व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या स्वर्गीय राजासनाची भव्यता

यहोवाच्या स्वर्गीय राजासनाची भव्यता

अध्याय १४

यहोवाच्या स्वर्गीय राजासनाची भव्यता

दृष्टांत २​—प्रकटीकरण ४:१–५:१४

विषय: देवाच्या न्यायाच्या राजासनापुढे घडणाऱ्‍या भयप्रेरित घटना

पूर्णतेचा काळ: हा दृष्टांत १९१४ पासून ते हजार वर्षांची कारकीर्द व त्यापलिकडेही, जेव्हा स्वर्ग व पृथ्वी यामधील प्रत्येक प्राणी यहोवाची स्तुती करीत राहील, तेथपर्यंत घडणाऱ्‍या घटना सादर करतो.—प्रकटीकरण ५:१३

१. योहान ज्या दृष्टांतांची आम्हासोबत सहभागिता करीत आहे त्याबद्दल आम्हाठायी बारकाईची आस्था का असली पाहिजे?

 योहान आता, जिवास थरारुन सोडणाऱ्‍या आणखी काही दृष्टांतांची सहभागिता करण्यास आरंभ करतो. तो ईश्‍वरी प्रेरणेने अद्यापही प्रभूच्या दिवसात आहे. यास्तव, तो जे वर्णन करतो, ते त्या दिवसात प्रत्यक्षात जगणाऱ्‍या आम्हासाठी गहन अर्थ राखून आहे. या दृष्टांतांद्वारे, यहोवा स्वर्गीय वास्तवतेवरील अदृश्‍यतेचा पडदा दूर सारतो आणि त्याचे जे न्यायदंड पृथ्वीवर पूर्ण करायचे आहेत त्याविषयीचा दृष्टिकोन आम्हास देतो. याखेरीज, आम्ही स्वर्गीय किंवा पृथ्वीवरील आशा राखणारे लोक असलो तरी, ही प्रकटीकरणे आम्हाला, यहोवाच्या उद्देशातील आमचे स्थान कोणते आहे ते पाहण्यास मदत देतात. या कारणास्तव, आम्ही सर्वांनी योहानाच्या या वक्‍तव्याकडे बारकाईने आस्था राखून असणारे हवे: “ह्‍या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यांत लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य.”—प्रकटीकरण १:३.

२. योहानाला आता कोणता अनुभव घडतो?

यानंतर योहान जे पाहतो ते २० व्या शतकातील माणसाला व्हिडीओद्वारे जे काही सादर करण्यात येते त्याच्यापेक्षा अतिश्रेष्ठ आहे! तो लिहितो: “ह्‍यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्‍या कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती; ती म्हणाली: ‘इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्‍यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.’” (प्रकटीकरण ४:१) आधुनिक अंतराळवीरांनी ज्या भौतिक बाह्‍य अंतराळाचा शोध लावलेला आहे त्याहीपेक्षा दूर, इतकेच नव्हे तर भौतिक विश्‍वातील आकाशगंगांच्याही खूपच दूर व उंच ठिकाणी योहान दृष्टांतात, यहोवाच्या अस्तित्वाचे अदृश्‍य आकाश बघतो. योहानाला जणू काय उघड्या दारातून प्रवेश करीत श्‍वास रोखून धरणाऱ्‍या, अंतिम स्वर्गात राजासनावर विराजमान झालेल्या यहोवाच्या दृष्टांताचा विस्तृत देखावा आपल्या डोळ्यांनी पाहण्याच्या मेजवानीचे निमंत्रण मिळते. (स्तोत्र ११:४; यशया ६६:१) केवढा हा सुहक्क!

३. ‘कर्ण्यासारखी’ वाणी आम्हास कशाची आठवण करून देते आणि तिचा निःसंशये उगम कोण असावा?

बायबल या ‘प्रथम वाणीची’ ओळख स्पष्ट करत नाही. येशूचा भरदार आवाज आधी ऐकला होता तसे, या वाणीठायी आज्ञा देणारा कर्ण्याचा आवाज आहे. (प्रकटीकरण १:१०, ११) तो आम्हाला सीनाय डोंगरावर यहोवाच्या अस्तित्वाचा संकेत देणाऱ्‍या भेदक कर्ण्याच्या आवाजाची आठवण देतो. (निर्गम १९:१८-२०) ज्याने बोलवणे आज्ञापिले आहे तो सर्वोच्च उगम, निःसंशये, यहोवा आहे. (प्रकटीकरण १:१) त्यानेच ते दार उघडल्यामुळे, योहान, दृष्टांतात यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या विशाल क्षेत्रातील परमपवित्र स्थानात प्रवेश करू शकला.

यहोवाची तेजोमय उपस्थिती

४. (अ) योहानाच्या दृष्टांताचा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी कोणता अर्थ होतो? (ब) ज्यांची या पृथ्वीवर सर्वकाळ जिवंत राहण्याची इच्छा आहे अशांसाठी या दृष्टांताचा काय अर्थ आहे?

योहान काय बघतो? त्याच्या भव्य अनुभवाची जी सहभागिता तो आम्हासोबत करतो ती ऐका: “लागलाच मी आत्म्याने संचारित झालो. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.” (प्रकटीकरण ४:२) काही क्षणातच, योहानाला देवाच्या आत्मिक क्रियाशील शक्‍तीद्वारे आध्यात्मिकरित्या यहोवाच्या राजासनापुढे आणण्यात आले. ते योहानाला केवढे थरारक वाटले असेल! येथे त्याला त्या स्वर्गांचा तो विस्मित पूर्वदृष्टांत देण्यात आला, जेथे त्याच्यासाठी व इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी “अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन” राखून ठेवण्यात आले होते. (१ पेत्र १:३-५; फिलिप्पैकर ३:२०) ज्यांची या पृथ्वीवर चिरकाल राहण्याची आशा आहे, अशांसाठी देखील योहानाचा दृष्टांत गहन अर्थ राखून आहे. तो त्यांना यहोवाच्या उपस्थितीचे वैभव आणि यहोवा राष्ट्रांचा न्यायनिवाडा करण्यासाठी व नंतर पृथ्वीवर राहणाऱ्‍या मानवांवर अधिपत्य गाजविण्यासाठी ज्या स्वर्गीय अधिकाराचा आराखडा वापरणार आहे त्यांची समज देण्यात मदत करतो. यहोवा खरोखरच उत्कृष्ठ संघटनेचा देव आहे!

५. कराराच्या कोशाच्या आवरणाद्वारे सूचित असणारी कोणती वास्तवता योहान बघतो?

योहान तेथे वर स्वर्गात जे काही बघतो ते, अरण्यात उभारलेल्या निवासमंडपाच्या प्रतिकृतीशी जुळणारे आहे. हे निवासमंडप इस्राएलांच्या खऱ्‍या भक्‍तीसाठी १,६०० वर्षांआधी बांधण्यात आले होते. त्या निवासमंडपाच्या परमपवित्र स्थानात कराराचा कोश होता आणि या कराराच्या वरच्या भागी असणाऱ्‍या सोन्याच्या घट्ट आवरणावरुन यहोवा स्वतः बोलला. (निर्गम २५:१७-२२; इब्रीयांस ९:५) यास्तव, कराराच्या कोशाचा पृष्ठभाग, यहोवाच्या राजासनाच्या चिन्हाला सूचित करतो. योहान आता त्या लाक्षणिक चिन्हाची खरी वास्तवता बघतो: सेनाधीश प्रभू यहोवा स्वतः वैभवी स्वर्गीय राजासनावर मोठ्या वैभवसंपन्‍नतेने विराजमान आहे!

६. योहान आम्हास यहोवाबद्दल कोणती छाप देतो व ते योग्य का आहे?

यहोवाच्या राजासनाचा दृष्टांत बघणाऱ्‍या आधीच्या संदेष्ट्याप्रमाणे, योहान त्यावर बसलेल्या पवित्र पुरुषाचे सविस्तर वर्णन देत नाही. (यहेज्केल १:२६, २७; दानीएल ७:९, १०) पण त्या आसनाधिष्ठाची आपली छटा योहान या शब्दांत सांगतो: “जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सार्दि या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते.” (प्रकटीकरण ४:३) केवढे हे अतुलनीय प्रदर्शन! एखाद्या तेजस्वी चकाकणाऱ्‍या रत्नासारखे शांतचित्त व सुंदरतेने वेढलेले दृश्‍य योहान पाहतो. शिष्य याकोबाने यहोवाला ‘[दैदिप्यमान, NW] ज्योतिमंडळाचा पिता’ असे जे म्हटले ते किती योग्यपणे याच्याशी जुळणारे आहे! (याकोब १:१७) प्रकटीकरण लिहून संपवल्यावर काही काळातच, योहानाने स्वतः म्हटले: “देव प्रकाश आहे, त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.” (१ योहान १:५) यहोवा हा किती अतिवैभवी व्यक्‍ती आहे!

७. यहोवाच्या राजासनाभोवती एक मेघधनुष्य आहे यापासून आपण काय शिकू शकतो?

योहानाने राजासनाभोवती हिरव्या पाचूसारखे मेघधनुष्य बघितले हे लक्षात घ्या. मेघधनुष्यासाठी असणारा ग्रीक शब्द (इरʹइस) याचे भाषांतर पूर्णपणे गोलाकार सुचवितो. बायबलमध्ये मेघधनुष्याचा पहिला उल्लेख नोहाच्या काळाच्या अनुषंगाने आलेला आहे. जलप्रलयाचे पाणी ओसरल्यावर यहोवाने मेघात एक धनुष्य दाखवले आणि त्याचा काय अर्थ होतो त्याची याप्रकारे स्पष्टता केली: “मी मेघात धनुष्य ठेविले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि यापुढे सर्व देहधाऱ्‍यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही.” (उत्पत्ती ९:१३, १५) मग, आताच्या स्वर्गीय दृष्टांताने योहानाच्या मनात काय आणले असावे? त्याने पाहिलेल्या मेघधनुष्याने त्याला यहोवासोबत शांतीमय नातेसंबंध राखण्याच्या गरजेचे स्मरण दिले असावे. हेच नाते आज योहानवर्ग अनुभवीत आहे. याशिवाय त्याने त्याच्यावर यहोवाच्या उपस्थितीचा शांतचित्तपणा व प्रसन्‍नता याचीही छाप पाडली असावी. हीच प्रसन्‍नता यहोवा, आपल्या नव्या पृथ्वीवरील समाजात मानवजातीवर आपला मंडप विस्तारीत करील, तेव्हा सर्व आज्ञाधारक मानवांप्रत पोहंचेल.—स्तोत्र ११९:१६५; फिलिप्पैकर ४:७; प्रकटीकरण २१:१-४.

२४ वडिलांची ओळख मिळवणे

८. राजासनाच्या सभोवार योहान कोणाला बघतो व हे कोणाचे प्रतिनिधीत्व करतात?

प्राचीन काळी निवासमंडपात सेवा करण्यासाठी याजकांची नियुक्‍ती केली जात होती हे योहानाला ठाऊक होते. त्यामुळे त्याने पुढे जे पाहिले व वर्णन केले त्याचे त्याला नवल वाटले असावे: “राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुगूट घातलेले चोवीस वडील बसलेले होते.” (प्रकटीकरण ४:४) होय, याजकांऐवजी येथे २४ वडील आहेत, ते आसनांवर बसलेले असून त्यांनी राजांसारखे मुकुट घातलेले आहेत. हे वडील कोण आहेत? ते ख्रिस्ती मंडळीतील अभिषिक्‍त जणांशिवाय दुसरे कोणी नाहीत. ते आता पुनरुत्थित झालेले व यहोवाने त्यांना वचन दिलेल्या स्वर्गीय जागा घेतलेले आहेत. पण हे आम्हाला कसे समजते?

९, १०. ते २४ वडील, स्वर्गातील वैभवी पदावर असणाऱ्‍या अभिषिक्‍तांच्या ख्रिस्ती मंडळीचे प्रतिनिधीत्व करतात हे आपल्याला कसे कळते?

पहिली गोष्ट ही की, त्यांनी मुकुट घातलेले आहेत. बायबल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या बाबतीत ते “अविनाशी मुगूट” मिळविणारे व अनंतकालिक जीवन, अमरत्व मिळविणारे असल्याचे सांगते. (१ करिंथकर ९:२५; १५:५३, ५४) पण हे २४ वडील आसनांवर बसलेले असल्यामुळे, ते सोनेरी मुकुट या संदर्भात बादशाही अधिकाराला सूचित करतात. (पडताळा प्रकटीकरण ६:२; १४:१४.) यामुळे या निर्णयाला पुष्टी मिळते की, हे २४ वडील येशूच्या पावलांस अनुसरणारे अभिषिक्‍त अनुयायी त्यांच्या स्वर्गातील पदावर आहेत, कारण येशूने यांच्याबरोबर आपल्या राज्यात राजासनांवर बसण्याचा करार केला आहे. (लूक २२:२८-३०) यहोवाच्या उपस्थितीत, कोणीही देवदूत नव्हे तर, केवळ येशू व हे २४ वडील स्वर्गात राज्य करीत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे.

१० हे येशूने लावदिकीया मंडळीला जे अभिवचन दिले होते त्याच्याशी सुसंगत आहे: “जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.” (प्रकटीकरण ३:२१) तथापि, या २४ वडिलांना देण्यात आलेली स्वर्गीय नेमणूक केवळ शासकीय सत्तेपुरती मर्यादित नाही. प्रकटीकरण पुस्तकाच्या प्रास्ताविकतेत योहानाने येशूबद्दल म्हटले की, त्याने “आपल्याला राज्य, आणि आपला देव व पिता ह्‍याच्यासाठी याजक असे केले.” (प्रकटीकरण १:५, ६) यामुळे हे राजे व याजकही आहेत. “ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करितील.”—प्रकटीकरण २०:६.

११. वडिलांची संख्या २४ ही योग्य का आहे, ती संख्या काय सूचित करते?

११ योहानाने राजासनाभोवती २४ वडील पाहिले तर या २४ संख्येची अर्थसूचकता काय असावी? हे कित्येक बाबतीत, प्राचीन इस्राएलातील विश्‍वासू याजकांची पडछाया ठरतात. प्रेषित पेत्राने या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा.’” (१ पेत्र २:९) ते प्राचीन यहूदी याजकत्व, २४ तुकड्यात विभागण्यात आले होते हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. यहोवासमोर सेवा करण्यासाठी प्रत्येक तुकडीला त्याच्या नियुक्‍त आठवडी नेमणूक देण्यात आली होती, यामुळे पवित्र सेवा अविरतपणे चालत असे. (१ इतिहास २४:५-१९) या कारणामुळे, योहानाने बघितलेल्या याजकांच्या स्वर्गीय दृष्टांतात २४ वडिलांना दाखवण्यात आले आहे हे योग्यच आहे, कारण हे याजकत्व न थांबता यहोवाची सेवा सातत्याने करीत राहते. जेव्हा यांची संख्या पूर्ण होईल तेव्हा, प्रत्येकी ६,००० विजेत्यांची एक, अशा २४ तुकड्या तयार होतील; कारण प्रकटीकरण १४:१-४ आम्हास सांगते की, १,४४,००० (२४ × ६,०००) जणांना कोकरा येशू ख्रिस्त याजबरोबर स्वर्गीय सीयोन डोंगरावर उभे राहण्यासाठी “पृथ्वीवरुन विकत घेतलेले” आहे. वस्तुतः, १२ ही संख्या ईश्‍वरी तोल असणाऱ्‍या संघटनेला सूचित करीत असल्यामुळे, २४ हा आकडा या व्यवस्थेला दुप्पटीने किंवा अधिक बळ देणारा आहे.

विजा, वाणी व मेघगर्जना

१२. योहान यानंतर काय पाहतो व ऐकतो आणि “विजा, वाणी व मेघगर्जना” कशाचे स्मरण करून देतात?

१२ योहान पुढे काय पाहतो व ऐकतो? “राजासनाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या.” (प्रकटीकरण ४:५अ) यहोवाच्या वैभवी सामर्थ्याचे हे केवढे भयावह आठवण करून देणारे प्रदर्शन आहे! उदाहरणार्थ, यहोवा सीनाय पर्वतावर “उतरला” तेव्हा, मोशेने कळविले: “तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. . . . शिंगांचा आवाज अधिकच वाढू लागला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि [खरा, NW] देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला.”—निर्गम १९:१६-१९.

१३. यहोवाच्या राजासनातून निघालेल्या विजा कशाचे प्रतिनिधीत्व करतात?

१३ प्रभूच्या दिवसात, यहोवा आपले सामर्थ्य व उपस्थिती अभूतपूर्व मार्गाने प्रकटवितो. खरोखरच्या विजांनी नव्हे, कारण योहान येथे चिन्हरुपे पाहत आहे. तर मग, या विजा कशाचे प्रतिनिधीत्व करतात? विजांचे चकाकणे प्रकाश पाडते; पण त्या एखाद्याला मृत्युचा तडाखाही देऊ शकतात. या कारणास्तव, यहोवाच्या राजासनातून निघणाऱ्‍या या विजा, त्याच्या लोकांना जो तेजोमयपणा सातत्याने देण्यात आला तो व अधिक अर्थसूचकपणे त्याच्या अग्नीमय न्यायदंडाच्या संदेशांना चित्रित करतात.—पडताळा स्तोत्र १८:१४; १४४:५, ६; मत्तय ४:१४-१७; २४:२७.

१४. आज कशाप्रकारे वाणी निनादल्या आहेत?

१४ आता वाणींबद्दल काय? यहोवा सीनाय डोंगरावर आला तेव्हा मोशेसोबत त्याने एका वाणीने भाष्य केले. (निर्गम १९:१९) स्वर्गातून आलेल्या वाण्यांनी प्रकटीकरणाच्या पुस्तकात कित्येक आज्ञा व घोषणा वदविल्या आहेत. (प्रकटीकरण ४:१; १०:४, ८; ११:१२; १२:१०; १४:१३; १६:१, १७; १८:४; १९:५; २१:३) आजही, यहोवाने आपल्या लोकांना आज्ञा व घोषणा वदवून त्यांची बायबलचे भविष्यवाद व तत्त्वे यांजविषयीची समज अधिक प्रज्वलित बनविली आहे. तेजोमय माहिती ही बहुधा आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत कळविण्यात आली व अशा बायबलच्या सत्यांची नंतर जगजाहीर घोषणा करण्यात आली. सुवार्तिकांच्या विश्‍वासू प्रचारकांबद्दल प्रेषित पौलाने म्हटले: “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर, व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोंचले.”—रोमकर १०:१८.

१५. प्रभूच्या या दिवसात राजासनातून कोणत्या गर्जना निघाल्या आहेत?

१५ विजा चमकल्यानंतर सामान्यपणे गडगडाट होतो. दाविदाने खरोखरीच्या गडगडाटाला “परमेश्‍वराचा [यहोवा, NW] ध्वनि” असे म्हटले. (स्तोत्र २९:३, ४) यहोवा दाविदाकरता त्याच्या शत्रूंशी लढला, तेव्हा त्याच्याकडून गर्जना आल्याचे सांगण्यात आले. (२ शमुवेल २२:१४; स्तोत्र १८:१३) अलिहूने ईयोबाला म्हटले की, यहोवा “आम्हास अगम्य अशी मोठी कृत्ये करतो” तेव्हा त्याचा शब्द जणू गर्जनेचा ध्वनी असतो. (ईयोब ३७:४, ५) प्रभूच्या या दिवसाच्या भागात देखील यहोवाने ‘गर्जना’ केली आहे, म्हणजे, आपल्या शत्रूंच्या विरुद्ध तो जी महत्कृत्ये करणार त्याबद्दलचा इशारा दिला आहे. या लाक्षणिक गर्जनांचा निनाद सबंध जगभर प्रतिध्वनींच्या रुपात परत परत निनादला आहे. या गर्जनेयुक्‍त घोषणेकडे तुम्ही लक्ष दिले आहे आणि त्यांच्या आवाजात भर घालण्यासाठी तुम्ही आपल्या जिभेचाही सदुपयोग करीत असल्यास धन्य आहात!—यशया ५०:४, ५; ६१:१, २.

पेटलेल्या मशाली व काचेचा समुद्र

१६. “पेटलेल्या सात मशाली” यांजद्वारे काय सूचित होते?

१६ यानंतर योहान आणखी काय पाहतो? हे: “पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या देवाचे सात आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता.” (प्रकटीकरण ४:५ब, ६अ) या सात मशालींची अर्थसूचकता स्वतः योहान आम्हाला सांगतो: “त्या देवाचे सात आत्मे आहेत.” सात ही संख्या ईश्‍वरी पूर्णतेला सूचित करते; यामुळे सात मशाली पवित्र आत्म्याच्या प्रज्वलित करणाऱ्‍या शक्‍तीची पूर्णता सूचित करणाऱ्‍या आहेत. हा प्रज्वलितपणा तसेच तो पृथ्वीवरील आध्यात्मिकरित्या क्षुधित असणाऱ्‍या लोकांना भरविण्याची जबाबदारी याबद्दल योहान वर्ग किती कृतज्ञ आहे! दर वर्षी वॉचटावर नियतकालिकाच्या ३८ कोटी प्रती हा प्रकाश शंभरापेक्षा अधिक भाषांत प्रवर्तित करीत आहेत म्हणून आम्हाला केवढा आनंद वाटतो!—स्तोत्र ४३:३.

१७. ‘स्फटिकासारखा काचेचा समुद्र’ कशाला चित्रित करतो?

१७ योहान आणखी, ‘स्फटिकासारखा काचेचा समुद्र’ बघतो. ज्यांना यहोवाच्या स्वर्गीय न्यायालयात प्रवेश देण्याचे निमंत्रण आहे अशांच्या बाबतीत हे काय सूचित करते? येशूने मंडळीचे जे पवित्रीकरण घडवून आणले आहे त्याबद्दल पौलाने म्हटले की, “तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे.” (इफिसकर ५:२६) आपल्या मृत्युआधी येशूने शिष्यांना म्हटले: “जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा.” (योहान १५:३) यास्तव, तो स्फटिकासारखा काचेचा समुद्र, शुद्धीकरण करणाऱ्‍या देवाच्या लिखित वचनास सूचित आहे. यहोवाच्या उपस्थितीत येणारे बादशाही याजकत्वाच्या वर्गाचे लोक त्याच्या वचनाकरवी पूर्णपणे शुद्ध होण्यास हवेत.

पाहा, ते “चार प्राणी”!

१८. राजासनाच्या मध्यभागी व चार बाजूस योहान काय बघतो?

१८ योहान आता आणखी एक वैशिष्ट्य बघतो. तो लिहितो: “आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले चार प्राणी होते.”—प्रकटीकरण ४:६ब.

१९. चार प्राण्यांद्वारे काय चित्रित केले आहे व हे आम्ही कसे जाणतो?

१९ हे प्राणी कशाचे प्रतीक आहेत? आणखी एका संदेष्ट्याने, यहेज्केलने, कळविलेला दृष्टांत आम्हाला हे उत्तर शोधून काढण्यात मदत करतो. यहेज्केलने देखील यहोवाला वैभवी रथावर विराजमान असल्याचे बघितले, ज्या रथासोबत जिवंत प्राणी होते आणि यांची गुणलक्षणे ही योहानाने वर्णिलेल्याप्रमाणेच होती. (यहेज्केल १:५-११, २२-२८) नंतर, यहेज्केलने पुन्हा तो रथ व त्याचे आसन यासोबत ते चारही प्राणी पाहिले. या खेपेला मात्र त्याने या प्राण्यांचा उल्लेख करुब असा केला. (यहेज्केल १०:९-१५) यास्तव, योहानाने पाहिलेले चार प्राणी देवाच्या पुष्कळ करुबांचे प्रतीक असले पाहिजेत. हे देवाच्या आत्मिक संघटनेतील उच्च दर्जाचे प्राणी आहेत. यहोवाच्या इतक्या जवळ करुबांना ठेवल्याचे बघून योहानाला विलक्षण असे काही वाटले नाही, कारण प्राचीन काळच्या निवासमंडपाच्या व्यवस्थेत देखील, यहोवाच्या राजासनाचे प्रतीक असणाऱ्‍या कराराच्या कोशाच्या आवरणावर सोन्याचे दोन करुब दाखविण्यात आले होते. या करुबांमधून, यहोवाने आपल्या वाणीने त्या राष्ट्राला आज्ञा दिल्या.—निर्गम २५:२२; स्तोत्र ८०:१.

२०. ते चार प्राणी हे “राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूंस” आहेत हे कोणत्या मार्गी म्हणता येऊ शकते?

२० हे चार प्राणी, “राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूंस” आहेत. याचा अचूक अर्थ काय होतो? याचा अर्थ, ते राजासनाभोवती अशा जागेत उभे आहेत की, ज्याद्वारे प्रत्येक जण, प्रत्येक बाजूच्या मध्यावर आहे असे दिसते. यामुळेच, टुडेज इंग्लिश व्हर्शनच्या भाषांतरकारांनी मूळच्या ग्रीक संज्ञेचा भिन्‍न शब्दात असा अर्थ केला: “राजासनाच्या बाजूंनी त्याच्या प्रत्येक दिशेला.” पर्यायाने त्या शब्दांचा असा अर्थ होऊ शकतो की, ते चार प्राणी स्वर्गात जेथे राजासन आहे त्याच्या मध्यभागी आहेत. कदाचित, याचसाठी द जरुसलेम बायबल ही संज्ञा देते की, “मध्यभागी स्वतः त्या आसनाभोवती एकत्रित करण्यात आलेले.” येथे, यहेज्केलने यहोवाच्या संघटनात्मक रथाच्या प्रत्येक टोकाला जे चार करुब बघितले त्याच्या तुलनेत, यहोवाच्या राजासनाभोवती असणाऱ्‍या करुबांची निकटता ही महत्त्वाची गोष्ट आहे. (यहेज्केल १:१५-२२) हे सर्व स्तोत्र ९९:१ मधील शब्दांशी जुळणारे आहे की, “परमेश्‍वर [यहोवा, NW] राज्य करितो, . . . तो करुबांवर अधिष्ठित आहे.”

२१, २२. (अ) योहान चार प्राण्यांचे कसे वर्णन देतो? (ब) चार प्राण्यांतील प्रत्येकाच्या स्वरुपावरुन तो कशाचे प्रतिनिधीत्व करतो?

२१ योहान पुढे म्हणतो: “पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्ह्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरूडासारखा होता.” (प्रकटीकरण ४:७) हे चारही प्राणी एकमेकांपासून अगदी वेगळे का दिसतात? हे विविध चार प्राणी विशिष्ट ईश्‍वरी गुण ठळकपणे सामोरे मांडतात हे उघड आहे. पहिला, प्राणी सिंह आहे. बायबलमध्ये सिंहाचा धैर्यासाठी व खासपणे न्याय व नीतीमत्तेसाठी जोपासलेले धैर्य म्हणून प्रतिकात्मक वापर करण्यात आलेला आहे. (२ शमुवेल १७:१०; नीतीसूत्रे २८:१) अशाप्रकारे, सिंह हा धैर्यशील न्यायाच्या ईश्‍वरी गुणाचे प्रतिनिधीत्व करतो. (अनुवाद ३२:४; स्तोत्र ८९:१४) दुसरा प्राणी गोऱ्ह्यासारखा दिसत होता. गोऱ्‍हा कोणता गुण आपल्या लक्षात आणतो? इस्राएलांसाठी गोऱ्‍हा हा त्याच्या बळामुळे खूप मोलवान संपत्ती होता. (नीतीसूत्रे १४:४; तसेच ईयोब ३९:९-११ देखील पहा.) या कारणास्तव, तरुण गोऱ्‍हा सामर्थ्यास, यहोवा पुरवीत असलेल्या प्रबळ शक्‍तिला सूचित करतो.—स्तोत्र ६२:११; यशया ४०:२६.

२२ तिसऱ्‍या प्राण्याचे तोंड मनुष्याच्या तोंडासारखे आहे. हे देवसदृश्‍य प्रेमाचे प्रतिनिधीत्व करीत असले पाहिजे, कारण पृथ्वीवर केवळ मानवालाच देवाच्या प्रतिरुपाप्रमाणे, प्रीतीच्या श्रेष्ठ गुणासहित निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ती १:२६-२८; मत्तय २२:३६-४०; १ योहान ४:८, १६) करुब यहोवाच्या राजासनाभोवती सेवा करीत असताना निःशंकपणे, हे गुण प्रदर्शित करीत असतात. पण चौथ्या जिवंत प्राण्याबद्दल काय? तो दिसण्यात उडणाऱ्‍या गरुडासारखा आहे. गरुडाची किती सूक्ष्म दृष्टी असते ते यहोवा स्वतःच आपल्या लक्षात आणून देतो: “त्याच्या नेत्रांस . . . दूरवर दिसते.” (ईयोब ३९:२९) यास्तव, गरुड हा दूरदृष्टीच्या बुद्धिस सूचित करणारा आहे. यहोवा हा बुद्धिचा उगम आहे. त्याचे करुब त्याच्या आज्ञांचे पालन करीत असता ईश्‍वरी बुद्धिची जोपासना करतात.—नीतीसूत्रे २:६; याकोब ३:१७.

यहोवाची स्तुती निनादते

२३. चार प्राण्यांना ‘सर्वांगी डोळे’ आहेत हे कशाची सूचकता दर्शविते आणि त्यांना पंखांच्या तीन जोड्या आहेत हे कशावर जोर देते?

२३ योहान आपले वर्णन पुढे सांगतो: “त्या चारहि प्राण्यांना प्रत्येकी सहा सहा पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते, आणि ‘पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभु देव [यहोवा, NW]’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.” (प्रकटीकरण ४:८) ही डोळ्यांची सर्वांगपूर्णता, पूर्ण तसेच दूरदृष्टी असल्याचे सुचविते. वस्तुतः, या चार प्राण्यांना निद्रेची आवश्‍यकता नसल्यामुळे ते ही दृष्टी सतत राखून आहेत. ते, त्या एकाचे अनुकरण करतात, ज्याच्याबद्दल असे लिहिण्यात आले आहे की, “परमेश्‍वराचे [यहोवा, NW] नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” (२ इतिहास १६:९) इतके डोळे असल्यामुळे करुब सर्वत्र बघू शकतात. त्यांच्या नजरेतून काहीही सुटत नाही. अशाप्रकारे ते देवाला त्याच्या न्यायाच्या कामी मदत देण्यात सदैव तत्पर असतात. त्याच्याविषयी असे सांगण्यात आले आहे: “परमेश्‍वराचे [यहोवा, NW] नेत्र सर्वत्र आहेत, ते बरेवाईट पाहत असतात.” (नीतीसूत्रे १५:३) पंखांच्या तीन जोड्या असल्यामुळे—बायबलमध्ये तीन ही संख्या जोर देण्यासाठी वापरली आहे—हे करुब यहोवाच्या न्यायाचा संदेश घोषित करण्यासाठी व त्याच्या अंमलबजावणीसाठी विजेच्या चपळाईने जाऊ शकतात.

२४. करुब यहोवाची कशी स्तुती करतात आणि कोणत्या अर्थसूचकतेसह?

२४ ऐका! करुब यहोवाला सुगम, जीवास थरारकता देणारे स्तुतीगीत गात आहेत: “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभु देव [यहोवा, NW].” पुन्हा येथे जो त्रिवारपणा आहे, तो त्याच्या प्रखरतेला सूचक आहे. करुब यहोवा देवाच्या पावित्र्याबद्दल जोरदारपणे पुष्टी देत आहेत. तो पवित्रतेच्या दर्जाचा अत्युच्च उगम आहे. तो ‘सनातन राजा,’ नेहमीच “पहिला व शेवटला, आदि व अंत” असा आहे. (१ तीमथ्य १:१७; प्रकटीकरण २२:१३) सर्व निर्मितीपुढे यहोवाचे अतुलनीय गुण जाहीर करीत असता हे करुब विश्रांती घेत नाहीत.

२५. प्राणी तसेच २४ वडील यहोवाला पूज्यता देण्यात कसे एक आहेत?

२५ स्वर्गातील स्वर्ग यहोवाच्या स्तुतीचा निनाद करीत आहेत! योहानाचे वर्णन पुढे म्हणते: “राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुति करितात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात; जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करितात आणि आपले मुगूट राजासनापुढे ठेवून म्हणतात: ‘हे प्रभो [यहोवा, NW], आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.’” (प्रकटीकरण ४:९-११) सबंध शास्त्रवचनात, यहोवा आमचा देव व सार्वभौम प्रभू याला देण्यात आलेल्या मानवंदनांपैकी ही अत्यंत भव्य अशी वंदना आहे!

२६. ते २४ वडील आपले मुकुट यहोवापुढे का ठेवतात?

२६ त्या २४ वडिलांठायी येशूने प्रदर्शित केलेली मनोवृत्ती आहे. ते आपले मुकुट खाली यहोवापुढे ठेवतात. देवाच्या उपस्थितीत असताना स्वतःस उंचवावे असा विचार देखील त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यांना मिळालेल्या राजपदाचा एकमात्र उद्देश, येशूने नेहमी केले तसेच, देवाला सन्मान व गौरव मिळवून द्यावे हा आहे हे ते लीनतेने ओळखतात. (फिलिप्पैकर २:५, ६, ९-११) ते नम्रपणे आपला कनिष्ठपणा कबूल करतात व आपणाला देण्यात आलेले अधिपत्य सार्वभौम प्रभू यहोवावर अवलंबून आहे हे मान्य करतात. अशाप्रकारे, ते करुब तसेच इतर विश्‍वासू प्राणिमात्रांच्या सहमतात सर्व गोष्टींचा निर्माता देव याला स्तुती व सन्मान देतात.—स्तोत्र १५०:१-६.

२७, २८. (अ) योहानाने या दृष्टांताचे जे वर्णन दिले आहे त्याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा? (ब) योहान यानंतर जे पाहतो व ऐकतो त्याबद्दल कोणते प्रश्‍न उभे राहतात?

२७ योहानाने या दृष्टांताचा जो अहवाल वर्णिलेला आहे तो वाचून कोण भारावल्याविना राहू शकेल? तो तर अती भव्यतेचा आहे! पण त्याची वस्तुस्थिती कशी असावी? यहोवाच्या वैभवामुळे कोणाचेही अंतःकरण भरुन येऊन त्याने आपल्या वैयक्‍तिक प्रार्थनेत तसेच त्याचे नाव जाहीरपणे प्रचार करताना ते चार प्राणी व २४ वडील यांच्यासोबत मिळून त्याची स्तुती गावी. हा तोच देव आहे ज्याचे साक्षीदार होण्याची ख्रिश्‍चनांना आज सुसंधी मिळाली आहे. (यशया ४३:१०) योहानाला देण्यात आलेला दृष्टांत आज आपण जगत आहोत त्या प्रभूच्या काळास लागू होणारा आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी व आमची बळकटी करण्यासाठी “सात आत्मे” सतत तयार आहेत. (गलतीकर ५:१६-१८) पवित्र देवाची सेवा करण्यासाठी पवित्र राहण्यामध्ये देवाचे वचन आज आमच्या साहाय्यार्थ उपलब्ध आहे. (१ पेत्र १:१४-१६) या संदेशाचे शब्द मोठ्याने वाचण्यात आम्ही खरेच धन्य आहोत. (प्रकटीकरण १:३) आम्ही यहोवाला विश्‍वासू राहावे व त्याची क्रियाशीलपणे स्तुती गात राहण्यापासून जगाने आम्हाला परावृत्त करू नये म्हणून ते शब्द आम्हाला केवढे उत्तेजन देतात!—१ योहान २:१५-१७.

२८ योहानाने आतापर्यंत, स्वर्गात उघडलेल्या दारातून आत येण्याचे निमंत्रण मिळाल्यावर जे काही पाहिले त्याचे वर्णन दिले आहे. अगदी उल्लेखनीयरित्या तो आम्हास कळवतो की, यहोवा, आपल्या सर्व वैभवानिशी व बहुमानाने आपल्या वैभवी राजासनावर विराजमान आहे. त्याच्या सभोवार सर्वात सामर्थ्यवान अशी संस्था आहे, ती तिचे वैभव व निष्ठावंतपणा यात चकाकत आहे. ईश्‍वरी न्यायालय आता सुरु झाले आहे. (दानीएल ७:९, १०, १८) आता रंगमंचावर काहीतरी अभूतपूर्व असे घडण्याच्या बेतात आहे. ते काय आहे व याचा आज आम्हावर कसा परिणाम होणार? ते, दृश्‍य पुढे येत असता आपण पाहू या!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[७५ पानांवरील चित्र]

[७८ पानांवरील चित्र]