातील [“इष्ट,” NW] तरतूदीने तृप्त बनले असते तर ते किती बरे झाले असते! (उत्पत्ती २:९) पण आता विश्‍वव्यापी नंदनवन आहे आणि यहोवा त्या लाक्षणिक झाडांच्या पानांचा “राष्ट्रांच्या आरोग्यासाठी” उपयोग करत आहे. * आज दिले जाणारे कुठलेही औषध वनौषध किंवा उपचार यापेक्षा उत्कृष्ट दर्जाची ती लाक्षणिक पाने आहेत, की ज्यांच्या वेदनाशामक अवलंबनामुळे विश्‍वास बाळगणाऱ्‍या मानवजातीला आध्यात्मिक व शारीरिक पूर्णत्वास नेले जाईल.

२६. जीवनाची झाडी आणखी कशाला चित्रित करतात व का?

२६ ती झाडे, ज्यांना नदीकडून चांगले पाणी मिळते, त्या १,४४,००० जे कोकऱ्‍याच्या नवरीचे सदस्य आहेत त्यांना अधिकपणे चित्रित करतात. पृथ्वीवर असताना हे सुद्धा येशू ख्रिस्तामार्फत जीवनासाठी देवाच्या तरतूदीतून पीत आहेत व त्यांना “धार्मिकतेचे वृक्ष” असे म्हटले आहे. (यशया ६१:१-३; प्रकटीकरण २१:६) त्यांनी यहोवाच्या स्तुतीसाठी आधीच पुष्कळ आध्यात्मिक फळे उत्पन्‍न केली आहेत. (मत्तय २१:४३) हजार वर्षाच्या राजवटीत, राष्ट्रांना पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळवून देणाऱ्‍या [“राष्ट्रांच्या मुक्‍तीसाठी,” NW] खंडणीरुपी बलिदानाच्या तरतूदीला वाटण्यात यांचा एक भाग असेल.—पडताळा १ योहान १:७.

यापुढे रात्र नाही

२७. नव्या यरुशलेमेत प्रवेश मिळण्याचा सुहक्क ज्यांना मिळाला त्यांना पुढे कोणते आशीर्वाद मिळतील असे योहान सांगतो आणि “काहीहि शापित असणार नाही” असे का म्हटले आहे?

२७ नव्या यरुशलेमेत प्रवेश—खरेच यासारखा सुहक्कच नाही! जरा विचार करा—एकेकाळी ते दीन, अपूर्ण असणारे मानव ह्‍या भव्य व्यवस्थेचा भाग होण्यासाठी येशूप्रमाणे त्याच्या मागोमाग स्वर्गात जातील! (योहान १४:२) त्यांना अनुभवण्यास मिळणाऱ्‍या आशीर्वादांची योहान एक झलक देतो, तो म्हणतो: “पुढे काहीहि शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्‍याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करितील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल.” (प्रकटीकरण २२:३, ४) इस्राएली याजकत्व भ्रष्ट झाल्यावर, यहोवाचा शाप त्यांना सहन करावा लागला. (मलाखी २:२) यरुशलेमेचे विश्‍वासहीन “घर” त्यागण्यात आले आहे असे येशूने घोषित केले. (मत्तय २३:३७-३९) पण नव्या यरुशलेमेत, “काहीहि शापित असणार नाही.” (पडताळा जखऱ्‍या १४:११.) त्याच्या सर्व रहिवाश्‍यांची, पृथ्वीवर असताना अग्नीने सत्वपरीक्षा झाली आणि ते विजयी झाल्यामुळे त्यांनी ‘अविनाशीपण आणि अमरत्व परिधान’ केले असेल. यहोवास येशूबद्दल माहीत होते तसे, यांच्याही बाबतीत, ते कधीच मागे पडणार नाहीत हे ठाऊक आहे. (१ करिंथकर १५:५३, ५७) याशिवाय, “देवाचे व कोकऱ्‍याचे राजासन,” तेथे असल्यामुळे ते नगरीची स्थिती अनंत काळासाठी सुरक्षित करील.

२८. नव्या यरूशलेमेच्या सदस्यांच्या कपाळावर देवाचे नाव का लिहिले आहे आणि त्यांच्या पुढे कोणती रोमांचक आशा आहे?

२८ स्वतः योहानाप्रमाणेच, त्या तेजोमय नगरीचे सर्व भावी सदस्य देवाचे “दास” आहेत. या कारणामुळे त्यांच्या कपाळावर देवाचे नाव ठळकपणे लिहिलेले आहे, ज्यामुळे तो त्यांचा मालक आहे अशी ओळख मिळते. (प्रकटीकरण १:१; ३:१२) नव्या यरुशलेमेचा भाग म्हणून त्याची पवित्र सेवा करणे याला ते मूल्यमापन करता येणार नाही इतका मोठा सुहक्क समजतील. येशू पृथ्वीवर असताना अशा भावी राजांना त्याने रोमांचक अभिवचन दिले, तो म्हणाला: “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.” (मत्तय ५:८) यहोवाला प्रत्यक्ष पाहण्यात व त्याची उपासना करण्यात ह्‍या दासांना किती आनंद वाटेल!

२९. स्वर्गीय नव्या यरुशलेमेबद्दल योहान असे का म्हणतो की “यापुढे रात्र असणार नाही”?

२९ योहान पुढे म्हणतो: “पुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही कारण प्रभू [यहोवा, NW] देव त्यांच्यावर प्रकाश पाडील. (प्रकटीकरण २२:५अ) पुरातन यरुशलेम, पृथ्वीवरील इतर नगरांप्रमाणेच, दिवसाच्या प्रकाशासाठी सूर्यावर आणि रात्री चंद्रावर तसेच कृत्रिम प्रकाशावर अवलंबून होते. परंतु स्वर्गीय यरुशलेमेमध्ये अशा प्रकाशाची काहीच गरज नाही. ते नगर स्वतः यहोवामुळेच प्रज्वलित असेल. “रात्र” ही संज्ञा विपत्ती किंवा यहोवापासून वेगळे होणे या लाक्षणिक अर्थाने देखील वापरता येऊ शकते. (मीखा ३:६; योहान ९:४; रोमकर १३:११, १२) अशा प्रकारची रात्र सर्वसमर्थ देवाच्या गौरवी, तेजस्वी अस्तित्वात कदापि नसेल.

३०. वैभवी दृष्टांताची समाप्ती योहान कशी करतो आणि प्रकटीकरण आम्हाला कशाची खात्री पुरविते?

३० या भव्य दृष्टांताची समाप्ती, योहान देवाच्या ह्‍या दासांविषयी असे म्हणत करतो: “आणि ते युगानुयुग राज्य करतील.” (प्रकटीकरण २२:५ब) हे खरे की, हजार वर्षांच्या शेवटी, खंडणीचे फायदे पूर्णपणे लागू झालेले असतील आणि मग येशू त्याच्या पित्याला एक परिपूर्ण मानवी समाज बहाल करेल. (१ करिंथकर १५:२५-२८) पण यानंतर येशू व १,४४,००० यांच्यासाठी यहोवाच्या मनात काय आहे हे आम्हाला माहीत नाही. परंतु प्रकटीकरण आम्हास खात्री देते की त्यांची यहोवाकरता पवित्र सुहक्काची सेवा अनंत काळासाठी चालू राहील.

प्रकटीकरणाचा आनंदी कळस

३१. (अ) नव्या यरूशलेमेचा दृष्टांत कोणत्या कळसास चित्रित करतो? (ब) नवे यरुशलेम मानवजातीच्या इतर विश्‍वासू जणांसाठी काय साध्य करते?

३१ नवे यरुशलेम, कोकऱ्‍याची नवरी हिच्या दृष्टांताची पूर्णता अगदी योग्यतेने प्रकटीकरणाने दाखवल्यानुसार आनंदी कळस आहे. हे पुस्तक सुरवातीला ज्यांना उद्देशून लिहिले होते ते पहिल्या शतकातील योहानाचे सर्व ख्रिस्ती सोबती त्या नगरात येशू ख्रिस्तासोबत अमर आत्मिक सहराजे म्हणून प्रवेश मिळण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे अजूनही पृथ्वीवर जिवंत असलेले शेष हीच आशा बाळगून आहेत. यास्तव, संघटित वधू कोकऱ्‍यासोबत जसजशी एकवटत आहे तसतसे प्रकटीकरण त्याच्या कळसास पोंहचत आहे. यानंतर, नव्या यरुशलेमेद्वारे मानवजातीला येशूच्या खंडणीरुपी बलिदानाचे फायदे लागू होतील आणि यामुळे सर्व विश्‍वासू जन सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवतील. अशाप्रकारे ती नवरी, नवे यरुशलेम तिचा वरराजा याला चिरकालासाठी एक धार्मिक नवी पृथ्वी बांधण्यासाठी निष्ठावान सोबतीण म्हणून सहकार्य देईल.—हे सर्व आमच्या सार्वभौम प्रभू यहोवाला गौरव मिळण्यासाठी केले जाईल.—मत्तय २०:२८; योहान १०:१०, १६; रोमकर १६:२७.

३२, ३३. प्रकटीकरणातून आम्ही काय शिकलो व त्यावर आमचा हृदयापासून कसा प्रतिसाद असला पाहिजे?

३२ प्रकटीकरण पुस्तकातील अभ्यासाच्या समाप्तीला येत असता आम्हाला खराच किती आनंद होतो! आम्ही सैतान व त्याच्या संततीच्या शेवटच्या प्रयत्नांना संपूर्णपणे निष्फळ केलेले आणि यहोवाचे धार्मिक न्यायदंड पूर्णपणे बजावलेले पाहिले आहे. मोठ्या बाबेलसोबत सैतानाच्या जगाचे इतर निरर्थक भ्रष्ट घटक कायमचे अस्तित्वातून जावयास हवे. स्वतः सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकले जाईल व नंतर नष्ट केले जाईल. पुनरुत्थान व न्यायदंड बजावण्याला सुरुवात होईल तसे नवे यरुशलेम ख्रिस्तासोबत स्वर्गातून राज्य करण्यास आरंभ करील आणि परिपूर्ण करण्यात आलेली मानवजात सरतेशेवटी नंदनवनातील पृथ्वीवर अनंत काळ जीवनाचा आनंद लुटू लागेल. प्रकटीकरण या गोष्टींचे किती स्पष्ट वर्णन देते! हे आमच्या निर्धारास, पृथ्वीवर आज ‘प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यास सार्वकालिक सुवार्ता सांगण्यासाठी’ किती दृढ करते! (प्रकटीकरण १४:६, ७) ह्‍या महान कार्यात तुम्ही स्वतःला पूर्णपणे खर्ची घालत आहात का?

३३ आमचे हृदय कृतज्ञतेने पूर्णपणे भरलेले असता, आपण प्रकटीकरणातील शेवटच्या शब्दांकडे लक्ष देऊ या.

[तळटीपा]

^ “माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात,” या प्रमाणाद्वारे असे दिसते की हे नगर १,४४,००० लोकांचे, जे आधी मानव होते पण आता देवदूतासारखे आत्मिक प्राणी बनले आहेत त्याच्याशी संबंधित असावे.

^ याकडे लक्ष द्या की ‘कोकऱ्‍याच्या जीवनी पुस्तकात’ आध्यात्मिक इस्राएलाच्या फक्‍त १,४४,००० यांचीच नावे आहेत. अशाप्रकारे हे पुस्तक, पृथ्वीवर जीवन मिळवणाऱ्‍यांची नावे असणाऱ्‍या ‘जीवनाचे पुस्तक’ यापासून अगदी वेगळे आहे.—प्रकटीकरण २०:१२.

^ हे लक्षात घ्या की “राष्ट्रे” ही संज्ञा नेहमी जे आध्यात्मिक इस्राएलाचे भाग नाहीत त्यांनाच चित्रित करते. (प्रकटीकरण ७:९; १५:४; २०:३; २१:२४, २६) या संज्ञेचा वापर केल्याने हे सूचित होत नाही की हजार वर्षांच्या राजवटीत मानवजात वेगवेगळ्या राष्ट्रीय गटाने संघटित असेल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]