व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रकटीकरण आणि तुम्ही

प्रकटीकरण आणि तुम्ही

अध्याय ४४

प्रकटीकरण आणि तुम्ही

१. (अ) प्रकटीकरणातील सर्व विस्मयकारक अभिवचनांबद्दल देवदूत योहानाला कोणती खात्री देतो? (ब) “मी लवकर येतो” म्हणणारा कोण आहे व हे “येणे” कधी आहे?

 नव्या यरुशलेमेविषयीचे आनंददायक वर्णन वाचल्यावर, तुम्हाला हे विचारावेसे वाटेल: ‘एवढे विस्मयकारक खरोखर होऊ शकेल का?’ देवदूताचे पुढील शब्द उद्धृत करुन योहान या प्रश्‍नाचे उत्तर देतो: “नंतर तो मला म्हणालाः ‘ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभु [यहोवा, NW] त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपल्या दासांना कळविण्यासाठी आपल्या दूताला पाठविले आहे. पाहा! मी लवकर येतो. ह्‍या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.’” (प्रकटीकरण २२:६, ७) प्रकटीकरणातील सर्व विस्मयकारक अभिवचनांची खरीच पूर्णता होईल! येशूच्या नावाने बोलताना देवदूत घोषित करतो की येशू “लवकर” येत आहे. येशूचे ‘चोरासारखे’ हे येणे, यहोवाच्या शत्रूंना नाश करण्यासाठी व प्रकटीकरणाचा महान व आनंदी कळस घडवून आणण्यासाठी असले पाहिजे. (प्रकटीकरण १६:१५, १६) यास्तव आम्ही, धन्य म्हणवून घेण्यासाठी आमचे जीवन प्रकटीकरण, ‘ह्‍या पुस्तकात’ सांगितल्याप्रमाणे जुळवून घेतले पाहिजे.

२. (अ) प्रकटीकरणाच्या समृद्ध गोष्टीबद्दल योहान कशी प्रतिक्रिया दाखवतो व देवदूत त्याला काय म्हणतो? (ब) “सावधान!” व “भक्‍ती देवाची” कर या देवदूताच्या शब्दावरून आम्हाला काय शिकायला मिळते?

प्रकटीकरणाच्या अशा समृद्ध गोष्टी पाहिल्यानंतर, साहजिकच योहान भारावून गेला हे समजण्याजोगे आहे: “हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखविणाऱ्‍या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला, [“सावधान!” NW] असे करू नको! मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधु संदेष्टे व ह्‍या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्‍यांच्या सोबतीचा दास आहे; नमन [“दंडवत,” NW] देवाला कर.” (प्रकटीकरण २२:८, ९; प्रकटीकरण १९:१० पडताळा.) देवदूतांची भक्‍ती न करण्याविषयीचा दोनदा सांगितलेला इशारा योहानाच्या दिवसात समयोचित होता, कारण काही अशी भक्‍ती निःसंशये आचरत होते व देवदूतांकडून खास प्रकटीकरण मिळाल्याचा ते दावा करीत होते. (१ करिंथकर १३:१; गलतीकर १:८; कलस्सैकर २:१८) आज, ते यावर जोर देते की आम्ही केवळ देवाचीच भक्‍ती केली पाहिजे. (मत्तय ४:१०) आम्ही इतरांची व कशाचीही भक्‍ती करुन शुद्ध भक्‍तिस दूषित करू नये.—यशया ४२:५, ८.

३, ४. देवदूत योहानाला आणखी काय कळवितो व अभिषिक्‍त शेषांनी त्याचा शब्द कसा पाळला?

योहान पुढे कळवतो: “पुन्हा तो मला म्हणाला: ‘ह्‍या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करु नको; कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो; नीतिमान्‌ माणूस नैतिक आचरण करीत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो.’”प्रकटीकरण २२:१०, ११.

अभिषिक्‍त शेषांनी देवदूताचा शब्द आज पाळला आहे. भविष्यवाणीच्या वचनांना त्यांनी मोहोरबंद केले नाही. झायन्स वॉचटावर ॲन्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्ट्‌ प्रेझेन्स (जुलै १८७९) या पहिल्याच आवृत्तीत त्यांनी प्रकटीकरणातील अनेक वचनांवर स्पष्टीकरण दिले होते. जसे आम्ही सुरवातीच्या अध्यायात पाहिले त्याप्रमाणे वॉचटावर संस्थेने अनेक वर्षापासून प्रकटीकरणावर इतर अनेक विचारप्रवर्तक पुस्तके प्रकाशित केली आहेत. आता पुन्हा, सत्याविषयी प्रेम असलेल्या सर्वांचे लक्ष आम्ही प्रकटीकरणाच्या जोरदार भविष्यवाण्यांकडे व त्यांच्या पूर्णतेकडे नेतो.

५. (अ) प्रकटीकरणातील सल्ला व इशाऱ्‍याकडे लोकांना दुर्लक्ष करावयाचे आहे तर मग काय? (ब) नम्र आणि धार्मिक जनांचा कोणता प्रतिसाद असला पाहिजे?

प्रकटीकरणातील सल्ला व इशाऱ्‍याकडे लोकांना दुर्लक्ष करण्याची इच्छा आहे तर, त्यांना तसे करू द्या! “दुराचारी माणूस दुराचार करीत राहो.” जे या स्वैराचारी युगाच्या घाणीत लोळण्याचे निवडतात, ते याच घाणीत मरतील. मोठ्या बाबेलच्या नाशाबरोबर लगेचच यहोवाचे न्यायदंड पूर्णरितीने बजावण्यास सुरवात होईल. तेव्हा नम्र लोक संदेष्ट्याची वचने ऐकण्यास दक्ष राहोत: “यहोवाचा शोध करा. . .धार्मिकतेचा शोध करा. . .नम्रतेचा शोध करा. . .कदाचित यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टिआड व्हाल.” (सफन्या २:३, NW) ज्यांनी यहोवाला आधीच समर्पण केले आहे असे, “नीतीमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो.” समजदार माणसाला माहीत आहे की, जे धार्मिकता व पवित्रता आचरतात ते कायमच्या आशीर्वादाच्या आनंदाचा अनुभव घेतात व याच्या तुलनेत पाहिले तर पापामुळे मिळणाऱ्‍या तात्पुरत्या फायद्यांशी याची तुलना होऊ शकत नाही. बायबल म्हणते: “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा, आपली प्रतीति पाहा.” (२ करिंथकर १३:५) जे कार्य तुम्ही निवडाल त्यावर व त्यात टिकून राहण्यामुळे, तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल.—स्तोत्र १९:९-११; ५८:१०, ११.

६. भविष्यवाणीत शेवटच्या वेळी यहोवा प्रकटीकरणाच्या वाचकांना उद्देशून काय म्हणतो?

अनंत काळचा राजा, यहोवा, प्रकटीकरणाच्या वाचकांना भविष्यवाणीत शेवटल्या वेळेला उद्देशून असे म्हणतो: “पाहा! मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्‌फा व ओमेगा, म्हणजे पहिला व शेवटला, आदि व अंत असा आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.”प्रकटीकरण २२:१२-१५.

७. (अ) कशासाठी यहोवा “लवकर येतो”? (ब) नव्या यरूशलेमेत ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांना का भाग नसणार?

पुन्हा एकदा, यहोवा त्याच्या अनंत काळच्या सार्वभौमत्वावर व त्याने सुरवातीला जे योजिले होते ते शेवटी पूर्ण करण्यावर जोर देतो. न्यायदंड बजावण्यासाठी व जे त्याचा शोध मनःपूर्वक करतात अशांना प्रतिफळ देण्यासाठी तो “लवकर येतो.” (इब्रीयांस ११:६) कोणाला प्रतिफळ दिले जाईल व कोणाचा त्याग केला जाईल हे त्याचे दर्जे ठरवतील. ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक ‘मुक्या कुत्र्यांसारखे’ वागले व यहोवाने येथे वर्णन केलेल्या वाणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. (यशया ५६:१०-१२; तसेच अनुवाद २३:१८, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप पहा.) निश्‍चितच, येशूने सात मंडळ्यांना दिलेल्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपली मतप्रणाली व खोट्या तत्त्वांना त्यांनी ‘पसंत केले व आपल्याच मार्गाने चालले आहेत.’ यास्तव, नव्या यरुशलेमेत त्यांचा भाग नसणार.

८. (अ) केवळ कोण “जीवनी वृक्षांजवळ जातील,” व याचा काय अर्थ होतो? (ब) मोठ्या लोकसमुदायाने “त्यांचे झगे” कसे धुतले आहेत व ते शुद्ध भूमिका कशी टिकवून ठेवतात?

यहोवाच्या नजरेत शुद्ध दिसण्यासाठी, केवळ अभिषिक्‍त जन खरेपणाने “आपले झगे धुतात,” म्हणून त्यांना “जीवनाच्या झाडावर अधिकार” मिळतो [“जीवनी वृक्षांजवळ जातील,” NW]. यामुळे, त्यांना त्यांच्या स्वर्गीय स्थानी अमर जीवनाचा हक्क व पदवी प्राप्त होईल. (पडताळा उत्पत्ती ३:२२-२४; प्रकटीकरण २:७; ३:४, ५.) मानव या नात्याने मृत्यू आल्यावर त्यांना पुनरूत्थानाद्वारे नव्या यरुशलेमेत प्रवेश मिळतो. १२ देवदूत त्यांना आत जाऊ देतात; परंतु जे कोणी लबाडी व अशुद्ध काम करुन स्वर्गीय आशा असल्याचा दावा करतात त्यांना मात्र ते बाहेर ठेवतात. पृथ्वीवरील मोठ्या लोकसमुदायानेही “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत” व त्यांना त्यांची शुद्ध भूमिका टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे. यहोवाने ज्याच्याविरूद्ध येथे इशारा दिला आहे ते अनैतिक वर्तन टाळून, त्याचप्रमाणे येशूने मंडळ्यांना दिलेल्या सात संदेशाचा बोध मनात घेऊन ते असे करू शकतात.—प्रकटीकरण ७:१४; अध्याय २ व ३.

९. येशू कोणते शब्द बोलतो आणि त्याचा संदेश व संपूर्ण प्रकटीकरण प्रामुख्याने कोणाला उद्देशून संबोधलेले आहे?

यहोवानंतर आता येशू बोलतो. प्रकटीकरणाचे वाचन करणाऱ्‍या चांगल्या अंतःकरणाच्या लोकांना तो उत्तेजन देऊन संबोधतो: “ह्‍या गोष्टींविषयी तुम्हास साक्ष देण्याकरिता मी, येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरिता पाठविले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानहि; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. (प्रकटीकरण २२:१६) होय, हा संदेश प्रामुख्याने, “मंडळ्यांकरिता” आहे. तो प्रथमतः पृथ्वीवरील अभिषिक्‍ताच्या मंडळीकरता आहे. प्रकटीकरणातील सर्व गोष्टी खासपणे नव्या यरुशलेमेत वस्तीकरता प्रवेश मिळवणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी लिहिलेल्या आहेत. याच मंडळीद्वारे मोठ्या लोकसमुदायाला देखील मौल्यवान भविष्यवादित सत्याची समज प्राप्त होण्याचा सुहक्क मिळाला आहे.—योहान १७:१८-२१.

१०. येशू स्वतःविषयी (अ) “दाविदाचे अंकुर व संतान” (ब) “पहाटचा तेजस्वी तारा” असे का म्हणतो?

१० योहानाला प्रकटीकरण देण्याची जबाबदारी येशूवर सोपविली होती व मंडळ्यांना योहानाद्वारे सोपविली होती. येशू ‘दाविदाचा अंकुर व संतान’ दोन्ही आहे. दैहिकरित्या तो दाविदाकडून आला होता त्यामुळे यहोवाच्या राज्याचा राजा होण्यास पात्र बनला. तो दाविदाचा “सनातन पिता,” व त्यानुसार दाविदाचा “अंकुर” बनेल. (यशया ९:६; ११:१, १०) हा दाविदाच्या वंशातून आलेला कायमचा, अमर राजा आहे, जो, यहोवाने दाविदाला दिलेल्या कराराची पूर्तता करतो; तोच मोशेच्या दिवसात भाकीत केलेला “पहाटचा तेजस्वी तारा” आहे. (गणना २४:१७; स्तोत्र ८९:३४-३७) तो उगवणारा व दिवस उजाडणारा “पहाटचा तारा” आहे. (२ पेत्र १:१९) महाशत्रू मोठ्या बाबेलच्या सर्व लबाड्या या वैभवशाली उगवण्याला परावृत्त करण्यास समर्थ झाल्या नाहीत.

म्हणो: “ये!”

११. योहान आता कोणते खुले आमंत्रण प्रस्तुत करीत आहे व कोण याला प्रतिसाद देऊ शकतात?

११ आता योहानाची बोलण्याची पाळी आहे. त्याने जे काही पाहिले व ऐकले त्याची हृदयापासून गुणग्राहकता दाखवून तो म्हणतो: “आत्मा व वधू ही म्हणतात ‘ये!’ ऐकणाराहि म्हणो: ‘ये!’ आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. (प्रकटीकरण २२:१७) येथे सर्वांसाठी आमंत्रण खुले असल्यामुळे, येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचा फायदा केवळ १,४४,००० जनांपुरताच मर्यादित राहात नाही. ‘जीवनाचे पाणी फुकट घ्या’ हा संदेश अधिक स्पष्टपणे घोषित करण्यासाठी यहोवाचा प्रवृत्त आत्मा वधू वर्गाद्वारे कार्य करीत आहे. (यशया ५५:१; ५९:२१ हेही पहा.) जो कोणी धार्मिकतेचा तान्हेला असेल त्याला ‘येऊन’ यहोवाचे औदार्य मिळवण्याचे आमंत्रण दिले आहे. (मत्तय ५:३, ६) अभिषिक्‍त योहान वर्गाच्या आमंत्रणास प्रतिसाद देणारा पृथ्वीवरील भावी आशा असलेला वर्ग, खरोखर किती सुहक्क असणारा आहे!

१२. प्रकटीकरण २२:१७ मधील आमंत्रणाला मोठा लोकसमुदाय कसा प्रतिसाद देतो?

१२ या आमंत्रणाकडे १९३० च्या दशकापासून, वाढत असलेला मोठा लोकसमुदाय ‘ऐकत’—व लक्ष देत आहे. त्यांच्या सोबतीच्या अभिषिक्‍त दासांप्रमाणे त्यांनी यहोवासमोर शुद्ध भूमिका मिळवली आहे. नवे यरुशलेम स्वर्गातून उतरून मानवजातीला आशीर्वाद देण्याच्या मार्गाची ते वाट पाहत आहेत. प्रकटीकरणाचा उत्साहवर्धक संदेश ऐकल्यावर, मोठा लोकसमुदाय केवळ “ये!” असे म्हणत नाही तर, यहोवाच्या संस्थेत इतरांना क्रियाशीलपणे एकत्र करीत आहेत आणि यांनाही “तान्हेला येवो,” असे म्हणण्याची तालीम देत आहेत. मोठ्या लोकसमुदायाची संख्या सतत वाढत आहे, ‘जीवनाचे पाणी फुकट घ्या’ हे आमंत्रण, अभिषिक्‍त वधू वर्गाच्या ८,७०० पेक्षा कमी असलेल्या सदस्यांबरोबर ते २३० पेक्षा अधिक देशातील, सर्व पृथ्वीभरातील ४४,०००,०० पेक्षा अधिक लोक देत आहेत.

१३. येशू कोणता इशारा देतो?

१३ आता पुढे येशू आणखी बोलत आहे, तो म्हणतो: “ह्‍या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्‍या प्रत्येकाला मी निश्‍चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ह्‍यांत भर घालील, त्याच्यावर ह्‍या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील आणि जो कोणी ह्‍या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील, त्याचा वाटा ह्‍या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडांतून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.प्रकटीकरण २२:१८, १९.

१४. प्रकटीकरणातील ‘संदेशवचनांकडे’ योहान वर्ग कोणत्या दृष्टीने पाहतो?

१४ योहान वर्गात असलेल्यांनी प्रकटीकरणातील ‘संदेशवचनांकडे’ लक्ष दिले पाहिजे. त्यांनी तिला लपवू नये किंवा तिच्यात भर टाकू नये. तिचा संदेशाचा त्यांनी उघडपणे “धाब्यावरून” प्रचार केला पाहिजे. (मत्तय १०:२७) प्रकटीकरण देवप्रेरित आहे. देवाने स्वतः उच्चारलेले व आता जो राज्य करीत आहे त्या येशू ख्रिस्ताद्वारे पाठविलेल्या शब्दात बदल करण्याचे धाडस कोण करील बरे? निश्‍चितच, असा व्यक्‍ती जीवन गमावू शकेल व मोठ्या बाबेलवर आणि संपूर्ण जगावर येणाऱ्‍या पीडा त्याला भोगाव्या लागतील.

१५. तो ‘ह्‍या गोष्टीविषयी साक्ष देतो’ व “मी लवकर येतो” या येशूच्या शब्दांचा काय अर्थबोध होतो?

१५ येशू आता समाप्तीचे उत्तेजनपर शब्द बोलतो: “ह्‍या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, ‘होय; मी लवकर येतो.’” (प्रकटीकरण २२:२०अ) येशू हा “विश्‍वसनीय व खरा साक्षी” आहे. (प्रकटीकरण ३:१४) प्रकटीकरणातील दृष्टांताची तो साक्ष देतो, तर ते खरे असले पाहिजे. दोघेही, तो व स्वतः यहोवा देव “लवकर” येतात हे पुन्हा पुन्हा जोर देऊन सांगतात, येशू येथे पाचव्यांदा असे बोलत आहे. (प्रकटीकरण २:१६; ३:११; २२:७, १२, २०) ते ‘येणे’ मोठ्या कलावंतिणीवर, राजनैतिक “राजे” व सर्व जे ‘आमच्या प्रभूच्या [यहोवा] व ख्रिस्ताच्या राज्यास’ विरोध करतात अशांवर न्यायदंड बजावण्यासाठी आहे.—प्रकटीकरण ११:१५; १६:१४, १६; १७:१, १२-१४.

१६. यहोवा देव व येशू लवकरच येत आहेत हे माहीत असल्यामुळे, कोणती निश्‍चयी कृती तुम्ही आचरली पाहिजे?

१६ यहोवा देव व येशू लवकर येतात हे तुम्हाला माहीत असल्यामुळे, ‘देवाचा दिवस येण्याची वाट पहात राहाण्याचे’ उत्तेजन तुम्हास मिळाले पाहिजे. (२ पेत्र ३:१२) पृथ्वीवरील सैतानी व्यवस्थीकरणाची वाटणारी स्थिरता भ्रामक आहे. सैतानाच्या अधीन राहून जगीक सरकारच्या शासकांनी तात्पुरते मिळविलेले यश क्षणिक असेल. या गोष्टी राहणार नाहीत. (प्रकटीकरण २१:१) यहोवाचे येशू ख्रिस्ताद्वारे असलेले व त्याने अभिवचन दिलेल्या नवीन जगातील राज्य यातच खरी स्थिरता मिळू शकते. याला दृष्टिआड होऊ देऊ नका!—१ योहान २:१५-१७.

१७. यहोवाच्या पवित्रतेच्या गुणग्राहकतेचा तुमच्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

१७ प्रकटीकरणातील अभ्यासाद्वारे तुम्ही जे काही शिकलात, त्याचा तुमच्या जीवनावर खोल परिणाम होऊ द्या. यहोवाच्या स्वर्गीय उपस्थितीवर दृष्टि टाकल्यावर, आमच्या निर्माणकर्त्याची महिमा व पवित्रता याविषयी तुम्हावर छाप पडली नाही का? (प्रकटीकरण ४:१-५:१४) अशा देवाची सेवा करणे केवढा विशेषाधिकार आहे! त्याच्या पवित्रतेच्या गुणग्राहकतेमुळे, येशूने सात मंडळ्यांना दिलेला सल्ला गंभीरपणे घेण्याकडे तुम्ही वळले पाहिजे व जडवाद, मूर्तीपूजा, अनैतिकता, कोंबटपणा, धर्मत्यागी गटबाजी अशा गोष्टींना टाळले पाहिजे, कारण यामुळे यहोवाला तुमची सेवा स्वीकृत वाटणार नाही. (प्रकटीकरण २:१-३:२२) योहान वर्गासाठी असलेले प्रेषित पेत्राचे शब्द मोठ्या लोकसमुदायाला देखील तात्त्विक रूपाने लागू होतात: “तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा”—१ पेत्र १:१५, १६.

१८. तुम्ही शक्य तेवढा कशात पूर्ण सहभाग घेतला पाहिजे व हे काम आज एवढ्या निकडीचे का आहे?

१८ याचप्रमाणे, “परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस” याची घोषणा करीत असताना तुमचा आवेश नवा होत राहो. (यशया ३५:४; ६१:२) तुम्ही लहान कळपातील असा किंवा मोठ्या लोकसमुदायातील असा, सैतानी जगावर देवाचे न्यायदंड विदित करण्यासाठी, यहोवा देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या ओतण्याचे घोषित करण्यास पूर्ण सहभाग घ्या. याचबरोबर, यहोवा व त्याच्या ख्रिस्ताच्या स्थापित झालेल्या राज्याच्या सार्वकालिक सुवार्तेची आनंदाने घोषणा करण्यात तुमच्या आवाजाची साथ द्या. (प्रकटीकरण ११:१५; १४:६, ७) हे काम नेटाने करा. आपण प्रभूच्या दिवसात आहोत हे जाणून, जे अद्याप यहोवाची सेवा करीत नाहीत असे पुष्कळ जण सुवार्ता घोषित करण्यात सहभाग घेण्यासाठी वळोत. ते देखील देवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याप्रत प्रगती करोत. लक्षात ठेवा, “[नियुक्‍त NW] समय जवळ आला आहे”!—प्रकटीकरण १:३.

१९. वृद्ध प्रेषित योहानाचे समाप्तीचे कोणते शब्द आहेत व तुम्ही याला कसा प्रतिसाद द्याल?

१९ यास्तव, योहानासोबत आम्ही कळकळीने प्रार्थना करतो: “आमेन! ये, प्रभु येशू ये. वृद्ध प्रेषित योहान पुढे म्हणतो: “प्रभु येशू [खिस्ताची] कृपा पवित्र जनांबरोबर असो. (प्रकटीकरण २२:२०ब, २१, NW) हे प्रकाशन वाचणाऱ्‍या तुम्हा सर्वांसोबतही ती असो. प्रकटीकरणाचा महान कळस जवळ आहे याचा तुम्हाला विश्‍वास असो व मग तुम्हीहि अंतःकरणपूर्वक “आमेन!” म्हणण्यासाठी आमच्यात सामील व्हाल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३१४ पानांवरील चित्रे]

“कुत्रे . . . बाहेर राहतील”

[३१५ पानांवरील चित्रे]

‘वेशीतून नगरीत प्रवेश मिळालेले धन्य.’