व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे पवित्र गूज —त्याचा वैभवी कळस!

देवाचे पवित्र गूज —त्याचा वैभवी कळस!

अध्याय २६

देवाचे पवित्र गूज —त्याचा वैभवी कळस!

१. (अ) पवित्र गूज पूर्ण करण्यात आले याबद्दल योहान आम्हास कसे कळवितो? (ब) देवदूतांचा समूह मोठ्याने का बोलतो?

 प्रकटीकरणाच्या १० व्या अध्यायातील १, ६, ७ वचनात एका बलवान देवदूताने जी शपथ वाहिली होती ती तुमच्या स्मरणात आहे का? त्याने म्हटले: “आणखी अवकाश लागणार नाही; तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्‍यास सुवार्ता सांगितली, तदनुसार त्याचे गूज पूर्ण होईल.” तो शेवटला कर्णा वाजविण्याची यहोवाची नियुक्‍त केलेली वेळ आली आहे! पण पवित्र गूज पूर्ण होते ते कसे काय? हे, योहानाला आम्हाला सांगण्यात खराच आनंद वाटत आहे. तो लिहितो: “सातव्या देवदूताने कर्णा वाजविला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या: ‘जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुग राज्य करील.’” (प्रकटीकरण ११:१५) त्या देवदूतांच्या समूहाला मोठ्याने बोलण्याचे, गर्जना करण्याचे कारण होते! कारण ही सार्वत्रिक महत्त्वाची असणारी घोषणा होती. ती सर्व जिवंत निर्मितीसाठी देखील महत्त्वाची आहे.

२. पवित्र गूज हे केव्हा व कोणत्या घटनेने आपल्या विजयी कळसास आणले जाते?

पवित्र गूज त्याच्या आनंदी कळसाला पोहंचते! प्रभू यहोवा १९१४ मध्ये आपल्या ख्रिस्ताला सहकारी राजा या नात्याने सिंहासनाधिष्ट करतो तेव्हा पवित्र गूज वैभवी, गौरवाने आणि विजयाने पूर्ण केले जाते. आपल्या पित्यासाठी कार्य करण्यात येशू ख्रिस्त मानवजातीच्या शत्रू जगतात आपले क्रियाशील सामर्थ्य हाती घेतो. वचनयुक्‍त संतान या नात्याने त्याला राज्याचे सामर्थ्य दिले जाते की, ज्यामुळे त्याला सैतान व त्याच्या संततीला नाहीसे करुन आणि पृथ्वीवर नंदनवनमय शांती प्रस्थापित करता येते. (उत्पत्ती ३:१५; स्तोत्र ७२:१, ७) मशीही राजा या नात्याने येशू अशाप्रकारे यहोवाचे वचन पूर्ण करील आणि ज्याला सेनाधीश प्रभू या नात्याने “युगानुयुग राज्य” केले पाहिजे तो आपला पिता, ‘सनातन राजा’ याचे गौरव करील.—१ तीमथ्य १:१७.

३. यहोवा देव नेहमीच राजा असताना, त्याने या पृथ्वीवर इतर सार्वभौमत्वांना अस्तित्वात राहण्याची अनुज्ञा का दिली?

पण ‘जगाचे राज्य आमच्या प्रभू’ यहोवाचे कसे झाले? यहोवा देव सर्वकाळ राजा नव्हता का? ते खरे आहे, कारण लेवी आसाफ याने हे गीत गायिले: “देव पुरातन कालापासूनचा माझा राजा आहे.” शिवाय आणखी एका स्तोत्रकर्त्याने हे घोषित केले: “परमेश्‍वर [यहोवा, NW] राज्य करितो, . . . तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे; तू अनादिकालापासून आहेस.” (स्तोत्र ७४:१२; ९३:१, २) पण यहोवाने आपल्या सुज्ञतेने इतर सार्वभौमांना या पृथ्वीवर अस्तित्वात राहू दिले. यामुळे, एदेनात जो वादविषय निर्माण झाला होता की, मानव देवाशिवाय अधिपत्य गाजवू शकेल काय, याची पूर्ण रुपाने परीक्षा झाली. मानवी शासन अगदी दयनीय रितीने अपयशी झाले आहे. देवाच्या संदेष्ट्याने उद्‌गारिलेले हे शब्द अगदी खरे आहेत: “हे परमेश्‍वरा [यहोवा, NW] मला ठाऊक आहे की, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) आपल्या पहिल्या पालकांठायी दोष निर्माण झाल्यापासून सबंध निवासी पृथ्वी, ही “जुनाट साप” सैतान याच्या वर्चस्वाखाली राहिली आहे. (प्रकटीकरण १२:९; लूक ४:६) यास्तव, आता नाट्यमय बदल होण्याची वेळ आली आहे! आपल्या अधिकारयुक्‍त दर्जाचे गौरव होण्यासाठी यहोवा पृथ्वीवर आपले सार्वभौमत्व एका नव्या मार्गाने म्हणजेच, त्याने नियुक्‍त केलेल्या मशीही राज्यामार्फत गाजवू लागतो.

४. कर्ण्याचा निनाद १९२२ मध्ये सरला तेव्हा, कोणती गोष्ट सामोरी आणण्यात आली? विवेचीत करा.

सातव्या देवदूताचा कर्णा १९२२ पर्यंत वाजून संपला तेव्हा सीडर पॉईंट, ओहायो येथील बायबल विद्यार्थ्यांच्या अधिवेशनात वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” या शास्त्रवचनावर आधारित भाषण सादर केले. (मत्तय ४:१७, किंग जेम्स व्हर्शन) त्यांनी या शब्दांनी समारोप केला: “तर मग, अहो सर्वसमर्थ देवाच्या पुत्रांनो, क्षेत्राकडे परत चला! तुमची तयारी पूर्ण करा! भानावर या, जागृत व्हा, क्रियाशील व्हा आणि धाडसी बना. प्रभूचे विश्‍वासू व खरे साक्षीदार व्हा. बाबेलचा प्रत्येक भेदनीय भाग उद्‌ध्वस्त होईपर्यंत लढाईत पुढे जा. हा संदेश दूरदूर न्या. यहोवा हा देव आहे आणि येशू ख्रिस्त हा राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू आहे हे जगाला कळालेच पाहिजे. हा सर्वात मोठा दिवस आहे. पाहा, राजा राज्य करीत आहे! तुम्ही त्याचे जाहीर प्रतिनिधी आहात. यास्तव, राजा व त्याचे राज्य याची जाहिरात करा, जाहिरात करा व जाहिरात करा.” ख्रिस्त येशू मार्फत देवाचे राज्य सामोरे आणण्यात आले व यामुळे राज्य प्रचाराची ती मोठी लाट उसळली आणि यात सर्व सात देवदूतांच्या कर्ण्यांनी घोषित केलेल्या न्यायदंडांची घोषणाही सामील करण्यात आली.

५. बायबल विद्यार्थ्यांच्या अधिवेशनात १९२८ मध्ये असे काय झाले की, ज्याने सातव्या कर्ण्याचा निनाद प्रतिध्वनित केला?

सातव्या देवदूताच्या कर्ण्याचा निनाद बायबल विद्यार्थ्यांच्या मिशीगन येथील डेट्रॉईटमध्ये जुलै ३०-ऑगस्ट ६, १९२८ मध्ये भरलेल्या अधिवेशनात ठळकपणे प्रतिबिंबित करण्यात आला. त्यावेळी १०७ रेडिओ उद्‌घोषक स्टेशने जोडण्यात आली. याला द न्यूयॉर्क टाइम्सने ‘इतिहासातील अत्यंत विस्तारीत व खर्चिक रेडिओ केंद्राचे जाळे’ असे म्हटले होते. अधिवेशनाने “सैतानाविरुद्ध पण यहोवाच्या बाजूने घोषणा” मोठ्या उत्स्फुर्ततेने मंजूर केली, ज्यात सैतान व त्याच्या दुष्ट संघटनांचा हर्मगिदोनात नाश आणि धार्मिकतेवर प्रेम करणाऱ्‍या सर्वांची मुक्‍ती याचा निर्देश करण्यात आला. देवाच्या राज्याच्या निष्ठावंत प्रजेला ३६८ पृष्ठांचे सरकार (इंग्रजी) हे अधिवेशन प्रकाशन प्राप्त करण्याचा मोठा आनंद झाला. या पुस्तकात “देवाने आपल्या अभिषिक्‍त राजाला १९१४ मध्ये सिंहासनाधिष्ठ केले आहे” याचा स्पष्ट पुरावा सादर केला आहे.

यहोवा सामर्थ्य घेतो

६. ख्रिस्त देवाच्या राज्यात राज्यारुढ झाला आहे या घोषणेला योहान कसे कळवतो?

देवाच्या राज्यात ख्रिस्त राजासनावर बसलेला आहे—ही घोषणा केवढ्या आनंदाची आहे! योहान कळवतो: “तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करुन म्हणाले: ‘हे प्रभु [यहोवा, NW] देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस व होतास तो तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि राज्यारुढ झाला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.’”—प्रकटीकरण ११:१६, १७.

७. (अ) पृथ्वीवर असणाऱ्‍या लाक्षणिक २४ वडिलांच्या शेषाने व (ब) ज्यांचे पुनरुत्थान होऊन स्वर्गात आपली जागा घेतली होती त्या लाक्षणिक २४ वडिलांनी यहोवा देवाचे कसे आभारप्रदर्शन केले?

यहोवा देवास हे आभारप्रदर्शन २४ वडील, स्वर्गातील पदावर असणारे ख्रिस्ताचे अभिषिक्‍त बांधव सादर करतात. या १,४४,००० अभिषिक्‍तांचा शेष, १९२२ पासून पुढे कर्ण्याच्या निनादाने ज्या कामाला आरंभ मिळाला ते करण्यात मग्न झाला. यांना मत्तय २४:३–२५:४६ ची पूर्ण समज मिळाली. तथापि, प्रभूच्या दिवसाच्या आधी ‘मरणापर्यंत विश्‍वासू राहिलेल्या’ त्यांच्या सहसाक्षीदारांचे स्वर्गात आपली जागा घेण्यासाठी पुनरुत्थान करण्यात आले, यामुळे ते, उपडे पडून देवाला नमस्कार घालणाऱ्‍या १,४४,००० च्या पूर्ण गटाचे प्रतिनिधीत्व करू शकत होते. (प्रकटीकरण १:१०; २:१०) आपल्या सार्वभौम प्रभूने त्याचे पवित्र गूज कळसाला आणून पूर्ण करण्यात दिरंगाई केली नाही म्हणून ते केवढे कृतज्ञ होते!

८. (अ) सातव्या कर्ण्याचा निनाद राष्ट्रांवर कोणता परिणाम करतो? (ब) राष्ट्रांनी आपला क्रोध कोणाविरुद्ध दर्शवला आहे?

उलटपक्षी, सातव्या कर्ण्याचा निनाद राष्ट्रांना कसलाही आनंद देत नाही. त्यांना यहोवाचा क्रोध अनुभवण्याची वेळ आली. योहान कळवतो: “राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि तुझे दास संदेष्टे व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीति बाळगणारे लहानथोर ह्‍यांस वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.” (प्रकटीकरण ११:१८) जगातील राष्ट्रांनी १९१४ पासून पुढे एकमेकांविरुद्ध, देवाच्या राज्याविरुद्ध आणि खासपणे यहोवाच्या दोन साक्षीदारांविरुद्ध आपला क्रोध दर्शवला आहे.—प्रकटीकरण ११:३.

९. राष्ट्रे पृथ्वीची कशी नासाडी करीत आहेत आणि याबद्दल देवाने काय करण्याचा निश्‍चय केला आहे?

इतिहासात राष्ट्रांनी आपली अविरत युद्धे आणि वाईट व्यवस्थापन याद्वारे पृथ्वीची नासाडी केली आहे. तथापि, १९१४ पासून ही नासाडी धोकादायक रितीने होत आहे. लोभ व भ्रष्टता यांचा परिणाम वाळवंटे वाढवण्यात आणि फलदायी जमिनीची प्रचंड नासधूस होण्यात झाला. आम्लयुक्‍त पाऊस व अणुकिरणोत्सर्जी ढगांमुळे मोठ्या क्षेत्राची हानी झाली. अन्‍नाचे उत्पादन प्रदूषित बनले. आम्ही श्‍वसन करतो ती हवा आणि पितो ते पाणी प्रदूषित झाले आहे. औद्योगिक कचरा भूप्रदेशावरील तसेच समुद्रावरील जीवनास धोका संभवीत आहे. प्रबळ सत्ता आपल्या अणुशस्त्रांद्वारे संपूर्ण मानवजात नष्ट करण्याची दहशत घालून आहे. पण यहोवा “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करणार आहे हे आनंदाचे आहे. या पृथ्वीची वाईट स्थिती करणाऱ्‍या त्या गर्विष्ठ, अभक्‍त मानवांवर तो दंडाज्ञा बजावणार आहे. (अनुवाद ३२:५, ६; स्तोत्र १४:१-३) अशा अपराध्यांकडून हिशोब मागवावा यासाठी यहोवा तिसऱ्‍या अनर्थाची योजना करून आहे.—प्रकटीकरण ११:१४.

नाश करणाऱ्‍यांचा अनर्थ!

१०. (अ) तिसरा अनर्थ काय आहे? (ब) कशाप्रकारे हा तिसरा अनर्थ पीडेपेक्षा अधिक काही करतो?

१० हा पहा तिसरा अनर्थ. तो लवकर येतो! याद्वारे यहोवा त्याचे “पादासन,” आपण राहतो ती त्याची सुंदर पृथ्वी हिची नासाडी करणाऱ्‍यांचा तो नाश करतो. (यशया ६६:१) हा अनर्थ देवाचे पवित्र गूज, त्याचे मशीही राज्य याला मिळालेल्या गतीद्वारे येतो. पहिल्या दोन अनर्थाद्वारे देवाचे शत्रू व खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील पुढारी यांना यातना मिळाल्या. हे अनर्थ मुख्यत्वे टोळांची पीडा आणि घोडदळावरील सैन्याद्वारे होते. पण यहोवाच्या राज्याद्वारेच प्रत्यक्षात येणारा तिसरा अनर्थ पीडा देण्यापेक्षाही अधिक काही करतो. (प्रकटीकरण ९:३-१९) तो नासाडी करणाऱ्‍या मानवी समाजाला व त्याच्या शासकांना मृतप्राय तडाखा देतो. हा यहोवाचा हर्मगिदोनात केलेल्या न्यायाचा कळस असेल. हेच दानीएलाने आधी भाकीत केले होते: “त्या राजांच्या [पृथ्वीची नासाडी करणारे अधिपती] अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” वाढत जाणाऱ्‍या पर्वताप्रमाणे देवाचे राज्य वैभव लाभलेल्या पृथ्वीवर राज्य करील व ते यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करील आणि मानवजातीला चिरकाल आनंद देईल.—दानीएल २:३५, ४४; यशया ११:९; ६०:१३.

११. (अ) भविष्यवाद कोणत्या सलग आनंदी घटनांचे वर्णन करतो? (ब) कोणत्या विपुल दयेची प्रचिती मिळते, कशी आणि कोणाद्वारे?

११ तिसऱ्‍या अनर्थासोबत सलग अशा आनंदी घटनांची मालिका येते, जी प्रभूच्या दिवसात प्रगतीशीलपणे पुढे जात राहील. ती ‘मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि देवाचे दास, संदेष्टे व पवित्र जन आणि त्याच्या नावाची भीती बाळगणाऱ्‍या सर्वांना वेतन देण्याची आहे.’ याचा अर्थ, मृतांचे पुनरुत्थान! मरणात आधीच निद्रावश झालेल्या अभिषिक्‍त पवित्र जनांना हे पुनरुत्थान प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला घडते. (१ थेस्सलनीकाकर ४:१५-१७) काही काळातच, बाकीचे पवित्र जन यांना क्षणार्धात पुनरुत्थित होण्याद्वारे येऊन मिळतील. याखेरीज, प्राचीन काळातील देवाचे दास, संदेष्टे आणि यहोवाच्या नामाची भीती बाळगणाऱ्‍या मानवजातीतील इतर सर्वांना, मग ते मोठ्या संकटातून पार होणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायातील बचावलेले असोत की, ‘मृत असलेले लहानथोर’ असोत, ज्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीत पुनरुत्थान मिळणार आहे, या सर्वांना प्रतिफळ किंवा वेतन मिळणार. वस्तुतः, देवाच्या मशीही राजापाशी मरण व अधोलोकाच्या किल्ल्या असल्यामुळे त्याची राजवट त्याला, सार्वकालिक जीवनप्राप्तीच्या मोलवान तरतूदीकडे धाव घेणाऱ्‍यांना ते प्रदान करण्याचा मार्ग मोकळा करते. (प्रकटीकरण १:१८; ७:९, १४; २०:१२, १३; रोमकर ६:२२; योहान ५:२८, २९) स्वर्गातील अमर जीवन किंवा पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन या गोष्टी यहोवाकडील विपुल दया आहेत आणि ती प्राप्त करणारे त्याचे सदासर्वदा ऋणी राहतील.—इब्रीयांस २:९.

त्याच्या कराराचा कोश बघा!

१२. (अ) प्रकटीकरण ११:१९ नुसार योहान स्वर्गात काय बघतो? (ब) कराराचा कोश कशाचे चिन्ह होते आणि इस्राएल बाबेलच्या दास्यात गेल्यावर त्याचे काय झाले?

१२ यहोवा राज्य करतो! तो आपल्या मशीही राज्याद्वारे मानवजातीवर आपले सार्वभौमत्व एका अद्‌भुत रितीने गाजवत आहे. याला, योहान पुढे जे बघतो त्याद्वारे याला पुष्टी मिळते: “तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा चमकल्या, गर्जना, व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व मोठ्या गारांची वृष्टीहि झाली.” (प्रकटीकरण ११:१९) देवाच्या कराराच्या कोशाचा हा प्रकटीकरणातील एकमेव उल्लेख आहे. हा कोश, यहोवाचे इस्राएल लोक यांजमध्ये त्याच्या उपस्थितीचे दृश्‍य चिन्ह होता. तो नंतर निवासमंडप व त्यानंतर शलमोनाने बांधलेल्या मंदिरात परमपवित्र स्थानात ठेवण्यात आला. पण सा.यु. पूर्वी ६०७ मध्ये इस्राएल लोक बाबेलच्या दास्यत्वात गेल्यावर यरुशलेम निर्जन बनले व कराराचा कोश गायब झाला. हे, दाविदाच्या घराण्यातील प्रतिनिधी “राजा होऊन परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] सिंहासनावर” बसण्याचे थांबले तेव्हा घडले.—१ इतिहास २९:२३. *

१३. देवाच्या स्वर्गीय पवित्र स्थानात देवाचा कराराचा कोश दिसला याद्वारे काय सूचित होते?

१३ आता २,५०० पेक्षा अधिक वर्षानंतर, हा कोश पुन्हा दिसला. पण योहानाच्या दृष्टांतानुसार हा कोश पृथ्वीवरील मंदिरात नाही. तो देवाच्या स्वर्गीय पवित्र स्थानात दिसतो. तेव्हा पुन्हा एकदा, यहोवा दाविदाच्या बादशाही घराण्यातील राजाद्वारे राज्य करीत आहे. तथापि, यावेळी येशू ख्रिस्त हा राजा स्वर्गीय यरुशलेमेत सिंहासनाधिष्ट झाला आहे. हा तो असा केंद्रबिंदू आहे जेथून तो यहोवाच्या न्यायदंडाची अंमलबजावणी करीत आहे. (इब्रीयांस १२:२२) प्रकटीकरणातील पुढील अध्याय आम्हाला याबद्दल अधिक माहिती देतील.

१४, १५. (अ) प्राचीन यरुशलेमेत केवळ कोणाला कराराचा कोश बघायला मिळे व का? (ब) स्वर्गातील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानात त्याचा कराराचा कोश कोणाला पहावयास मिळतो?

१४ पृथ्वीवरील प्राचीन यरुशलेमेत सर्वसाधारण इस्राएल लोकांना कराराचा कोश पाहावयास मिळत नव्हता. शिवाय, तो मंदिरात काम करणाऱ्‍या याजकांना देखील दिसू शकत नव्हता; कारण तो परमपवित्र स्थानात ठेवला गेला होता व ही जागा व पवित्र स्थान यात पडदा होता. (गणना ४:२०; इब्रीयांस ९:२, ३) प्रमुख याजक प्रतिवर्षी प्रायश्‍चित्ताच्या दिवशी जेव्हा परमपवित्र स्थानात जाई तेव्हा त्यालाच केवळ हा कोश बघावयास मिळे. पण जेव्हा स्वर्गातील मंदिरातील पवित्र स्थान उघडते तेव्हा तो लाक्षणिक कोश केवळ यहोवाचा प्रमुख याजक, येशू ख्रिस्त यालाच नव्हे तर, त्याच्या १,४४,००० सहयाजकांना देखील बघावयास मिळतो. तो योहानालाही दिसतो.

१५ ज्यांचे स्वर्गात जीवनासाठी प्रथम पुनरुत्थान होते त्यांना हा लाक्षणिक कोश जवळून पहावयास मिळतो, कारण ते यहोवाच्या सिंहासनाभोवती असणाऱ्‍या २४ वडिलांच्या जागा घेतात. पृथ्वीवरील योहान वर्गाला यहोवाच्या आत्म्याने, त्याच्या आध्यात्मिक मंदिरातील त्याचे अस्तित्व पाहण्याचा आनंद मिळाला. या अद्‌भुत घटनेबद्दल सर्वसाधारण मानवजातीला जागृत करण्यासाठी चिन्हेही देण्यात आली. योहानाचा दृष्टांत गर्जना, वाणी, विजा, भूकंप व गारा याबद्दल माहिती देतो. (पडताळा प्रकटीकरण ८:५.) हे कशाला चित्रित करते?

१६. कशाप्रकारे विजा, वाणी, गर्जना, भूकंप आणि मोठ्या गारा टाकण्यात आल्या?

१६ धर्माच्या क्षेत्रात १९१४ पासून प्रचंड उलाढाली घडल्या आहेत. तरीपण या ‘भूमिकंपासोबत’ अशा समर्पित वाणींची सोबत आली जिने देवाच्या प्रस्थापित राज्याच्या संदेशाचा सूर स्पष्टरित्या विदित केला. बायबलमधून ‘गर्जनात्मक इशारे’ देण्यात आले. देवाच्या भविष्यवादित वचनातील अंतर्दृष्टी चकाकत्या विजेप्रमाणे पाहिली व प्रसिद्ध केली गेली. ईश्‍वरी न्यायदंडाच्या मोठमोठ्या ‘गारा’ ख्रिस्ती धर्मजगतावर व सर्वसाधारण खोट्या धर्मावर टाकण्यात आल्या. या सर्व गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले जाण्यास हवे होते. तथापि, प्रकटीकरणाच्या पूर्ण झालेल्या चिन्हांकडे येशूच्या काळातील यरुशलेमेच्या लोकांप्रमाणेच बहुसंख्य लोक लक्ष देण्यात अपयशी ठरले हे दुःखाचे आहे.—लूक १९:४१-४४.

१७, १८. (अ) सात देवदूतांच्या कर्ण्यांच्या निनादामुळे समर्पित ख्रिश्‍चनांवर कोणती जबाबदारी आणली आहे? (ब) खिस्तीजन ही नेमणूक कशी पूर्ण करीत आहेत?

१७ सात देवदूत आपले कर्णे वाजवून या पृथ्वीवरील ऐतिहासिक घटनांचा संकेत देत राहिले. या घोषणांना जगभर निनादविण्यात समर्पित ख्रिश्‍चनांची मोठी जबाबदारी आहे. या नेमणूकीची पूर्णता करण्यामध्ये ते केवढे आनंदी आहेत! हे यावरुन दिसते की, १९८४ ते १९९३ पर्यंतच्या केवळ दहा वर्षात त्यांनी दर वर्षी आपल्या जगव्याप्त सेवकपणात ५०,५५,८८,०३७ पासून १,०५,७३,४१,९७२ इतके तास दुपटीने घालविले. ही १०९ टक्के वाढ आहे. खरोखरी, “देवाने . . . सुवार्ता सांगितली तदनुसार त्याचे गूज” ‘पृथ्वीच्या दिगंतरापर्यंत’ कळवले जात आहे.—प्रकटीकरण १०:७; रोमकर १०:१८.

१८ देवाच्या राज्याचे उद्देश जसजसे उलगडले जात आहेत तसतसे इतर दृष्टांत देखील आता पूर्णत्वास येण्याची वाट पाहून आहेत.

[तळटीपा]

^ रोमी इतिहासकार टॅसिटस कळवतो की, सा.यु. पूर्वी ६३ मध्ये यरुशलेम काबीज केल्यावर, नियस पाँपीयस मंदिरातील पवित्र स्थानात आला तेव्हा ते त्याला रिकामे आढळले. तेथे आत कराराचा कोश नव्हता.—टॅसिटस हिस्ट्री, ५.९.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७३ पानांवरील चौकट]

यहोवाच्या न्यायदंडाच्या कर्ण्यासमान घोषणांची काही ठळक वैशिष्ट्ये

१. १९२२ सीडर पॉईंट, ओहायो: ख्रिस्ती धर्मजगतातील धर्म व राजकीय नेत्यांना तसेच मोठ्या व्यापाराला शांती, समृद्धी व आनंद आणण्यातील आपल्या अपयशाचे समर्थन करण्याचे आव्हान. मशीही राज्य हाच एकमेव तोडगा.

२. १९२३ लॉस एंजल्स, कॅलिफोर्निया: “सर्व राष्ट्रे हर्मगिदोनाप्रत आगेकूच करीत आहेत पण आज जिवंत असणारे लाखो जण कधीच मरणार नाहीत” या जाहीर भाषणाने शांतीप्रिय ‘मेंढरांना’ मानवजातीच्या मृतप्राय समुद्रातून बाहेर पडण्याचे आवाहन केले.

३. १९२४ कोलंबस, ओहायो: एक्लेसियांना स्वतःचे परीक्षण करण्याचा आणि मशीही राज्याचा प्रचार करण्यात नकार देण्याबद्दलचा आरोप. खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी देवाच्या सूडाचा प्रचार केला पाहिजे आणि शोकग्रस्त मानवजातीचे सांत्वन केले पाहिजे.

४. १९२५ इंडियानापोलिस, इंडियाना: ख्रिस्ती धर्मजगताच्या आध्यात्मिक अंधःकाराच्या विरुद्ध आशेचा संदेश, ज्यात शांती, समृद्धता, आरोग्य, जीवन, स्वातंत्र्य आणि चिरकालिक सौख्यानंद हे देवराज्याचे तेजोमय अभिवचन आहे.

५. १९२६ लंडन, इंग्लंड: ख्रिस्ती धर्मजगत व त्याचे धर्मपुढारी यांनी देवाच्या राज्यास दिलेला नकार व त्या स्वर्गीय सरकारच्या जन्माचे स्वागत करण्याचा नकार देण्यामुळे त्यांजवरील टोळधाडीसमान पीडा.

६. १९२७ टोरंटो, कॅनडा: लोकांनी ‘संघटित ख्रिस्ती विश्‍वास’ त्यागून यहोवा देव, त्याचा राजा व राज्य यांना आपली निष्ठा दाखविण्याचे सर्व लोकांना निमंत्रण, जणू घोडदळाच्या सैन्याद्वारे देण्यात आले.

७. १९२८ डेट्रॉईट, मिशिगन: सैतानाविरुद्ध पण यहोवाच्या वतीने एक घोषणा ज्यात, १९१४ मध्ये राजासनाधिष्ठ झालेला देवाचा अभिषिक्‍त राजा सैतानाच्या सर्व दुष्ट संघटनांचा नाश करून मानवजातीला बंधनमुक्‍त करील हे स्पष्ट रुपात सांगण्यात आले.

[१७४ पानांवरील चित्रे]

यहोवा “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करील

[१७५ पानांवरील चौकट]

पृथ्वीची नासाडी

“दर तीन सेकंदाला पावसाच्या जंगलाच्या मूळ भागाचा फूटबॉल क्रिडांगणाइतका आकाराचा काही भाग नष्ट होत आहे. . . . अशा या जंगलाच्या नाशामुळे हजारो वनस्पती व प्राण्यांच्या जाती नष्ट केल्या जात आहेत.”—इलस्ट्रेटेड ॲटलस ऑफ द वर्ल्ड (रँड मॅकनॅली).

“दोन शतकांच्या समझोत्यामध्ये [दोन मोठी सरोवरे] जगातील सर्वात मोठी गटारे झाली.”—द ग्लोब ॲण्ड मेल (कॅनडा).

एप्रिल १९८६ मध्ये रशियाच्या चर्नोबल येथील अण्वस्त्र कारखान्यात झालेला स्फोट व लागलेली आग “नागासाकी व हिरोशिमावर पडलेल्या बाँबवृष्टीनंतर अत्यंत अभूतपूर्व अशी अण्वस्त्र घटना होती,” त्याकडून “पूर्वी कोणाही अण्वस्त्र चाचणी किंवा अणुबाँबने माती व पाणी वातावरणात उधळण्यात आले नव्हते, इतक्या अधिक प्रमाणात जगाच्या हवामानात दूरपल्ल्याची किरणोत्सर्जकता फेकली गेली.”—जामा; द न्यूयॉर्क टाईम्स.

मिनामाता, जपान मध्ये एका रासायनिक कारखान्याने समुद्राच्या किनारपट्टीत पारदर्शक द्रव सोडला. या द्रवाने मासे व शिंपले यांना संसर्ग लागला. असे मासे आहारात आल्यामुळे मिनमाता (एमडी) हा “सांसर्गिक मज्जातंतूचा रोग सुरु झाला. . . . आजपर्यंत [१९८५], जपानभर २,५७८ लोकांना या एमडीची बाधा झाली असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.”—इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी.

[१७६ पानांवरील चौकट]

प्रकटीकरण ११:१५-१९ मध्ये दिलेल्या वजनदार घोषणा पुढे येणाऱ्‍या दृष्टांताच्या प्रास्ताविक आहेत. प्रकटीकरण १२ वा अध्याय हा आधी घडलेला दृष्टांत विस्तृत करून दाखवतो आणि प्रकटीकरण ११:१५, १७ मधील भव्य घोषणा सविस्तरपणे सांगतो. अध्याय १३ हा ११:१८ वचनाची पार्श्‍वभूमी देतो, त्यात सैतानी राजकीय संघटनेची उत्पत्ती व वाढ दाखविली असून तिनेच पृथ्वीची नासाडी घडवून आणली आहे. अध्याय १४ व १५ हे सातव्या देवदूताच्या कर्ण्याने व तिसऱ्‍या अनर्थाने जोडलेला पुढच्या राज्य न्यायदंडांची जोड दाखवतो.