व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हर्मगिदोनात योद्धा-राजा विजय मिळवतो

हर्मगिदोनात योद्धा-राजा विजय मिळवतो

अध्याय ३९

हर्मगिदोनात योद्धा-राजा विजय मिळवतो

दृष्टांत १३​—प्रकटीकरण १९:११-२१

विषय: येशू सैतानी व्यवस्थीकरणाचा नाश करण्यासाठी स्वर्गातील सैन्यांचे नेतृत्व करतो

पूर्णतेचा काळ: मोठ्या बाबेलचा नाश घडल्यावर

१. हर्मगिदोन काय आहे आणि त्याकडे कसे आणले जाते?

 हर्मगिदोन—हा शब्द पुष्कळांना मोठा भयानक वाटतो. तथापि, धार्मिकतेवर प्रेम करणाऱ्‍यांना, यहोवा जेव्हा सर्व राष्ट्रांवर शेवटचा न्यायदंड बजावेल तो दीर्घकाळ प्रतीक्षा केलेला दिवस वाटतो. हे काही मानवाचे युद्ध नव्हे, तर ती ‘सर्वसमर्थ देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई’ आहे, ज्यात तो पृथ्वीवर शासन करणाऱ्‍यांविरुद्ध आपला क्रोध ओतणार आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६; यहेज्केल २५:१७) मोठ्या बाबेलचा विध्वंस झाल्यामुळे मोठ्या संकटाची आधीच सुरवात झालेली असेल. आता सैतानाच्या प्रभावाखाली किरमिजी रंगाचे श्‍वापद व त्याची दहा शिंगे एकवटून यहोवाच्या लोकांवर हल्ला करतील. देवाच्या स्त्रीसमान संघटनेवर सैतानाचा अधिक क्रोध उफाळला असल्यामुळे तिच्या संतानापैकीच्या शेषांबरोबर शेवटपर्यंत युद्ध करीत राहण्यात आपल्या कुयुक्त्यांचा वापर करण्याचा त्याचा निश्‍चय आहे. (प्रकटीकरण १२:१७) ही सैतानाची शेवटली संधी आहे!

२. मागोगचा गोग कोण आहे आणि यहोवा त्याला त्याच्या लोकांवर चढाई करण्यासाठी कसे उद्युक्‍त करतो?

दियाबलाच्या या दुष्ट हल्ल्याचे वर्णन यहेज्केलच्या ३८ व्या अध्यायात स्पष्टपणे दिले आहे. तेथे या नीतीभ्रष्ट सैतानाला “मागोग देशातील गोग” असे संबोधण्यात आले आहे. यहोवा या लाक्षणिक गोगच्या जबड्यात गळ घालून त्याला व त्याच्या अगणित लष्करी सैन्याला चढाई करायला लावतो. हे तो कसे घडवून आणतो? देवाचे साक्षीदार निर्भय राहणारे, ‘निरनिराळ्या राष्ट्रातून जमा केलेले, . . . गुरेढोरे व मालमत्ता संपादन केलेले आणि पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहणारे’ लोक आहेत हे बघून तो गोगला चढाई करण्याची चालना भरतो. हे लोक श्‍वापद व त्याची मूर्ती यांची भक्‍ती करण्यास नकार देत असल्यामुळे पृथ्वीच्या जणू मधल्या प्रदेशी आहेत. त्यांची आध्यात्मिक शक्‍ती व समृद्धता पाहून गोगला भारी क्रोध येतो. या कारणामुळे गोग, त्याची अगणित लष्करी सेना तसेच दहा शिंगे असलेले समुद्रातून वर आलेले श्‍वापद याबरोबर मिळून त्यांना ठार करण्यासाठी जणू झेप घेतो. तथापि, मोठ्या बाबेलला मिळू शकले नाही असे ईश्‍वरी संरक्षण देवाच्या शुद्ध लोकांना मिळाले आहे!—यहेज्केल ३८:१, ४, ११, १२, १५; प्रकटीकरण १३:१.

३. गोगच्या लष्करी सैन्यांचे यहोवा कसे उच्चाटन करतो?

यहोवा गोग व त्याच्या सर्व समुदायाची कशी विल्हेवाट लावतो? ऐका! “प्रभु परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो, माझ्या सर्व पर्वतांकडे त्यांजविरुद्ध मी तरवार बोलावीन; प्रत्येकाची तरवार आपल्या भावावर चालेल.” पण या झगड्यात कोणतीही अण्वस्त्र किंवा प्रासंगिक अस्त्रे काम करणार नाहीत; कारण यहोवा हे घोषित करतो: “मरी व रक्‍तपात यांनी मी त्याजबरोबर वाद मांडीन; त्याजवर, त्याच्या सैन्यांवर पाऊस, मोठ्या गारा, अग्नि व गंधक यांची धो धो वृष्टि मी त्याजबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन. याप्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रगट करीन आणि बहुत राष्ट्रांस माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांस समजेल की, मी परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे.”—यहेज्केल ३८:२१-२३; ३९:११; पडताळा यहोशवा १०:८-१४; शास्ते ७:१९-२२; २ इतिहास २०:१५, २२-२४; ईयोब ३८:२२, २३.

“विश्‍वसनीय व सत्य” असा म्हटलेला

४. युद्धाच्या तयारीत असलेल्या येशू ख्रिस्ताचे वर्णन योहान कसे देतो?

यहोवा तरवार बोलवतो. पण ही तरवार कोण चालवतो? प्रकटीकरणाकडे पुन्हा वळाल्यावर आम्हाला याचे उत्तर आणखी एका थरारक दृष्टांतामध्ये बघायला मिळते. योहानापुढे स्वर्ग उघडतो आणि खऱ्‍या भयप्रद रितीने त्याच्या डोळ्यांपुढे प्रकट होते—तो तर युद्धाच्या तयारीतील येशू ख्रिस्त! योहान आम्हास सांगतो: “नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला; तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्‍वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करितो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुगूट आहेत.”—प्रकटीकरण १९:११, १२अ.

५, ६. (अ) “पांढरा घोडा,” (ब) “विश्‍वसनीय व सत्य” हे नाव, (क) “अग्नीच्या ज्वालेसारखे” असणारे डोळे आणि (ड) “पुष्कळ मुगूट” याद्वारे काय सूचित होते?

आधी चार घोडेस्वारांच्या दृष्टांतात होते तसेच “पांढरा घोडा” येथेही धार्मिक युद्धाचे प्रतीक आहे. (प्रकटीकरण ६:२) या शक्‍तिशाली योद्ध्‌यापेक्षा देवाचा दुसरा कोणता पुत्र अधिक नीतीमान असू शकेल बरे? याला “विश्‍वसनीय व सत्य” असे म्हटलेले असल्यामुळे तो “विश्‍वसनीय व खरा साक्षी” येशू ख्रिस्तच असला पाहिजे. (प्रकटीकरण ३:१४) तो, यहोवाच्या धार्मिक न्यायाची अंमलबजावणी करण्यासाठी युद्ध करतो. अशाप्रकारे तो, यहोवाने नियुक्‍त केलेला न्यायाधीश या पात्रतेमध्ये “समर्थ देव” अशी भूमिका पूर्ण करतो. (यशया ९:६) त्याचे डोळे अत्यंत भयप्रेरित, “अग्नीच्या ज्वालेसारखे” आहेत व ते त्याच्या शत्रूंच्या येणाऱ्‍या अग्नीमय नाशाकडे लागले आहेत.

या योद्ध्‌या राजाच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. योहानाने समुद्रातून वर येणाऱ्‍या श्‍वापदाच्या डोक्यावर दहा मुकुट पाहिले होते, ते त्याच्या पृथ्वीवरील तात्कालिक शासनाला अनुलक्षून आहेत. (प्रकटीकरण १३:१) तथापि, येशूला तर “पुष्कळ मुगूट” आहेत. त्याचे वैभवी अधिपत्य अतुलनीय आहे कारण तो “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभु” आहे.—१ तीमथ्य ६:१५.

७. येशूला कोणते लिहिलेले नाव आहे?

योहान आणखी वर्णन देतो: “त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कोणालाहि कळत नाही.” (प्रकटीकरण १९:१२ब) बायबलने आधीच देवाच्या पुत्राची ओळख येशू, इम्मानुएल आणि मीखाएल या नावांनी दर्शविलेली आहे. पण येथे न दाखवण्यात आलेले “नाव” हे प्रभूच्या दिवसापासून येशू जो दर्जा व जे हक्क अनुभवीत आहे, त्याला अनुलक्षून आहे असे दिसते. (पडताळा प्रकटीकरण २:१७.) येशूचे १९१४ पासूनचे वर्णन देताना यशया म्हणतो की, “त्याला अद्‌भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील.” (यशया ९:६) प्रेषित पौलाने येशूच्या नावाचा संबंध त्याच्या सेवेच्या अत्यंत उच्च हक्कासोबत जोडला व म्हटले: “देवाने [येशूला] अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्‍यात हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा.”—फिलिप्पैकर २:९, १०.

८. ते लिहिलेले नाव केवळ येशूलाच का समजू शकते आणि तो काही उच्च हक्कांची सहभागिता कोणासोबत करतो?

येशूला लाभलेले हक्क अप्रतिम आहेत. यहोवाशिवाय स्वतः येशूलाच असे उच्च पद ग्रहण करण्याचा अर्थ समजू शकतो. (पडताळा मत्तय ११:२७.) या कारणामुळेच देवाच्या सर्व निर्मितीमध्ये केवळ येशूनेच त्या नावाची पूर्ण गुणग्राहकता बाळगली आहे. तरीदेखील यापैकीच्या काही सुहक्कात तो आपल्या वधूला सहभाग देतो. यामुळेच तो असे अभिवचन देतो: “जो विजय मिळवितो . . . त्याच्यावर . . . माझे नवे नाव लिहीन.”—प्रकटीकरण ३:१२.

९. (अ) येशूने “रक्‍त उडालेले बाह्‍य वस्त्र अंगावर घेतलेले होते,” आणि (ब) त्याला “देवाचा शब्द” हे नाव देण्यात आले होते याचा काय अर्थ होतो?

योहान पुढे सांगतो: “त्याने रक्‍त उडालेले बाह्‍य वस्त्र अंगावर घेतलेले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते.” (प्रकटीकरण १९:१३, NW) हे कोणाचे “रक्‍त” आहे? ते मानवजातीसाठी वाहण्यात आलेले येशूचे जीवनी रक्‍त असू शकते. (प्रकटीकरण १:५) पण या संदर्भात पाहू जाता ते, त्याच्या शत्रूंचे रक्‍त असू शकते जे, यहोवाच्या न्यायदंडांची या शत्रूंवर पूर्तता केली जात असताना त्याच्या वस्त्रांवर सांडले असावे. आपल्याला येथे आधीच्या दृष्टांताचे स्मरण होते जेथे, पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकण्यात व ते तुडविण्यात आले तेव्हा ते रक्‍त “घोड्यांच्या लगामास पोहोंचेल” इतके वर आले—हे देवाच्या शत्रूंवर मिळवलेल्या मोठ्या विजयाला सूचित करते. (प्रकटीकरण १४:१८-२०) याचप्रमाणे, येशूच्या बाह्‍यवस्त्रांवर उडालेले रक्‍त त्याचा विजय निर्णायक व पूर्ण स्वरुपाचा असल्याचे दाखवते. (पडताळा यशया ६३:१-६.) येथे पुन्हा योहान येशूला नाव असल्याचे सांगतो. यावेळेस मात्र हे नाव सर्वांना जाहीर करण्यात आलेले आहे—“देवाचा शब्द”—हे त्या योद्ध्‌या राजाला तो यहोवाचा प्रमुख वक्‍ता व सत्याची बाजू घेणारा असल्याची ओळख देते.—योहान १:१; प्रकटीकरण १:१.

येशूचे सहयोद्धे

१०, ११. (अ) या युद्धात येशू एकटाच नाही हे योहान कसे दाखवतो? (ब) घोडे पांढरे आहेत व त्यावर बसलेल्या स्वारांनी “पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे” धारण केली आहेत याद्वारे काय सूचित होते? (क) स्वर्गातील ‘सैन्यामध्ये’ कोणाकोणाचा समावेश आहे?

१० या युद्धात येशू केवळ एकटाच लढत नाही. योहान आम्हास सांगतो: “स्वर्गातील सैन्ये पांढऱ्‍या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.” (प्रकटीकरण १९:१४) हे घोडे ‘पांढरे’ आहेत याद्वारे ते धार्मिक युद्ध असल्याचे दाखवते. राजाच्या योद्ध्‌यांसाठी “तलम वस्त्रे” योग्यच आहेत व या वस्त्रांचा चकाकीपणा व शुद्धता ही यहोवापुढील शुद्ध व नीतीमान स्थानाला अनुलक्षून आहे. मग, ही “सैन्ये” कोणाची मिळून बनलेली आहेत? यात निःसंशये स्वर्गातील पवित्र देवदूतांचा समावेश असणार. प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला मीखाएल व त्याच्या दूतांनी सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून लावले. (प्रकटीकरण १२:७-९) येशू आपल्या वैभवी राजासनावर बसलेला असताना व पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे व लोकांचा न्याय करीत असताना हे ‘सर्व देवदूत’ त्याच्यासोबत आहेत. (मत्तय २५:३१, ३२) यास्तव, देवाच्या न्यायाची सरतेशेवटी पूर्ण अंमलबजावणी होणार तेव्हा त्या निर्णायक युद्धात येशू पुन्हा आपल्या देवदूतांसह असेल.

११ यात इतर देखील समाविष्ट असतील. येशूने थुवतीरा मंडळीच्या लोकांना संदेश पाठवला तेव्हा त्याने असे अभिवचन दिले होते: “जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो त्याला, माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करितात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील.” (प्रकटीकरण २:२६, २७) यात काहीही संशय नाही की, जेव्हा ती वेळ येईल तेव्हा स्वर्गात असणारे ख्रिस्ताचे बांधव देखील लोक व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवण्यात सहभाग घेतील.

१२. (अ) हर्मगिदोनातील लढाईत यहोवाचे पृथ्वीवरील सेवक भाग घेतील का? (ब) परंतु यहोवाचे पृथ्वीवरील लोक हर्मगिदोनात कसे समाविष्ट आहेत?

१२ पण पृथ्वीवरील देवाच्या सेवकांबद्दल काय? हर्मगिदोनाच्या लढाईमध्ये योहान वर्ग तसेच त्याचे निष्ठावंत साथीदार, जे सर्व राष्ट्रातून सामोरे येऊन यहोवाच्या उपासनेच्या आध्यात्मिक मंदिराकडे आलेले आहेत ते देखील भाग घेणार नाहीत. या शांतीप्रिय लोकांनी आधीच आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केलेले आहेत. (यशया २:२-४) तरीही, त्यांचा अधिक समावेश आहे! आपण आधीच पाहिले आहे की, निर्भयपणे राहात असणाऱ्‍या यहोवाच्या लोकांवर गोग व त्याचा समूह मोठा हल्ला करणार आहे. हाच तो यहोवाच्या योद्ध्‌या राजासाठी संकेत असणार, तो होताक्षणीच त्याच्यासह त्याची स्वर्गातील सेना युद्धाची सुरवात करील आणि त्या सर्व राष्ट्रांचे समूळ उच्चाटन करील. (यहेज्केल ३९:६, ७, ११; पडताळा दानीएल ११:४४–१२:१.) देवाचे पृथ्वीवरील लोक प्रेक्षक म्हणून यात मोठा रस घेतील. हर्मगिदोन त्यांच्यासाठी तारण घेऊन येणार आहे आणि यहोवाच्या समर्थनाच्या मोठ्या दिवसाची प्रत्यक्षता स्वतः बघून ते चिरकालासाठी जिवंत राहतील.

१३. यहोवाचे साक्षीदार सर्व सरकारांविरुद्ध नाहीत हे आपल्याला कसे कळते?

१३ याचा हा अर्थ होतो का की, यहोवाचे साक्षीदार सर्व सरकारांच्या विरोधात आहेत? मुळीच नाही! ते तर प्रेषित पौलाच्या या सूचनेचा अवलंब करतात: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे.” जोपर्यंत हे सध्याचे व्यवस्थीकरण आहे तोपर्यंत हे ‘वरिष्ठ अधिकारी’ देवाच्या अनुज्ञेमुळेच मानवी समाजात काही प्रमाणात सुव्यवस्था राखण्यासाठी अस्तित्वात आहेत याची त्यांना जाणीव आहे. या कारणामुळेच यहोवाचे साक्षीदार कर भरतात, कायद्यांचे पालन करतात, रहदारीची बंधने पाळतात, नोंदणीच्या गरजेची पूर्ती करतात. (रोमकर १३:१, ६, ७) याखेरीज, ते सत्य व प्रामाणिक असणे; शेजाऱ्‍यांवर प्रीती दाखवणे; एक मजबूत व नैतिक कुटुंब उभारणे आणि मुलांना चांगले नागरिक बनण्याची तालीम देणे यासारखी बायबलची तत्त्वे आचरतात. यामुळे ते केवळ “कैसराचे ते कैसराला” देत नाहीत तर “देवाचे ते देवाला” देखील भरून देतात. (लूक २०:२५; १ पेत्र २:१३-१७) देवाचे वचन, या जगातील सरकारी सत्ता तात्कालिक आहे असे सांगत असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार एका पूर्ण जीवनाची, खऱ्‍या जीवनाची व जे ख्रिस्ताच्या राज्याच्या कारकिर्दीत अनुभवण्यास मिळेल त्याची तयारी करीत आहेत. (१ तीमथ्य ६:१७-१९) या जगाच्या सत्ता उलटविण्यात ते सहभागी होणार नसले तरी देवाचे प्रेरित वचन, बायबल, यहोवा हर्मगिदोनात बजावणाऱ्‍या न्यायदंडाबद्दल जे म्हणते त्याबद्दल आदरयुक्‍त भय धरून आहेत.—यशया २६:२०, २१; इब्रीयांस १२:२८, २९.

अंतिम युद्धाकडे!

१४. येशूच्या मुखातून निघणारी “तीक्ष्ण धारेची तरवार” काय आहे?

१४ येशू आपला विजय कोणत्या अधिकाराने संपवतो? योहान आम्हास कळवतो: “त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते, तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील.” (प्रकटीकरण १९:१५अ) “तीक्ष्ण धारेची तरवार” ही जे देवाच्या राज्याला आपले पाठबळ दाखवण्याचे नाकारतात अशांच्या हत्येची आज्ञा करण्याच्या येशूच्या देव-प्रणीत अधिकाराला सूचित आहे. (प्रकटीकरण १:१६; २:१६) या जोमदार चिन्हांची समांतरता यशयाच्या या शब्दांसोबत जुळणारी आहे: “त्याने [यहोवा, NW] माझे मुख तीक्ष्ण तरवारीसारखे केले; त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपविले; त्याने मला चकचकीत बाणासारखे” केले. (यशया ४९:२) येथे यशया, देवाचे न्यायदंड घोषित करून जणू आपल्या अचूक बाणांनी त्यावर दंडाज्ञा बजावणाऱ्‍या येशूची पडछाया आहे.

१५. काळाच्या या समयात कोणाला उघड करण्यात येऊन त्याचा न्याय केला जाईल व हे कशाचा आरंभ होण्याचे चिन्ह असेल?

१५ काळाच्या या समयात येशूने प्रेषित पौलाच्या या उद्‌गारांच्या पूर्णतेनुरुप ही हालचाल केली असेल की, ‘तो धर्मत्यागी पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभु येशू आपल्या मुखातील श्‍वासाने मारून टाकील आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.’ होय, येशूची उपस्थिती (ग्रीक, रोसिʹया) १९१४ पासून पुढे, त्याने अधर्मी किंवा धर्मत्यागी पुरुषास किंवा ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांस उघड करून दाखविण्याद्वारे प्रकट होत आलेली आहे. जेव्हा किरमिजी रंगाच्या श्‍वापदाची दहा शिंगे ख्रिस्ती धर्मजगत तसेच मोठ्या बाबेलच्या इतर भागावर दंड बजावून नासधूस करतील तेव्हा ती उपस्थिती तर अधिक प्रमाणात प्रकट होईल. (२ थेस्सलनीकाकर २:१-३, ८) हीच मोठ्या संकटाची सुरवात असेल! यानंतर, सैतानाच्या संघटनेच्या राहिलेल्या भागाकडे येशू या भविष्यवादाच्या सहमतात आपले लक्ष वळवतो: “तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीस ताडण करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करील.”—यशया ११:४.

१६. यहोवाने नियुक्‍त केलेल्या योद्धा-राजाबद्दल स्तोत्रसंहिता व यिर्मया कसे वर्णन देतात?

१६ यहोवाने नियुक्‍त केलेला या अर्थी हा योद्धा-राजा कोणाचा बचाव केला जाईल व कोणास ठार मारण्यात येईल ते ठरवील. यहोवा, या देवाच्या पुत्रास संबोधताना भविष्यवादितपणे असे म्हणतो: “लोहदंडाने तू त्यांस [पृथ्वीच्या शासनकर्त्यांना] फोडून काढिशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करिशील.” शिवाय, यिर्मया अशा भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्‍यांना व त्यांच्या हुजऱ्‍यांना संबोधून असे म्हणतो: “मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान्‌ भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल!” या दुष्ट जगाला ते अधिपती कितीही इष्ट वाटले असतील तरी राजाच्या लोहदंडाच्या एकाच तडाख्यात मोलवान भांडे भंग पावते तसे त्यांचे तुकडे पडणार. प्रभु येशूबद्दल दाविदाने जे भाकीत केले त्याप्रमाणेच ते असणार: “परमेश्‍वर [यहोवा, NW] तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो: ‘तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.’ तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभु [यहोवा, NW] आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बीमोड करील. तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील; रणभूमि प्रेतांनी भरील.”—स्तोत्र २:९, १२; ८३:१७, १८; ११०:१, २, ५, ६; यिर्मया २५:३४.

१७. (अ) योद्धा-राजा करीत असलेल्या नाशाच्या हालचालीचे वर्णन योहान कसे करतो? (ब) राष्ट्रांसाठी देवाचा क्रोध केवढा भयानक असेल त्याबद्दल काही भविष्यवाद जी माहिती देतात ती सांगा.

१७ हा प्रबळ योद्धा-राजा पुढच्याही दृश्‍यात दिसतो: “सर्वसमर्थ देव ह्‍याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवितो.” (प्रकटीकरण १९:१५ब) पूर्वीच्या दृष्टांतात योहानाने आधीच ‘देवाच्या क्रोधाचे द्राक्षकुंड’ तुडविले जात असल्याचे बघितले होते. (प्रकटीकरण १४:१८-२०) यशया देखील अशा दंडाज्ञेच्या द्राक्षकुंडाचे वर्णन करतो आणि इतर संदेष्टे यहोवाचा क्रोधाचा दिवस सर्व राष्ट्रांसाठी केवढा भयानक असेल ते सांगतात.—यशया २४:१-६; ६३:१-४; यिर्मया २५:३०-३३; दानीएल २:४४; सफन्या ३:८; जखऱ्‍या १४:३, १२, १३; प्रकटीकरण ६:१५-१७.

१८. यहोवा सर्व राष्ट्रांचा न्याय करील याबद्दल योएल संदेष्टा कोणती स्पष्टता देतो?

१८ योएल संदेष्टा द्राक्षकुंडाचा संबंध, यहोवा “सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा [जो] न्याय करणार आहे,” त्याजशी लावतो. अर्थात यहोवा त्याचा नियुक्‍त असलेला शास्ता येशू व त्याच्या स्वर्गीय सैन्याला ही आज्ञा देतो: “विळा चालवा, पीक तयार आहे. या, चला, उतरा; द्राक्षांचा घाणा भरला आहे; कुंडे भरून वाहात आहेत; कारण लोकांची दुष्टाई फार आहे. लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्‍यात लोकांच्या झुंडी आहेत, कारण निर्णयाच्या खोऱ्‍यात परमेश्‍वराचा [यहोवा, NW] दिवस येऊन ठेपला आहे. सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशवयाचे थांबतात. परमेश्‍वर [यहोवा, NW] सीयोनेतून गर्जना करितो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवितो; आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्‍वर [यहोवा, NW] आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे. . . . परमेश्‍वर [यहोवा, NW] तुमचा देव मी आहे हे तुम्हांस कळेल.”—योएल ३:१२-१७.

१९. (अ) पहिले पेत्र ४:१७ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाचे कसे उत्तर मिळणार? (ब) येशूच्या बाह्‍यवस्त्रावर कोणते नाव लिहिण्यात आले आहे व ते योग्य असल्याचे का दिसेल?

१९ सर्व आज्ञाभंजक राष्ट्रे व लोक यांच्यासाठी हा भयानक अंताचा दिवस असेल, पण तोच दिवस ज्यांनी यहोवा व त्याचा योद्धा-राजा यांना आपला आश्रय केले आहे अशांसाठी सुटकेचा असेल! (२ थेस्सलनीकाकर १:६-९) १९१८ पासून देवाच्या घराकडून सुरु झालेला न्यायनिवाडा आपल्या कळसाला पोहंचला असेल व त्याने १ पेत्र ४:१७ मधील या प्रश्‍नाचे उत्तर दिले असेल की, “देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्‍यांचा शेवट काय होईल?” वैभवी विजेत्याने ते द्राक्षकुंड संपूर्णरित्या तुडवले असणार व याद्वारे त्याला उंच करण्यात आले आहे असे तो शाबीत करणार, त्याच्याबद्दल योहान म्हणतो: “त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभु हे नाव लिहिलेले आहे.” (प्रकटीकरण १९:१६) तो पृथ्वीवरील कोणाही अधिपती, मानवी राजा किंवा प्रभूपेक्षा अधिक सामर्थ्यवान असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचे वैभव व दिमाख चकाकत आहे. त्याने “सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्‍यांच्या प्रीत्यर्थ” आपली धाव केली आहे आणि सर्वकाळचा विजय मिळवला आहे! (स्तोत्र ४५:४) रक्‍तात बुचकळलेल्या वस्त्रावर ज्याचे तो समर्थन करतो त्या सार्वभौम प्रभु यहोवाने बहाल केलेले नाव लिहिण्यात आले!

देवाची सायंकाळची मोठी जेवणावळ

२०. योहान ‘देवाच्या [“सायंकाळच्या,” NW] मोठ्या मेजवानीचे’ कसे वर्णन देतो आणि यामुळे आधीचा परंतु तसाच असणारा कोणता भविष्यवाद लक्षात आणला जातो?

२० यहेज्केलच्या दृष्टांतात गोगच्या समूहाचा नाश झाल्यावर पक्षी व जंगली जनावरांना त्यावर मेजवानीचे निमंत्रण मिळाले! यहोवाच्या शत्रूंची शवे खाऊन त्यांनी भूप्रदेश स्वच्छ बनवला. (यहेज्केल ३९:११, १७-२०) योहानाचे पुढील शब्द आम्हाला आधीच्या त्या भविष्यवादाचे सविस्तरपणे स्मरण करून देतात. तो म्हणतो: “नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्‍या सर्व पांखरांस उच्च वाणीने म्हणाला: ‘या, देवाच्या [“सायंकाळच्या,” NW] मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बलवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे अशा सर्वांचे मांस खावयास या.’”—प्रकटीकरण १९:१७, १८.

२१. (अ) देवदूत ‘सूर्यात उभा’ होता; (ब) मृतांना जमिनीवर तसेच पडून राहू दिले; (क) जी शवे जमिनीवर असतील त्यांची यादी आणि (ड) ‘देवाची सायंकाळची मोठी जेवणावळ’ या सर्वांद्वारे काय सूचित होते?

२१ तो देवदूत ‘सूर्यात उभा’ होता व ही जागा पक्ष्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज्ञा करण्याजोगी होती. योद्धा-राजा व त्याचे स्वर्गातील सैन्य ज्यांना लवकरच ठार मारणार आहेत अशांच्या मांसावर ताव मारण्यासाठी तो निमंत्रित करतो. मृतांना जमिनीवर तसेच सोडण्यात येणार ही गोष्ट ते जाहीरपणे अपमानकारकरित्या मरतील हे सुचविते. प्राचीन काळच्या इजबेलीप्रमाणे यांना सन्माननीय दफन मिळणार नाही. (२ राजे ९:३६, ३७) तेथे जी शवे पडतील त्यांची यादी या नाशाची पातळी कोठवर असणार ते दाखवते: राजे, लष्करी अधिकारी, बलवान माणसे, स्वतंत्र आणि दास. यात कोणताही अपवाद राहणार नाही. यहोवाविरुद्ध असणाऱ्‍या बंडखोर जगाचा सर्व मागमूस नाहीसा केला जाईल. यानंतर, गोंधळलेला व खवळलेला असा मानवजातीचा समुद्र राहणार नाही. (प्रकटीकरण २१:१) ही ‘देवाची सायंकाळची मोठी जेवणावळ’ आहे. कारण यामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः यहोवा पक्ष्यांना निमंत्रण देत आहे.

२२. शेवटल्या युद्धाचा सारांश योहान कसा देतो?

२२ या शेवटल्या युद्धाचा सारांश योहान अशाप्रकाराने देतो: “तेव्हा ते श्‍वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्‍वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाहि धरला गेला; त्याने श्‍वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्‍या लोकांस त्याच्यासमोर चिन्हे करून ठकविले होते. ह्‍या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले; बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली.”—प्रकटीकरण १९:१९-२१.

२३. (अ) ‘सर्वसत्ताधारी देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई’ “हर्मगिदोन” येथे कोणत्या अर्थाने लढविली जाते? (ब) ‘पृथ्वीतील राजांनी’ कोणता इशारा ऐकण्याकडे दुर्लक्ष केले आणि याचा काय परिणाम होणार?

२३ यहोवाच्या क्रोधाची सहावी वाटी ओतल्यावर योहानाने कळविले की, “पृथ्वीवरील राजे व संपूर्ण जगाला” दुरात्मिक प्रचाराखाली “सर्वसत्ताधारी देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकत्र” केले जाते. ही लढाई हर्मगिदोन येथे होते—हे खरे स्थळ नसून ती यहोवाच्या न्यायदंडाची पूर्तता करण्यासाठी असणारी जगव्याप्त परिस्थिती आहे. (प्रकटीकरण १६:१२, १४, १६) आता योहान युद्धाला सज्ज झालेले सैन्य बघतो. देवाविरुद्ध “पृथ्वीवरील सर्व राजे व त्यांची सैन्ये” एकत्र झाल्याचे तो बघतो. यांनी यहोवाच्या राजाच्या अधीन होण्याचे हेतुपुरस्सरपणे नाकारले आहे. त्या राजाने या प्रेरित संदेशाद्वारे त्यांना अशी पुरेशी ताकीद दिली होती: “[यहोवाने] रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून पुत्राचे चुंबन घ्या.” ख्रिस्ताच्या अधिकाराला अधीन न झाल्यामुळे त्यांना मरावे लागेल.—स्तोत्र २:१२, NW.

२४. (अ) श्‍वापद व खोटा संदेष्टा यांजवर कोणता दंड बजावला जातो आणि कोणत्या अर्थाने ते “जिवंत” आहेत? (ब) ‘अग्निसरोवर’ लाक्षणिक का असले पाहिजे?

२४ समुद्रातून येणारे सात डोकी व दहा शिंगे असणारे श्‍वापद सैतानाच्या राजकारणी संघटनेचे प्रतिनिधीत्व करते; तिची विस्मृति होईल व त्याबरोबर खोटा संदेष्टा म्हणजे सातवी जागतिक सत्ता ही देखील लयास जाईल. (प्रकटीकरण १३:१, ११-१३; १६:१३) ते “जिवंत” असतानाच किंवा देवाच्या पृथ्वीवरील लोकांविरुद्ध चाल करून जाण्यासाठी एकोपा करीत असतानाच यांना ‘अग्नीच्या सरोवरात’ टाकण्यात येईल. हे खरोखरचे अग्नीचे सरोवर आहे का? नाही; जसे श्‍वापद व खोटा संदेष्टा हे खरोखरचे प्राणी नाहीत, तसे हेही खरोखरीचे स्थळ नाही. उलटपक्षी, ते सरोवर, संपूर्ण व शेवटल्या नाशाचे द्योतक आहे, जेथून कधीही परत येणे नसणार. येथेच नंतर मरण व अधोलोक यांना तसेच स्वतः दियाबलाला टाकण्यात येते. (प्रकटीकरण २०:१०, १४) ती दुष्टांना सर्वकाळ यातना देण्याची अग्नीची भट्टी नाही, कारण अशाप्रकारच्या जागेची नुसती कल्पना देखील यहोवाला घृणित वाटते.—यिर्मया १९:५; ३२:३५; १ योहान ४:८, १६.

२५. (अ) कोण “घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले” जातात? (ब) या “मारले” जाणाऱ्‍यांपैकी कोणाचे पुनरुत्थान होऊ शकेल अशी आशा आपण बाळगावी का?

२५ जे सरकारचे थेटपणे भाग नव्हते, पण मानवजातीच्या भ्रष्ट जगात सुधारणा न होणारे असे आहेत असे सर्व “घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले” जातात. असे लोक मृत्युदंडाच्या लायकीचे आहेत असे येशू घोषित करील. यांच्या बाबतीत अग्निसरोवराचा उल्लेख नसल्यामुळे यांचे पुनरुत्थान होऊ शकेल अशी आपण आशा करू शकतो का? यहोवाच्या न्यायाधीशाद्वारे ज्यांचा संहार घडला आहे अशांचे पुनरुत्थान होईल असे कोठेही सांगण्यात आलेले नाही. येशूने स्वतः म्हटल्याप्रमाणे ‘मेंढरे’ नसणारे “सैतान व त्याचे दूत ह्‍यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे” त्यात जातील, म्हणजे अशांना “सार्वकालिक शिक्षा [विनाश]” मिळेल. (मत्तय २५:३३, ४१, ४६) याद्वारे “न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस” समाप्तीला येतो.—२ पेत्र ३:७; नहूम १:२, ७-९; मलाखी ४:१.

२६. हर्मगिदोनाचा कोणता परिणाम घडेल, हे थोडक्यात सांगा.

२६ अशाप्रकारे, सैतानाची पृथ्वीवरील सर्व संघटना समाप्तीला येते. राजकीय अधिपत्याचे “पहिले आकाश” सरते. तसेच, सैतानाने कित्येक शतके उभारलेली आणि शाश्‍वत वाटणारी व्यवस्था, ही “पृथ्वी” नष्ट होईल. यहोवाचा विरोध करणाऱ्‍या दुष्ट मानवजातीचा ‘समुद्र’ देखील राहणार नाही. (प्रकटीकरण २१:१; २ पेत्र ३:१०) पण यहोवाने सैतानासाठी काय राखून ठेवले आहे? ते योहान आम्हाला पुढे सांगतो.

[अभ्यासाचे प्रश्‍न]