व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय अकरा

आज इतकं दुःख का आहे?

आज इतकं दुःख का आहे?

१, २. बहुतेक लोकांच्या मनात कोणता प्रश्न येतो?

एका सुनामीत एक अख्खं गाव नष्ट होतं. एक बंदूकधारी मनुष्य सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करतो आणि त्यात असंख्य लोक घायाळ होतात आणि मरतात. कॅन्सरमुळे एका आईचा मृत्यू होतो. तिच्यामागे तिची पाच मुलं एकटी पडतात.

अशा प्रकारची संकटं किंवा दुःखद प्रसंग घडतात तेव्हा बहुतेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो. “हे असं का झालं?” जगात इतकं दुःख, इतका द्वेष का आहे? तुमच्याही मनात कधी असा प्रश्न येतो का?

३, ४. (क) हबक्कूकने यहोवाला कोणते प्रश्न विचारले? (ख) यहोवाने त्याला काय उत्तर दिलं?

आपण बायबलमधून शिकतो की देवावर दृढ विश्वास असलेल्या लोकांच्या मनातसुद्धा असे प्रश्न आले. जसं की, हबक्कूक या यहोवाच्या संदेष्ट्याने त्याला विचारलं: “मला अधर्म का पाहावयास लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.”—हबक्कूक १:३.

हबक्कूक २:२, ३ या वचनांमध्ये आपण यहोवाने त्याला दिलेल्या उत्तराबद्दल वाचतो. तसंच, यहोवाने हेही वचन दिलं, की तो लवकरच परिस्थिती सुधारणार आहे. यहोवाचं लोकांवर खूप प्रेम आहे. “त्याला तुमची काळजी आहे,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (१ पेत्र ५:७) जगातलं दुःख पाहून आपल्यापेक्षा त्याला जास्त वाईट वाटतं. (यशया ५५:८, ९) पण मग त्याने या जगात इतकं दुःख का राहू दिलं आहे, या प्रश्‍नावर आपण चर्चा करू या.

जगात इतकं दुःख का आहे?

५. जगात असलेल्या दुःखाबद्दल अनेक धार्मिक पुढारी काय शिकवतात? पण बायबलमध्ये काय शिकवण दिली आहे?

पाळक, पुजारी आणि धार्मिक पुढारी सहसा शिकवतात की लोकांनी दुःख भोगावं अशी देवाची इच्छा आहे. तर बाकीचे लोक म्हणतात, की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जे काही बरं-वाईट होतं ते देवाने आधीच तिच्या नशिबात लिहिलेलं असतं आणि त्याने ते का लिहिलं त्यामागचं कारण आपण कधीच समजू शकणार नाही. काही जण असंही म्हणतात की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो म्हणजे अगदी लहान मुलांचाही तेव्हा ते स्वर्गात जातात कारण देवाला ते हवे असतात. पण या सर्व शिकवणी खोट्या आहेत. यहोवा कधीच अशा वाईट गोष्टी घडवून आणत नाही. “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे.—ईयोब ३४:१०.

६. जगात असलेल्या दुःखांबद्दल अनेक लोक देवाला जबाबदार का ठरवतात?

जगात असलेल्या दुःखांबद्दल अनेक लोक देवालाच जबाबदार ठरवतात. कारण, जगावर देवाचं नियंत्रण आहे, असा ते विचार करतात. पण ३ ऱ्या अध्यायात आपण शिकलो, की या जगाचा खरा शासक दियाबल सैतान आहे.

७, ८. जगात असलेल्या दुःखांची कोणती कारणं आहेत?

बायबलमध्ये म्हटलं आहे: “सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहान ५:१९) या वचनात सांगितल्याप्रमाणे जगावर राज्य करणारा सैतान खरोखरच खूप दुष्ट आणि क्रूर आहे. तो “सबंध पृथ्वीवरील लोकांना” फसवत आहे. (प्रकटीकरण १२:९) आणि जगातले बहुतेक लोक त्याच्याप्रमाणेच वागतात. या कारणामुळे जगात आपल्याला इतका खोटेपणा, द्वेष आणि क्रूरता पाहायला मिळते.

जगात असलेल्या दुःखांची इतरही कारणं आहेत. आदाम व हव्वा यांनी देवाविरुद्ध बंड केल्यानंतर ते पापी झाले आणि त्यांच्यामुळे त्यांची मुलंही पापी झाली. पापी असल्यामुळे लोक इतरांना त्रास देतात, त्यांची हानी करतात. त्यांना इतरांपेक्षा वरचढ व्हायचं असतं. ते एकमेकांबरोबर लढतात, युद्धात भाग घेतात, दुसऱ्यांवर दादागिरी करतात. (उपदेशक ४:१; ८:९) शिवाय, सर्वांवर “समय व प्रसंग” येतात, त्यामुळेही त्यांना दुःखाचा सामना करावा लागतो. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) म्हणजे लोक जेव्हा चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असतात तेव्हा अपघात किंवा वाईट गोष्टी घडतात.

९. देवाने दुःख राहू दिलं यामागे योग्य कारण असावं, अशी आपण खातरी का बाळगू शकतो?

जगातली दुःखं, यहोवामुळे नाहीत. युद्ध, गुन्हेगारी किंवा लोकांबरोबर होणाऱ्या गैरवागणुकीसाठी आपण यहोवाला दोष देऊ शकत नाही. तो भूकंप, वादळं किंवा पूर यांसारखी संकटं आणत नाही. मग तुमच्या मनात प्रश्न येईल, की ‘यहोवा जर सर्वात शक्तिशाली आहे, तर तो या वाईट गोष्टी घडण्यापासून थांबवत का नाही?’ आपण याआधी शिकलो, की देवाला आपली खूप काळजी आहे आणि जर त्याने दुःख राहू दिलं आहे, तर त्यामागे नक्कीच योग्य कारण असेल.—१ योहान ४:८.

यहोवाने दुःख का राहू दिलं?

१०. सैतानाने यहोवावर कोणता आरोप लावला?

१० एदेन बागेत सैतानाने आदाम व हव्वा यांना फसवलं. यहोवा देव वाईट शासक आहे, असा आरोप त्याने यहोवावर लावला. त्याने असाही दावा केला, की यहोवा, आदाम आणि हव्वा यांच्यापासून चांगली गोष्ट राखून ठेवत आहे. सैतानाची इच्छा होती की आदाम आणि हव्वा यांनी असा विश्वास करावा की त्यांना यहोवाची गरज नाही आणि जर त्यांनी यहोवाऐवजी त्याला शासक म्हणून निवडलं तर ते सुखी होतील.—उत्पत्ति ३:२-५; अंत्यटीप २७ पाहा.

११. कोणत्या प्रश्‍नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे?

११ आदाम व हव्वा यांनी यहोवाच्या आज्ञेचं पालन करण्याऐवजी सैतानाचं ऐकलं आणि यहोवाविरुद्ध बंड केलं. बरोबर आणि चूक काय हे ठरवण्याचा अधिकार आपल्यालाच आहे, असा त्यांनी विचार केला. मग, यहोवा हे कसं सिद्ध करणार होता की या बंडखोरांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे आणि मानवांसाठी काय योग्य आहे हे फक्त तोच जाणतो?

१२, १३. (क) यहोवाने आदाम व हव्वा यांचा लगेच नाश का केला नाही? (ख) यहोवाने सैतानाला या जगाचा शासक बनण्याची व मानवांना स्वतःवर राज्य करू देण्याची परवानगी का दिली?

१२ बंडाळी नंतर यहोवाने आदाम व हव्वा यांचा लगेच नाश केला नाही. त्याने त्यांना मुलं होऊ दिली. यहोवाने या मुलांना हे ठरवण्याचा हक्क दिला, की त्यांना शासक म्हणून कोण हवं आहे? संपूर्ण पृथ्वी परिपूर्ण मानवांनी भरावी, असा यहोवाचा संकल्प होता. सैतानाने लाख प्रयत्न केले तरी, यहोवाचा संकल्प पूर्ण होणार होता.—उत्पत्ति १:२८; यशया ५५:१०, ११.

१३ सैतानाने असंख्य देवदूतांसमोर यहोवावर आरोप लावले होते. (ईयोब ३८:७; प्रकटीकरण ५:११) त्यामुळे त्याचे आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करून दाखवण्यासाठी यहोवाने सैतानाला वेळ दिला. सैतानाच्या अधिकाराखाली मानवी सरकारे स्थापन करण्यासही त्याने परवानगी दिली. यावरून सिद्ध होणार होतं, की देवाच्या मदतीशिवाय मानव आणि सैतान यशस्वी रीत्या राज्य करू शकतात किंवा नाही.

१४. यहोवाने सैतानाला व मानवांना वेळ दिल्यामुळे काय सिद्ध झालं आहे?

१४ हजारो वर्षांपासून मानव राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत आणि सैतान खोटा आहे हे सिद्ध झालं आहे. मानवांना खरोखरच देवाच्या मदतीची गरज आहे. संदेष्टा यिर्मयाने जे म्हटलं ते अगदी योग्यच होतं. त्याने म्हटलं: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

पण यहोवा इतका वेळ का थांबला आहे?

१५, १६. (क) यहोवा इतका वेळ का थांबला आहे? (ख) सैतानामुळे निर्माण झालेल्या समस्या यहोवाने का सोडवल्या नाहीत?

१५ पण यहोवा इतका वेळ का थांबला आहे? वाईट गोष्टी घडण्याचं तो थांबवत का नाही? सैतानाचं राज्य पूर्णपणे अयशस्वी ठरेल, हे सिद्ध होण्यासाठी वेळ लागणार होता. या दरम्यान, मानवांनी वेगवेगळी सरकारे स्थापन करून पाहिली आणि ते प्रत्येक वेळा अपयशी ठरले. आज जरी त्यांनी विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत बरीच प्रगती केली असली, तरी अन्याय, गरिबी, गुन्हेगारी आणि युद्ध यांचं प्रमाण आज पूर्वीपेक्षा फार वाढलं आहे. यावरून हेच सिद्ध होतं, की मानव स्वतःवर राज्य करू शकत नाहीत.

१६ पण, सैतानामुळे निर्माण झालेल्या समस्या यहोवाने सोडवल्या नाहीत. कारण असं केल्यामुळे त्याचा सैतानाच्या राज्याला पाठिंबा आहे, असा याचा अर्थ झाला असता; आणि यहोवा सैतानाच्या राज्याला कधीच पाठिंबा देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, जर यहोवाने समस्या सोडवल्या असत्या तर मानव यशस्वीपणे स्वतःवर राज्य करू शकतात हा सैतानाचा दावा खरा आहे, असं मानवांना वाटलं असतं. पण ते खोटं असल्यामुळे तो कधीच या गोष्टीला सहकार्य देणार नाही. कारण तो स्वतः कधी खोटं बोलत नाही.—इब्री लोकांना ६:१८.

१७, १८. सैतानामुळे झालेली हानी यहोवा कशी भरून काढणार आहे?

१७ सैतान आणि मानव यांच्या बंडाळीमुळे झालेली सर्व हानी यहोवा पुन्हा भरून काढू शकतो का? नक्कीच काढू शकतो! कारण त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. सैतानाने लावलेल्या आरोपांचं पूर्णपणे उत्तर केव्हा दिलं जाईल हे यहोवाला माहीत आहे. त्यानंतर त्याच्या संकल्पाप्रमाणे तो या पृथ्वीला नंदनवन बनवणार आहे. मग “स्मारक कबरींमध्ये असलेले सर्व जण” पुन्हा जिवंत केले जातील. (योहान ५:२८, २९) यानंतर कोणी आजारी पडून मरणार नाही. सैतानाने केलेली सर्व हानी भरून काढण्यासाठी यहोवा येशूचा उपयोग करणार आहे. येशू “सैतानाची कार्ये उद्ध्वस्त” करेल. (१ योहान ३:८) पण आतापर्यंत यहोवाने धीर धरल्यामुळे आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. कारण यामुळेच आपल्याला त्याची ओळख झाली आणि आपला शासक म्हणून आपण त्याची निवड करू शकलो. (२ पेत्र ३:९, १० वाचा.) तेव्हा आज जरी आपल्याला दुःख सोसावं लागलं तरी यहोवा आपल्याला ते सहन करण्याची शक्ती देतो.—योहान ४:२३; १ करिंथकर १०:१३ वाचा.

१८ यहोवाला आपला शासक म्हणून निवडण्याची तो आपल्यावर कधीच जबरदस्ती करत नाही. त्याने मानवांना इच्छा स्वातंत्र्याची देणगी दिली आहे. या देणगीचा आपल्याला काय फायदा होतो, त्याची आता आपण चर्चा करू या.

तुम्ही तुमच्या इच्छा स्वातंत्र्याचा उपयोग कसा कराल?

१९. यहोवाने आपल्या सर्वांना कोणती सुंदर देणगी दिली आहे? या देणगीबद्दल आपण त्याचे आभार का मानले पाहिजेत?

१९ यहोवाने मानवांना इच्छा स्वातंत्र्याची सुंदर देणगी दिली आहे. या देणगीमुळे आपण प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो. प्राण्यांना यहोवाने उपजत बुद्धी दिली आहे. म्हणजे प्राणी त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतात. (नीतिसूत्रे ३०:२४-२८) पण मानवांचं तसं नाही. मानवांना देवाने विचार करण्याचं, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे आपण जीवन कसं जगायचं, यहोवाला संतुष्ट करायचं की नाही हे मानव स्वतः ठरवू शकतात. शिवाय आपण रोबोटसारखे देखील नाही. त्यांना ज्या कामासाठी बनवलं जातं ते फक्त तेच काम करतात. पण आपण कोणाबरोबर मैत्री करायची, जीवन कसं जगायचं हे ठरवू शकतो. आपण जीवनात आनंदी असावं अशी यहोवाची इच्छा आहे.

२०, २१. तुम्ही आता कोणता उत्तम निर्णय घेऊ शकता?

२० यहोवाची इच्छा आहे, की आपणसुद्धा त्याच्यावर प्रेम करावं. (मत्तय २२:३७, ३८) एक मूल स्वतःहून जेव्हा आपल्या वडिलांना म्हणतं की “पप्पा, मला तुम्ही खूप आवडता,” तेव्हा त्याच्या वडिलांना आनंद होतो. कारण ते मूल असं कोणाच्या सांगण्यावरून नाही तर मनापासून म्हणत असतं. आपणसुद्धा यहोवावर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्यालाही असाच आनंद होतो. सैतानाने व आदाम आणि हव्वा यांनी यहोवाला नाकारलं. त्याची सेवा करायची किंवा नाही हे निवडण्याचं स्वातंत्र्य त्याने आपल्याला दिलं आहे. तुम्हाला मिळालेल्या इच्छा स्वातंत्र्याच्या देणगीचा तुम्ही कसा वापर कराल?

२१ यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या इच्छा स्वातंत्र्याचा उपयोग करा. लाखो लोकांनी, सैतानाला नाकारून यहोवाला संतुष्ट करण्याची निवड केली आहे. (नीतिसूत्रे २७:११) दुःख नसलेल्या देवाच्या नवीन जगात जाण्याकरता तुम्ही आत्ता काय करू शकता? पुढच्या अध्यायात आपल्याला याचं उत्तर मिळेल.