प्रकटीकरणाचा आनंदी कळस!
अध्याय १
प्रकटीकरणाचा आनंदी कळस!
१. आम्ही आनंदी असावे ही देवाची इच्छा आहे हे आम्हास कसे कळते?
योहानास झालेले प्रकटीकरण—हे बायबलचे थरारक पुस्तक, ईश्वरी अहवालाचा आनंदी कळस गाठते. आम्ही याला ‘आनंदी’ असे का म्हणतो? खरे म्हणजे, बायबलच्या लेखकाचे वर्णन ‘आनंदी देव’ असे केलेले आहे. तो आपणावर प्रीती करणाऱ्यांना त्याची ‘वैभवी सुवार्ता’ सोपवतो. आम्हीसुद्धा आनंदी राहावे अशी त्याची इच्छा आहे. या कारणामुळे, अगदी आरंभालाच प्रकटीकरणाचे पुस्तक आम्हाला ही खात्री देते की, “ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा . . . धन्य.” याच्या शेवटल्या अध्यायात आणखी असे सांगितले आहे की, “ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.”—१ तीमथ्य १:११; प्रकटीकरण १:३; २२:७.
२. प्रकटीकरणाच्या पुस्तकाद्वारे आनंद मिळवण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?
२ प्रकटीकरण पुस्तकाद्वारे आम्हास कसा आनंद मिळू शकतो? त्यामध्ये असणारी विविध चिन्हे वा प्रतीके यांचा अर्थ शोधून व त्यानंतर त्याच्या सहमतात आपली हालचाल राखून तो आम्हास मिळवता येईल. जेव्हा देव व येशू ख्रिस्त हे आजच्या दुष्ट व्यवस्थीकरणावर आपला न्यायदंड बजावून त्याच्या जागी, जेथे ‘मरण देखील असणार नाही’ असे “नवे आकाश व नवी पृथ्वी” आणतील तोपर्यंत मानवजातीच्या गोंधळाच्या इतिहासाने आपला कळस गाठला असणार. (प्रकटीकरण २१:१, ४) त्या नव्या जगात, खरी शांती व सुरक्षितता यासहित आम्हाला रहावेसे वाटणार नाही का? आम्ही प्रकटीकरणातील थरारक भविष्यवादांसहित देवाच्या संपूर्ण वचनाचा अभ्यास करुन आपला विश्वास वाढविला तर हे साध्य करु शकू.
अपॉकलिप्स—ते काय आहे?
३. पुष्कळ लोक अपॉकलिप्स व हर्मगिदोन याचा काय अर्थ असल्याचा विचार करतात?
३ पण प्रकटीकरणास अपॉकलिप्स म्हटलेले नाही का? ते तसेच आहे, कारण याला ग्रीक भाषेत अ․पॉ․कʹलि․प्सीस् असे म्हणतात, यावरुन “रेवलेशन” हे इंग्रजीत, तर “प्रकटीकरण” हे मराठीत भाषांतर घेतलेले आहे. बहुतेक लोक या अपॉकलिप्सचा संबंध, आण्विक युद्धाद्वारे होणाऱ्या जगाच्या नाशासोबत जोडतात. अमेरिकेतील टेक्सस् येथील शहरात मोठ्या संख्येने आण्विक क्षेपणास्त्रे बनविलेली आहेत, तेथे धर्माकडे कल असणाऱ्या लोकांपैकी काही असे म्हणत आहेत की, “मरणाऱ्यांत आम्ही पहिले असू.” या क्षेत्रातील पाळकांचे असे मत बनले आहे की, “हर्मगिदोनास टाळता तर येणारच नाही पण ते तर आता अगदी हाताशी आले आहे. तेव्हा चांगले व वाईट, किंवा देव व सैतान, यामध्ये आण्विक आपत्तीद्वारेच अंतिम युद्ध होईल.” *
४. “अपॉकलिप्स” ह्या शब्दाचा खरा अर्थ काय होतो आणि बायबलच्या शेवटल्या पुस्तकास “प्रकटीकरण” हे शीर्षक का योग्य आहे?
४ परंतु अपॉकलिप्स हे खरोखरी आहे तरी काय? अनेक शब्दकोश जरी त्याची व्याख्या “येऊन ठेपलेला विश्वव्यापी नाश” अशी करतात तरी ग्रीक अ․पॉ․कʹलि․प्सीस् याचा मूलभूत अर्थ म्हणजे “अनावरण करणे” किंवा “उघड करणे” असा आहे. अशाप्रकारे, बायबलच्या शेवटल्या पुस्तकास “प्रकटीकरण” हा योग्य मथळा वा शीर्षक दिले आहे. येथे आम्हाला केवळ जागतिक नाशाचा नाशकारक संदेशच पाहायला मिळत नाही, तर आमच्या हृदयात एक तेजस्वी आशा आणि स्थिर अशा विश्वासाची उभारणी करणाऱ्या ईश्वरी सत्यांना ते उघड करते.
५. (अ) हर्मगिदोनात कोणाचा नाश केला जाईल व कोण बचावले जातील? (ब) हर्मगिदोनातील बचावणाऱ्यांकरता कोणते भव्य भवितव्य वाट पाहून आहे?
५ हे खरे आहे की, बायबलच्या अंतिम पुस्तकात, हर्मगिदोनाचे वर्णन ‘सर्वसमर्थ देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई’ असे केलेले आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) परंतु अणुशस्त्राद्वारे होणाऱ्या नाशापासून ते फारच वेगळे असेल! अशा प्रकारचा नाश याचा अर्थ, बहुधा पृथ्वीवरील सर्व जिवांचा नाश असा होतो. या उलट, देवाचे वचन अशी आनंदी खात्री पुरविते की, केवळ देवाच्या इच्छेला विरोध करणारे दुष्ट, त्याच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या शक्तीद्वारे नष्ट केले जातील. (स्तोत्र ३७:९, १०; १४५:२०) सर्व राष्ट्रातील एक मोठा लोकसमुदाय हर्मगिदोनातील ईश्वरी न्यायाचा कळस गाठला जाईल तेव्हा बचावून राहील. त्यानंतर, येशू ख्रिस्त त्यांचे मेंढपाळकत्व करील व नंदनवन पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाप्रत त्यांचे मार्गदर्शन करील. त्यांच्यापैकी आपण एक असावे अशी तुमची इच्छा नाही का? प्रकटीकरण दाखवून देते की, तुम्ही त्यामध्ये असू शकाल, हे खरेच आनंदाचे आहे!—प्रकटीकरण ७:९, १४, १७.
ईश्वरी रहस्यांचा शोध घेणे
६. प्रकटीकरणावर प्रकाश पाडण्यासाठी आतापर्यंतच्या वर्षात वॉचटावर संस्थेने कोणती पुस्तके प्रकाशित केलेली आहेत?
६ अगदी सुरवातीलाच, म्हणजे १९१७ मध्ये वॉचटावर या संस्थेने संपलेले रहस्य (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक, यहेज्केल व प्रकटीकरण या बायबलमधील पुस्तकांच्या प्रत्येक वचनावरील एक भाष्य होते. त्यानंतर, बायबलमधील भविष्यवादांच्या पूर्णतेत जागतिक घटना उघड होण्याचे चालूच राहिले तेव्हा, अगदी समयोचित असे दोन खंड असलेले व प्रकाश (इंग्रजी) असे शीर्षक दिलेले पुस्तक तयार करण्यात आले. त्याचे प्रकाशन १९३० मध्ये करण्यात आले. त्यात प्रकटीकरणाचा अद्ययावत अभ्यास सादर केला. ‘धार्मिकांकरिता प्रकाश चकाकत’ राहिला. त्यामुळे १९६३ मध्ये “मोठी बाबेल पडली!” देवाचे राज्य अधिकार गाजवीत आहे! (इंग्रजी) हे ७०४ पानी पुस्तक संस्थेने प्रकाशित केले. खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य अशा मोठ्या बाबेलच्या उदयाचा व ऱ्हासाचा संपूर्ण ऐतिहासिक तपशील या पुस्तकाने दिला व त्याचा शेवट प्रकटीकरणातील शेवटल्या नऊ अध्यायांच्या चर्चेने केला. धार्मिकांचा मार्ग विशेषतः मंडळीच्या हालचालीबाबत जसा उत्तरोत्तर प्रकाशित होत गेला त्यानुसार, “तेव्हा देवाचे गूज संपेल” (इंग्रजी) हा ३८४ पानांचा खंड १९६९ मध्ये प्रकाशित झाला, ज्यात प्रकटीकरणाच्या पहिल्या १३ अध्यायांची चर्चा केलेली आहे.—स्तोत्र ९७:११; नीतीसूत्रे ४:१८.
७. (अ) प्रकटीकरणावरील हे पुस्तक संस्थेने प्रकाशित का केलेले आहे? (ब) वाचकांच्या फायद्याकरता, शिकवणीच्या कोणत्या मदती या पुस्तकात पुरविल्या आहेत?
७ या सध्याच्या काळात प्रकटीकरणावर आणखी एक पुस्तक का प्रकाशित केले जावे? प्रसिद्ध झालेली बरीच माहिती फारच तपशीलवार आहे आणि जगभर अनेक भाषेत तिचे भाषांतर व प्रकाशन करण्याची शक्यता उपलब्ध झाली नव्हती. या कारणास्तव, प्रकटीकरणावरील पुस्तक एका खंडात तयार करावे व ते कित्येक भाषेत निर्माण करता येऊ शकेल अशा पद्धतीने त्याचे संकलन करण्याचे उचित दिसले. तसेच या अद्भुत भविष्यवादांचे शिरशिरी भरविणारे महत्त्व वाचकांस स्पष्टरित्या ग्रहण करता यावे याकरता या खंडात उदाहरणे, तक्ते, सारांश या शिकवणीच्या मदती पुरविण्याची संधी साधली आहे.
८. हे पुस्तक प्रकाशित करण्याचे अधिक जोरदार कारण कोणते?
८ हे पुस्तक प्रकाशित करण्याचे एक जोरदार कारण म्हणजे, सध्याच्या सत्याशी अद्ययावत राहण्याची गरज. यहोवा त्याच्या वचनाच्या अर्थावर सतत मोठा प्रकाश पाडीत आहे आणि जसजसे आम्ही मोठ्या संकटाच्या जवळ पोहंचू तसतसे इतर भविष्यवादांसह प्रकटीकरणाची आमची समज अधिक धारदार केली जाईल, याची अपेक्षा आम्ही बाळगू शकतो. (मत्तय २४:२१; प्रकटीकरण ७:१४) आम्हाला चांगली माहिती मिळत राहावी हे महत्त्वाचे आहे. प्रेषित पेत्राने ईश्वरी भविष्यवादाबद्दल असे लिहिले की: “अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.”—२ पेत्र १:१९.
९. (अ) इतर भविष्यवादांसोबत, देव काय निर्माण करील असे प्रकटीकरण दाखवते? (ब) नवीन जग काय आहे व त्यात तुम्ही कसे बचावून राहू शकता?
९ नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करण्याचा उद्देश यहोवा राखून आहे हे दाखवून देणाऱ्या इतर अनेक बायबलमधील भविष्यवादांच्या साक्षीत, प्रकटीकरण भर घालते. (यशया ६५:१७; ६६:२२; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-५) त्यातील संदेश, नवीन आकाशात त्याचे सह-अधिपती होण्यास ज्यांना येशूने त्याच्या रक्ताने विकत घेतले त्या अभिषिक्त ख्रिश्चनांना, मुख्यत्वे उद्देशून आहे. (प्रकटीकरण ५:९, १०) तथापि, ख्रिस्ताच्या राज्याखाली सार्वकालिक जीवनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो लोकांचा देखील विश्वास, ही सुवार्ता बळकट करील. त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात का? नवीन जगाचा भाग या नात्याने, उंदड शांतीच्या आनंदासह, शिरशिरी भरविणाऱ्या सदृढतेसह व कधीही अंत न होणाऱ्या देवाच्या ओतप्रोत भरुन वाहणाऱ्या तरतूदींसह नंदनवनात राहण्याची तुमची आशा, हे प्रकटीकरण अधिक बळकट करील. (स्तोत्र ३७:११, २९, ३४; ७२:१, ७, ८, १६) त्या नवीन जगात जाण्यास जर तुम्हास बचावून राहायचे आहे तर अति महत्त्वपूर्ण शेवट वा कळस हाताशीच असणाऱ्या, सुस्पष्ट चित्रांद्वारे वर्णित केलेल्या प्रकटीकरणाकडे लक्ष देण्याची ही अत्यंत तातडीची, होय, बंधनकारक वेळ आहे.—सफन्या २:३; योहान १३:१७.
[तळटीपा]
^ सुडेऊट झेइटंग, म्युनिच, जर्मनी, जानेवारी २४, १९८७.
[अभ्यासाचे प्रश्न]
[७ पानांवरील चित्र]