व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या न्यायदंडाबद्दल त्याची स्तुती करा!

यहोवाच्या न्यायदंडाबद्दल त्याची स्तुती करा!

अध्याय ३८

यहोवाच्या न्यायदंडाबद्दल त्याची स्तुती करा!

१. योहानाने कोणती “मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी” ऐकली?

 आता मोठी बाबेल राहिलेली नाही! ही खरीच आनंदाची वार्ता आहे. यामुळेच योहान स्वर्गात स्तुतीची आनंदी घोषणा ऐकतो त्यात नवल असे काही नाही! “ह्‍यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, हालेलूया, * तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत; कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्‍ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. ते दुसऱ्‍यांदा म्हणाले, हालेलूया!* तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.”—प्रकटीकरण १९:१-३.

२. (अ) “हालेलूया” याचा काय अर्थ होतो व योहानाने तो येथे दोनदा ऐकल्यामुळे त्याद्वारे काय सूचित होते? (ब) मोठ्या बाबेलचे पतन घडवण्यामध्ये कोणाला गौरव मिळते? स्पष्ट करा.

खरेच, हालेलूया! या शब्दाचा अर्थ, “अहो लोकहो, तुम्ही याहची स्तुती करा,” असा होतो; येथे “याह” हे यहोवा या ईश्‍वरी नामाचे संक्षिप्त रुप आहे. यामुळे स्तोत्रकर्त्याने केलेला आर्जव आपल्या लक्षात येतो: “प्रत्येक प्राणी परमेशाचे [“याहचे,” NW] स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा.” (स्तोत्र १५०:६) प्रकटीकरणात येथे योहान दोनदा “हालेलूया!” असा स्वर्गीय गजर ऐकतो तो, सत्याच्या ईश्‍वरी प्रकटीकरणाची सातत्यता दर्शवतो. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाचा तोच देव आहे जो स्वतः इब्री शास्त्रवचनांचाही देव आहे व त्याचे नाव यहोवा असे आहे. ज्या देवाने प्राचीन बाबेलचे पतन घडवले त्यानेच आता मोठ्या बाबेलचा न्याय करून तिचा नाश केला आहे. या अचाट कृत्याबद्दल त्याला सर्व गौरव द्या! तिच्या पतनासाठी जे सामर्थ्य लागले ते, ज्या राष्ट्रांचा वापर त्याने साधन या नात्याने तिला उद्‌ध्वस्त करण्यासाठी केला त्यांचे नसून त्याच्या स्वतःचे होते. तारणाचे श्रेय आम्ही केवळ यहोवालाच दिले पाहिजे.—यशया १२:२; प्रकटीकरण ४:११; ७:१०, १२.

३. मोठ्या बाबेलीस तिच्या पात्रतेचा न्याय का मिळाला?

या कलावंतिणीला असा हा न्याय का मिळाला? यहोवाने नोहा, तसेच त्याच्याद्वारे सर्व मानवजातीला देऊ केलेला नियम असे सांगतो की, निरर्थकपणे सांडण्यात आलेल्या रक्‍ताबद्दल मरणदंडाची शिक्षा दिली पाहिजे. हेच देवाने इस्राएलाला दिलेल्या नियमात पुन्हा सांगितले आहे. (उत्पत्ती ९:६; गणना ३५:२०, २१) याखेरीज, मोशेच्या नियमशास्त्रात शारीरिक तसेच आध्यात्मिक व्यभिचारासाठी मृत्युदंडाची शिक्षा सांगितली होती. (लेवीय २०:१०; अनुवाद १३:१-५) मोठी बाबेल ही हजारो वर्षांपासून रक्‍तदोषी आहे आणि तिने तर गंभीर प्रकारातील व्यभिचार आचरला आहे. उदाहरणार्थ, रोमन कॅथलिक चर्चच्या धोरणाने म्हटले आहे की, पाळकांना विवाह करता येणार नाही, त्यामुळे यापैकीच्या पुष्कळांनी अनैतिकता आचरली आणि आज एडस्‌ आजार लावून घेतला आहे. (१ करिंथकर ६:९, १०; १ तीमथ्य ४:१-३) पण तिच्या पापांचा ‘स्वर्गापर्यंत पोहंचलेला’ ढीग यात तिची आध्यात्मिक व्यभिचाराची धक्कादायक कृत्ये समाविष्ट आहेत, ज्यात खोटे शिक्षण आणि भ्रष्ट राजकारणी लोकांसोबत स्वतःचे मित्रत्व राखणे यांचा देखील समावेश आहे. (प्रकटीकरण १८:५) तिला सरतेशेवटी तिची शिक्षा मिळाली असल्यामुळे स्वर्गातील समुदायाने दुसऱ्‍यांदा हालेलूया असे म्हटले.

४. मोठ्या बाबेलीचा धूर “युगानुयुग वर चढत आहे” याद्वारे काय सूचित केले जाते?

मोठ्या बाबेलीस एका जिंकलेल्या शहराप्रमाणे आग लावली गेली असून तिच्या धुराचा लोट “युगानुयुग वर चढत आहे.” विजय मिळवणारे सैन्य जेव्हा एखाद्या शहराला आग लावतात तेव्हा त्याची राख तप्त आहे तोवर त्याचा धूर वर जात राहतो. जे कोणी ते शहर त्या जळालेल्या अवस्थेत असताना बांधण्याचा प्रयत्न करील त्याला शहराच्या तप्त अवशेषांमुळे चांगलेच चटके बसतील. मोठ्या बाबेलीस मिळालेल्या अंतिम दंडाच्या रुपात तिचा धूर साक्षीरुपाने ‘युगानुयुगे’ वर जात असल्यामुळे, कोणालाही परत त्या पूर्णपणे अन्यायी असलेल्या शहराची उभारणी करता येणार नाही. खोटा धर्म सदासर्वकाळासाठी निघून गेला आहे. खरेच, हालेलूया!—पडताळा यशया ३४:५, ९, १०.

५. (अ) २४ वडील व चार प्राणी हे काय करतात व म्हणतात? (ब) हालेलूयाचे ध्रुपद हे ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसमध्ये गायिल्या जाणाऱ्‍या हालेलूया सुरापेक्षा अधिक मंजूळ का आहे?

आधीच्या दृष्टांतात योहानाने राजासनाभोवती चार प्राणी व स्वर्गातील वैभवी पदावर असलेल्या राज्य वारसदारांना चित्रित करणारे २४ वडील बघितले. (प्रकटीकरण ४:८-११) आता जेव्हा मोठ्या बाबेलच्या नाशामुळे स्वर्गात हालेलूयाची तिसरी गर्जना होते तेव्हा तो त्यांना परत बघतो. “तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले: आमेन, हालेलूया!” * (प्रकटीकरण १९:४) हा भव्य हालेलूयाचा सूर कोकऱ्‍याच्या स्तुतीस्तव जे “नवे गीत” गायिले गेले आहे त्याला जोडून आहे. (प्रकटीकरण ५:८, ९) यहोवाने मोठी कलावंतीण, मोठी बाबेल हिजवर निर्णायकपणे विजय मिळविलेला असल्यामुळे ते या सार्वभौम प्रभुला सर्व गौरव देऊन विजयाचे ध्रुपद गात आहेत. हा हालेलूयाचा सूर, ख्रिस्ती धर्मजगतात जेथे यहोवा किंवा याह याचा अपमान केला जातो व त्याला तुच्छ मानले जाते त्या चर्चेसमधून गायिल्या जाणाऱ्‍या कोणत्याही हालेलूया कवनांपेक्षा अधिक मंजूळ आहे. यहोवाच्या नामाचा अपमान करणारे हे दांभिक गायन आता सदासर्वकाळासाठी स्तब्ध झालेले आहे!

६. कोणाची “वाणी” ऐकू येते, ती काय करायला सांगते व याला कोण प्रतिसाद देतात?

यहोवाने ‘त्याची भीती बाळगणाऱ्‍या सर्व लहानथोर’ जनांना १९१८ मध्ये प्रतिफळ देण्यास आरंभ केला. यामध्ये प्रथम मरणापर्यंत विश्‍वासू राहिलेले अभिषिक्‍त ख्रिस्ती होते; यांना त्याने पुनरुत्थित करून २४ वडिलांच्या स्वर्गीय मालिकेत आणून बसवले. (प्रकटीकरण ११:१८) यांच्याबरोबर इतर सुद्धा हालेलूयाचा गजर करतात, कारण योहान कळवतो: “इतक्यात राजासनापासून वाणी झाली; ती म्हणाली: अहो, आमच्या देवाची भीति बाळगणाऱ्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.” (प्रकटीकरण १९:५) ही “वाणी,” यहोवाचा प्रवक्‍ता, त्याचा स्वपुत्र, ‘राजासनाच्या मध्ये’ उभा असणारा येशू ख्रिस्त याची आहे. (प्रकटीकरण ५:६) केवळ स्वर्गातच नव्हे, तर या पृथ्वीवर देखील ‘देवाचे सर्व दास’ या गायनात सहभागी होत आहेत; यामध्ये योहान वर्गाचे अभिषिक्‍त जन स्वतः पुढाकार घेत आहेत. हे सर्वजण ‘आमच्या देवाचे स्तवन करा’ या आज्ञेचे केवढ्या आनंदाने पालन करीत आहेत!

७. मोठ्या बाबेलचा नाश घडल्यावर कोण यहोवाची स्तुती करील?

होय, या दासात मोठ्या लोकसमुदायाचाही समावेश आहे. १९३५ पासून हे मोठ्या बाबेलमधून बाहेर आलेले आहेत व यांनी देवाच्या या अभिवचनाची पूर्णता अनुभवली आहे: “परमेश्‍वराचे [यहोवा, NW] भय धरणाऱ्‍या लहानथोरांस तो आशीर्वाद देईल.” (स्तोत्र ११५:१३) कलावंतिणीसारखी असणारी बाबेल नाश होईल तेव्हा यापैकीचे लाखो जण योहान वर्ग व सर्व स्वर्गीय प्राण्यांसोबत ‘आमच्या देवाचे स्तवन करण्यात’ आपला स्वर उंचावतील. यानंतर या पृथ्वीवर पुनरुत्थित होणारे, मग ते गतकाळात प्रतिष्ठित राहिलेले असो वा नसो, तेही, मोठी बाबेल ही कायमची नाहीशी झालेली आहे हे जाणून निश्‍चये हालेलूया म्हणतील. (प्रकटीकरण २०:१२, १५) त्या जुनाट वेश्‍येवर अभूतपूर्व विजय संपादल्यामुळे यहोवाला सर्व स्तुती मिळो!

८. योहानाने पाहिलेला स्तुतीचा स्वर्गीय सूर आम्हाला, मोठ्या बाबेलचा नाश होण्याआधी काय करण्याची चालना देवो?

हे सर्व, आज आम्हाला देवाच्या कार्यात पूर्णपणे सहभागी होण्याची केवढी प्रबळ चालना देते! याहचे सर्व सेवक देवाचे न्यायदंड घोषित करण्यामध्ये आणि मोठ्या बाबेलीस पदभ्रष्ट करून तिचा नाश करण्याआधी सध्या राज्याची भव्य आशा घोषित करण्यामध्ये पूर्ण अंतःकरण व जीव लावोत.—यशया ६१:१-३; १ करिंथकर १५:५८.

‘हालेलूया—यहोवा राजा आहे!’

९. शेवटला हालेलूयाचा इतका प्रचंड व समृद्ध आवाज का आहे?

आनंद करण्याजोगी आणखी कारणे आहेत व याबद्दल योहान आम्हाला असे सांगतो: “तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनि व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनि मी ऐकला; तो म्हणाला: ‘हालेलूया, * कारण सर्वसमर्थ आमचा प्रभु [यहोवा, NW] देव ह्‍याने राज्य हाती घेतले आहे.’” (प्रकटीकरण १९:६) हा शेवटला हालेलूया ती सुस्पष्ट किंवा प्रमाणबद्ध घोषणा करतो. तो असा प्रचंड व वैभवी निनाद आहे जो, कोणताही मानवी सूर, पृथ्वीवरील धबधब्याचा सूर यापेक्षा अधिक दिमाखी आणि भूमीच्या कोणत्याही मेघगर्जनेपेक्षाही अति भयप्रेरित असा आहे. अयुतांचा स्वर्गीय आवाज “आमचा प्रभु [यहोवा, NW] देव याने राज्य हाती घेतले आहे” याबद्दल मोठा पुकारा करतो.

१०. मोठ्या बाबेलचा विनाश घडल्यावर यहोवाने राज्य हाती घेतले आहे असे कोणत्या अर्थी म्हटले जाऊ शकते?

१० तथापि, यहोवा राज्य हाती घेतो हे कसे काय? स्तोत्रकर्त्याने तर हजारो वर्षांआधीच असे घोषित केले होते की, “देव पुरातन कालापासूनचा माझा राजा आहे.” (स्तोत्र ७४:१२) यहोवाचे राजपद तर यापेक्षाही आणखी प्राचीन आहे. तर मग, विश्‍वातील तो सूर “प्रभु [यहोवा, NW] देव ह्‍याने राज्य हाती घेतले आहे” असे कसे म्हणू शकतो? ते या अर्थी की, मोठ्या बाबेलचा नाश घडल्यावर मग यहोवाची सार्वभौम सत्ताधारी या नात्याने भक्‍ती करण्यामध्ये अडथळा निर्माण करणारा असा तो गर्विष्ठ प्रतिस्पर्धी राहणार नाही. पुढे पृथ्वीवरील सत्ताधिशांना यहोवाचा विरोध करण्यास चालना देण्यासाठी खोटा धर्म अस्तित्वात नसणार. जगाच्या स्वामित्वावरुन प्राचीन बाबेल पडल्यावर सियोनेने ही विजयी घोषणा ऐकली: “तुझा देव राजा आहे!” (यशया ५२:७, NW) १९१४ मध्ये राज्याचा जन्म घडल्यावर २४ वडिलांनी हे घोषित केले: “हे प्रभु [यहोवा, NW] देवा, . . . तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि राज्यारूढ झाला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.” (प्रकटीकरण ११:१७) आता, मोठ्या बाबेलचा नाश झाल्यावर पुन्हा हा निनाद ऐकायला येतो की, यहोवा ‘राज्यारुढ झाला आहे.’ येथून पुढे खरा देव यहोवा याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारा कोणताही मानवनिर्मित देव उरत नाही!

कोकऱ्‍याचे लग्न जवळ आले आहे!

११, १२. (अ) प्राचीन यरुशलेमेने प्राचीन बाबेलला कसे संबोधले आणि याने नव्या यरुशलेमेला मोठ्या बाबेलसंबंधाने कसा नमूना दिला? (ब) मोठ्या बाबेलवर विजय मिळवल्यामुळे स्वर्गीय समूह कोणते गीत गातात व काय जाहीर करतात?

११ “अगे माझ्या वैरिणी”! असे मूर्तिपूजक बाबेलाबद्दल यहोवाच्या उपासनेच्या मंदिराने, यरुशलेमेने म्हटले. (मीखा ७:८) याचप्रमाणे, १,४४,००० सदस्यांनी मिळून बनलेली वधू, “पवित्र नगरी, नवे यरुशलेम” हिने देखील मोठ्या बाबेलला आपली वैरीण असे म्हणणे अगदी योग्य आहे. (प्रकटीकरण २१:२) पण सरतेशेवटी त्या मोठ्या कलावंतिणीला विपत्ती, विनाश व विध्वंस मिळाला. तिच्या दुरात्मिक प्रथा व ज्योतिषांना तिला वाचवता येणे शक्य झाले नाही. (पडताळा यशया ४७:१, ११-१३.) खऱ्‍या भक्‍तीचा हा खराच मोठा विजय!

१२ अमंगळ वेश्‍या, मोठी बाबेल कायमची नाहीशी झाली असल्यामुळे, आता नक्कीच कोकऱ्‍याची कुमारी, शुद्ध वधूकडे लक्ष केंद्रित होणार! या कारणामुळे स्वर्गीय समूह आनंदाने यहोवाची अशी स्तुती गातात: “आपण आनंद व उल्लास करू व त्याचे गौरव करू; कारण कोकऱ्‍याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे; ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.”—प्रकटीकरण १९:७, ८.

१३. शतकांपासून कोकऱ्‍याच्या लग्नासाठी कोणती तयारी करण्यात आली?

१३ येशूने या स्वर्गीय लग्नाची कित्येक शतकांपासून प्रेमळ तयारी केली. (मत्तय २८:२०; २ करिंथकर ११:२) तो आध्यात्मिक इस्राएलांच्या १,४४,००० जनांना शुद्ध करीत राहिला की, ज्यामुळे त्यांना “गौरवयुक्‍त मंडळी अशी [बनवून] स्वतःला ती सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.” (इफिसकर ५:२५-२७) “देवाचे जे वरील पाचारण” ते मिळवण्यासाठी प्रत्येक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाला जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकावे लागले आणि नवे ख्रिस्ती व्यक्‍तित्व धारण करून “प्रभूसाठी [यहोवा, NW]” धार्मिक कृत्ये “जिवेभावे” आचरावी लागली.—फिलिप्पैकर ३:८, १३, १४; कलस्सैकर ३:९, १०, २३.

१४. सैतानाने कोकऱ्‍याच्या संभाव्य वधूला कसे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला?

१४ सा. यु. ३३ च्या पेंटेकॉस्टपासून कोकऱ्‍याची वधू होणाऱ्‍या संभाव्य सदस्यांना भ्रष्ट करावे यासाठी सैतानाने मोठ्या बाबेलचा वापर केला. पहिल्या शतकाच्या समाप्तीस त्याने मंडळीत बाबेली धर्माची बीजे रोवली. (१ करिंथकर १५:१२; २ तीमथ्य २:१८; प्रकटीकरण २:६, १४, २०) विश्‍वासाची पायमल्ली करणाऱ्‍यांचे वर्णन देताना प्रेषित पौलाने असे म्हटले की, “अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्‍यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१३, १४) यानंतरच्या शतकात धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताने मोठ्या बाबेलच्या इतर धर्मांप्रमाणेच स्वतःला संपत्ती, प्रतिष्ठा यांच्या “जांभळी व किरमिजी वस्त्रे . . . सोने, मूल्यवान रत्ने व मोत्ये” यांनी सुशोभित केले. (प्रकटीकरण १७:४) त्याच्या पाळक व पोपनी कॉन्स्टंटाईन व चार्लमॅग्ने यासारख्या रक्‍तपिपासू सत्ताधाऱ्‍यांसोबत मैत्री संपादिली. तो “पवित्र जनांची नीतिकृत्ये” यांनी कधीच सुशोभित झाला नाही. एक बनावट वधू म्हणून तो खरेपणाने सैतानाचा फसवा प्रतिनिधी बनला. सरतेशेवटी त्याचाही कायमचा विनाश झाला आहे!

कोकऱ्‍याची वधू स्वतःला सजवते

१५. शिक्का मारण्याचे काम कसे होते व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाच्या बाबतीत कसली गरज आहे?

१५ अशाप्रकारे, आता जवळजवळ २,००० वर्षांनी वधूवर्गाच्या सर्व १,४४,००० सदस्यांनी स्वतःची तयारी पूर्ण केली आहे. पण ‘कोकऱ्‍याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे’ असे कोणत्या क्षणी म्हणता येईल? सा. यु. ३३ च्या पेंटेकॉस्टपासून पुढे अभिषिक्‍त जनांवर “खंडणी भरून प्राप्त केलेल्या [भावी] मुक्‍तीच्या दिवसापर्यंत” “त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा . . . शिक्का” मारण्यात आला. प्रेषित पौलाने म्हटले त्याप्रमाणे त्यांच्यावर देवाने “मुद्रांकित केले व [त्यांच्या] अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला.” (इफिसकर १:१३; ४:३०; २ करिंथकर १:२२) प्रत्येक अभिषिक्‍त ख्रिस्ती ‘पाचारण केलेला व निवडलेला’ असून तो ‘विश्‍वासू’ राहिला आहे.—प्रकटीकरण १७:१४.

१६. (अ) प्रेषित पौलावर केव्हा शिक्कामोर्तब पूर्ण झाले आणि हे आम्हाला कसे कळते? (ब) कोकऱ्‍याच्या नवरीने केव्हा पूर्णपणे “स्वत:ला सजविले” असणार?

१६ काही दशकांच्या परिक्षणानंतर प्रेषित पौल स्वतःबद्दल असे म्हणू शकला: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाहि देईल.” (२ तीमथ्य ४:७, ८) प्रेषित अद्याप देहात होता व तो हुतात्मिक मरणास सामोरा जाणार होता तरी त्याच्यावर शिक्का पूर्णपणे मारला गेला होता असे दिसते. याप्रमाणेच अशी वेळ येईल जेव्हा १,४४,००० पैकी पृथ्वीवर अवशिष्ट राहिलेल्या लोकांवर वैयक्‍तिकपणे शिक्कामोर्तब होण्याचे काम पूर्ण होऊन ते यहोवाच्या मालकीचे होतील. (२ तीमथ्य २:१९) हे, कोकऱ्‍याच्या वधूने स्वतःला पूर्णपणे तयार केले असेल, म्हणजे १,४४,००० पैकी बहुतांश लोकांना स्वर्गीय प्रतिफळ मिळालेले असेल व पृथ्वीवर हयात असलेल्या बाकीच्या लोकांवर विश्‍वासू लोक या नात्याने संमती मिळून त्यांजवर शिक्का मारण्यात येईल तेव्हा घडेल.

१७. कोकऱ्‍याचे लग्न केव्हा घडू शकते?

१७ यहोवाच्या वेळापत्रकात या क्षणाला म्हणजे, जेव्हा १,४४,००० सदस्यांवरील शिक्कामोर्तब पूर्ण करण्यात येईल तेव्हा देवदूत मोठ्या संकटाचे चार वारे सोडतील. (प्रकटीकरण ७:१-३) प्रथम, कलावंतिणीसारख्या असणाऱ्‍या मोठ्या बाबेलवर दंडाज्ञा बजावण्यात येईल. मग, विजयशाली ख्रिस्त लगेच हर्मगिदोनाकडे वळून सैतानाच्या पृथ्वीवरील इतर सर्व संघटनांचा नाश करील आणि सरतेशेवटी तो सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अगाधकूपात पाठवील. (प्रकटीकरण १९:११–२०:३) अशावेळी पृथ्वीवर बचावून राहणारे अभिषिक्‍त जन लवकरच वधूवर्गाच्या त्यांच्या सहसदस्यांना जाऊन मिळण्यासाठी स्वर्गीय प्रतिफळ मिळवतील. मग, विश्‍वाच्या शांतीदायक वातावरणात कोकऱ्‍याचे लग्न संपन्‍न होईल!

१८. कोकऱ्‍याच्या लग्नात ज्या घटना अनुक्रमाने घडतील त्याची ४५ वे स्तोत्र कशी पुष्टी देते?

१८ या अनुक्रमाला स्तोत्राच्या ४५ व्या अध्यायात दिलेल्या भविष्यवादित घटनांचे वर्णन पुष्टी देते. प्रथमतः राजासनावर बसलेला राजा आपल्या शत्रूंवर विजयाने स्वारी करतो. (वचने १-७) यानंतर लग्न होते, स्वर्गीय वधूला पृथ्वीवरील तिच्या सख्या, मोठ्या लोकसमुदायाची साथ मिळते. (वचने ८-१५) या विवाहाला, पुनरुत्थित मानवजात ‘सर्व पृथ्वीवरील अधिपति’ यांच्या देखरेखीखाली परिपूर्णतेप्रत आणले जाते तेव्हा समृद्धी मिळते. (वचने १६, १७) कोकऱ्‍याच्या लग्नासमवेत हे केवढे वैभवी आशीर्वाद आहेत!

आमंत्रित धन्य आहेत

१९. प्रकटीकरणातील सात धन्यतांपैकी चवथी कोणती आहे आणि या खास धन्यतांमध्ये कोण सहभाग घेतो?

१९ प्रकटीकरणात देण्यात आलेल्या सात धन्यतांपैकी चवथी धन्यता योहान आता कळवतो: “तेव्हा तो [जो देवदूत योहानाला प्रकटीकरणाच्या गोष्टी कळवीत होता तो] मला म्हणाला: ‘हे लिही की, कोकऱ्‍याच्या लग्नाच्या [“सायंकाळच्या” NW] मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.’ तो मला असेहि म्हणाला: ही देवाची सत्यवचने आहेत.” (प्रकटीकरण १९:९) * “कोकऱ्‍याच्या लग्नाच्या [“सायंकाळच्या,” NW] मेजवानीस बोलाविलेले ते” वधूवर्गाचे सदस्य आहेत. (पडताळा मत्तय २२:१-१४.) अभिषिक्‍त वधूचे सर्व सदस्य हे निमंत्रण मिळण्याच्या आनंदात सहभागी होतात. यापैकीचे बहुतेक निमंत्रक तर आधीच स्वर्गात, लग्नाच्या सायंकाळच्या मेजवानीस गेले आहेत. जे अद्याप पृथ्वीवर आहेत तेही, आपल्याला निमंत्रण आहे म्हणून आनंदी आहेत. लग्नाच्या सायंकाळच्या मेजवानीतील त्यांची जागा सुरक्षित आहे. (योहान १४:१-३; १ पेत्र १:३-९) यांचे स्वर्गात जाण्यासाठी पुनरुत्थान झाल्यावर पूर्ण व एकत्रित असा वधूगट कोकऱ्‍यासोबत अप्रतिम अशा आनंदी विवाहबंधनात बांधला जाईल.

२०. (अ) “ही देवाची सत्यवचने आहेत,” या शब्दाद्वारे कोणता अर्थ समजतो? (ब) देवदूताच्या शब्दांमुळे योहानावर कोणता परिणाम घडला आणि देवदूताने कोणता प्रतिसाद व्यक्‍त केला?

२० देवदूताने पुढे म्हटले की, “ही देवाची सत्यवचने आहेत.” “सत्य” या शब्दाचे ले․थिनोसʹ या ग्रीक शब्दावरुन भाषांतर झाले असून त्याचा अर्थ “खरा” किंवा “भरवशाचा” असा आहे. ही वचने वस्तुतः यहोवाकडूनच असल्यामुळे ती विश्‍वासू व भरवसा ठेवण्यालायक आहेत. (पडताळा १ योहान ४:१-३; प्रकटीकरण २१:५; २२:६.) योहानाला त्या लग्नाच्या जेवणावळीला निमंत्रित केला गेलेला या अर्थी हे ऐकून तसेच वधूवर्गाला पुढे जे आशीर्वाद आहेत त्यांची जाणीव होऊन नक्कीच आनंद वाटला असावा. त्याला हे बघून व ऐकून इतके भारावल्यासारखे झाले की, देवदूताला त्याला सूचना करावी लागली. योहान कळवतो: “तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.”—प्रकटीकरण १९:१०अ.

२१. (अ) प्रकटीकरण देवदूतांबद्दल काय प्रकटविते? (ब) ख्रिश्‍चनांनी देवदूतांबद्दल कोणती वृत्ती बाळगली पाहिजे?

२१ सबंध प्रकटीकरणात देवदूतांचा विश्‍वासूपणा आणि तत्परता याबद्दल अप्रतिम साक्ष देण्यात आली आहे. यांना प्रकट करण्यात आलेल्या सत्याच्या माध्यमात समाविष्ट करण्यात आले आहे. (प्रकटीकरण १:१) सुवार्तेचा प्रचार करण्यात व लाक्षणिक पीडा ओतण्यात ते मानवांबरोबर कार्य करतात. (प्रकटीकरण १४:६, ७; १६:१) सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून लावण्यात लढताना ते येशूच्या सोबत होते आणि पुनः ते हर्मगिदोनात त्याच्याबरोबर लढाईत राहतील. (प्रकटीकरण १२:७; १९:११-१४) खरेच, यांना यहोवाच्या अगदी सान्‍निध्यात जाता येते. (मत्तय १८:१०; प्रकटीकरण १५:६) असे असले तरी ते देवाचे नम्र सेवक यापेक्षा मोठे नाहीत. खऱ्‍या भक्‍तीमध्ये देवदूतांची भक्‍ती करण्याचे किंवा अशांना सापेक्ष भक्‍ती देण्याचे तसेच देवाची भक्‍ती कोणा “संत” वा देवदूताद्वारे करण्याचे समाविष्ट नाही. (कलस्सैकर २:१८) ख्रिस्ती लोक केवळ यहोवाचीच भक्‍ती करतात आणि आपल्या मागण्या ते त्याला येशूच्या नामाने कळवतात.—योहान १४:१२, १३.

भविष्यवादातील येशूचे स्थान

२२. देवदूत योहानाला काय म्हणतो आणि त्या शब्दांचा काय अर्थ होतो?

२२ यानंतर देवदूत म्हणतो: “कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.” (प्रकटीकरण १९:१०ब) ते कसे? याचा हा अर्थ आहे की, सर्व प्रेरित भविष्यवाद येशू व तो यहोवाच्या उद्देशानुरुप जी भूमिका पार पाडतो त्यावर आधारलेले आहेत. बायबलमधील पहिल्या भविष्यवादाने येणाऱ्‍या एका संतानाबद्दल अभिवचन दिले. (उत्पत्ती ३:१५) येशू ते संतान बनला. या मूलभूत भविष्यवादावरच इतर प्रकटीकरणांनी भविष्यवादित सत्याची मोठी इमारत रचली. प्रेषित पेत्राने विश्‍वास धरणाऱ्‍या विदेशी कर्नेल्य याला म्हटले: ‘सर्व संदेष्टे त्याच्याविषयी [येशू] साक्ष देतात.’ (प्रेषितांची कृत्ये १०:४३) याच्या साधारण २० वर्षांनी प्रेषित पौलाने म्हटले: “देवाची वचने कितीहि असोत, त्याच्याठायी [येशू] होय हे आहे.” (२ करिंथकर १:२०) आणखी ४३ वर्षांनंतर योहान स्वतःच आपल्याला स्मरण देतो: ‘सत्य हे येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले.’—योहान १:१७.

२३. येशूचे उच्च पद व अधिकार या गोष्टी आपण यहोवाला जी भक्‍ती देतो तिला विचलित करीत नाही ते कसे?

२३ हे, आम्ही यहोवाला जी भक्‍ती देतो त्यापासून विचलित करते का? नाही. देवदूताने जे इशारेवजा शब्द उद्‌गारले होते ते लक्षात आणा: “नमन देवाला कर.” येशू केव्हाही यहोवाशी स्पर्धा करू पाहात नाही. (फिलिप्पैकर २:६) हे खरे की सर्व देवदूतांना “त्याला [येशू] नमन” करण्याचे सांगितले आहे, शिवाय सर्व निर्मितीने त्याचे उच्च पद ओळखून “प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा” हेही खरे आहे. पण हे सर्व “देवपित्याच्या गौरवासाठी” आणि त्याच्या आज्ञेने करायचे आहे याकडेही लक्ष द्या. (इब्रीयांस १:६; फिलिप्पैकर २:९-११) यहोवानेच येशूला त्याचे उच्च पद बहाल केले आणि ह्‍या अधिकारपदाला ओळखण्याद्वारे आपण देवाला गौरव देत असतो. आपण येशूच्या अधिकाराखाली अधीन होण्याचे नाकारल्यास, ते स्वतः यहोवा देवाला नाकारण्यासारखे आहे.—स्तोत्र २:११, १२.

२४. आश्‍चर्याने गुंग करणाऱ्‍या कोणत्या दोन घटनांची आपल्याला प्रतीक्षा आहे व यामुळे आपण कोणत्या शब्दांचा उच्चार करावा?

२४ यास्तव, आपण स्तोत्रसंहिता १४६ ते १५० अध्यायात नमूद असणारे शब्द ऐक्याने उच्चारू या की, “अहो लोकहो, तुम्ही यहोवाचे स्तवन करा!” (NW) खोट्या धर्माच्या जगव्याप्त बाबेली साम्राज्यावर यहोवा विजय मिळवील याची अपेक्षा धरुन आपण हालेलूयाचा गजर करावा! शिवाय कोकऱ्‍याचे लग्न जवळ येत असता आमचा आनंद अधिकाधिक वाढत राहो!

[तळटीपा]

^ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

^ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

^ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७३ पानांवरील चौकट]

“सदोम व गमोरा यांना संदेशपत्र”

या शीर्षकाखाली, लंडनच्या डेली टेलिग्राफ याच्या नोव्हेंबर १२, १९८७ च्या अंकात चर्च ऑफ इंग्लंडच्या सर्वसाधारण धर्माधिकाऱ्‍यांच्या सभेतील ठरावाबद्दल कळवण्यात आले. यात चर्चमधून पुरुषगामी “ख्रिश्‍चनांना” बाहेर काढून टाकण्याचा मसुदा होता. गॉडफ्रे बार्कर या स्तंभलेखकांनी म्हटले: “काल कँटरबरीच्या आर्चबिशपांनी अगदी उदासपणे मत मांडले: ‘प्रेषित पौलाला चर्च ऑफ इंग्लंडला संदेशाचे पत्र लिहावे लागले असते तर आपण, ते पत्र कसे असू शकेल हे विचारून बघू शकतो.’” बार्कर महाशयांनीच त्याचे उत्तर देऊन म्हटले की, “सदोम व गमोरा यांना संदेशपत्र. हे ते उत्तर असेल,” व पुढे म्हटले: “डॉ. रुनसी [आर्चबिशप] यांनी कल्पना लढविली की, ते रोमकरांस पत्रातील अध्याय १ प्रमाणे असेल.”

लेखकाने पौलाच्या रोमकरांस पत्र १:२६-३२ मधील वचनांचे अवतरण घेतले: “देवाने त्यांस निंद्य मनोभावनांच्या स्वाधीन केले; . . . पुरुषांनी पुरुषांसोबत अनुचित कर्म केले . . . असे आचरण करितात ते मरणास योग्य आहेत, असा देवाचा नियम त्यांस ठाऊक असताही, ते स्वतः ती कर्मे करतात.” त्यांनी समारोप केला: “संत पौलाला मंडळीतील लोकांबद्दल काळजी होती; पण डॉ. रुनसी यांना व्यासपीठावर भाषण देणाऱ्‍या लोकांची समस्या वाटते.”

आर्चबिशपांना इतकी समस्या का वाटत होती? लंडनच्या डेली मेल वृत्तपत्रात ऑक्टोबर २२, १९८७ च्या अंकात जे मोठे मथळे दिसले, त्यांनी जाहीर केले: “‘तीन सुखविलासांमध्ये एक धर्मोपदेशक.’ . . . पुरुषगाम्यांना बाहेर हाकलण्याच्या मोहिमेमुळे ‘चर्च ऑफ इंग्लंड बंद होईल.’” लेस्बियन ॲण्ड गे ख्रिश्‍चन मुव्हमेंट या संस्थेचे साधारण सचिव “रेव्हरंड” यांनी असे म्हटल्याचे वृत्तात कळविण्यात आले: “ही मोहीम स्वीकारल्यास चर्च भंग पावेल व हे कँटरबरीच्या आर्चबिशपांना माहीत आहे. सर्वसाधारण आकड्यात पाहिल्यास चर्च ऑफ इंग्लंडचे ३० ते ४० टक्के पाळक विलासी आहेत असा आमचा विश्‍वास आहे. हेच लोक चर्चच्या सेवकपणात हिरीरीने भाग घेणारे आहेत.” चर्चला जाणाऱ्‍या लोकात जी घट दिसत आहे ती, पुरुषगामी कार्याच्या होत असलेल्या वाढीबद्दलचा तीव्र संताप निःसंशये दाखवणारी आहे.

चर्चच्या सभेने याबद्दल कोणता निर्णय घेतला? (९५ टक्के पाळकांचा समावेश असणाऱ्‍या) ३८८ सदस्यांच्या प्रचंड संख्येने प्रतिकूल मताला पुष्टी जोडली. याबद्दल द एकॉनॉमिस्ट वृत्तपत्राने नोव्हेंबर १४, १९८७ च्या अंकात कळवले: “चर्च ऑफ इंग्लंड पुरुषगामी प्रथेविरुद्ध आहे खरे, पण ते तितके नाही. सर्वसाधारण सभेने, चर्चच्या परिषदेने, पुरुषगामी पाळकांचा विचार मनात राखून या आठवडी हे ठरवले की, पुरुषगामी कृत्ये ही, व्यभिचार व जारकर्म यांच्याएवढी पापस्वरुपी नाहीत: त्यात, ‘चिरस्थायी वैवाहिक नातेसंबंधात योग्य स्थान राखून असलेले लैंगिक समागमाचे कृत्य’ या ‘शिष्टाचाराचा अभाव दिसतो’ इतकेच आहे.” कँटरबरीच्या आर्चबिशपांनी घेतलेला विशिष्ट पावित्रा आणि प्रेषित पौलाने रोमकर १:२६, २७ मध्ये केलेले स्पष्ट विधान यामधील फरक दर्शवताना द एकॉनॉमिस्टने “सेंट पॉलला आपले विचार चांगले ठाऊक होते” हा मथळा देऊन त्याचे शब्द अवतरित केले.

येशू ख्रिस्ताला देखील त्याचे विचार स्पष्टपणे माहीत होते व ते त्याने स्पष्ट रुपात बोलून दाखवले. त्याने म्हटले की, त्याच्या संदेशाचा अवमान करणाऱ्‍या लोकांपेक्षा ‘न्यायाच्या दिवशी . . . सदोम प्रदेशास सोपे जाईल.’ (मत्तय ११:२३, २४) येशू हे अतिशयोक्‍तिपणाने दाखवून देत होता की, देवाचा पुत्र व त्याचा संदेश यांचा धिक्कार करणारे ते धार्मिक पुढारी सदोमी लोकांपेक्षा अधिक दोषास्पद होते. यहूदाचे पत्र ७ वे वचन सांगते की, त्या सदोमी लोकांना ‘सार्वकालिक अग्निदंड’ म्हणजे सर्वनाश मिळाला. (मत्तय २५:४१, ४६) तर मग, देवाच्या राज्याच्या उच्च नैतिक प्रणालींपासून दूर करून आपल्या अंधळ्या कळपाला या जगाच्या स्वैराचारी व नीच मार्गाक्रमणात अंधळेपणाने लोटणाऱ्‍या तथाकथित ख्रिस्ती नेत्यांना केवढा मोठा न्यायदंड मिळणार! (मत्तय १५:१४) अशा या खोट्या धर्मांबद्दल, मोठ्या बाबेलीबद्दल, स्वर्गातून आलेल्या एका वाणीने तातडीने म्हटले: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.”—प्रकटीकरण १८:२, ४.

[२७५ पानांवरील चित्रे]

स्वर्गाने चार वेळेला हालेलूयाचा गजर करून त्याने मोठ्या बाबेलवर जी शेवटली सरशी मिळवली त्याबद्दल याहची स्तुती केली