व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू उत्तेजनासह येतो

येशू उत्तेजनासह येतो

अध्याय ४

येशू उत्तेजनासह येतो

१. योहान आता कोणास लिहितो आणि आज कोणास त्याचा संदेश अत्यंत मनोवेधक असा वाटण्यास हवा?

 आज देवाच्या लोकांच्या मंडळीसोबत जे सहवास राखून आहेत त्या प्रत्येकासाठी, पुढे जे काही आहे ते अत्यंत मनोवेधक आस्थेचे आहे. येथे संदेशाची एक मालिकाच आहे. नेमलेला “समय” जवळ येत आहे तसतसा त्यांचा विशिष्ट अवलंब स्पष्ट होत आहे. (प्रकटीकरण १:३) त्या घोषणांकडे लक्ष देणे हे आमच्या सार्वकालिक फायद्याचे आहे. अहवालात असे वाचण्यात येते: “आशियातील सात मंडळ्यांस योहानाकडून जो आहे, होता व जो येणार त्याच्यापासून त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापासून आणि . . . येशू ख्रिस्त ह्‍याच्यापासून, तुम्हास कृपा व शांति असो.”—प्रकटीकरण १:४, ५ब.

२. (अ) “सात” ही संख्या कशाची सुचकता दर्शवते? (ब) ‘सात मंडळ्यांना’ अनुलक्षून असणारा संदेश, प्रभूच्या दिवसात कोणास लागू होतो?

योहान येथे ‘सात मंडळ्यांना’ उद्देशून लिहित आहे; यांची नावे भविष्यवादात आपल्याला नंतर वाचावयास मिळतील. “सात” ही संख्या प्रकटीकरणात वारंवार उपयोगात आणलेली आहे. ती देव व त्याच्या अभिषिक्‍त मंडळीच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संपूर्णतेविषयीची सूचकता दर्शवते. जगभरात देवाच्या लोकांच्या मंडळ्यांची संख्या आता प्रभूच्या दिवसात हजारोंनी वाढलेली असल्यामुळे, प्रामुख्यत्वे अभिषिक्‍तांच्या ‘सात मंडळ्यांना’ जे काही म्हणण्यात आले आहे ते आजही देवाच्या सर्व लोकांना लागू होणारे आहे याची आपल्याला खात्री धरता येईल. (प्रकटीकरण १:१०) होय, या पृथ्वीच्या पाठीवर असणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व मंडळ्यांसाठी व त्यांच्यांशी संलग्न राहणाऱ्‍या सर्वांसाठी योहानाकडे महत्त्वपूर्ण संदेश आहे.

३. (अ) योहानाच्या अभिवादनातील “कृपा व शांति” कोठून येतात? (ब) प्रेषित पौलाचे कोणते शब्द योहानाच्या अभिष्ट चिंतनासारखे आहेत?

“कृपा व शांति”—या गोष्टी किती इष्ट आहेत व खासपणे जेव्हा आम्ही त्यांच्या उगमाविषयी विचार करतो, तेव्हा तर त्या अधिकच हव्याहव्याशा वाटतात! या गोष्टी ज्याच्याकडून मिळतात तो स्वतः सार्वभौम प्रभु यहोवा, ‘सनातन राजा’ आहे, जो “अनादिकालापासून अनंतकालपर्यंत” जिवंत आहे. (१ तीमथ्य १:१७; स्तोत्र ९०:२) येथे ते “सात आत्मे” सुद्धा गोवलेले आहेत, जी संज्ञा देवाची क्रियाशील शक्‍ती किंवा पवित्र आत्मा याच्या पूर्ण स्वरुपाच्या कार्यवहनास सूचित करणारी आहे. ती शक्‍ती, भविष्यवादाकडे लक्ष देणाऱ्‍या सर्वांना समज व आशीर्वाद मिळवून देते. याखेरीज, “येशू ख्रिस्त” याची भूमिकाही प्रमुख स्वरुपाची आहे, त्याच्याबद्दल योहानाने नंतर लिहिले: तो “अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण” होता. (योहान १:१४) अशाप्रकारे, योहानाने जे अभिष्टचिंतन लिहिले त्यातील घटक, प्रेषित पौलाने करिंथकरांच्या मंडळीस लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्राच्या अंताला जे समारोपाचे विचार लिहिले, त्याच्याशी सदृश्‍य आहेत. त्याने लिहिले: “प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.” (२ करिंथकर १३:१४) आज सत्यावर प्रीती दाखवणाऱ्‍या आम्हा सर्वांना देखील ते शब्द लागू होवोत!—स्तोत्र ११९:९७.

“विश्‍वसनीय साक्षी”

४. योहान येशू ख्रिस्ताचे पुढील वर्णन कसे देतो आणि त्याने दिलेली वर्णनात्मक रुपे योग्य प्रकारातील का आहेत?

सबंध विश्‍वामध्ये यहोवाच्या नंतर येशू हा अत्यंत वैभवी व्यक्‍ती आहे. हे योहान मान्य करतो व त्याच्याबद्दल म्हणतो: “‘विश्‍वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला,’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’” आहे. (प्रकटीकरण १:५अ) आकाशातील चंद्राप्रमाणे, यहोवाच्या देवत्वाचा सर्वथोर साक्षी असा तो खंबीरतेत स्थापित झालेला आहे. (स्तोत्र ८९:३७) यज्ञार्पित मरणापर्यंत त्याने आपली सचोटी राखल्यानंतर, अमर अशा आत्मिक जीवनासाठी, मानवजातीतून सर्वप्रथम उठविलेला असा तो झाला. (कलस्सैकर १:१८) आता यहोवाच्या सान्‍निध्यात, पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा तो उंचावला गेला आहे व त्याला “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार” दिला आहे. (मत्तय २८:१८; स्तोत्र ८९:२७; १ तीमथ्य ६:१५) पृथ्वीवरील राष्ट्रांमध्ये अधिपत्य गाजविण्याकरता त्याला १९१४ मध्ये अधिष्ठित करण्यात आले.—स्तोत्र २:६-९; मत्तय २५:३१-३३.

५. (अ) योहान, प्रभु येशू ख्रिस्ताबद्दलची रसिकता पुढे कशी व्यक्‍त करतो? (ब) येशूच्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या देणगीमुळे कोणाचा फायदा होतो आणि अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी या खास आशीर्वादात कसा सहभाग घेतला आहे?

प्रभु येशू ख्रिस्ताविषयी योहान आणखी आपली रसिकता व्यक्‍त करीत पुढचे हे रसभरीत वर्णन अशा शब्दात देतो: [तो] आपल्यावर प्रीती करितो, [त्याने] आपल्या रक्‍ताने तुम्हाआम्हाला आपल्या पातकांतून मुक्‍त केले आणि आपल्याला राज्य, आपला देव व पिता ह्‍याच्यासाठी याजक असे केले; त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन.’ (प्रकटीकरण १:५क, ६) येशूने आपले परिपूर्ण मानवी जीवन दिले, ज्यामुळे मानवजातीच्या जगातील जे कोणी त्याजवर विश्‍वास ठेवतात अशांठायी परिपूर्ण जीवन पुनर्स्थापित व्हावे. प्रिय वाचकहो, यात तुम्ही देखील समाविष्ट होऊ शकता! (योहान ३:१६) तथापि, योहानाप्रमाणे जे अभिषिक्‍त ख्रिस्ती बनले आहेत, त्यांच्यासाठी विशेष आशीर्वादांकरता येशूच्या यज्ञार्पित मरणामुळे मार्ग खुला झाला. यांना येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर नीतीमान असे घोषित करण्यात आले आहे. येशूने केले त्याप्रमाणेच पृथ्वीवरील जीवनाच्या सर्व भवितव्याचा त्याग करून, लहान कळपातील सदस्य, येशू ख्रिस्तासोबत त्याच्या राज्यात राजे व याजक या नात्याने सेवा करण्यास, पुनरुत्थानाच्या अपेक्षेसह पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त होतात. (लूक १२:३२; रोमकर ८:१८; १ पेत्र २:५; प्रकटीकरण २०:६) केवढा हा भव्य हक्क! यामुळेच योहानाने गौरव व सामर्थ्य हे येशूचे आहे असे जे म्हटले त्यात काही नवल नव्हते!

“मेघासहित येतो”

६. (अ) येशूच्या ‘मेघासहित येण्याबद्दल’ योहान काय घोषित करतो आणि यावेळी योहानाला येशूच्या कोणत्या भविष्यवादाची आठवण झाली असेल? (ब) येशू कसा ‘येतो’ आणि पृथ्वीवर कोणाला मोठे दुःख होणार?

आता, योहान आनंदाने हे घोषित करतो: “पाहा, तो मेघासहित येतो; प्रत्येक डोळा त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले तेहि पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन.” (प्रकटीकरण १:७) या ठिकाणी, योहानाला, येशूने व्यवस्थीकरणाच्या समाप्तीबद्दल केलेल्या भविष्यवादाची आठवण झाली असावी हे नक्की. येशूने तेथे म्हटले होते: “तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल; मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करितील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरुढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.” (मत्तय २४:३, ३०) अशाप्रकारे, येशू ‘येतो’ म्हणजे तो राष्ट्रांवर यहोवाचा न्यायदंड बजावण्याच्या हेतूने त्यांच्याकडे आपले लक्ष वळवितो. यामुळे पृथ्वीवर लक्षणीय बदल होतील शिवाय “पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक” यांनी येशूच्या राज्यपदाकडे खरेपणाने दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यांना ‘सर्वसमर्थ देवाच्या क्रोधाचा’ अनुभव घ्यावा लागेल.—प्रकटीकरण १९:११-२१; स्तोत्र २:२, ३, ८, ९.

७. आज्ञाभंजकांचाही समावेश आहे असा “प्रत्येक डोळा” येशूला कसा “पाहील”?

येशूने आपल्या शिष्यांसमवेत घालवलेल्या शेवटल्या सायंकाळी त्यांना म्हटले होते: “आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही.” (योहान १४:१९) तर मग, “प्रत्येक डोळा त्याला पाहील,” हे कसे? येशूचे शत्रू त्याला आपल्या शारीरिक नेत्रांनी पाहू शकतील अशी अपेक्षा आम्हाला धरता येणार नाही, कारण प्रेषित पौलाने, येशूच्या पुनरुत्थानानंतरच्या त्याच्या स्थितीविषयी सांगताना असे म्हटले की, येशू “अगम्य प्रकाशात राहतो” व त्याला “कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही.” (१ तीमथ्य ६:१५, १६) यास्तव, योहानाने “पाहील” असे जे लिहिले, त्याचा अर्थ “जाणणे” असा होतो; जसे की देवाचे अदृश्‍य गुण आपल्याला त्याच्या निर्मितीद्वारे स्पष्ट दिसतात किंवा समजतात. (रोमकर १:२०) येशू “मेघासहित येतो” याचा अर्थ, जसा सूर्य ढगात असताना आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, तसाच येशूही आपल्या डोळ्यांना अदृश्‍य असेल. दिवसा सूर्य जेव्हा ढगाआड झालेला असतो तेव्हा, तो आहे हे आपल्याला सभोवार पसरलेल्या त्याच्या प्रकाशामुळे कळते. याचप्रमाणे, प्रभु येशू अदृश्‍य असला तरी तो, ‘अग्निज्वालावेष्ठित असा प्रकट होऊन जे त्याची सुवार्ता मानीत नाही अशांचा तो सूड उगवील.’ यांना देखील त्याला “पाहण्यास” भाग पाडले जाईल.—२ थेस्सलनीकाकर १:६-८; २:८.

८. (अ) सा.यु. ३३ मध्ये “ज्यांनी त्याला भोसकले” ते कोण होते आणि आज असे कोण आहेत? (ब) येशू आता पृथ्वीवर नाही तर लोक त्याला कसे ‘भोसकू शकतात’?

“ज्यांनी त्याला भोसकले,” तेही येशूला ‘पाहतील.’ हे कोण असावेत? सा.यु. ३३ मध्ये येशूला देहांत शिक्षा झाली, तेव्हा रोमी शिपायांनी त्याला अक्षरशः भोसकले होते. या खूनाचा दोष यहुद्यांवरही आला होता, कारण पेत्राने यापैकीच्या काहींना पेंटेकॉस्टच्या वेळी असे म्हटले: “ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, त्याला देवाने प्रभु व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” (प्रेषितांची कृत्ये २:५-११, ३६; पडताळा जखऱ्‍या १२:१०; योहान १९:३७.) ते रोमी व यहुदी आता मरुन जवळजवळ २,००० वर्षे होत आली आहेत. यास्तव, जे ‘त्याला भोसकतात,’ ते आज, येशूला वधस्तंभी दाखविण्यात आलेल्या द्वेषपूर्ण मनोवृत्तीसारखीच वृत्ती दाखविणारी राष्ट्रे व लोक यांचे प्रतिनिधीत्व करणारे जन आहेत. येशू आता पृथ्वीवर नाही. तथापि, येशूबद्दल साक्ष देतात अशा यहोवाच्या साक्षीदारांचा जे विरोध, छळ करतात किंवा मूकपणे अशा कृतीला आपली मान्यता देतात ते विरोधक जणू येशूलाच ‘भोसकत’ असतात.—मत्तय २५:३३, ४१-४६.

“अल्फा व ओमेगा”

९. (अ) आता कोण बोलतो आणि प्रकटीकरणात तो असे किती वेळा बोलतो? (ब) जेव्हा यहोवा स्वतःला “अल्फा व ओमेगा” तसेच “सर्वसमर्थ” असे संबोधितो तेव्हा त्याचा काय अर्थ होतो?

आता, आश्‍चर्यांतील आश्‍चर्य! सार्वभौम प्रभु यहोवा स्वतः बोलतो. तो आमचा महान शिक्षक आणि प्रकटीकरणाचा एकमेव उगम असल्यामुळे, प्रकट होत असलेल्या दृष्टांताची प्रस्तावना त्याने करावी हे किती योग्य आहे! (यशया ३०:२०) आमचा देव घोषित करतो: “जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्वसमर्थ तो म्हणतो, ‘मी अल्फा व ओमेगा आहे.’” (प्रकटीकरण १:८) प्रकटीकरणातील तीनपैकी ही पहिली वेळ आहे जेथे यहोवा स्वतः स्वर्गातून बोलतो. (प्रकटीकरण २१:५-८; २२:१२-१५ हेही पहा.) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी, अल्फा व ओमेगा हे ग्रीक मधील अनुक्रमे पहिले व शेवटले मुळाक्षर आहे हे लगेच ओळखले असेल. त्या दोन अक्षरांद्वारे स्वतःला संबोधून घेतल्यामुळे यहोवा हे दर्शवू इच्छित होता की, त्याच्या अगोदर कोणीही सर्वसमर्थ देव नव्हता आणि त्याच्यानंतरही होणार नाही. देवत्वाबद्दलचा वादविषय तो सर्वकाळाकरता यशस्वीरित्या पूर्णत्वास आणील. आपल्या सर्व उत्पत्तीचा सर्वोच्च सार्वभौम या नात्याने तोच एकमेव सर्वसमर्थ देव असल्याचे सर्वकाळासाठी समर्थन केले जाईल.—पडताळा यशया ४६:१०; ५५:१०, ११.

१०. (अ) यानंतर योहान स्वतःचे कसे वर्णन देतो आणि त्यास कोठे बंदिस्त करण्यात आले होते? (ब) योहानाने लिहिलेली गुंडाळी कोणाच्या सहकार्याने मंडळ्‌यांकडे पाठविण्यात आली असावी? (क) आज आध्यात्मिक अन्‍न वेळोवेळी कसे पुरविले जाते?

१० यहोवा सर्व गोष्टींचे परिणाम मार्गदर्शित करील या आत्मविश्‍वासाने, योहान आपल्या सोबतीच्या दासांना सांगतो: “मी योहान, जो तुमचा बंधु आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्‍यांचा भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्‍यांखातर पात्म नावाच्या बेटात होतो.” (प्रकटीकरण १:९) सुवार्तेसाठी पात्म बेटात कैदी असणारा आणि आपल्या बांधवासोबत संकटे सहन करणारा तसेच, येणाऱ्‍या राज्यात सहभागी होण्याची दृढ आशा धरणारा वृद्ध प्रेषित योहान आता प्रकटीकरणातील पहिला दृष्टांत पाहतो. ह्‍या दृष्टांतांद्वारे त्याला मोठे उत्तेजन मिळाले यात काही शंका नाही; कारण यांची आज प्रत्यक्ष पूर्णता बघून योहान वर्गाला देखील तितकेच उत्तेजन मिळत आहे. योहानाने प्रकटीकरणाची गुंडाळी मंडळ्यांकडे कशी पाठविली ते आम्हास ज्ञात नाही; कारण तो त्यावेळी बंदिस्त होता. (प्रकटीकरण १:११; २२:१८, १९) हे काम पार पाडण्यात यहोवाच्या देवदूतांनी सहकार्य दिले असावे हे नक्की; कारण आज, ज्या ठिकाणी बंदी आहे तेथे काम करणाऱ्‍या यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांचे संरक्षण त्यांनी केले आहे, यामुळे यांना सत्याची क्षुधा राखणाऱ्‍या त्यांच्या आध्यात्मिक बांधवांना समयोचित अन्‍न देता आले.—स्तोत्र ३४:६, ७.

११. ज्याची योहानाने रसिकता बाळगली होती असा कोणता हक्क आज योहान वर्ग अत्यंत विशेषपणे मोलवान असे समजतो?

११ मंडळ्यांसोबतचे दळणवळणाचे माध्यम या अर्थी यहोवाने आपला वापर करून घेतला या विशेष हक्काबद्दल योहानाला किती खोल कृतज्ञता वाटली असावी! याचप्रमाणे, देवाच्या घरच्या लोकांसाठी आज, योहान वर्ग “यथाकाळी [आध्यात्मिक] अन्‍न देण्यास” जो हक्क मिळाला त्याबद्दल मोठी कदर दाखवीत आहे. (मत्तय २४:४५) या आध्यात्मिक तरतूदीद्वारे तुमची आध्यात्मिक बळकटी साधली जावो आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाचे वैभवी ध्येय प्राप्त होवो!—नीतीसूत्रे ३:१३-१८; योहान १७:३.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चौकट]

कठीण काळात आध्यात्मिक अन्‍न मिळविणे

या शेवटल्या काळी, यहोवाच्या साक्षीदारांना मोठा त्रास व छळ सहन करावा लागला तरी आपल्या विश्‍वासात दृढ राहता यावे यासाठी त्यांना आध्यात्मिक अन्‍न मिळत राहणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे. बहुतेक प्रकरणात पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला. हे यहोवाच्या अप्रतिम सामर्थ्याद्वारे घडले.

उदाहरणार्थ, जर्मनीमध्ये हिटलरच्या काळी, साक्षीदार द वॉचटावर याच्या नकला करुन त्याच्या प्रतीचे वाटप करीत; यावर क्रूर नात्सी अधिकाऱ्‍यांनी बंदी घातली होती. या नकला करण्याचे काम जेथे केले जाई तेथे, हम्बर्गमध्ये एका घरी गेस्टापोंनी छापा घातला. ते घर लहान होते व लपवून ठेवण्याजोगी सुरक्षित जागा नव्हती. टाईपरायटर कपाटात ठेवण्यात आला होता आणि नकला करण्याचे साहित्य बटाटे ठेवण्याच्या टोपलीत तळघरात ठेवण्यात आले होते. या टोपलीच्या मागे एक पेटी नियतकालिकांनी पूर्णपणे भरलेली होती! शोध करणे चुकणार नव्हते. पण काय घडले? ज्या अधिकाऱ्‍याने कपाट उघडून पाहिले, ते त्याने अशा पद्धतीने उघडले की, त्याला टाईपरायटर दिसू शकला नाही. तळघराबद्दल घरचे यजमान कळवतात: “तीन अधिकारी त्या खोलीत मध्यभागी उभे राहिले व तेथेच ती टोपली व वॉचटावर नियतकालिकांनी पूर्ण भरलेली पेटी होती. पण हे साहित्य त्या तिघांपैकी एकालाही दिसले नाही; जणू त्यांचे डोळे अंधळे करण्यात आले होते.” या ईश्‍वरी साहाय्याबद्दल खरेच आभारी आहोत, कारण नंतर हेच कुटुंब खडतर व धोक्याच्या काळी आध्यात्मिक अन्‍नाचा पुरवठा करीत राहिले.

१९६० च्या दशकात, नायजेरियात मुलकी युद्ध घडले आणि बायफ्रा हा प्रांत विभागला गेला. या बायफ्राच्या सभोवार नायजेरियन प्रदेश असल्यामुळे याचा आणि बाहेरील जगताचा संपर्क केवळ हवाई मार्गाने होऊ शकत होता. याचा अर्थ हा की, बायफ्रा येथे असलेल्या साक्षीदारांना आध्यात्मिक आहार न मिळण्याचा धोका संभवला होता. मग, १९६८ च्या आरंभाला बायफ्रन अधिकाऱ्‍यांनी त्यांच्यातील एका मुलकी कामगाराला युरोपातील एका मोठ्या पदावर नेमले आणि दुसऱ्‍या एकाला बायफ्रन हवाई मार्गावर नेमले. हे दोघेही यहोवाचे साक्षीदार होते आणि हे दोघेच बायफ्रा व बाहेरील जग यामधील दोन दुवे होते. या दोघांनीही जाणले की, ही यहोवाकडील व्यवस्था असावी. यामुळेच त्यांनी बायफ्रा येथे आध्यात्मिक अन्‍न आणण्याचे अत्यंत नाजूक व धोकादायक काम करण्याची स्वेच्छा दाखवली. ते त्यांना सबंध युद्धकाळात करता आले. यापैकीच्या एकाने असे म्हटले की, “ही व्यवस्था अशी झाली की, जी कोणा मानवाला कधीच आखता आली नसती.”

[१९ पानांवरील चौकट]

प्रकटीकरणातील लाक्षणिक संख्या

संख्या लाक्षणिक अर्थ

२ एखाद्या गोष्टीच्या पुष्ट्यर्थ सबळतेला सूचकता दाखविते. (प्रकटीकरण ११:३, ४; पडताळा अनुवाद १७:६.)

३ जोर सूचित करते. प्रखरता दाखविते. (प्रकटीकरण ४:८; ८:१३; १६:१३, १९)

४ बांधेसूदपणाच्या बाबतीत चौरसाकृती किंवा सार्वत्रिकपणा सूचविते. (प्रकटीकरण ४:६; ७:१, २; ९:१४; २०:८; २१:१६)

६ अपूर्णतेचे सूचक. सर्वसाधारण नसणारे, राक्षसी. (प्रकटीकरण १३:१८; पडताळा २ शमुवेल २१:२०.)

७ ईश्‍वरी प्रमाणाद्वारे ठरविलेल्या संपूर्णतेचे सूचक, यहोवाच्या किंवा सैतानाच्या उद्देशांच्या अनुषंगाने. (प्रकटीकरण १:४, १२, १६; ४:५; ५:१, ६; १०:३, ४; १२:३)

१० पृथ्वीवरील गोष्टींच्या अनुषंगाने भौतिकदृष्ट्या पूर्णतेचे वा संपूर्णतेचे सूचक. (प्रकटीकरण २:१०; १२:३; १३:१; १७:३, १२, १६)

१२ स्वर्गात किंवा पृथ्वीवर ईश्‍वरी प्रमाणाने संघटित करण्यात आलेली संस्था. (प्रकटीकरण ७:५-८; १२:१; २१:१२, १६; २२:२)

२४ यहोवाच्या संघटनात्मक व्यवस्थेची मुबलकता (दुप्पटपणा) याचे सूचक. (प्रकटीकरण ४:४)

प्रकटीकरणात दिलेल्या काही संख्या शब्दशः गृहीत धरल्या पाहिजेत. बहुधा, संदर्भ ते सूचित करतो. (पाहा प्रकटीकरण ७:४, ९; ११:२, ३; १२:६, १४; १७:३, ९-११; २०:३-५.)