व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ११

सांत्वन व बोध करणारी देवप्रेरित गीते

सांत्वन व बोध करणारी देवप्रेरित गीते

दावीद व देवाचे इतर सेवक यहोवाची उपासना व स्तुती करण्यासाठी भक्‍तिगीते रचतात. यांपैकी १५० भक्‍तिगीतांचे बोल स्तोत्रसंहिता या पुस्तकात जतन करण्यात आले आहेत

बायबलमधील सर्वात मोठे पुस्तक हे भक्‍तिगीतांचा एक संग्रह आहे. या पुस्तकातील स्तोत्रे जवळजवळ १,००० वर्षांच्या काळादरम्यान लिहिण्यात आली. स्तोत्रसंहिता नावाच्या या पुस्तकात, आजवरच्या इतिहासात यहोवाच्या सेवकांनी आपला विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी लिहिलेले सर्वात भावपूर्ण व अर्थपूर्ण शब्द वाचायला मिळतात. आनंद, स्तुती, कृतज्ञतेपासून दुःख, खेद व पश्‍चात्तापापर्यंत मानवी भावभावनांच्या कितीतरी छटा या स्तोत्रांतून झळकतात. ही स्तोत्रे रचणाऱ्‍यांचा देवासोबत भरवशाचा व अत्यंत घनिष्ठ असा नातेसंबंध होता हे त्यांच्या शब्दांवरून स्पष्ट दिसते. तर अशा या स्तोत्रांतून व्यक्‍त होणाऱ्‍या काही मुख्य विषयांचा येथे विचार करू या.

यहोवाच सबंध विश्‍वाचा सर्वोच्च अधिपती आहे, उपासना व स्तुती मिळण्यास तोच योग्य आहे. “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस,” असे स्तोत्र ८३:१८ (पं.र.भा.) येथे सांगितले आहे. बरीच स्तोत्रे यहोवाच्या निर्मितीकृत्यांबद्दल त्याची स्तुती करतात. उदाहरणार्थ तारकामय आकाश, पृथ्वीवरील विस्मयकारक जीवसृष्टी तसेच मानवी शरीराची अद्‌भुत घडण यांचा उल्लेख स्तोत्रांमध्ये आढळतो. (स्तोत्रे ८, १९, १३९, १४८) तर इतर स्तोत्रे देवाच्या एकनिष्ठ सेवकांचे तारण व संरक्षण करण्याच्या त्याच्या सामर्थ्याबद्दल त्याचे गौरव करतात. (स्तोत्रे १८, ९७, १३८) आणखी काही स्तोत्रे देवाच्या न्यायीपणाची प्रशंसा करतात आणि अत्याचार सहन करणाऱ्‍यांना मुक्‍त करणारा व दुष्टांना दंड देणारा देव म्हणून त्याची स्तुती करतात.—स्तोत्रे ११, ६८, १४६.

यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना तो साहाय्य करतो व त्यांचे सांत्वन करतो. २३ वे स्तोत्र हे बहुधा सर्वात सुप्रसिद्ध स्तोत्र असावे. यात दावीद यहोवाची तुलना आपल्या मेंढरांचे मार्गदर्शन, संरक्षण व संभाळ करणाऱ्‍या प्रेमळ मेंढपाळाशी करतो. स्तोत्र ६५:२ यहोवाच्या उपासकांना याची आठवण करून देते की तो ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे. ज्यांच्या हातून गंभीर पाप घडले आहे अशा अनेकांना ३९५१ वे स्तोत्र अतिशय सांत्वनदायक वाटते. या स्तोत्रांत दावीद आपल्या हातून घडलेल्या घोर पापांबद्दल पश्‍चात्ताप व्यक्‍त करतो. स्तोत्र ५५:२२ यहोवावर भरवसा ठेवण्याचे व सर्व चिंतांचा भार त्याच्यावर टाकण्याचे प्रोत्साहन देते.

मशीहाच्या राज्याद्वारे यहोवा सध्याच्या जगाचा कायापालट करेल. स्तोत्रांतील बरेच उतारे भविष्यात येणाऱ्‍या राजाविषयी म्हणजे मशीहाविषयी सांगतात. २ ऱ्‍या स्तोत्रात अशी भविष्यवाणी केली आहे की हा राजा त्याचा विरोध करणाऱ्‍या दुष्ट राष्ट्रांचा नाश करेल. तसेच तो उपासमार, अन्याय व अत्याचार या गोष्टींचा अंत करेल असे ७२ वे स्तोत्र सांगते. स्तोत्र ४६:९ यानुसार देव मशीहाच्या राज्याद्वारे लढायांचा अंत करून त्यांत वापरली जाणारी सर्व शस्त्रास्त्रे नष्ट करेल. स्तोत्र ३७ यात असे सांगितले आहे की दुष्ट लोकांचे नामोनिशाण राहणार नाही. पण, खऱ्‍या देवाला भिऊन वागणारे लोक मात्र पृथ्वीवर सर्वकाळ राहतील आणि सबंध जगात शांती व ऐक्य नांदेल.

स्तोत्रसंहिता या पुस्तकावर आधारित.