व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लवकरच घडल्या पाहिजेत अशा गोष्टी

लवकरच घडल्या पाहिजेत अशा गोष्टी

अध्याय ३

लवकरच घडल्या पाहिजेत अशा गोष्टी

१. या जगावरील देवाच्या न्यायदंडाची अंमलबजावणी तुम्ही कशी चुकवू शकाल?

 आजच्या जगीक घटनांविषयी तुम्ही गाढ आस्था राखली पाहिजे. असे का? कारण हे जग देवाच्या न्यायदंडाची अंमलबजावणी चुकवू शकत नाही. परंतु तुम्ही ती चुकवू शकाल. ज्या जगावर नाशाची शिक्षा फर्मावली आहे, अशा ‘जगाचा भाग न बनता,’ तुम्ही हे करू शकाल. एखादे खडतर वनवासी जीवन स्वीकारावे असा याचा अर्थ होत नाही. उलट, याचा हा अर्थ आहे की, एखाद्या हितकारक, अर्थपूर्ण जीवनाचा आनंद लुटत असता, भ्रष्ट राजनीती, अधाशी व्यापार यापासून, तसेच देवाचा अनादर करणाऱ्‍या धर्मापासून आणि हिंसाचारी व अनैतिक वागणुकीपासून तुम्ही स्वतःला वेगळे करावे. त्याच वेळी वागणुकीसंबंधी देवाचे उच्च दर्जे तुम्ही अनुसरलेच पाहिजे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे. (योहान १७:१४-१६; सफन्या २:२, ३; प्रकटीकरण २१:८) या सर्व बाबतीत तुम्ही लक्ष देणे व तुमच्या जीवनक्रमणात आवश्‍यक ते बदल करीत राहणे किती महत्त्वाचे आहे, हे बायबलचे पुस्तक प्रकटीकरण दाखवून देते.

२. प्रकटीकरणाच्या भव्य भविष्यवादाची ओळख वा सुरवात प्रेषित योहान कशी करतो आणि हा महत्त्वाचा संदेश देवाने कोणास दिला?

प्रेषित योहान या भविष्यवादाची सुरवात या शब्दात करतो: “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण: हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले.” (प्रकटीकरण १:१अ) अशाप्रकारे, देवापासून हा महत्त्वाचा संदेश ज्यास मिळाला तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त होता. गूढ त्रैकत्वाचा एक भाग असण्यापासून फार दूर; पण आपल्या पित्याच्या अधीन असलेला, असे येशूला येथे दाखविले आहे. त्याचप्रमाणे ‘दास,’ जे एकत्र मिळून ख्रिस्ती मंडळी बनतात, ते येशू ख्रिस्ताच्या अधीन असल्याने, ‘तो जेथे जातो तेथे त्याच्यामागे जात राहतात.’ (प्रकटीकरण १४:४; इफिसकर ५:२४) परंतु आज खरोखरी देवाचे ‘दास’ कोण आहेत आणि प्रकटीकरण त्यांना कशाप्रकारे फायदा पुरवते?

३. (अ) येशू ख्रिस्ताच्या अधीन असणारे ‘दास’ कोण आहेत? (ब) हे ‘दास’ देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली कोणते कार्य करीत आहेत?

ज्याने हे प्रकटीकरण लिहून काढले आहे तो योहान स्वतःचे वर्णन, दास याप्रकारे करतो. तो सर्वात शेवटी बचावून राहिलेला प्रेषित होता व जे स्वर्गीय अविनाशी जीवनाचे वतन मिळवतात, अशा आत्म्याने अभिषिक्‍त, निवडलेल्या ‘दासांच्या’ गटापैकी एक होता. आज, अशांपैकी पृथ्वीवर राहिलेले, केवळ काही हजार आहेत. देवाचे इतर सेवक देखील आहेत. ते पुरुष, स्त्रिया व मुले असून, त्यांची संख्या सध्या कित्येक लाख आहे व यांचा एक मोठा लोकसमुदाय आहे. हे लोक अभिषिक्‍त ‘दासांसोबत,’ देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली सबंध मानवजातीस सार्वकालिक सुवार्ता घोषित करण्यास सहभागी होत आहेत. पृथ्वीवरील नम्र जनांना तारणाच्या शोधार्थ मदत देण्यासाठी, हे सर्व ‘दास’ स्वतःला केवढ्या मोठ्या प्रमाणात खर्ची घालत आहेत! (मत्तय २४:१४; प्रकटीकरण ७:९, १४; १४:६) आनंदी सुवार्तेपासून फायदे मिळवण्यासाठी तुम्ही काय केलेच पाहिजे ते प्रकटीकरण दाखवून देते.

४. (अ) योहानाने प्रकटीकरण साधारण १,९०० वर्षांपूर्वी लिहिले आहे तर मग, ‘जे लवकर झाले पाहिजे’ त्या गोष्टींविषयी तो कसे बोलू शकत होता? (ब) भाकीत केलेल्या गोष्टींबद्दल आज पुरावा काय सूचित करतो?

तथापि, ‘जे लवकर झाले पाहिजे,’ ते या ‘दासांना’ दाखवले जाईल असे योहान कसे म्हणू शकला? हे शब्द जवळजवळ १,९०० वर्षे आधी बोलण्यात आले नव्हते का? यहोवाच्या दृष्टीने हजार वर्षे ही “कालच्या गेलेल्या दिवसासारखी” आहेत; तसेच ज्याने मानवाच्या वस्तीकरता ही पृथ्वी निर्माण करून तिची तयारी करण्यात जो अनिश्‍चित काळ खर्च केला, याच्या तुलनेत, १,९०० वर्षे, त्याच्या दृष्टिकोनातून एक अल्प काळ आहे. (स्तोत्र ९०:४) प्रेषित पौलाने त्याच्या स्वतःच्या ‘उत्सुक अपेक्षा व आशा’ याबद्दल लिहिले, त्यास प्राप्त होणाऱ्‍या प्रतिफळाचा खरेपणा, अगदी हाताशी असलेला त्याला दिसला यात शंका नाही. (फिलिप्पैकर १:२०) तथापि, आज, पूर्वभाकीत केलेल्या सर्व गोष्टी ठरलेल्या वेळी होतील, याविषयीचा पुरावा सध्या वाढत आहे. मानवजातीचा बचाव, इतिहासात यापूर्वी कधीही पणास लागलेला नव्हता. याचा उपाय केवळ देवाकडेच आहे!—यशया ४५:२१.

दळणवळणाचे माध्यम

५. प्रेषित योहानास व नंतर मंडळ्यांना प्रकटीकरण कसे कळविले गेले?

प्रकटीकरण १:१ब, २ पुढे म्हणते: ‘आणि त्याने [येशूने] आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्‍याला चिन्हांनी हे [प्रकटीकरण] कळविले. ज्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयीची म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली.’ अशाप्रकारे देवदूतीय निरोप्याकरवी योहानास प्रेरित अहवाल प्राप्त झाला. एका गुंडाळीत त्याने तो लिहिला व त्याच्या काळातील मंडळ्यांना तो पाठविला. आज पृथ्वीवर ऐक्यतेत असलेल्या त्याच्या सेवकांच्या साधारण ७३,००० मंडळ्यांच्या उत्तेजनार्थ देवाने ते प्रकटीकरण जतन करून ठेवलेले आहे हे आम्हासाठी आनंदाचे आहे.

६. आज आपल्या ‘दासांना’ आध्यात्मिक अन्‍न पुरविण्यास कोणत्या माध्यमाचा उपयोग करणार असल्याची येशूने ओळख दिली?

योहानाच्या काळी प्रकटीकरण कळविण्याचे देवाचे एक माध्यम होते व योहान स्वतःच त्या माध्यमाचा पृथ्वीवरील भाग होता. याचप्रमाणे आजही, देवाच्या ‘दासांना’ आध्यात्मिक अन्‍न देत राहण्यात त्याचे एक माध्यम आहे. या सद्य व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी, येशूने आपल्या महान भविष्यवादात, “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे,” असे पृथ्वीवरील ते माध्यम असल्याची ओळख दिली. (मत्तय २४:३, ४५-४७) भविष्यवादाचा अर्थ उघड करीत राहण्यात तो या योहान वर्गाचा उपयोग करून घेतो.

७. (अ) प्रकटीकरणात आढळणाऱ्‍या चिन्हांनी आम्हावर कसा परिणाम करण्यास हवा? (ब) प्रकटीकरणाच्या दृष्टांतांच्या परिपूर्णतेत योहान वर्गातील काहींनी किती काळ सहभाग घेतला आहे?

प्रेषित योहान लिहितो की, येशूने ते प्रकटीकरण ‘चिन्हांनी’ किंवा लाक्षणिक संकेतांनी सादर केले. ती चिन्हे स्पष्ट स्वरुपाची असून त्यांचे परीक्षण करणे हे शिरशिरी भरविणारे आहे. ती शक्‍तिशाली हालचालींचे वर्णन देतात; या कारणामुळे तो भविष्यवाद व त्याचा अर्थ इतरांना माहीत करून देण्यात आवेशी प्रयत्न करण्याची चालना आम्हाला त्याकडून मिळाली पाहिजे. चकित करणारे अनेक दृष्टांत प्रकटीकरण आम्हाला सादर करते, या प्रत्येकामध्ये योहानाने क्रियाशीलपणे किंवा एखाद्या निरिक्षकासारखा सहभाग घेतला. ह्‍या दृष्टांतांच्या परिपूर्णतेत ७० पेक्षा अधिक वर्षे सहभाग घेतलेला योहान वर्ग, इतरांना स्पष्ट करण्यासाठी देवाच्या आत्म्याने त्यांना अर्थ उघड करून सांगितला म्हणून आनंदी आहे.

८. (अ) प्रकटीकरणाच्या प्रत्येक दृष्टांताबद्दल कोणती गोष्ट लक्षवेधक आहे? (ब) प्रकटीकरणातील श्‍वापदास ओळखण्यासाठी दानीएलचा भविष्यवाद आमची कशी मदत करतो?

प्रकटीकरणातील दृष्टांत कालगणनेच्या क्रमात सादर करण्यात आलेले नाहीत. प्रत्येकाला त्याच्या पूर्णतेची विशिष्ट कालमर्यादा आहे. पुष्कळसे दृष्टांत आधीच्या भविष्यवादांचा सूर प्रतिध्वनित करीत असल्यामुळे त्यांचा अर्थ कसा घ्यावा हे त्यातून कळून येते. उदाहरणार्थ, दानीएलाच्या पुस्तकात चार भयानक श्‍वापदांचे वर्णन केले आहे, जे पृथ्वीवरील राज्य करणाऱ्‍या सत्तांना सूचित करतात. यामुळे, प्रकटीकरणातील श्‍वापदे ही राजकीय सत्तांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत व यात सध्याच्या अस्तित्वात असणाऱ्‍या सत्तांचाही समावेश आहे हे समजण्यास आम्हास मदत मिळते.—दानीएल ७:१-८, १७; प्रकटीकरण १३:२, ११-१३; १७:३.

९. (अ) योहानाप्रमाणे कोणती वृत्ती योहान वर्गाने दाखवली आहे? (ब) आम्ही धन्य होण्याचा कोणता मार्ग योहान आपल्याला दाखवतो?

योहान, देवाने येशू ख्रिस्तामार्फत त्याला दिलेल्या संदेशासंबंधी साक्ष देण्यात विश्‍वासू होता. त्याने “जे जे पाहिले त्या” सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन त्याने केले आहे. तो भविष्यवाद पूर्ण रितीने समजण्यास व त्याचे उत्तम मुद्दे देवाच्या लोकांना माहीत करुन देण्यासाठी देव व येशू यांच्याकडील मार्गदर्शनासाठी योहान वर्गाने कळकळीने प्रयत्न केलेला आहे. अभिषिक्‍त मंडळीच्या (तसेच मोठ्या संकटातून देव ज्यांना जिवंतपणे बचावून ठेवील अशा आंतरराष्ट्रीय मोठ्या लोकसमुदायाच्या) फायद्यासाठी योहान हे लिहितो की: “ह्‍या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यांत लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण [नेमलेला] समय जवळ आला आहे.”प्रकटीकरण १:३.

१०. धन्यतेच्या प्राप्तीस्तव प्रकटीकरणाच्या बाबतीत आम्ही काय केले पाहिजे?

१० प्रकटीकरणाचे वाचन केल्यामुळे तुमचा मोठा फायदा होईल आणि त्यात लिहिलेल्या गोष्टींचे आचरण केल्यामुळे तर अधिकच लाभ घडेल. योहानाने आपल्या एका पत्रात असे स्पष्ट केले: “देवावर प्रीति करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्‍वास.” (१ योहान ५:३, ४) अशा विश्‍वासाची उभारणी करून तुम्हाला सर्वोच्च आनंद मिळवून घेता येईल!

११. (अ) भविष्यवादित शब्दांचे आपण पालन करणे का तातडीचे आहे? (ब) कोणता समय आता अधिकच जवळ येत आहे?

११ ‘नेमलेला समय जवळ आला’ असल्यामुळे आपल्याला त्या भविष्यवादाचे शब्द पाळणे तातडीचे आहे. पण हा नेमलेला समय कशासाठी? देवाच्या न्यायदंडासह प्रकटीकरणातील भविष्यवादांच्या पूर्णतेकरता. सैतानी जगीक व्यवस्थेवर देव व येशू ख्रिस्ताने अंतिम न्यायदंड बजावण्याचा नेमलेला समय जवळ आला आहे. येशू पृथ्वीवर असताना त्याने म्हटले होते की, ‘तो दिवस व ती घटका’ केवळ त्याच्या पित्याला ठाऊक होती. पहिल्या जागतिक महायुद्धापासून या पृथ्वीवर जो त्रास अधिकाधिक वाढत आहे त्याच्याही पलिकडे पाहून येशूने हे म्हटले की, “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.” यास्तव, देवाचा निर्णय बजावण्याची नियुक्‍त वेळ ही अत्यंत जलदपणे जवळ येत आहे. (मार्क १३:८, ३०-३२) हबक्कूक २:३ देखील असे म्हणते: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.” त्या मोठ्या संकटातून आमचे बचावून जाणे किंवा तारण, देवाच्या भविष्यवादित वचनाचे पालन करण्यावर अवलंबून आहे.—मत्तय २४:२०-२२.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चौकट]

प्रकटीकरणाच्या पुस्तकाची आपल्याला समज घडण्यासाठी

• यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज आहे

• प्रभूचा दिवस केव्हा सुरु झाला ते जाणले पाहिजे

• आज अस्तित्वात असणाऱ्‍या विश्‍वासू व बुद्धिमान दासाची ओळख धरली पाहिजे