व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचा भव्य विषय

बायबलचा भव्य विषय

अध्याय २

बायबलचा भव्य विषय

शास्त्रवचनांचा उलगडा करणे प्रकटीकरणाच्या पुस्तकातील दडलेल्या रहस्यांनी बायबलच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना बऱ्‍याच काळापासून गोंधळात पाडले होते. देवाच्या नियुक्‍त समयी ती रहस्ये उलगडणार होती पण कशी, केव्हा व कोणाद्वारे? नेमलेला काळ जवळ आला म्हणजे केवळ देवाचा आत्मा त्या अर्थाचा उलगडा करु शकत होता. (प्रकटीकरण १:३) ती पवित्र रहस्ये देवाच्या पृथ्वीवरील आवेशी दासांना प्रकटविली जाणार होती व यामुळे त्यांना त्याच्या न्यायदंडांना घोषित करण्यात बळकटी येणार होती. (पडताळा मत्तय १३:१०, ११.) या प्रकाशनात देण्यात आलेली स्पष्टीकरणे कधीही न चुकणारी आहेत असा दावा केलेला नाही. प्राचीन काळच्या योसेफाप्रमाणेच आम्ही देखील असे म्हणतो की, “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना?” (उत्पत्ती ४०:८) पण याच वेळी, आमचा हा पूर्ण विश्‍वास आहे की, येथे देण्यात आलेली स्पष्टीकरणे ही बायबलच्या पूर्ण सहमतात असून ती, आमच्या या महासंकटाच्या काळात ईश्‍वरी भविष्यवाद केवढ्या अपूर्वपणे पूर्ण झालेले आहेत ते दाखवितात.

१. यहोवाचा भव्य उद्देश काय आहे?

 बायबलमधील एक बोधवचन असे म्हणते: “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा.” (उपदेशक ७:८) सर्व निर्मितीसमोर आपले नाव पवित्र करावे या यहोवाच्या भव्य उद्देशाच्या, नाट्यमय कळसाचे वाचन, आम्ही प्रकटीकरण या पुस्तकात करतो. देवाने आपल्या आधीच्या संदेष्ट्यामार्फत हे वेळोवेळी घोषित केले की: “तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे.”—यहेज्केल २५:१७; ३८:२३.

२. बायबलमधील प्रकटीकरण, आधीच्या इतर पुस्तकासहित आम्हाला कोणते समाधानकारक ज्ञान मिळविण्याची मदत करते?

अनेक गोष्टींचा विजयी शेवट, प्रकटीकरण जसे स्पष्ट रितीने दाखवून देते, त्याचप्रमाणे त्या गोष्टींची सुरवात आम्हाकरता, बायबलच्या सुरवातीच्या पुस्तकात वर्णिली आहे. ह्‍या अहवालाच्या परीक्षणाद्वारे, उपस्थित झालेला वादविषय आणि देवाच्या उद्देशांचा सर्वसाधारण दृष्टिकोन, यांची समज प्राप्त होण्यास आम्हास शक्य झालेले आहे. हे किती समाधानकारक आहे! शिवाय त्याने आम्हास हालचाल करण्यास प्रवृत्त करावे की ज्यामुळे मानवजातीकरता वाट पाहून असलेले अद्‌भुत भवितव्य याची आम्ही सहभागिता करू शकू. (स्तोत्र १४५:१६, २०) या ठिकाणी, सबंध बायबलची पार्श्‍वभूमी आणि विषय, याची चर्चा करणे उचित दिसते, ते याकरता की, सबंध मानवजात ज्यास तोंड देऊन आहे, त्याचप्रमाणे तो निकालात काढण्याविषयी देवाने स्पष्ट विदित केलेला उद्देश, असा प्रामुख्याने महत्त्वपूर्ण असलेला वादविषय आमच्या विचाराधीन असावा.

३. उत्पत्तीच्या पुस्तकात असणारा कोणता भविष्यवाद, प्रकटीकरणासहित सबंध बायबलला एक विषय देतो?

बायबलचे पहिले पुस्तक, उत्पत्ती, ‘प्रारंभाविषयी’ सांगते आणि पृथ्वीवरील शिरोमणी निर्मितीस, मानवास निर्माण करण्यासह, ते देवाच्या निर्मितीच्या कार्याचे वर्णन करते. जवळजवळ ६,००० वर्षांपूर्वी एदेन बागेत, ज्याचा उच्चार देवाने स्वतः केला होता, त्या सर्वप्रथम ईश्‍वरी भविष्यवादाची घोषणासुद्धा, उत्पत्ती हे पुस्तक करते. पहिली स्त्री, हव्वा हिला फसविण्यास एका सर्पाचा उपयोग नुकताच केलेला होता; परिणामी “बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ” खाऊन, यहोवाच्या नियमाची अवज्ञा तिच्यासोबत करण्यासाठी तिने आपला पती आदाम याचे मन वळविले. त्या पापी दांपत्यावर न्यायदंड घोषित करताना देव सर्पास म्हणाला: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ती १:१; २:१७; ३:१-६, १४, १५) तो भविष्यवाद प्रकटीकरणासह संपूर्ण बायबलसाठी एक शीर्षक प्रस्तुत करतो.

४. (अ) देवाने पहिला भविष्यवाद उच्चारल्यावर, आमच्या पहिल्या पालकांच्या बाबतीत काय घडले? (ब) पहिल्या भविष्यवादासंबंधाने कोणकोणते प्रश्‍न उद्‌भवतात आणि आम्हाला याची उत्तरे जाणण्याची गरज का आहे?

त्या भविष्यवादाचा उच्चार केल्यावर देवाने ताबडतोब आमच्या आद्य पालकांना एदेनमधून बाहेर घालविले. नंदनवनातील सार्वकालिक जीवनाची यापुढे ते वाट पाहू शकत नव्हते; बाहेरील तयार नसलेल्या भूमीवर त्यांना जीवन जगावे लागणार होते. मृत्युदंडाखाली ते पापी लेकरांना निपजवणार होते. (उत्पत्ती ३:२३–४:१; रोमकर ५:१२) तरीदेखील, एदेनमधील त्या भविष्यवादाचा काय अर्थ होतो? त्यात कोणकोण गोवलेले आहेत? प्रकटीकरणासोबत त्याचा कसा संबंध जुळतो? आम्हासाठी आज, त्याचा काय संदेश आहे? ज्या दुःखद घटनेने, तो भविष्यवाद वदविण्यास यहोवास निरविले, त्याच्या परिणामापासून व्यक्‍तिगत सुटका मिळवण्याकरता, या प्रश्‍नांची उत्तरे आम्हाला ठाऊक असणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

नाटकातील प्रमुख व्यक्‍ती

५. सर्पाने हव्वेची फसवणूक केल्यावर, देवाचे सार्वभौमत्व व त्याचे नाव यासंबंधाने काय घडले आणि हा वादविषय कसा सोडवण्यात येईल?

हव्वेशी लबाड बोललेल्या सर्पाला उद्देशून उत्पत्ती ३:१५ चा भविष्यवाद आहे. त्याने हव्वेला सुचवले होते की, तिच्या अवज्ञेमुळे ती मरणार नव्हती, तर ती स्वतंत्र, एक देवता, बनू शकेल. अशाप्रकारे, दियाबलाने यहोवास लबाड ठरविण्याचा प्रयत्न केला आणि मानवास अशी फूस लावली की, ते देवाचे अधिपत्य नाकारून आपले जीवन अधिक सुधारू शकतील. (उत्पत्ती ३:१-५) यहोवाच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले गेले व त्याचे उत्तम नाव कलंकित केले गेले. प्रकटीकरणाचे पुस्तक त्याच्या सार्वभौमत्वाचे सत्यत्व स्थापित करण्यास व त्याच्या नावावरील कलंक दूर करण्यास नीतीमान न्यायाधीश यहोवा, आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या राज्यसत्तेचा कसा वापर करतो त्याचे वर्णन देते.—प्रकटीकरण १२:१०; १४:७.

६. हव्वेशी सर्पाद्वारे भाष्य करणाऱ्‍याची ओळख प्रकटीकरण कशी करून देते?

“सर्प” ही संज्ञा केवळ खरोखरीच्या सापाला लागू होणारी आहे का? मुळीच नाही! त्या सापाद्वारे बोललेल्या कुविख्यात आत्मिक प्राण्याची ओळख प्रकटीकरण आम्हास देते. तो “मोठा अजगर, . . . सर्व जगाला ठकविणारा, जो ‘दियाबल व सैतान’” होता. त्याने “कपट करून हव्वेला ठकविले.”—प्रकटीकरण १२:९; २ करिंथकर ११:३.

७. उत्पत्ती ३:१५ मध्ये असणारी स्त्री ही आत्मिक क्षेत्रातील आहे हे कशावरुन कळते?

पुढे उत्पत्ती ३:१५ हे एका ‘स्त्रीबद्दल’ बोलते. ती हव्वा होती का? तिला बहुधा तसेच वाटले असावे. (पडताळा उत्पत्ती ४:१.) परंतु, ५,००० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी हव्वा मृतवत्‌ झाली तेव्हा, हव्वा व सैतान यांच्यामधील दीर्घकाळ टिकून राहणारे शत्रुत्व अशक्य झाले. शिवाय ज्या सर्पास उद्देशून यहोवा बोलला, तो जर एक अदृश्‍य आत्मा आहे, तर ती स्त्री देखील आत्मिक क्षेत्रातील असण्याची अपेक्षा आम्ही बाळगावी. प्रकटीकरण १२:१, २ याची खात्री पुरविते. ते दाखवून देते की, ही लाक्षणिक स्त्री म्हणजे, आत्मिक प्राण्यांची मिळून बनलेली, यहोवाची स्वर्गीय संस्था आहे.—तसेच यशया ५४:१, ५, १३ देखील पहा.

विरोधात असणाऱ्‍या दोन संतती

८. दोन संततीच्या बाबतीत आता जे सांगण्यात आले आहे त्याविषयी आम्ही गाढ रसिकता का बाळगली पाहिजे?

यानंतर उत्पत्ती ३:१५ मध्ये दोन संतती दृश्‍यमान होतात. पृथ्वीवरील यथायोग्यतेतील सार्वभौमत्वाच्या महान वादविषयाशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांच्याबाबत आम्ही अधिक आस्थेवाईक असले पाहिजे. तरुण असो की वृद्ध, त्यात आम्ही प्रत्येकजण गोवलेलो आहोत. या संततीपैकी कोणाच्या पक्षात तुम्ही आहात?

९. सैतानाच्या संततीमध्ये निश्‍चये कशाचा समावेश आहे?

प्रथम, संतती किंवा संतान त्या सर्पाचे आहे. ते काय आहे? खात्रीने त्यामध्ये अशा इतर आत्मिक प्राण्यांचा समावेश आहे, जे सैतानाच्या बंडखोरीत त्याला जाऊन मिळाले आणि ज्यांना शेवटी, पृथ्वीच्या आसमंतात ‘त्याच्यासोबत . . . टाकण्यात’ आले आहे. (प्रकटीकरण १२:९) जर, सैतान किंवा बालजबूल हा ‘दुरात्म्यांचा अधिपती’ आहे तर, हे स्पष्ट आहे की ते सर्व मिळून त्याची अदृश्‍य संस्था बनतात.—मार्क ३:२२; इफिसकर ६:१२.

१०. बायबल इतरांना सैतानाच्या संतानाचे भाग असल्याचे कसे दाखवून देते?

१० पुढे, येशूने त्याच्या काळातील यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांना असे सांगितले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता.” (योहान ८:४४) देवाचा पुत्र येशू याला केलेल्या विरोधामुळे त्या धार्मिक नेत्यांनी दाखवून दिले की, तेसुद्धा सैतानाची संतती होते. सैतानाची, लाक्षणिक पिता या नात्याने सेवा करीत राहून ते त्याच्या संततीचा भाग होते. सबंध इतिहासातील काळात इतर अनेक मानवांनी, विशेषतः येशूच्या शिष्यांचा विरोध व छळ करीत राहून सैतानाची सेवा करून अशाचप्रकारे आपली ओळख करून दिली. अशाप्रकारे या मानवांचे सामुहिकरित्या, या पृथ्वीवरील सैतानाची दृश्‍य संस्था बनविणारे, असे वर्णन केले जाऊ शकते.—पहा योहान १५:२०; १६:३३; १७:१५.

स्त्रीच्या संतानाची ओळख मिळते

११. स्त्रीच्या संतानाबद्दल, देव, काळाच्या ओघात काय काय प्रकट करीत गेला?

११ शेवटी, उत्पत्ती ३:१५ मधील भविष्यवाद स्त्रीच्या संततीचा उल्लेख करतो. सैतान जेव्हा त्याच्या संततीत वाढ करीत होता, त्यावेळी एका संततीची प्रस्तुती करण्यासाठी यहोवा त्याच्या “स्त्रीस” किंवा पत्नीसमान त्याच्या स्वर्गीय संस्थेस तयार करीत होता. गेली ४,००० वर्षे आज्ञाधारक देवभिरु लोकांना त्या येणाऱ्‍या संततीविषयीचा तपशील, यहोवाने प्रगतीशीलपणे प्रकट केला. (यशया ४६:९, १०) अशाप्रकारे, अब्राहाम, इसहाक याकोब आणि इतरांच्या वंशावळीत ती संतती दृश्‍यमान होईल, या अभिवचनावर ते विश्‍वासाची उभारणी करू शकले. (उत्पत्ती २२:१५-१८; २६:४; २८:१४) त्यांच्या अटळ विश्‍वासामुळेच अशा यहोवाच्या सेवकांचा, सैतान व त्याच्या अनुयायांनी वारंवार छळ केला.—इब्रीयांस ११:१, २, ३२-३८.

१२. (अ) स्त्रीच्या संतानातील प्रमुख केव्हा व कोणत्या घटनेसह सामोरा आला? (ब) येशूचा कोणत्या उद्देशास्तव अभिषेक करण्यात आला?

१२ सरतेशेवटी, आमच्या सामान्य युगाच्या २९ व्या वर्षी परिपूर्ण मानव येशू याने यार्देन नदीजवळ स्वतःला सादर केले व त्याचा बाप्तिस्मा केला गेला. तेथे यहोवाने पवित्र आत्म्याकरवी येशूला जन्म दिला व म्हटले: “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१७) तेथे येशूची, देवाच्या स्वर्गीय संस्थेतून पाठविला गेलेला, अशी ओळख करून दिली गेली. सबंध पृथ्वीवर यहोवाच्या नावाने अधिपत्याची पुनर्स्थापना करणाऱ्‍या स्वर्गीय राज्याचा नियोजित राजा या नात्याने देखील त्यास अभिषिक्‍त करण्यात आले. अशाप्रकारे ज्यात सरकार किंवा सार्वभौमत्व गोवले गेले आहे असा, वादविषय एकदाच व कायमचा निकालात काढला जाणार होता. (प्रकटीकरण ११:१५) यावरुन, त्या स्त्रीच्या संततीपैकी येशू एक प्रमुख संतती होता; तो पूर्वभाकीत मशीहा होता.—पडताळा गलतीकर ३:१६; दानीएल ९:२५.

१३, १४. (अ) स्त्रीचे संतान केवळ एकच प्रमुख व्यक्‍ती असू शकत नाही याबद्दल आम्हाला आश्‍चर्य का वाटू नये? (ब) संततीचा दुय्यम भाग बनण्यासाठी देवाने मानवजातीतून किती जणांची निवड केली आहे आणि यांचे मिळून कोणते संघटन बनते? (क) या संतानासोबत आणखी कोण ऐक्याने सेवा करीत आहेत?

१३ त्या स्त्रीची संतती केवळ एकच प्रमुख व्यक्‍ती असणार का? बरे तर, सैतानाच्या संततीविषयी काय? बायबल सैतानाच्या संततीची ओळख करून देताना, त्यात दुष्ट देवदूतांचा व देवाचा अनादर करणाऱ्‍या मानवी समुहाचा समावेश करते. यासाठीच मशीही संतान येशू ख्रिस्त याजसोबत याजकीय सहराजे बनण्याकरता, मानवजातीतून सचोटी राखणाऱ्‍या १,४४,००० ची निवड करण्याचा देवाचा उद्देश जाणून घेण्यात, आम्हास आश्‍चर्य वाटू नये. देवाच्या स्त्रीसमान असलेल्या संस्थेच्या शत्रुत्वात “तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास” सैतान निघून गेला, असे म्हणताना प्रकटीकरण त्या संततीचा उल्लेख करते.—प्रकटीकरण १२:१७; १४:१-४.

१४ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना बायबलमध्ये येशूचे भाऊ असे म्हटले आहे व त्याचे भाऊ या नात्याने त्यांचे पिता व माता हे समाईक आहेत. (इब्रीयांस २:११) यहोवा देव त्यांचा पिता आहे. म्हणूनच ती “स्त्री,” पत्नीसमान देवाची स्वर्गीय संस्था, त्यांची माता असलीच पाहिजे. येशू ख्रिस्त प्राथमिक भाग असल्यामुळे ते त्या संततीचा दुय्यम भाग बनतात. आत्म्याने जन्मलेल्या ह्‍या ख्रिश्‍चनांची मंडळी, पृथ्वीवरील देवाची दृश्‍य संस्था बनविते, जी त्याच्या स्त्रीसमान स्वर्गीय संस्थेखाली सेवा करते. ते स्वर्गात, पुनरुत्थानाच्या वेळी ख्रिस्त येशूसोबत एकत्र होतील. (रोमकर ८:१४-१७; गलतीकर ३:१६, २९) सर्व राष्ट्रातून सामोरा आलेला, दुसरी मेंढरे यांचा लाखोंचा समुदाय हा जरी त्या संततीचा भाग नसला तरी, देवाच्या पृथ्वीवरील संस्थेसोबत सेवा करण्यास त्याचे एकत्रीकरण होत आहे. या दुसऱ्‍या मेंढरांपैकी यातील तुम्ही एक आहात का? तर मग, पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन ही तुमची आनंदी आशा आहे.—योहान १०:१६; १७:१-३.

शत्रुत्व कसे वाढले

१५. (अ) सैतानाच्या मानवी तसेच देवदूतीय संतानाची कशी वाढ झाली त्याचे वर्णन करा. (ब) नोहाच्या काळी जलप्रलय घडल्यावर सैतानाच्या संतानाचे काय झाले?

१५ मानवजातीच्या इतिहासात फारच लवकर सैतानाच्या मानवी संततीने प्रकट होण्यास सुरवात केली. उदाहरणार्थ, प्रथम जन्मलेला मानव काइन, “त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा [हाबेलचा] वध केला.” (१ योहान ३:१२) त्यानंतर, हनोख याने यहोवाच्या येण्याविषयी असे म्हटले: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि भक्‍तिहीन लोकांनी अभक्‍तीने केलेल्या आपल्या सर्व भक्‍तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्‍तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यावरुन त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित येईल.” (यहूदा १४, १५) शिवाय, बंडखोर देवदूत सैतानास येऊन मिळाले व त्याच्या संततीचा भाग बनले. या देवदूतांनी पार्थिव देह धारण करून मानव कन्यांशी विवाह करण्याकरता त्यांचे स्वर्गातील योग्य असे ‘स्वस्थान सोडले.’ त्यांनी दंगलखोर अमानवी मिश्रजातीय संतती निपजविली. ते जग हिंसाचार व वाईटाने भरलेले असे झाले, त्यामुळे देवाने जलप्रलयात त्याचा नाश केला, त्यात विश्‍वासू नोहा व त्याचे कुटुंब इतकेच मानव बचावले. आज्ञाभंजक देवदूत, जे सध्या सैतानाच्या नियंत्रणाखाली दुरात्मे आहेत, त्यांना, नाशास पात्र ठरवलेल्या बायका व संकरित मुले सोडण्यास भाग पाडले गेले. पार्थिव देहाचा त्याग करून आत्मिक क्षेत्रात परत गेले. तेथे सैतान व त्याची संतती यांच्यावर त्वरेने बजावल्या जाणाऱ्‍या न्यायदंडाची ते वाट पाहात आहेत.—यहूदा ६; उत्पत्ती ६:४-१२; ७:२१-२३; २ पेत्र २:४, ५.

१६. (अ) जलप्रलयानंतर कोणता जुलमी सामोरा आला आणि त्याने, आपण सैतानाच्या संततीचा भाग आहोत हे कसे दाखवून दिले? (ब) बाबेलचा बुरुज बांधणाऱ्‍यांचा बेत देवाने कसा उधळून लावला?

१६ त्या मोठ्या जलप्रलयानंतर लवकरच, निम्रोद नावाचा एक जुलमी पृथ्वीवर सामोरा आला. ‘यहोवा समोर बलवान पारधी,’ अशाप्रकारे बायबल त्याचे वर्णन करते—खरोखरी त्या सर्पाची संतती असा तो होता. सैतानासारखा बंडखोरीचा आत्मा त्याने प्रदर्शित केला आणि सर्व पृथ्वी भरुन टाकण्यास मानवजात पांगविली जावी या यहोवाच्या उद्देशास तुच्छ लेखून, बाबेल नगराची किंवा बाबेलोनची बांधणी केली. “गगनचुंबी शिखराचा” असा एक मोठा बुरुज बांधण्याचे बाबेलचे मुख्य काम होते. त्या बुरुजाचे बांधकाम करणाऱ्‍यास देवाने निष्क्रिय केले. त्याने त्यांच्या भाषेत घोटाळा केला व तेथून “त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले,” परंतु स्वतः बाबेल नगराला मागे राहण्यास अनुमती दिली.—उत्पत्ती ९:१; १०:८-१२; ११:१-९.

राजकीय सत्ता दृष्टिपथास येतात

१७. मानवजातीची वाढ होत असता मानवी समाजाचा कोणता भ्रष्ट भाग सामोरा आला व याच्या परिणामात कोणती मोठी साम्राज्ये उद्‌भवली?

१७ यहोवाच्या सार्वभौमत्वास आव्हान विकसित करणाऱ्‍या मानवी समाजाची लक्षणे त्या बाबेलमध्ये दिसून आली. त्यापैकी एक राजकारण होते. मानवजात जशी बहुगुणित होत गेली, तसे सत्ता बळकावून घेण्यास इतर महत्त्वाकांक्षी लोकांनी निम्रोदचे उदाहरण अनुसरले. मानवाने मानवावर अधिकार गाजवून त्यांस इजा पोहंचविली. (उपदेशक ८:९) उदाहरणार्थ, अब्राहामाच्या दिवसात, शिनार व इतर दूरवरच्या राजांच्या नियंत्रणाखाली, सदोम, गमोरा व आसपासची नगरे आली. (उत्पत्ती १४:१-४) परिणामी, लष्करी व संघटनात्मक बुद्धिमान लोकांनी स्वतःच्या संपन्‍नतेकरता व गौरवाकरता मोठी साम्राज्ये स्वतःच्या श्रमाने मिळविली. मिसर, अश्‍शुर, बाबेल, मेद-पारस, ग्रीस व रोम यांच्यासह बायबल काहींचा उल्लेख करते.

१८. (अ) राजकीय शासनकर्त्यांबद्दल देवाचे लोक कोणती मनोवृत्ती बाळगून आहेत? (ब) राजकीय अधिकाऱ्‍यांनी कधी कधी देवाच्या आस्थेनुरुप कशी सेवा केली आहे? (क) कित्येक शासनकर्त्यांनी स्वतःला सैतानाच्या संतानाचे भाग असल्याचे कसे दाखवून दिले आहे?

१८ त्या राजकीय सत्तांचे अस्तित्व यहोवाने सहन केले आणि त्याच्या लोकांनी त्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्‍या देशात जेव्हा वास्तव्य केले तेव्हा त्यांनी त्यांना सापेक्ष आज्ञाधारकता दर्शविली. (रोमकर १३:१, २) काही वेळा, राजकीय अधिकाऱ्‍यांनी देवाच्या उद्देशाची वाढ करण्यास किंवा त्याच्या लोकांना संरक्षण या नात्याने त्यांची सेवा देखील केली. (एज्रा १:१-४; ७:१२-२६; प्रेषितांची कृत्ये २५:११, १२; प्रकटीकरण १२:१५, १६) तथापि, अनेक राजकीय अधिकाऱ्‍यांनी खऱ्‍या भक्‍तीस क्रूर विरोध केलेला आहे व सर्पाच्या संततीचा स्वतः भाग असल्याचे दाखवून दिले.—१ योहान ५:१९.

१९. जागतिक साम्राज्यांचे चित्रण प्रकटीकरणाच्या पुस्तकात कसे करण्यात आले आहे?

१९ मानव सत्तेचा बहुतेक भाग, आम्हा मानवास सौख्यानंद आणण्यास किंवा आमच्या समस्या सोडविण्यास दीनपणे अपयशी ठरला. मानवजातीस, प्रत्येक प्रकारच्या सरकारासह प्रयोग करण्यास यहोवाने अनुमती दिली. परंतु भ्रष्टाचारास किंवा ज्या मार्गी सरकारांनी लोकांवर चुकीचे अधिपत्य केले त्यांस तो संमती दर्शवीत नाही. (नीतीसूत्रे २२:२२, २३) प्रकटीकरण जुलमी जागतिक सत्तांचे वर्णन एका घमेंडी व भयंकर जंगली श्‍वापदासारखे करते.—प्रकटीकरण १३:१, २.

स्वार्थी व्यापारी नियंत्रक

२०, २१. “सरदार” व “बलवान” लोकांसोबत आणखी कोणत्या दुसऱ्‍या गटाचा समावेश सैतानाच्या दुष्ट संततीमध्ये होण्यास हवा व का?

२० राजकीय अधिकाऱ्‍यांशी अगदी समरुप असणारे भौतिक गोष्टींवर अप्रामाणिक नियंत्रण ठेवणारे त्या दृश्‍यात आले. पुरातन बाबेलच्या खोदून काढलेल्या अवशेषांचा अहवाल दाखवून देतो की, दुर्दैवी परिस्थिती असलेल्या सोबत्यांस, धंद्यात स्वार्थीपणा दाखवणे हे त्यावेळी अत्यंत लोकप्रिय होते. जागतिक व्यापाऱ्‍यांनी आजतागायत स्वार्थी लाभ मिळवणे चालूच ठेवलेले आहे, ज्यामुळे अनेक देशात काही थोडके अत्यंत धनवान बनले आहेत, तर बहुसंख्य लोक दारिद्‌य्रात दीन जीवन जगत आहेत. या २० व्या शतकातील औद्योगिक युगात, मानवजातीस आता नाशाचे भय दाखविणारे आण्विक शस्त्र व दारुगोळा यांचा समावेश असलेला नाश करणाऱ्‍या राक्षसी लष्करी शस्त्रास्त्रांचा साठा राजकीय सत्तांना पुरवून, व्यापारी उत्पादकांनी मोठा लाभ प्राप्त केला आहे. सैतानाच्या दुष्ट संततीतील असणारे, ‘सरदार’ व ‘बलवान’ पुरुष यांच्यासोबत अशा लोभी व्यापारी बडे लोकांचा समावेश केलाच पाहिजे. ज्यांचा देव व ख्रिस्त नाश करण्यास पात्र असा, न्याय करतात, अशा पृथ्वीवरील संस्थांचे हे सर्व भाग आहेत.—प्रकटीकरण १९:१८.

२१ भ्रष्ट राजनीती व लोभी व्यापार यात मानवी समाजाच्या तिसऱ्‍या घटकाची भर घातली पाहिजे, जे देवाच्या विपरीत न्यायास लायक आहेत. तो घटक काय आहे? या प्रसिद्ध जागतिक रचनेसंबंधी प्रकटीकरण काय म्हणते ते जाणून तुम्ही आश्‍चर्यचकित व्हाल.

मोठी बाबेल

२२. प्राचीन बाबेलात कोणत्या प्रकारच्या धर्माची वाढ झाली?

२२ मूळ बाबेलची बांधणी, हे एका राजनीतीपेक्षा अधिक, असे साहस होते. त्या नगराची स्थापना यहोवाच्या सार्वभौमत्वास तुच्छ लेखण्यास करण्यात आली होती, त्यामुळे त्यात धर्म गोवलेला होता. खरोखरी, पुरातन बाबेल धार्मिक मूर्तिपूजेचा स्रोत बनले. त्याच्या पंडितांनी देवाचा अवमान करणाऱ्‍या तत्त्वांची शिकवण दिली; जसे की, मरणानंतर मानवी जीव अमर राहतो आणि ज्यावर दुरात्म्यांची देखरेख असते असे सार्वकालिक भय व अत्यंत त्रासाचे स्थळ. त्यांनी प्राण्यांची व असंख्य देवदैवतांची भक्‍ती करण्याचे उत्तेजन दिले. ही पृथ्वी व तिजवरील मानवाचा मूळ उगम स्पष्ट करण्यास अनेक दंतकथा त्यांनी जुळविल्या; मुले निपजविण्यास व पिकांची वाढ करण्यास, तथाकथित सुपीकतेची व युद्धातील विजयाची खात्री देण्यास अत्यंत खालच्या पायरीवरील धार्मिक विधी पार पाडले व अर्पणे वाहिली.

२३. (अ) बाबेलातून दूर जाताना लोकांनी आपल्यासोबत काय नेले व याचा काय परिणाम झाला? (ब) जगाला वेढून टाकणाऱ्‍या खोट्या धर्म साम्राज्याला प्रकटीकरण कोणत्या नावाने संबोधते? (क) खोट्या धर्माने कोणाविरूद्ध सतत लढत दिली?

२३ विविध भाषांचे गट बाबेलपासून पृथ्वीवर पसरले, तसे त्यांनी आपल्यासोबत बाबेलचा धर्मदेखील नेला. अशाप्रकारे, युरोप, आफ्रिका, अमेरिका, दूर पूर्वेकडील व दक्षिणेकडील समुद्र येथील मूळ रहिवाशांत, पुरातन बाबेलसारख्या असणाऱ्‍या धार्मिक विधींची व विश्‍वासांची भरभराट झाली, त्यातील अनेक विश्‍वास आजही टिकून आहेत. तर मग, जगाला व्यापून टाकणाऱ्‍या खोट्या धर्मसाम्राज्यांचा, मोठी बाबेल असे नाव असलेले नगर अशाप्रकारे प्रकटीकरण उचितपणे उल्लेख करते. (प्रकटीकरण, अध्याय १७, १८) जेथे जेथे त्याची पेरणी झाली तेथे तेथे खोट्या धर्माने जुलमी याजक, अंधविश्‍वास, अज्ञानीपणा व अनैतिकता यांची वाढ केली. सैतानाच्या हातातील ते एक सामर्थ्यशाली असे हत्यार राहिले आहे. मोठ्या बाबेलने सार्वभौम प्रभू यहोवा याच्या खऱ्‍या भक्‍तीच्या विरोधात सदैव क्रूरतेने लढा दिला.

२४. (अ) सर्पाला स्त्रीच्या संतानाची कशी ‘टाच फोडता’ आली? (ब) स्त्रीच्या संतानास डसणे हे केवळ टाचेस लागलेल्या छोट्या घावाप्रमाणे का वर्णिण्यात आले?

२४ त्या सर्पाच्या संततीचा अत्यंत निंद्य असा भाग या नात्याने पहिल्या शतकातील यहूदी धर्माच्या शास्त्री व परुशी यांनी स्त्रीच्या संततीच्या प्रमुख प्रतिनिधीचा छळ करण्यामध्ये पुढाकार घेतला व शेवटी त्याची हत्या केली. अशाप्रकारे, ‘सर्प त्याची [त्या “संततीची”] टाच फोडू शकला.’ (उत्पत्ती ३:१५; योहान ८:३९-४४; प्रेषितांची कृत्ये ३:१२, १५) ही, केवळ टाचेची जखम असे वर्णन का केले आहे? कारण या पृथ्वीवर त्या जखमेने केवळ अल्पावधी स्पर्श केला होता. ती जखम कायमची नव्हती, कारण यहोवाने येशूला तिसऱ्‍या दिवशी पुनरुत्थित करून आत्मिक जीवनात उंचावले.—प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३; १ पेत्र ३:१८.

२५. (अ) वैभवी येशू ख्रिस्ताने सैतान व त्याच्या दूतांविरुद्ध कशी कृती आधीच आचरली आहे? (ब) सैतानाच्या पार्थिव संततीला केव्हा काढून टाकण्यात येईल? (क) देवाचे स्त्री संतान जुनाट साप सैतानाचे “डोके फोडील” याचा काय अर्थ होणार?

२५ आता तो वैभवी येशू ख्रिस्त, यहोवाच्या शत्रूंचा न्याय करीत असून देवाच्या उजव्या हातास त्याची सेवा करतो. सैतान व त्याचे दूत यांच्याविरूद्ध त्याने अगोदरच कारवाई केलेली असून त्यांना पृथ्वीवर टाकून येथे त्यांची हालचाल मर्यादित केली आहे व त्याच्या परिणामामुळे या २० व्या शतकात अनर्थामध्ये वाढ होत आहे. (प्रकटीकरण १२:९, १२) परंतु, देव जेव्हा, मोठी बाबेल व पृथ्वीवरील सैतानाच्या संस्थेच्या सर्व भागांवर न्यायदंड बजावील तेव्हा सैतानाच्या पृथ्वीवरील संततीचे पूर्वभाकीत उच्चाटन होईल. शेवटी, देवाच्या स्त्रीची संतती येशू ख्रिस्त, त्या कावेबाज जुनाट सर्पाचे, म्हणजे सैतानाचे “डोके फोडील.” त्याचा अर्थ हा होईल की, त्याचा पूर्णपणे नाश आणि मानवी घडामोडीतून त्याचे पूर्ण उच्चाटन.—रोमकर १६:२०.

२६. आपण प्रकटीकरणातील भविष्यवादाचे परीक्षण करून बघणे हे का अत्यंत महत्त्वपूर्ण आहे?

२६ या सर्व गोष्टी कशा घडून येतील? याच गोष्टी बायबलचे पुस्तक, प्रकटीकरण यात उघड केलेल्या आहेत. मनात ठसतील अशी चिन्हे व प्रतिके यांनी नजरेत भरणाऱ्‍या दृष्टांताच्या मालिकेद्वारे प्रकट केले आहे. या सामर्थ्यवान भविष्यवादांचे परीक्षण आपण उत्सुकतेने करू या. प्रकटीकरणातील वचने आम्ही ऐकली व पाळली तर आम्ही खरोखरी धन्य होऊ! असे करीत राहण्याद्वारे, सार्वभौम प्रभु यहोवा याच्या नावाचा सन्मान करण्यात सहभागी होऊ व त्याचे सार्वकालिक आशीर्वाद प्राप्त करू. कृपया आपण पुढे वाचत राहा व जे शिकाल ते सुज्ञतेने लागू करा. त्याचा अर्थ, मानवी इतिहासाचा कळस असणाऱ्‍या या समयी तुमचे तारण होऊ शकते.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चौकट/चित्र]

व्यापारी दळणवळणाचे पुरातन पाचरीच्या आकाराचे लिखाण

जेम्स बी. प्रीचर्ड यांच्या द्वारे संपादित पूर्वेजवळील प्राचीन लिखाणे (इंग्रजी) या पुस्तकात बाबेलोनी काळात हम्मुराबीने संकलित केलेल्या जवळजवळ ३०० नियमांची यादी दिलेली आहे. ते दाखविते की, त्या काळी व्यापारी जगतात फैलावलेली दिखाऊ अप्रामाणिकता केवढी धोक्याची होती. याचे एक उदाहरण बघता: “सरंजामशाहीतील कोणा जमीनदाराने आपल्या मुलाकडून किंवा दासाकडून कोणत्याही साक्षीविना किंवा कराराविना काही विकत घेतले किंवा चांदी, सोने, दास, दासी, बैल, मेंढरु वा गाढव किंवा काही आपल्याकडे ठेवण्यासाठी घेतले असल्यास, येथे जमीनदार चोर ठरत असल्यामुळे त्याला ठार करण्यात यावे.”