व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विजेते होण्याची धडपड करणे

विजेते होण्याची धडपड करणे

अध्याय ८

विजेते होण्याची धडपड करणे

स्मुर्णा

१. (अ) वैभवी येशूकडून यानंतरच्या कोणत्या मंडळीला सल्ला मिळतो? (ब) स्वतःला “पहिला व शेवटला” असे संबोधण्याद्वारे येशूने त्या मंडळीतील ख्रिश्‍चनांना कशाचे स्मरण दिले?

 प्राचीन इफिस आज विध्वंस झालेल्या स्थितीत आहे. तथापि, येशूने दिलेल्या दुसऱ्‍या संदेशाचे स्थळ अद्याप एक भरभराटीचे शहर आहे. इफिसच्या भग्नावस्थेपासून साधारण ३५ मैल दूरवर इझमिर नावाचे तुर्की शहर आहे. तेथे आजसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांची एक आवेशी मंडळी आढळून येते. येथेच पहिल्या शतकातील स्मुर्णा होते. येशूचे पुढील शब्द त्या मंडळीला काय म्हणतात ते लक्षात घ्या: “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही: जो ‘पहिला व शेवटला,’ जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो.” (प्रकटीकरण २:८) स्मुर्णामधील ख्रिश्‍चनांना हे विदित करण्याद्वारे येशू याचे स्मरण देत होता की, तोच सर्वप्रथम सचोटीरक्षक असा आहे व ज्याला यहोवाने थेटपणे पुनरुत्थित करून अमर आत्मिक जीवन दिले त्यामध्ये तो पहिला तसेच शेवटला असा आहे. बाकीच्या सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वतः येशू पुनरुत्थित करील. यामुळेच, त्याच्यासोबत अमर स्वर्गीय जीवनात सहभागी होण्याची आशा धरुन असलेल्या त्याच्या बांधवांना बोध करण्यास, तो चांगल्या प्रकारे पात्र आहे.

२. “जो मेला होता व जिवंत झाला” त्याच्या शब्दाकडून सर्व ख्रिश्‍चनांना सांत्वन का प्राप्त होते?

येशूने धार्मिकतेकरिता छळ सहन करण्याच्या मार्गाचे नेतृत्व केले आणि यात त्याला योग्य प्रतिफळ लाभले. मरणापर्यंत त्याचे विश्‍वासू राहाणे व नंतर त्याचे पुनरुत्थान होणे या गोष्टी सर्व ख्रिश्‍चनांना आशेचा आधार देतात. (प्रेषितांची कृत्ये १७:३१) येशू “मेला होता व जिवंत झाला” ही वस्तुस्थिती हे सिद्ध करते की, सत्यासाठी जे काही सहन करावे लागते ते व्यर्थ नाही. ख्रिश्‍चनांना त्यांच्या विश्‍वासाकरता त्रास सहन करण्याची वेळ येते तेव्हा येशूचे पुनरुत्थान हे उत्तेजनाचा गाढ स्रोत ठरते. हीच तुमची परिस्थिती आहे का? तर मग, येशूने स्मुर्णा मंडळीला पुढे जे म्हटले त्याकडून तुम्ही धैर्य मिळवू शकता:

३. (अ) स्मुर्णातील ख्रिश्‍चनांना येशूने कोणते उत्तेजन दिले? (ब) स्मुर्णातील ख्रिस्ती दरिद्री होते तरी, येशूने त्यांना “धनवान” असे का म्हटले?

“तुझे क्लेश व तुझे दारिद्र्‌य मला ठाऊक आहे—तरी तू धनवान आहेस—आणि जे यहूदी नसताहि स्वतःला यहूदी म्हणवितात पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करितात ती मला ठाऊक आहे.” (प्रकटीकरण २:९) स्मुर्णातील बंधुंसाठी येशूजवळ टिकात्मक असे काही नाही, केवळ उबदार अशी प्रशंसा आहे. आपल्या विश्‍वासाच्या खातर त्यांनी बराच छळ सहन केलेला आहे. भौतिकदृष्ट्या ते दरिद्री होते व हे कदाचित त्यांच्या विश्‍वासूपणामुळे असेल. (इब्रीयांस १०:३४) परंतु ते आध्यात्मिक गोष्टींसंबंधाने प्रमुख काळजी बाळगून होते आणि येशूने सांगितले त्याप्रमाणे त्यांनी स्वर्गात संपत्ती साठविलेली आहे. (मत्तय ६:१९, २०) या कारणामुळे, प्रमुख मेंढपाळाने त्यांना “धनवान” असे गृहीत धरले.—पडताळा याकोब २:५.

४. स्मुर्णातील ख्रिश्‍चनांना कोणाकडील बराच विरोध सहन करावा लागला आणि त्या विरोधकांकडे येशूने कसे पाहिले?

स्मुर्णामधील ख्रिश्‍चनांना दैहिक यहुद्यांकडून बराच विरोध सहन करावा लागला आहे ही नोंद विशेषरित्या येशू करतो. आरंभाला देखील या धर्माच्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार दडपून टाकण्याचा निकराने प्रयत्न केला होता. (प्रेषितांची कृत्ये १३:४४, ४५; १४:१९) आता, यरुशलेमेच्या पतनानंतरच्या काही दशकांनी पुन्हा स्मुर्णा येथील यहूदी परत तोच सैतानी आत्मा प्रदर्शित करीत आहेत. या कारणामुळेच येशूने अशांना “सैतानाची धर्मसभा” असे म्हटले ते काही नवलाईचे नाही! *

५. स्मुर्णातील ख्रिश्‍चनांसाठी कोणत्या परीक्षा पुढे होत्या?

अशा द्वेषाला तोंड देऊन असताना, स्मुर्णामधील ख्रिश्‍चनांचे येशू या शब्दांनी सांत्वन करतो: “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरु नको; पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे दहा दिवस हालअपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.” (प्रकटीकरण २:१०) येथे येशू “तुमची,” “तुमचे” या शब्दाचा ग्रीक बहुवचनीय प्रकार तीन वेळा उपयोगात आणतो; त्यावरुन हे दिसते की, यामध्ये तो सबंध मंडळीचा समावेश करीत आहे. स्मुर्णातील ख्रिश्‍चनांची परीक्षा लगेच संपेल याचे अभिवचन येशू देत नाही. त्यांच्यापैकी काहींचा छळ होत राहील व त्यांना तुरुंगात टाकले जाईल. त्यांना “दहा दिवस” संकटात टाकले जाईल. दहा ही संख्या, पृथ्वीवरील गोष्टींची परिपूर्णता किंवा संपूर्णता दर्शविते. आध्यात्मिक दृष्ट्या संपन्‍नता राखणाऱ्‍या सचोटी धारकांनाही मानवी दशेत असताना पूर्ण परीक्षेला उतरावे लागेल.

६. (अ) स्मुर्णातील ख्रिश्‍चनांनी का भय बाळगू नये? (ब) स्मुर्णा मंडळीस आपल्या संदेशाची समाप्ती येशूने कशी केली?

तथापि, स्मुर्णातील ख्रिश्‍चनांना भिण्याचे व हातमिळवणी करण्याचे कारण नव्हते. ते शेवटपर्यंत विश्‍वासू राहिल्यास त्यांना “जीवनाचा मुगूट” हे बक्षीस त्यांच्यासमोर होते. त्यांच्या बाबतीत हे बक्षीस म्हणजे स्वर्गातील अमर जीवन होते. (१ करिंथकर ९:२५; २ तीमथ्य ४:६-८) प्रेषित पौलाने या बहुमूल्य बक्षीसाच्या प्राप्तीस्तव सर्व गोष्टींचा, त्याच्या पृथ्वीवरील जीवनाचा त्याग देखील योग्य समजला. (फिलिप्पैकर ३:८) स्मुर्णातील विश्‍वासू जनांठायी देखील हीच भावना आहे. येशू आपल्या संदेशाचा समारोप या शब्दांनी करतो: “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको: जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्‍या मरणाची बाधा होणारच नाही.” (प्रकटीकरण २:११) विजेत्यांना स्वर्गातील अमर जीवनाची खात्री देण्यात आलेली आहे. या जीवनाला मृत्युची बाधा होऊ शकत नाही.—१ करिंथकर १५:५३, ५४.

“दहा दिवस संकटे”

७, ८. स्मुर्णा येथील मंडळीप्रमाणेच १९१८ मध्ये ख्रिस्ती मंडळीला कसे ‘परीक्षेत पाडण्यात आले’?

स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांप्रमाणे, आज योहान वर्ग व त्यांचे साथीदार आजवर परीक्षेला तोंड देत आले आहेत व यापुढेही त्यांना ‘परीक्षेत पाडले जाईल.’ त्यांचा विश्‍वासूपणा त्यांना देवाचे लोक असल्याची साक्ष देतो. (मार्क १३:९, १०) प्रभूचा दिवस सुरु झाल्यानंतर थोड्याच कालावधीत, यहोवाच्या लोकांच्या आंतरराष्ट्रीय गटाला येशूने स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांना सांगितलेल्या वचनांकडून खरे सांत्वन मिळू शकले. (प्रकटीकरण १:१०) हा गट १८७९ पासून देवाच्या वचनातून आध्यात्मिक संपन्‍नता खणून काढीत होता व त्याची सहभागिता इतरांसोबत मुक्‍तपणे करीत होता. तथापि, त्यांना पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान तीव्र द्वेष व विरोधास तोंड द्यावे लागले, याचे कारण काही अंशी, त्यांनी युद्धाच्या आत्म्याने स्वतःला पछाडू दिले नाही आणि काही अंशी त्यांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या चुका उघडपणे प्रदर्शित केल्या हे होते. ख्रिस्ती धर्मजगताच्या काही पुढाऱ्‍यांच्या चिथावणीमुळे १९१८ मध्ये त्यांना मोठा छळ सहन करावा लागला, जो स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांना यहूदी समाजाकडून मिळालेल्या छळासमान कटू होता.

वॉचटावर संस्थेचे नवे अध्यक्ष जोसेफ एफ. रदरफोर्ड व त्यांच्या इतर सात सहकाऱ्‍यांना साधारणपणे २० वर्षांची शिक्षा मिळून जून २२, १९१८ रोजी तुरुंगात पाठविण्यात आले तेव्हा, या छळाच्या लाटेने अमेरिकेत शिखर गाठले. नऊ महिन्यानंतर त्यांना जामिनावर मुक्‍त करण्यात आले. मे १४, १९१९ मध्ये वरिष्ठ न्यायालयाने त्यांच्यावरील चुकीचा दोषास्पद न्याय उलटविला आणि चौकशीत १२५ चुका झाल्या असल्याचे दाखवून देण्यात आले. सेंट ग्रेगरी द ग्रेट या व्यवस्थेचे एक सरदार, रोमन कॅथलिक न्यायाधीश मॅन्टन यांनी या ख्रिश्‍चनांचा जामीन १९१८ मध्ये नाकारला होता, यांना नंतर १९३९ मध्ये लाचलुचपतीची मागणी करणे, ती स्वीकारणे इत्यादि सहा दोषांबद्दल दोन वर्षांचा तुरुंगवास व १०,००० डॉलर्सचा दंड करण्यात आला.

९. नात्सी जर्मनीमध्ये हिटलरने यहोवाच्या साक्षीदारांना कसे वागविले आणि याला पाळकवर्गाने कशी प्रतिक्रिया दर्शविली?

जर्मनीतील नात्सी सत्तेच्या दरम्यान हिटलरने यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावर पूर्णपणे बंदी लादली. कित्येक वर्षे हजारो साक्षीदारांना राजकीय बंद्यांच्या छावणीत क्रूरपणे डांबण्यात आले, तेथे बहुतेक जण मेले आणि हिटलरच्या युद्ध तुकडीत भरती होण्यास नकार दिला अशा शेकडो तरुणांचा वध केला गेला. या सर्व घटनांना धार्मिक पुढाऱ्‍यांचा पाठिंबा होता हे, जर्मन मार्ग (इंग्रजी) या वृत्तपत्राच्या मे २९, १९३८ च्या अंकात प्रकाशित करण्यात आलेल्या एका कॅथलिक पाळकांच्या वक्‍तव्यावरुन स्पष्ट होते. थोडक्यात, त्यांनी असे म्हटले: “सध्या पृथ्वीवर असा एक देश आहे, जेथे बायबल विद्यार्थ्यांना [यहोवाचे साक्षीदार] बंदी आहे. तो जर्मनी आहे! . . . अडॉल्फ हिटलर सत्तेवर आल्यावर जर्मन कॅथलिक बिशपांनी आपल्या विनंतीचा पुनरुच्चार केला तेव्हा हिटलर यांनी म्हटले: ‘हे तथाकथित कळकळीचे बायबल विद्यार्थी [यहोवाचे साक्षीदार] त्रासदायक आहेत. . . . ते विद्वत्तेचा आव आणणारे असे मी त्यांना समजतो; या अमेरिकन जज्ज्‌ रदरफोर्डद्वारे जर्मन कॅथलिकांना असे मलिन केले जाणे हे मी कधीही खपवून घेणार नाही. यासाठीच मी [यहोवाच्या साक्षीदारांना] जर्मनीमध्ये बंदी आणीत आहे.’” याला तेथील पाळकांनी आपली “वाहवा” जोडली!

१०. (अ) प्रभूचा दिवस पुढे प्रगमन करीत असता यहोवाच्या साक्षीदारांना कोणत्या छळास तोंड द्यावे लागले? (ब) ख्रिश्‍चनांनी न्यायालयात धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढत दिली तेव्हा बहुधा काय घडले?

१० प्रभूचा दिवस पुढे प्रगमन करीत असता जुनाट साप व त्याच्या संततीने अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांचे साथीदार यांजविरुद्ध लढत देण्याचे थांबविले नाही. यांच्यापैकी अनेकांना त्याने तुरुंगात टाकले व त्यांचा क्रूरतेने छळ केला. (प्रकटीकरण १२:१७) त्या शत्रूंनी, ‘कायद्याने कुरापती करण्याचा’ प्रयत्न चालू ठेवला; पण यहोवाच्या लोकांनी खंबीरपणे यावर जोर दिला: “आम्ही माणसांपेक्षा देवालाच आपला शासक मानले पाहिजे.” (स्तोत्र ९४:२०, किंग जेम्स व्हर्शन; प्रेषितांची कृत्ये ५:२९, NW) वॉचटावर नियतकालिकाने १९५४ मध्ये कळवले: “गेल्या चाळीस वर्षांत सत्तर पेक्षा अधिक राष्ट्रांनी एकाच वेळी किंवा इतर वेळी बंधनकारक नियम लादले आणि यहोवाच्या साक्षीदारांचा छळ केला.” जेथे न्यायालयात धार्मिक स्वातंत्र्यासाठी झगडणे शक्य होते तेथे त्या ख्रिश्‍चनांनी तसे केले व अनेक राष्ट्रात निनादणाऱ्‍या विजयाने ते विजयी झाले. केवळ अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात यहोवाच्या साक्षीदारांनी २३ अनुकूल निर्णय जिंकले आहेत.

११. येशूच्या उपस्थितीबाबतच्या चिन्हाविषयीचा कोणता भविष्यवाद प्रभूच्या दिवसात यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पूर्ण झालेला आहे?

११ कैसराचे ते कैसराला द्या या येशूच्या आज्ञेचे पालन करण्यात इतर कोणताही गट इतका प्रामाणिक राहिलेला नाही. (लूक २०:२५; रोमकर १३:१, ७) तसेच, ज्याच्या सदस्यांना अनेक देशात विविध प्रकारच्या सरकारखाली तुरुंगात टाकण्यात आले असा कोणताही दुसरा गट नाही. सध्या अमेरिका, युरोप, आफ्रिका व आशियात हे चालूच आहे. येशूच्या उपस्थितीच्या चिन्हामध्ये जो थोर भविष्यवाद दिला गेला त्यामध्ये हे शब्द नमूद होते: “तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हास धरुन देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्तय २४:३, ९) हे प्रभूच्या दिवसात यहोवाच्या ख्रिस्ती साक्षीदारांच्या संबंधाने खचितच पूर्ण झालेले आहे.

१२. योहान वर्गाने छळाच्या विरुद्ध देवाच्या लोकांना कसे बळकट केले?

१२ देवाच्या लोकांची छळामध्ये मजबूती करावी या उद्देशाने योहान वर्गाने, येशूने स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांसाठी काढलेल्या उद्‌गारांचे वेळोवेळी स्मरण दिले आहे. उदाहरणार्थ, नात्सींचा छळ सुरु झाला तेव्हा १९३३ व १९३४ मध्ये द वॉचटावरने “त्यांना भिऊ नका” हे लेख सादर केले, ज्यामध्ये मत्तय १०:२६-३३ ची चर्चा होती. दुसरा लेख “अग्नी परीक्षा” दानीएल ३:१७, १८ वर आधारित होता आणि “सिंहाची तोंडे” या तिसऱ्‍या लेखाचे, दानीएल ६:२२ हे प्रमुख वचन होते. तसेच १९८० च्या दशकात ४० पेक्षा अधिक देशात यहोवाच्या साक्षीदारांनी क्रूर छळ सहन केला तेव्हा “छळ झाला तरी धन्य!” आणि “ख्रिस्ती सहनशीलतेसह छळास तोंड देतात” या प्रकारचे लेख टेहळणी बुरुजने प्रसिद्ध करून त्यांना बळकटी पुरविली. *

१३. स्मुर्णामधील ख्रिश्‍चनांप्रमाणे, यहोवाचे साक्षीदार छळास का घाबरलेले नाहीत?

१३ खरेच, यहोवाचे ख्रिस्ती साक्षीदार शारीरिक छळ व इतर परीक्षा प्रसंगांना लाक्षणिकपणे दहा दिवस सहन करीत आहेत. मागे, स्मुर्णातील ख्रिश्‍चनांप्रमाणे ते घाबरले नाहीत. याचप्रमाणे या पृथ्वीवर त्रास अधिकाधिक वाढत असता आम्हालाही भिण्याचे कारण नाही. छळ किंवा त्रास सहन करण्यास आम्ही सिद्ध झालेलो आहोत आणि ‘आपल्या मालमत्तेची हानी आम्ही आनंदाने स्वीकारतो.’ (इब्रीयांस १०:३२-३४) देवाच्या वचनाचा अभ्यास करून व ते आपलेसे करुन आपल्याला विश्‍वासात दृढ उभे राहण्यासाठी सिद्ध केले जाते. तुमच्या सचोटीत यहोवा तुमचे संरक्षण करू शकतो व करील याची खात्री बाळगा. “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:६-११.

[तळटीपा]

^ योहानाचा मृत्यू झाल्यावर साधारण ६० वर्षांनी स्मुर्णामध्ये राहणाऱ्‍या एका ८६ वर्षाच्या पॉलीकार्प नावाच्या या वृद्ध गृहस्थाला, तो येशूवरील आपल्या विश्‍वासाचा त्याग करीत नाही म्हणून जाळून ठार मारले. पॉलीकार्पचे हुतात्म्य (इंग्रजी) हे लिखाण याच घटनेच्या काळात लिहिण्यात आले असे समजण्यात येते, ते सांगते की, जाळण्यासाठी लाकडे गोळा केली जात होती तेव्हा “यहूदी अत्यंत आवेशाने या कामाला लागले. या कामी मदत करणे हा तर त्यांचा नेहमीचा प्रघात होता.” खरे पाहता, हत्या “मोठ्या शब्बाथ दिवशी” घडली.

^ पहा द वॉचटावर नोव्हेंबर १, १९३३; ऑक्टोबर १ व १५, डिसेंबर १ व १५, १९३४; मे १, १९८३.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३९ पानांवरील चौकट/चित्रे]

साधारण ५० वर्षांपासून इतिहासकारांनी, नात्सी काळात यहोवाच्या जर्मन साक्षीदारांनी जी आपली सचोटी दाखवली त्याबद्दलची साक्ष दिली आहे. पितृदेशातील माता (इंग्रजी) हे क्लॉडिया कुन्झ यांनी लिहिलेले व १९८६ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक असे म्हणते: “नात्सी पार्श्‍वभूमी नसणाऱ्‍या सर्व जर्मनांना त्यांना न आवडणाऱ्‍या सत्तेपासून पळवाट काढण्याचे मार्ग सापडले. . . . पण आकडेवारी व विचारप्रणालीच्या रंगमंचावरील कोपऱ्‍यात ते २०,००० यहोवाचे साक्षीदार होते, ज्यांनी व्यक्‍तीशः नात्सी राज्यास कसलीही मानवंदना स्वीकारण्याचे हेतुपुरस्सर नाकारले. . . . या प्रतिरोध करणाऱ्‍या आकर्षक गटाला त्यांच्या धर्माद्वारे जतन करण्यात आले. सुरवातीपासूनच यहोवाच्या साक्षीदारांनी नात्सी राज्याच्या कोणाही प्रकारास सहकार्य दिले नाही. १९३३ मध्ये गेस्तापोंनी त्यांचे राष्ट्रीय मुख्यालय उद्‌ध्वस्त केले आणि या पंथावर १९३५ मध्ये बंदी आणली तरी यांनी ‘हाईल हिटलर’ म्हणण्याचे नाकारले. यहोवाच्या साक्षीदारांपैकी साधारण अर्ध्यांना (बहुतेक पुरुष) राजकीय बंद्यांच्या छावण्यात पाठवण्यात आले, त्यांच्यापैकी हजारोंची हत्या केली गेली आणि आणखी हजार १९३३ ते १९४५ पर्यंत मृत्युमुखी पडले. . . . कॅथलिक व प्रॉटेस्टंट लोकांनी त्यांचे पाळक, हिटलरसोबत सहकार्य करा असा आर्जव करताना ऐकले होते. ते प्रतिकार करतील तर ते चर्च व राज्य या दोघांच्या आज्ञा न मानणारे असे दिसून येणार होते.”