व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्पाचे डोके चिरडणे

सर्पाचे डोके चिरडणे

अध्याय ४०

सर्पाचे डोके चिरडणे

दृष्टांत १४​—प्रकटीकरण २०:१-१०

विषय: सैतानाला अथांग डोहात टाकले जाणे, हजार वर्षीय राजवट, मानवजातीची शेवटची परीक्षा आणि सैतानाचा नाश

पूर्णतेचा काळ: मोठ्या संकटाच्या अंतानंतर ते सैतानाच्या नाशापर्यंत

१. बायबलमधील पहिल्या भविष्यवाणीची पूर्णता होण्यास कशी सुरवात झाली?

 बायबलची पहिली भविष्यवाणी तुम्हास आठवते का? सर्पाला बोलताना यहोवाने ती केली होती: “तू व स्त्री तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टांच फोडिशील.” (उत्पत्ती ३:१५) आता ही भविष्यवाणी तिच्या पूर्णतेच्या कळसास पोहंचत आहे! यहोवाच्या स्वर्गीय स्त्रीसमान संस्थेबरोबर सैतानाच्या युद्धाच्या इतिहासाचा आम्ही मागोवा घेतला आहे. (प्रकटीकरण १२:१, ९) सर्पाच्या पृथ्वीवरील संततीसहित, त्याचा धर्म, राजकारण व मोठा व्यापार यांनी स्त्रीचे संतान, येशू ख्रिस्त व त्याच्या पृथ्वीवरील १,४४,००० अभिषिक्‍त अनुयायांचा क्रुरतेने छळ केला आहे. (योहान ८:३७, ४४; गलतीकर ३:१६, २९) सैतानाने येशूस यातनामय मरण सोसावयास लावले. परंतु हा केवळ टाचेचा घाव होता, कारण देवाने तिसऱ्‍या दिवशी त्याच्या विश्‍वासू पुत्राचे पुनरूत्थान केले.—प्रेषितांची कृत्ये १०:३८-४०.

२. सर्पाला कसे तुडवले गेले व सर्पाच्या पृथ्वीवरील संततीचे काय होते?

पण सर्प व त्याच्या संततीबद्दल काय? सा. यु. ५६ च्या सुमाराला प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना मोठे पत्र लिहिले होते. त्याचा समारोप करताना त्याने त्यांना असे उत्तेजन दिले: “शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच चिरडील.” (रोमकर १६:२०, NW) हे केवळ वरकरणी तुडविण्यापेक्षा अधिक आहे. सैतानाला चिरडले गेले पाहिजे! पौलाने येथे सायनट्रीʹबो हा ग्रीक शब्द वापरला, ज्याचा अर्थ आघाताद्वारे मुरंबा बनविणे, त्याला तुडविणे, चिरडण्याद्वारे पूर्णपणे नाश करणे असा होतो. सर्पाच्या मानवी संततीला, खऱ्‍या पीडा प्रभूच्या दिवसात सुरू होऊन त्याचा कळस मोठी बाबेल व जगाची मोठी राजनैतिक व्यवस्था यासोबत त्यांची आर्थिकता व लष्करी सैन्याचा मोठ्या संकटात समूळ नाश करण्यात गाठला जाईल. (प्रकटीकरण, अध्याय १८ व १९) अशाप्रकारे यहोवा दोन संततीमधील वैर संपुष्टात आणतो. सैतानाच्या पृथ्वीवरील संततीवर देवाच्या स्त्रीचे संतान विजय मिळवते, त्यामुळे त्याची संतती राहत नाही!

सैतान अथांग डोहात टाकला जातो

३. सैतानाला काय होईल असे योहान आम्हास कळवतो?

तर मग, सैतान व त्याच्या दुरात्म्यांसाठी काय राखून ठेवले आहे? योहान आम्हास कळवतो: “नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरतांना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्‍यास धरले आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे.”प्रकटीकरण २०:१-३.

४. अथांग डोहाच्या किल्ल्या असलेला देवदूत कोण आहे आणि आम्हाला हे कसे समजते?

हा देवदूत कोण आहे? यहोवाच्या आद्यशत्रूला काढून टाकण्यासाठी त्याला अफाट शक्‍ती असली पाहिजे. त्याच्याजवळ “अथांग डोहाची किल्ली व . . . मोठा साखळदंड” आहे. हे आम्हाला आधीच्या दृष्टांताची आठवण देत नाही का? होय, टोळांवरील राजाला “अथांग डोहाचा दूत” असे म्हटले आहे! (प्रकटीकरण ९:११) येथे पुन्हा आम्ही यहोवाचा मुख्य विजेता, महिमायुक्‍त येशू ख्रिस्ताला कार्यरत झालेला पाहतो. हा आद्य देवदूत ज्याने सैतानाला स्वर्गातून खाली टाकले, मोठ्या बाबेलचा न्याय केला आणि हर्मगिदोनात “पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये” यांचा अंत केला तो बाजूला होऊन सैतानाला अथांग डोहात टाकण्याचा तडाखा त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या देवदूतास देणार असे होणारच नाही!—प्रकटीकरण १२:७-९; १८:१, २; १९:११-२१.

५. दियाबल सैतानाबरोबर अथांग डोहाचा दूत कसा व्यवहार करतो का?

मोठ्या अग्निवर्ण अजगराला खाली टाकले तेव्हा “सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप” असे त्याजविषयी म्हटले होते. (प्रकटीकरण १२:३, ९) आता, त्याला धरुन अथांग डोहात टाकले जाते तेव्हा त्याचे पुन्हा सविस्तर वर्णन “दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप” असे केल्याचे दिसते. “त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये” म्हणून या कुविख्यात भक्षक, फसविणारा, निंदक व विरोधकाला साखळदंडाने बांधून “अथांग डोहात” टाकले जाते व बंद करून त्यावर शिक्का मारला जातो. ज्याप्रमाणे अंधाऱ्‍या कोठडीत कैदी निकामी बनतो त्याप्रमाणे हजार वर्षांसाठी सैतानाला अथांग डोहात टाकल्यामुळे, मानवजातीवर त्याचा काहीच प्रभाव राहणार नाही. अथांग डोहाचा दूत राज्याच्या धार्मिकतेसंबंधाने असलेल्या कोणत्याही संपर्कापासून सैतानाला दूर करतो. मानवजातीसाठी ती केवढी मुक्‍तता असेल!

६. (अ) सैतानाच्या दूतांना देखील अथांग डोहात टाकले जाते यासाठी कोणता पुरावा आहे? (ब) आता कशाचा आरंभ होऊ शकतो व का?

दुरात्म्यांचे काय होते? त्यांना देखील “न्यायनिवाड्याकरिता राखून” ठेवले आहे. (२ पेत्र २:४) सैतानाला “भुतांचा अधिपति जो बालजबूल” असे म्हटले आहे. (लूक ११:१५, १८; मत्तय १०:२५) अनेक काळापासून सैतानाबरोबर एकत्र काम करीत असल्यामुळे त्यांनाही यासारखाच न्यायदंड मिळू नये का? त्या दुरात्म्यांसाठी अथांग डोह हे भीतीचे साधन अनेक काळापासून होते; एके प्रसंगी येशू त्यांच्यासमोर गेला, तेव्हा ते ‘त्याला विनंती करीत होते की, आम्हास अथांग डोहात जावयाला आज्ञा करू नको.’ (लूक ८:३१) सैतानाला अथांग डोहात टाकल्यावर त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना देखील निश्‍चितपणे त्यात टाकले जाईल. (पडताळा यशया २४:२१, २२.) सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात बंद केल्यावर येशूच्या हजार वर्षीय राजवटीस प्रारंभ केला जाईल.

७. (अ) अथांग डोहात असताना सैतान व त्याचे दूत कोणत्या अवस्थेत असतील व हे आम्हास कसे कळते? (ब) हेडीज व अथांग डोह हे सारखेच आहेत का? (तळटीप पहा.)

अथांग डोहात असताना सैतान व त्याचे दुरात्मे क्रियाशील असतील का? किरमिजी रंगाच्या सात-डोकी असलेल्या श्‍वापदाची आठवण करा, “ते होते आणि नाही ते अथांग डोहातून वर येणार आहे.” (प्रकटीकरण १७:८) अथांग डोहात असताना ते ‘नव्हते.’ ते अक्रियाशील व स्थिर होते, त्याचे सर्व बेत व उद्देश निर्जीव झाले होते. अशाचप्रकारे येशूविषयी बोलताना, प्रेषित पौलाने म्हटले: “अधोलोकी कोण उतरेल? अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास.” (रोमकर १०:७) अधोलोकी (अथांग डोह) असताना येशू मृत होता. * तर मग यावरून आपण असे म्हणू शकतो की हजार वर्षे अथांग डोहात असताना सैतान व त्याचे दुरात्मे निर्जीव अक्रियाक स्थितीत असतील. धार्मिकांच्या प्रेमिकांसाठी ती केवढी चांगली बातमी असेल!

हजार वर्षांसाठी न्यायाधीश

८, ९. सिंहासनावर बसलेल्यांविषयी योहान आता आम्हाला काय सांगतो व हे कोण आहेत?

हजार वर्षांनंतर सैतानाला अथांग डोहातून थोड्या काळासाठी सोडण्यात येईल. पण का? याचे उत्तर देण्याआधी, योहान आमचे लक्ष मागे त्या काळाच्या सुरवातीकडे नेतो. आम्ही वाचतो: “नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते, त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता.” (प्रकटीकरण २०:४अ) हे आसनांवर बसलेले व स्वर्गातून महिमायुक्‍त येशूबरोबर राज्य करणारे कोण आहेत?

ते “पवित्र जन” आहेत ज्यांचे वर्णन ‘मानवपुत्रासारख्या’ दिसणाऱ्‍या बरोबर राज्य करणारे असे दानीएल करतो. (दानीएल ७:१३, १४, १८) यहोवाच्या उपस्थितीच्या सान्‍निध्यात स्वर्गीय सिंहासनावर बसतील हे तेच २४ वडील आहेत. (प्रकटीकरण ४:४) त्यामध्ये १२ प्रेषितांचा देखील समावेश आहे, ज्यांना येशूने अभिवचन दिले होते: “पुनरूत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीहि बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.” (मत्तय १९:२८) यामध्ये पौल व करिंथमधील विश्‍वासू राहिलेल्या ख्रिश्‍चनांचाही समावेश आहे. (१ करिंथकर ४:८; ६:२, ३) तसेच यामध्ये लावदिकीया मंडळीतील विजय मिळविलेल्या सदस्यांचाही समावेश असणार.—प्रकटीकरण ३:२१.

१०. (अ) योहान आता १,४४,००० राजांचे वर्णन कसे करतो? (ब) योहानाने अगोदर सांगितल्याप्रमाणे १,४४,००० राजांमध्ये कोणाचा समावेश होतो?

१० विजय मिळविलेल्या आणि ज्यांना “देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत” त्या अभिषिक्‍तांसाठी १,४४,००० सिंहासने तयार करण्यात आली आहेत. (प्रकटीकरण १४:१, ४) योहान पुढे सांगतो, “आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद [“कुऱ्‍हाडीने” NW] झाला होता, आणि ज्यांनी श्‍वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण धारण केलेली नव्हती त्यांचे आत्मेहि पाहिले.” (प्रकटीकरण २०:४ब) तर मग त्या राजांमध्ये, अभिषिक्‍त हुतात्मिक ख्रिश्‍चन ज्यांनी पाचवा शिक्का उघडताना यहोवाला विचारले होते की त्यांच्या रक्‍ताचा सूड घेण्यासाठी तो किती काळ थांबून राहील, यांचाही समावेश आहे. त्यावेळी त्यांना तागाचे पांढरे वस्त्र दिले गेले व थोडा वेळ थांबण्यासाठी सांगितले. पण आता राजांचा राजा व प्रभुंच्या प्रभुने मोठ्या बाबेलचा व राष्ट्रांचा नाश करून सैतानाला अथांग डोहात टाकल्याने तो सूड घेतला गेला.—प्रकटीकरण ६:९-११; १७:१६; १९:१५, १६.

११. (अ) कुऱ्‍हाडीने “शिरच्छेद झाला” हा शब्दप्रयोग आम्ही कसा समजून घ्यावा? (ब) सर्व १,४४,००० जन बलिदानरुपी मरणाने मृत्यू पावले असे का म्हटले जाऊ शकते?

११ या १,४४,००० बादशाही न्यायाधीशांचा शारीरिकरित्या कुऱ्‍हाडीने “शिरच्छेद” केला होता का? तुलनात्मकरित्या काहींच्या बाबतीत खऱ्‍या अर्थाने तसेच झाले. तथापि, हा वाक्यांश अभिषिक्‍त ख्रिश्‍चन ज्यांना या किंवा इतर मार्गांनी हुतात्मिक मरण सहन करावे लागले त्यांनाही लागू होतो यात काही संशय नाही. * (मत्तय १०:२२, २८) निश्‍चितपणे, सैतानाची इच्छा आहे की सर्वांचा कुऱ्‍हाडीने शिरच्छेद करावा; परंतु खरे पाहता, येशूचे सर्वच आध्यात्मिक बांधव हुतात्मे म्हणून मरण पावत नाहीत. पुष्कळ जन आजाराने व वृद्धापकाळाने मृत्यू पावतात. तथापि, हे, योहान आता जो समुदाय पाहतो त्यातील आहेत. त्या सर्वांचा मृत्यू बलिदानाचा अर्थ राखून आहे. (रोमकर ६:३-५) या व्यतिरिक्‍त त्यातील कोणीही जगाचा भाग नव्हते. यास्तव, त्या सर्वांचा जगाने द्वेष केलेला आहे व याचा परिणाम जगाच्या दृष्टिने ते मृत आहेत. (योहान १५:१९; १ करिंथकर ४:१३) त्यांच्यापैकी कोणीही श्‍वापदाची व त्याच्या मूर्तीची भक्‍ती केली नाही व ते मरण पावले तेव्हा एकानेही श्‍वापदाची खूण बाळगलेली नाही. ते सर्व विजेते असे मृत्यू पावले.—१ योहान ५:४; प्रकटीकरण २:७; ३:१२; १२:११.

१२. योहान १,४४,००० राजांविषयी कोणता अहवाल देतो व त्यांचे पुन्हा जिवंत होणे कधी घडते?

१२ आता हे विजयीवीर पुन्हा जिवंत होतात! योहान कळवतो: “ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.” (प्रकटीकरण २०:४क) याचा अर्थ राष्ट्रांचा नाश व सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकण्यापर्यंत या न्यायाधीशांचे पुनरूत्थान होत नाही असा होतो का? नाही. त्यातील बहुतेक अगोदरच जिवंत झालेले आहेत, कारण हर्मगिदोनात येशूबरोबर राष्ट्रांच्याविरूद्ध कारवाई करण्यामध्ये ते त्याच्यासोबत होते. (प्रकटीकरण २:२६, २७; १९:१४) खरोखर, पौलाने निर्देशिले की त्यांचे पुनरूत्थान १९१४ मध्ये येशूच्या उपस्थितीच्या आरंभानंतर लगेचच होते आणि काहींचे इतरांपेक्षा आधी पुनरुत्थान होते. (१ करिंथकर १५:५१-५४; १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७) या कारणास्तव, या प्रत्येकाला स्वर्गात अमर जीवनाचे दान मिळाल्यावर त्यांचे जिवंत होणे त्या काळी घडते.—२ थेस्सलनीकाकर १:७; २ पेत्र ३:११-१४.

१३. (अ) ज्यात १,४४,००० शासन करतील त्या हजार वर्षांकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे व का? (ब) हेरोपोलिसच्या पापियसने हजार वर्षांबद्दल कोणता दृष्टिकोन धरला? (तळटीप पहा.)

१३ त्यांचे राज्य व न्याय करणे एक हजार वर्षासाठी असेल. ही अक्षरशः हजार वर्षे असतील की, आम्ही त्यास लाक्षणिक न समजता येणारा मोठ्या अवधीचा काळ समजावे? पहिले शमुवेल २१:११ नुसार “हजारो” याचा अर्थ मोठी व अनिश्‍चित संख्या वाटते. परंतु प्रकटीकरण २०:५-७ मध्ये “ती हजार वर्षे” असे तीन वेळा उल्लेखण्यात आल्यामुळे “हजार” ही संख्या अक्षरशः आहे. पौलाने या न्यायाच्या समयास “एक दिवस” असे संबोधले, तो असे म्हणाला: “त्याने [देवाने] असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो . . . जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:३१) पेत्र आम्हास सांगतो की, यहोवाला एक दिवस एक हजार वर्षासारखा आहे, यामुळे हा न्यायदंडाचा दिवस अक्षरशः हजार वर्षे असणे अगदी उचित आहे. *२ पेत्र ३:८.

मृतांपैकी बाकीचे लोक

१४. (अ) ‘मृतांपैकी बाकीच्या लोकांबद्दल’ योहान कोणते विधान करतो? (ब) “जिवंत झाले” या उद्‌गारावर प्रेषित पौलाने वापरलेला शब्दप्रयोग कसा प्रकाशझोत टाकतो?

१४ (मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत) असे प्रेषित योहान म्हणतो, तर हे राजे कोणाचा न्याय करतील? (प्रकटीकरण २०:५अ) पुन्हा एकदा ‘जिवंत होणे’ हा शब्दप्रयोग त्याचा संदर्भ लक्षात घेऊन समजला पाहिजे. या शब्दप्रयोगाचा अर्थ विविध परिस्थितीत वेगवेगळा होऊ शकतो. उदाहरणार्थ, पौलाने त्याच्या अभिषिक्‍त सह ख्रिश्‍चनांविषयी असे लिहिले: “तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्‍यामुळे मृत झाला असता तुम्हासहि त्याने (देवाने) जिवंत केले.” (इफिसकर २:१, NW) होय, आत्म्याने अभिषिक्‍त असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना येशूच्या यज्ञार्पणावरील त्यांच्या विश्‍वासामुळे धार्मिक घोषित केले जाऊन पहिल्या शतकात “जिवंत केले” गेले.—रोमकर ३:२३, २४.

१५. (अ) यहोवाच्या ख्रिस्त-पूर्व साक्षीदारांनी देवाबरोबर कोणत्या भूमिकेचा आनंद उपभोगला? (ब) इतर मेंढरांचे ‘जिवंत होणे’ कसे घडते व ते कधी पूर्ण अर्थाने पृथ्वीचे वतन पावतील?

१५ अशाचप्रकारे, ख्रिस्त-पूर्व यहोवाच्या साक्षीदारांना देवाबरोबरील मित्रत्वाद्वारे धार्मिक घोषित केले गेले व अब्राहाम, इसहाक व याकोब हे जरी शारीरिकरित्या मेले होते तरी त्यांना “जिवंत” असल्याचे म्हणण्यात आले. (मत्तय २२:३१, ३२; याकोब २:२१, २३) तथापि, ते व पुनरूत्थित झालेले इतर सर्व, त्याचप्रमाणे हर्मगिदोनातून बचावणारा मोठा लोकसमुदाय व या नवीन जगात जन्मलेली मुले या सर्वांना मानवी पूर्णतेप्रत नेण्याची गरज आहे. येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर येशू व त्याचे सहराजे व सहयाजक हजार वर्षाच्या न्यायाच्या दिवसात हे काम पूर्ण करतील. या दिवसाच्या समाप्तीस, “मृतांपैकी बाकीचे लोक” “जिवंत झाले” असतील म्हणजेच ते परिपूर्ण मानव बनलेले असतील असा याचा अर्थ होतो. आम्ही पाहणारच आहोत की त्यांना अंतिम परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल परंतु परिपूर्ण मानव या नात्याने त्यांना या परीक्षेचा सामना करावा लागेल. परीक्षेत उत्तीर्ण होतील तेव्हा देव त्यांना, पूर्ण अर्थाने धार्मिक म्हणून सार्वकालिक जीवनासाठी लायक असे घोषित करील. ते या अभिवचनाच्या संपूर्ण पूर्णतेचा अनुभव घेतील: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) आज्ञाधारक मानवजातीकरिता किती उज्ज्वल भवितव्य राखलेले आहे!

पहिले पुनरूत्थान

१६. ख्रिस्ताबरोबर राजे या नात्याने राज्य करणाऱ्‍यांना पुनरूत्थानाचा जो अनुभव येणार त्याचे वर्णन योहान कसे करतो व का?

१६ जे “जिवंत झाले आणि [ज्यांनी] ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले,” त्याकडे वळून आता, योहान पुढे लिहितो: “हेच पहिले पुनरूत्थान. (प्रकटीकरण २०:५ब) हे कसे पहिले आहे? हे “पहिले पुनरूत्थान” आहे, कारण जे याचा अनुभव घेतील ते “देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ” असे आहेत. (प्रकटीकरण १४:४) ते महत्त्वपूर्णतेच्या बाबतीत देखील प्रथम आहे, कारण ज्यांचा यात भाग असेल ते येशूबरोबर त्याच्या स्वर्गीय राज्यात सहशासक असतील व बाकीच्या मानवजातीचा न्याय करतील. शेवटी, त्याच्या गुणामध्ये ते पहिले आहेत. स्वतः येशू ख्रिस्ताव्यतिरिक्‍त, ज्यांचे पहिले पुनरूत्थान केले जाईल त्या प्राण्यांविषयी बायबल म्हणते की त्यांनाच केवळ अमरत्व प्राप्त होते.—१ करिंथकर १५:५३; १ तीमथ्य ६:१६.

१७. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या आशीर्वादित भवितव्याचे वर्णन योहान कसे करतो? (ब) “दुसरे मरण” काय आहे व १,४४,००० विजेत्यांवर याची कोणतीही “सत्ता” का असणार नाही?

१७ या अभिषिक्‍त जनांसाठी ती केवढी आशीर्वादीत आशा! योहान घोषित करतो: “पहिल्या पुनरूत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुसऱ्‍या मरणाची सत्ता नाही.” (प्रकटीकरण २०:६अ) स्मुर्णातील ख्रिश्‍चनांना येशूने अभिवचन दिले, त्याप्रमाणे “पहिले पुनरूत्थान” यात सहभाग असलेल्या विजेत्यांना ‘दुसरे मरण’ ज्याचा अर्थ नाश व ज्यात पुनरूत्थानाची आशा नाही असा धोका त्यांना राहणार नाही. (प्रकटीकरण २:११; २०:१४) अशा विजेत्यांवर दुसऱ्‍या मरणाची ‘सत्ता नसणार’ कारण त्यांनी अविनाशीपणा व अमरत्व परिधान केलेले असेल.—१ करिंथकर १५:५३.

१८. पृथ्वीच्या नवीन शासकांविषयी योहान आता काय म्हणतो व ते काय साध्य करतील?

१८ सैतानाच्या अधिकाराच्या कालावधीतील पृथ्वीवरील राजांपासून हे किती वेगळे असेल! यांनी ५० किंवा ६० वर्षांपर्यंत राज्य केले आहे तर अधिकांनी केवळ काही वर्षेच राज्य केले आहे. त्यातील पुष्कळांनी मानवजातीवर जुलूम केला. ते काहीही असले तरी, सतत बदलणारे शासन व त्यांच्या बदलणाऱ्‍या योजनांमुळे राष्ट्रांना कायम स्वरूपाचा फायदा कसा होऊ शकेल? याच्या अगदी उलट योहान पृथ्वीच्या नवीन शासकांविषयी म्हणतो: “तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करितील.” (प्रकटीकरण २०:६ब) येशूबरोबर त्यांचे एक हजार वर्षांसाठी एकच सरकार असेल. येशूच्या परिपूर्ण मानवी यज्ञार्पणाच्या मूल्याचा उपयोग करून त्यांची याजकीय सेवा, आज्ञाकारी मानवांना आध्यात्मिक, नैतिक व शारीरिक पूर्णतेप्रत निरवील. त्यांच्या राजकीय सेवेचा परिणाम जगव्याप्त मानवी समाजाची बांधणी करण्यात परिणामित होईल, यामुळे यहोवाची धार्मिकता व पवित्रता प्रकट केली जाईल. एक हजार वर्षांसाठी शासक असल्यामुळे, येशूसोबत ते, प्रतिसाद दर्शविणाऱ्‍या मानवजातीला सार्वकालिक जीवनाच्या ध्येयाप्रत प्रेमाने मार्गदर्शन करतील.—योहान ३:१६.

अंतिम परीक्षा

१९. हजार वर्षाच्या समाप्तीस पृथ्वीची व मानवजातीची परिस्थिती कशी असेल व आता येशू काय करतो?

१९ हजार वर्षाच्या समाप्तीस सर्व पृथ्वी आरंभीच्या एदेन बागेसारखी होईल. ते एक वास्तविक नंदनवन असेल. परिपूर्ण मानवजातीला देवासमोर कोणा याजकाच्या मध्यस्थीची जरूरी भासणार नाही, कारण तेव्हा आदामाच्या पापामुळे आलेले सर्व मागमूस काढले जातील व अंतिम शत्रू मृत्यू देखील नाहीसा केला जाईल. ख्रिस्ताच्या राज्याने एका सरकाराधीन नवीन जग या देवाच्या उद्देशास पूर्ण केलेले असेल. अशा परिस्थितीत येशू “देवपित्याला राज्य सोपून” देईल.—१ करिंथकर १५:२२-२६; रोमकर १५:१२.

२०. अंतिम परीक्षेची वेळ होईल तेव्हा काय होईल असे योहान आम्हास सांगतो?

२० आता अंतिम परीक्षेचा समय आहे. एदेनातील पहिल्या मानवाच्या तुलनेत पाहता ते परिपूर्ण मानवजातीचे जग त्याच्या सत्वात टिकून राहील का? काय होते याविषयी योहान सांगतो: “ती हजार वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्‍त करण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यातील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यांस लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले.”प्रकटीकरण २०:७-९अ.

२१. सैतान त्याच्या शेवटच्या प्रयत्नांमध्ये कसा पुढे जातो व हजार वर्षाच्या राज्य कारकिर्दीनंतरही काही त्याचे अनुकरण करतील याबद्दल आम्हाला का आश्‍चर्य वाटू नये?

२१ सैतानाच्या शेवटल्या प्रयत्नाला केवढे यश मिळेल? तो “पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यातील गोग व मागोग राष्ट्रांस” फसवितो व ‘लढाईकडे’ त्यांना निरवितो. हजार वर्षाच्या आनंदी व उभारणीकारक ईश्‍वरशासित शासनानंतर सैतानाची बाजू कोण घेईल बरे? परिपूर्ण आदाम व हव्वा एदेनच्या नंदनवनातील आनंदी जीवन उपभोगत असताना सैतान त्यांना ठकवू शकला हे आम्ही विसरू नये. आरंभीच्या बंडाचे दुष्ट परिणाम पाहिलेल्या देवदूतांना देखील तो पतभ्रष्ट करू शकला होता. (२ पेत्र २:४; यहूदा ६) तर मग, देवाच्या राज्याच्या हजार वर्षांच्या आनंददायक शासनानंतरही काही परिपूर्ण मानव सैतानाचे अनुकरण करण्यास मोहीत होतील यामुळे आम्ही आश्‍चर्यचकीत होऊ नये.

२२. (अ) ‘पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यातील राष्ट्रे’ या शब्दप्रयोगामुळे काय सूचित होते? (ब) या बंडखोरांना “गोग व मागोग” का संबोधले आहे?

२२ बायबल या बंडखोरांना ‘पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यातील . . . राष्ट्रे, असे संबोधते. याचा अर्थ मानवजात पुन्हा एकदा एकमेकांपासून विभिन्‍न राष्ट्रात विभागली जाईल असा होत नाही. तर याद्वारे केवळ असे समजते की हे स्वतःला यहोवाच्या धार्मिक, निष्ठावान जनांपासून वेगळे करतील व राष्ट्रे आज जो दुष्ट आत्मा प्रदर्शित करीत आहेत तोच ते दाखवतील. पृथ्वीवरील ईश्‍वरशासित सरकारचा नाश करण्याच्या हेतूने यहेज्केलच्या भविष्यवाणीतील गोग व मागोगप्रमाणे ते ‘दुष्ट युक्‍ति योजतील.’ (यहेज्केल ३८:३, १०-१२) यास्तव, त्यांना “गोग व मागोग” संबोधले आहे.

२३. जे बंड करतील त्यांची संख्या “समुद्राच्या वाळूइतकी” असेल याद्वारे काय सूचित होते?

२३ सैतानाच्या बंडात जे सामील होतील त्यांची संख्या “समुद्राच्या वाळूइतकी” असेल. ती किती असेल बरे? ती पूर्वनियोजित संख्या नाही. (पडताळा यहोशवा ११:४; शास्ते ७:१२.) सैतानाच्या फसव्या लबाडीस प्रत्येक जन कसा प्रतिसाद देईल यावर शेवटली एकूण संख्या आधारित राहील. तरीपण बरीच संख्या असेल यात काही शंका नाही, कारण “पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर” यावर विजय मिळवण्यासाठी ते स्वतः बळकट असल्याचे समजतील.

२४. (अ) “प्रिय नगर” काय आहे व त्यास कसे वेढले जाते? (ब) “पवित्र जनांची छावणी” कशाला सूचित करते?

२४ “प्रिय नगर” हे प्रकटीकरण ३:१२ मध्ये महिमायुक्‍त येशूने त्याच्या अनुयायांना ज्या नगराविषयी सांगितले तेच असू शकते व तो असे म्हणतो “स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी.” ही स्वर्गीय संघटना असल्यामुळे पृथ्वीवरील शक्‍ती तिला कसे ‘वेढितील’? त्यात ते ‘पवित्र जनांच्या छावणीला वेढतात.’ छावणी नगराबाहेर असते; यास्तव, “पवित्र जनांची छावणी” ही स्वर्गीय नव्या यरूशलेमेपासून बाहेर पृथ्वीवर जे आहेत व यहोवाच्या शासकीय व्यवस्थेला जे निष्ठावंतपणे पाठिंबा देतात त्यांना लागू होते. सैतानाच्या अधीन असणारे ते विद्रोही त्या विश्‍वासू जनांवर हल्ला करतात, तेव्हा प्रभु येशू तो हल्ला त्याच्यावर केल्यासारखा समजतो. (मत्तय २५:४०, ४५) स्वर्गीय नव्या यरुशलेमेने पृथ्वीला नंदनवन बनविण्यासाठी जे सर्व काही केले त्यास ‘ती राष्ट्रे’ काढून टाकण्याचा प्रयत्न करतील. यामुळे ‘पवित्र जनांच्या छावणीवर’ आक्रमण करण्याद्वारे ते “प्रिय नगर” यावर देखील आक्रमण करतात.

अग्नी व गंधकाचे सरोवर

२५. ‘पवित्र जनांच्या छावणीवरील’ बंडखोरांच्या आक्रमणाच्या परिणामाचे वर्णन योहान कसे करतो व सैतानासाठी याचा काय अर्थ होईल?

२५ सैतानाचा हा अंतिम प्रयत्न यशस्वी होईल का? कदापि नाही—आमच्या दिवसात आध्यात्मिक इस्त्राएलावर मागोगच्या गोगचा हल्ला जसा यशस्वी होणार नाही तसेच ते असेल! (यहेज्केल ३८:१८-२३) योहान या परिणामाचे वर्णन हुबेहुब असे देतो: “तेव्हा स्वर्गातून अग्नि उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकले; त्यांस ठकविणाऱ्‍या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्‍वापद व तो खोटा संदेष्टा आहे.” (प्रकटीकरण २०:९ब-१०अ) आता केवळ अथांग डोहात बंद करण्याऐवजी यावेळी मात्र जुनाट साप, सैतानाला चिरडून अस्तित्वहीन केले जाते, अग्नीने संपूर्णपणे नाश केल्यासारखे त्याचा समूळ नाश केला जातो.

२६. ‘अग्नी व गंधकाचे सरोवर’ यातना देण्याचे खरोखरचे ठिकाण का नाही?

२६ आम्ही अगोदरच पाहिले आहे की ‘अग्नी व गंधकाचे सरोवर’ हे यातना देण्याचे खरोखरचे ठिकाण नाही. (प्रकटीकरण १९:२०) सैतानाला सर्वकाळासाठी तेथे अतियातना द्यायच्या असतील तर यहोवाला त्याला जिवंत ठेवावे लागेल. तथापि जीवन ही एक देणगी आहे, शिक्षा नव्हे. मृत्यू हा पापासाठी शिक्षा आहे आणि बायबलनुसार मृत प्राण्यांना यातना होत नाहीत. (रोमकर ६:२३; उपदेशक ९:५, १०) आणखी, आम्ही असे वाचतो की मरणाला अधोलोकासहित याच अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकले जाते. निश्‍चितच, मरण व अधोलोक यातना अनुभव करु शकणार नाहीत!—प्रकटीकरण २०:१४.

२७. अग्नी व गंधकाचे सरोवर ही संज्ञा समजण्यासाठी सदोम व गमोराचे जे झाले ते आम्हाला कशी मदत करते?

२७ ही सर्व माहिती अग्नी व गंधकाचे सरोवर हे लाक्षणिक आहे याला पाठबळ देते. अग्नी व गंधकाचा उल्लेख आम्हाला पुरातन सदोम व गमोरा नगराच्या नाशाविषयी आठवण करून देतो. त्यांच्या अतिदुष्टतेमुळे देवाने त्यांचा नाश केला. जेव्हा ती वेळ आली, तेव्हा “परमेश्‍वराने [यहोवा, NW] सदोम व गमोरा यांवर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला.” (उत्पत्ती १९:२४) त्या दोन नगरांवर जे गुदरले त्यास ‘सार्वकालिक अग्निदंड’ म्हटले आहे. (यहूदा ७) तथापि, त्या दोन नगरांना सार्वकालिक यातना भोगाव्या लागल्या नाहीत. तर, त्यांच्या दुष्ट रहिवाश्‍यांबरोबर त्यांचा कायमचाच समूळ नाश करण्यात आला. आज ती नगरे अस्तित्वात नाहीत व त्यांचे ठिकाण कोणीही निश्‍चित सांगू शकणार नाही.

२८. अग्नी व गंधकाचे सरोवर काय आहे व ते मरण, अधोलोक व अथांग डोह यापासून कसे वेगळे आहे?

२८ याच्या अनुषंगाने बायबल स्वतः अग्नी व गंधकाच्या सरोवराचा अर्थ स्पष्ट करते: “अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.” (प्रकटीकरण २०:१४) हे येशूने सांगितलेल्या गेहन्‍नासारखेच आहे, जेथे दुष्टांचा नाश केला जातो, सार्वकालिक यातना दिल्या जात नाहीत. (मत्तय १०:२८) हा पूर्ण स्वरूपाचा नाश असेल यामध्ये पुनरूत्थानाची आशा नसणार. मरण, अधोलोक व अथांग डोहाच्या किल्ल्या आहेत परंतु अग्नी गंधकाचे सरोवर उघडण्यासाठी असणाऱ्‍या किल्लीचा उल्लेख केलेला नाही. (प्रकटीकरण १:१८; २०:१) ते कधीही त्याच्या कैद्यांना मुक्‍त करणार नाही.—पडताळा मार्क ९:४३-४७.

रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगणे

२९, ३०. योहान आम्हास दियाबल, श्‍वापद व खोटा संदेष्टा याविषयी काय सांगतो व हे आम्ही कसे समजले पाहिजे?

२९ दियाबल त्याचप्रमाणे श्‍वापद व खोटा संदेष्टा यांचा उल्लेख करून आता योहान आम्हाला सांगतो: “तेथे त्यांस रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.” (प्रकटीकरण २०:१०ब) याचा काय अर्थ होऊ शकतो? अगोदर सांगितल्याप्रमाणे, श्‍वापद व खोटा संदेष्टा, तसेच मरण व अधोलोक ही प्रतीके (चिन्हे) यांना पीडा भोगाव्या लागणार असे म्हणणे तर्कशुद्ध वाटत नाही. यास्तव, सैतानाला युगानुयुग पीडा भोगावी लागेल यावर विश्‍वास ठेवण्याचे आम्हाजवळ कोणतेही कारण नाही. त्याला नष्ट केले जाईल.

३० “पीडा” यासाठी जो ग्रीक शब्द बेसानिʹझो वापरला आहे त्याचा मूळ अर्थ “कसवटीच्या दगडाने (धातुची) परीक्षा करणे” असा होतो. “पीडा देऊन प्रश्‍न विचारणे” हा दुसरा अर्थ होतो. (द न्यू थेअर्स ग्रीक-इंग्लिश लेक्सिकन ऑफ दी न्यू टेस्टमेंट) या संदर्भात, ग्रीक शब्दाचा वापर दाखवतो की सैतानाचे जे होईल ते युगानुयुगासाठी, यहोवाच्या शासनाची योग्यता व धार्मिकतेच्या वादविषयासंबंधाने एक कसोटी राहील. सार्वभौम सत्तेचा वादविषय सदासर्वकाळासाठी मिटलेला असेल. यहोवाची सार्वभौमता खोटी आहे का, हे आव्हान पारखण्यासाठी पुन्हा कधीही इतका मोठा अवधी दिला जाणार नाही.—पडताळा स्तोत्र ९२:१, १५.

३१. “पीडा” हा एकच अर्थ देणारे दोन ग्रीक शब्द, दियाबल सैतानाला जी शिक्षा मिळते ती समजण्यासाठी आम्हाला कशी मदत करतात?

३१ शिवाय, बेसानिस्टसʹ, “यातना देणारा” हा संबंधित शब्द बायबलमध्ये “तुरूगांधिकारी” या अर्थाने वापरला आहे. (मत्तय १८:३४, किंगडम इंटरलिनियर) याच्या अनुषंगाने सैतान अग्नी व गंधकाच्या सरोवरात सर्वकाळ जखडून राहील; त्याला कधीही मुक्‍त केले जाणार नाही. शेवटी, योहानाच्या परिचयाचे होते त्या ग्रीक सेप्ट्युजंट मध्ये बेʹसानोस शब्दाचा वापर मानखंडनेसाठी केला आहे व त्यामुळे मृत्यू ओढावतो. (यहेज्केल ३२:२४, ३०) यामुळे आम्हाला हे पाहण्यास मदत होते की सैतानाला मिळालेली शिक्षा त्याची मानखंडना करते तसेच अग्नी व गंधकाच्या सरोवरात त्याचा सार्वकालिक मृत्यू घडवते. त्याची कर्मे त्याच्यासोबत नाश पावतात.—१ योहान ३:८.

३२. दुरात्म्यांना कोणती शिक्षा भोगावी लागेल व आम्हाला ते कसे समजते?

३२ पुन्हा, दुरात्म्यांविषयी या वचनात काही सांगितले नाही. मग, हजार वर्षाच्या समाप्तीस यांना सैतानाबरोबर सोडण्यात येऊन त्याबरोबर शेवटी सार्वकालिक मरण दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे का? पुरावा याचे उत्तर होय, असे देतो. शेरडे व मेंढरांच्या दृष्टांतात येशू म्हणतो की शेरडे “सैतान व त्याचे दूत ह्‍यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे” त्यात जातील. (मत्तय २५:४१) “सार्वकालिक अग्नि” हा शब्दप्रयोग जेथे सैतानाला टाकण्यात येईल त्या अग्नी व गंधकाच्या सरोवराला अनुलक्षून असला पाहिजे. दियाबलाचे दूत त्याबरोबर स्वर्गातून खाली टाकण्यात आले होते. यास्तव, हजार वर्षीय राजवटीच्या आरंभास ते त्याबरोबर अथांग डोहात गेले हे उघड आहे. तेव्हा, त्याच्याबरोबर यांचा देखील अग्नी व गंधकाच्या सरोवरात नाश होईल हे अगदी सुसंगत वाटते.—मत्तय ८:२९.

३३. उत्पत्ती ३:१५ मधील कोणत्या अंतिम भागाची पूर्णता तेव्हा घडून येईल व आता यहोवाचा आत्मा कोणत्या गोष्टीकडे योहानाचे लक्ष वेधवतो?

३३ अशाप्रकारे, उत्पत्ती ३:१५ मध्ये उद्धृत केलेल्या भविष्यवाणीतील अंतिम भागाची पूर्णता घडते. सापाचे डोके लोखंडी टाचेने चिरडल्यावर तो जसा मरतो तशीच सैतानाची अवस्था अग्नीच्या सरोवरात टाकल्यावर होईल. तो व त्याचे दुरात्मे सर्वकाळासाठी गेलेले असतील. प्रकटीकरणात त्यांच्याविषयी पुढे कसलाही उल्लेख आलेला नाही. आता, भविष्यवादितपणे त्यांना काढून टाकण्यात आल्यामुळे यहोवाचा आत्मा पृथ्वीवरील आशा जोपासणाऱ्‍या लोकांना ज्या गोष्टीचे अधिक आकर्षण वाटते त्याकडे लक्ष आकर्षित करतो: “राजांचा राजा” व “त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्‍वासू” स्वर्गातून राज्य करतील तेव्हा मानवजातीवर याचा काय परिणाम होईल? (प्रकटीकरण १७:१४) याचे उत्तर देण्यासाठी, योहान आम्हास हजार वर्षीय राजवटीच्या आरंभास पुन्हा एकदा आणतो.

[तळटीपा]

^ इतर शास्त्रवचने सांगतात की येशू मृतावस्थेत असताना अधोलोकात (हेडीज) होता. (प्रेषितांची कृत्ये २:३१) तथापि यावरून आम्ही असा निष्कर्ष काढू नये की, हेडीज व अथांग डोह सर्वदा सारखेच आहेत. श्‍वापद व सैतान अथांग डोहात जातील, परंतु केवळ मानवांच्या बाबतीत असे म्हटले आहे की ते हेडीजमध्ये (अधोलोक) जातील, जेथे ते पुनरूत्थान होईपर्यंत मरणाच्या निद्रावस्थेत असतील.—ईयोब १४:१३; प्रकटीकरण २०:१३.

^ योहानाच्या दिवसात तरवारीचा वापर जरी सामान्यपणे होत होता, तरी रोममध्ये वध करण्यासाठी कुऱ्‍हाड (ग्रीक, पेʹले․कस) पारंपारिक हत्यार होते. (प्रेषितांची कृत्ये १२:२) यास्तव, येथे वापरलेल्या पेपे․ले․कीस․मेʹनोन या (“कुऱ्‍हाडीने वध केला”) ग्रीक शब्दाचा साधा अर्थ “वध केला” असा होतो.

^ चित्तवेधकपणे, प्रकटीकरणाचा लेखक योहान, याच्या शिष्यांकडून बायबलचे काही ज्ञान हेरापोलिसचा पापियसला प्राप्त झाले असे समजले जाई, असा अहवाल चवथ्या शतकातील इतिहासकार इसूबियस यांनी दिला जे (इसूबियसचे त्याला कडक असहमत असतानासुद्धा) ख्रिस्ताच्या खरोखरच्या हजार वर्षीय राजवटीवर विश्‍वास ठेवत होते.—चर्चचा इतिहास (इंग्रजी), इसूबियस, तिसरे, ३९.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९३ पानांवरील चित्रे]

मृत समुद्र. सदोम व गमोराचे संभाव्य ठिकाण

[२९४ पानांवरील चित्रे]

“तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडिशील”