बायबल कथांचं माझं पुस्तक
बायबलमधल्या ११६ कथा जाणून घ्या. त्या अचूक, समजायला सोप्या आहेत आणि त्यात सुंदर चित्रही आहेत.
प्रस्तावना
जगातल्या सर्वात महान पुस्तकातून, बायबलमधून घेतलेल्या सत्य कथा, निर्मितीपासून सुरू झालेला मानवांचा इतिहास सांगतात.
भाग १
निर्मिती ते जलप्रलय
कथा १
देव वस्तू घडवू लागतो
उत्पत्ती पुस्तकातली निर्मितीची गोष्ट अद्भूत आणि समजायला सोपी आहे—अगदी लहान मुलंसाठीसुद्धा.
कथा २
एक सुंदर बाग
उत्पत्तीमध्ये सांगितलं आहे, की देवाने एका खास जागी एदेन बाग बनवली होती. सर्व पृथ्वी, या सुंदर बागेसारखी व्हावी अशी देवाची इच्छा होती.
कथा ३
पहिले स्त्री-पुरुष
देवाने आदाम आणि हव्वाला बनवलं आणि एदेनच्या बागेत ठेवलं. हे पहिलं विवाहित जोडपं होतं.
कथा ४
त्यांनी आपलं घर का गमावलं
मानवांनी मूळ परादीस कसं गमावलं हे उत्पत्ती या बायबलच्या पुस्तकात वाचायला मिळते.
कथा ५
खडतर जीवनाची सुरुवात होते
एदेन बागेच्या बाहेर आदाम आणि हव्वाला खूप समस्यांचा सामना करावा लागला. जर त्यांनी देवाचा आज्ञा मानली असती तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं जीवन आनंदी झालं असतं.
कथा ६
एक चांगला आणि एक वाईट मुलगा
उत्पत्तीमधली काईन आणि हाबेलची गोष्ट आपण कशा प्रकारची व्यक्ती असणं गरजेचं आहे आणि उशीर होण्याआधी आपण कोणती मनोवृत्ती बदलली पाहिजे हे शिकवते.
कथा ७
एक धाडसी माणूस
हनोखचं उदाहरण हे दाखवून देतं की तुमच्या सभोवती असलेली माणसं जरी वाईट वागत असली तरी तुम्ही योग्य ते करू शकता.
कथा ८
पृथ्वीवरचे राक्षस
उत्पत्तीच्या ६ व्या अध्यायात सांगितलं आहे की लोकांना त्रास देणारे राक्षस पृथ्वीवर होते. त्यांना नेफिलीम म्हटलं जायचं. ते स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानव बनून राहायला आलेल्या देवदूतांची मुलं होते.
कथा ९
नोहा तारु बांधतो
जरी इतरांनी ऐकलं नाही तरी नोहा आणि त्याच्या कुटुंबानं देवाच्या आज्ञांचं पालन केलं आणि म्हणून जलप्रलयातून ते बचावले.
कथा १०
जलप्रलय
नोहा देत असलेला इशारा ऐकून लोक हसले. पण स्वर्गातून जलप्रलयाचं पाणी पडायला लागलं तेव्हा त्यांचं हसू पळालं! नोहाच्या तारूमुळे नोहाचा, त्याच्या कुटुंबाचा आणि अनेक प्राण्यांचा जीव कसा वाचला ते पाहा.
कथा १२
माणसं एक मोठा बुरुज बांधतात
देवाला माणवांनी केलेली गोष्ट आवडली नाही म्हणून त्याने शिक्षा दिली आणि तिचा परिणाम आजही लोकांवर आहे.
कथा १३
अब्राहाम—देवाचा मित्र
अब्राहाम आपलं चांगलं आणि आरामदायक घर सोडून तंबूमध्ये कायमचं राहायला का गेला?
कथा १४
देव अब्राहामाच्या विश्वासाची परीक्षा घेतो
देवाने अब्राहामला इसहाकचा बळी द्यायला का सांगितलं?
कथा १५
लोटाच्या बायकोनं मागं पाहिलं
तिने जे केलं त्यापासून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो.
कथा १६
इसहाकाला चांगली बायको मिळते
रिबेका एक चांगली पत्नी कशामुळे बनली? तिच्या सुंदरतेमुळे की इतर कोणत्या गोष्टीमुळे?
कथा १७
भिन्न असलेले जुळे भाऊ
त्यांचा वडील इसहाक याचं एसाववर खूप प्रेम होतं पण आईला म्हणजे रिबकेला मात्र याकोब आवडायचा.
कथा १९
याकोबाचं मोठं कुटुंब
इस्राएलच्या १२ वंशाची नावं याकोबच्या १२ मुलांच्या नावावरून पडली आहेत का?
कथा २१
योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात
आपल्या भावाला ठार मारण्याची इच्छा त्यांच्यापैकी काहींना का झाली असावी?
कथा २२
योसेफाला तुरुंगात टाकलं जातं
योसेफने नियम मोडला म्हणून नाही तर त्याने योग्य ते केलं म्हणून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं.
कथा २४
योसेफ त्याच्या भावांची परीक्षा घेतो
योसेफच्या भावांनी त्याला विकलं होतं. पण त्याचे भाऊ आता बदललेत हे त्याला कसं कळणार होतं?
कथा २५
कुटुंब इजिप्तला स्थलांतर करतं
याकोबाच्या कुटुंबातल्या सदस्यांना याकोबी लोक म्हणण्याऐवजी इस्राएली लोक का म्हटलं जातं?
कथा २६
ईयोब देवाशी प्रामाणिक राहतो
ईयोब त्याची संपत्ती, मुलं, आरोग्य गमावतो. पण देव त्याला खरंच शिक्षा देत होता का?
कथा २७
एक दुष्ट राजा इजिप्तवर राज्य करतो
फारोने त्याच्या लोकांना सर्व इस्राएली तान्ह्या मुलांना मारून टाकायला का सांगितलं?
कथा २८
तान्हा मोशे कसा वाचला
इस्राएली मुलांना ठार मारण्याची आज्ञा देण्यात आली होती पण मोशेच्या आईने त्याला जिवंत ठेवायचा मार्ग शोधून काढला.
कथा २९
मोशे का पळून गेला
४० वर्षांच्या मोशेला वाटलं, की आपण इस्राएली लोकांना वाचवण्यासाठी तयार आहोत. पण तो तयार नव्हता.
कथा ३०
जळणारं झुडूप
एका नंतर एक चमत्कार करून देव मोशेला सांगतो की इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्याची वेळ आता झाली आहे.
कथा ३२
दहा पीडा
इजिप्तचा राजा फारो हट्टीपणे इस्राएली लोकांना जाऊ द्यायला नकार देतो म्हणून देव इजिप्तवर दहा पीडा आणतो.
कथा ३३
तांबडा समुद्र ओलांडणं
देवाकडून मिळालेल्या शक्तीमुळे मोशे तांबड्या समुद्राचे दोन भाग करतो. इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र ओलांडतात.
कथा ३६
सोन्याचं वासरू
कानातली सोन्याची कुंडलं वितळवून बनवलेल्या पुतळ्याची लोकांना उपासना का करायची आहे?
कथा ३८
बारा हेर
दहा हेर एक सांगत होते तर बाकीचे दोन हेर वेगळं काहीतरी! मग इस्राएली लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा होता?
कथा ३९
अहरोनाची काठी फुलांनी बहरते
एका रात्रीत निर्जीव लाकडाच्या काठीला फुलं आणि पिकलेली फळं कशी काय येऊ शकतात बरं?
कथा ४८
शहाणे गिबोनकर
ते यहोशवा आणि इस्राएली लोकांना फसवून वचन द्यायला लावतात, पण इस्राएली लोक दिलेलं वचन पाळतात का?
कथा ४९
सूर्य स्थिर होतो
देव यहोशवासाठी असं काहीतरी करतो जे त्याने आधी कधीच केलं नव्हतं आणि पुढेही कधी केलं नाही.
कथा ५२
गिदोन आणि त्याची ३०० माणसं
पाणी पिण्याच्या बाबतीत एक वेगळ्याच प्रकारची परीक्षा घेऊन देव या छोट्या सैन्यासाठी लढाऊ माणसं निवडतो.
कथा ५३
इफ्ताहाचा नवस
त्याने यहोवाला केलेल्या नवसाचा त्याच्यावरच नाही तर त्याच्या मुलीवरही परिणाम झाला.
कथा ५५
लहान मुलगा यहोवाची सेवा करतो
महायाजक एलीला एक वाईट बातमी सांगण्यासाठी यहोवा लहान शमुवेलचा वापर करतो
कथा ५६
शौल—इस्राएलचा पहिला राजा
शौलला आधी देवाने निवडलं पण नंतर देवानेच त्याला सोडून दिलं. यावरून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकू शकतो.
कथा ५७
देव दावीदची निवड करतो
यहोवाने दावीदमध्ये असं काय पाहिलं, जे शमुवेल संदेष्ट्याने पाहिलं नव्हतं?
कथा ५८
दावीद आणि गल्याथ
दावीद गल्याथाशी फक्त आपल्या गोफणीच्या जोरावर नाही तर त्याहून कितीतरी पटीने शक्तिशाली हत्यारासोबत लढला.
कथा ५९
दावीदला का निसटलं पाहिजे
शौल आधी दावीदवर खूप खूश असतो. पण असं काय झालं की ज्यामुळे नंतर त्याला त्याचा इतका हेवा वाटतो की तो त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो?
कथा ६०
अबीगईल आणि दावीद
अबीगईल आपला नवरा मूर्ख असल्याचं सांगते आणि त्यामुळे तात्पुरतं का असेना पण तिच्या नवऱ्याचा जीव वाचतो.
कथा ६१
दाविदला राजा करतात
दावीदने ज्या गोष्टी केल्या आणि ज्या गोष्टी करण्यापासून त्याने स्वतःला आवरलं, त्यावरून त्याने दाखवून दिलं की इस्राएलचा राजा बनण्यासाठी तो योग्य आहे.
कथा ६२
दाविदाच्या घराण्यात संकटं
दावीदच्या फक्त एका चुकीमुळे त्याला आणि त्याच्या घराण्याला बरीच वर्षं संकटं सोसावी लागतात.
कथा ६४
शलमोन मंदिर बांधतो
अतिशय बुद्धिमान असूनही, शलमोनला मूर्खपणाचं आणि चुकीचं काम करण्यासाठी भाग पाडलं जातं.
कथा ६५
राज्य विभागलं जातं
यराबाम राज्य करायला सुरवात करताच लोकांना देवाचे नियम मोडायला प्रवृत्त करतो.
कथा ६७
यहोशाफाट यहोवावर भरवसा ठेवतो
एक सैन्य आपल्या पुढे कोणतंही हत्यार सोबत न घेतलेल्या गायकांना घेऊन लढाईला का जाईल बरं?
कथा ६८
पुन्हा जिवंत झालेले दोन मुलगे
मेलेल्या एका व्यक्तीला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं का? हो असं घडलंय आधी!
कथा ७२
देव हिज्कीया राजाला मदत करतो
एक स्वर्गदूत फक्त एका रात्रीत १,८५,००० अश्शूरी सैनिकांना ठार मारतो.
कथा ७४
एक निडर माणूस
आपण अजून संदेष्टा बनण्याइतकं मोठं झालेलो नाही, असं यिर्मयाला वाटतं. पण देवाला माहीत आहे की तो संदेष्ट्याचं काम करू शकतो.
कथा ७६
जेरूसलेमचा नाश होतो
देवाने इस्राएली लोकांचे शत्रू असणाऱ्या बॅबिलोनी लोकांना जेरूसलेमचा नाश का करू दिला?
कथा ७९
सिंहांच्या गुहेत दानीएल
दानीएलला मृत्यूदंडाची शिक्षा मिळते. पण ही शिक्षा मिळण्यापासून स्वतःला वाचवणं त्याच्या हातात होतं का?
कथा ८०
देवाचे लोक बॅबिलोन सोडतात
पर्शियाच्या राजाने बॅबिलोन काबीज केलं तेव्हा एक भविष्यवाणी पूर्ण झाली, आणि आता आणखी एक पूर्ण होईल.
कथा ८१
देवाच्या मदतीवर भिस्त ठेवणं
इस्राएली माणसाचा नियम मोडून देवाची आज्ञा पाळतात. मग देव त्यांना आशीर्वाद देईल का?
कथा ८२
मर्दखय आणि एस्तेर
वश्ती राणी दिसायला सुंदर होती पण तरीही अहश्वेरोश राजाने तिच्या जागी एस्तेरला आपली नवीन राणी म्हणून निवडलं. पण का?
कथा ८३
जेरूसलेमच्या वेशी
भिंतीचं बांधकाम चालू असताना मग तो दिवस असो किंवा रात्र, इस्राएली लोकांना आपले भाले आणि तलवारी नेहमी सोबत ठेवायच्या होत्या.
कथा ८४
देवदूत मरीयेला भेट देतो
तो देवाकडून एक संदेश आणतो: मरीयेला एक मुलगा होईल आणि तो सदासर्वकाळ राज्य करेल.
कथा ८६
ताऱ्यानं वाट दाखवलेली माणसं
येशूला शोधण्यासाठी मागी लोकांना कोणी मदत केली? ऐकून कदाचित थक्क व्हाल.
कथा ८८
योहान येशूला बाप्तिस्मा देतो
योहान पापी लोकांना बाप्तिस्मा द्यायचा, पण त्यांच्यासारखं येशूने कधीही पाप केलं नव्हतं. तरीही योहानने त्याला बाप्तिस्मा का दिला?
कथा ९०
स्त्री सोबत विहिरीपाशी
येशू देत असलेलं पाणी प्यायल्यावर तिला कधीच तहान लागणार नव्हती याचा काय अर्थ होतो?
कथा ९२
येशू मेलेल्यांना उठवतो
देवाच्या मदतीने येशू याईरच्या मुलीला फक्त ‘ऊठ!’ म्हणतो आणि तिचं पुनरूत्थान होतं.
कथा ९३
येशू अनेक लोकांना जेवू घालतो
चमत्कार करून हजारो लोकांना जेवण देऊन, येशूने कोणती महत्त्वाची गोष्ट सिद्ध केली?
कथा ९४
तो लहान मुलांवर प्रेम करतो
येशू त्याच्या प्रेषितांना सांगतो की आपण मुलांकडून बरंच काही शिकू शकतो.
कथा ९५
येशूची शिकवण्याची पद्धत
येशू सहसा उदाहरणं देऊन शिकवायचा. दयाळू शोमरोनी माणसाची गोष्ट ही येशूने वापरलेल्या बऱ्याच उदाहरणांपैकी एक आहे
कथा ९८
जैतुनांच्या डोंगरावर
येशू आपल्या चार प्रेषितांना भविष्यात घडणाऱ्या अशा घटनांबद्दल सांगतो ज्या आज आपल्या दिवसात पूर्ण होत आहेत.
कथा १०२
येशू जिवंत आहे
स्वर्गदूताने कबरेच्या दारावर लावलेला मोठा दगड बाजूला केला तेव्हा पहारा देणाऱ्या सैनिकांना जे दिसलं त्यामुळे त्यांना धक्का बसला.
कथा १०५
जेरूसलेममध्ये वाट पाहणं
पेंटेकॉस्टच्या दिवशी येशू आपल्या शिष्यांवर देवाचा पवित्र आत्मा का ओततो?
कथा १०६
तुरुंगातून सुटका
यहुदी धार्मिक नेते प्रेषितांचं काम थांबवण्यासाठी त्यांना तुरूंगात टाकतात. देव हे घडू देतो, कारण यामागे देवाचा एक उद्देश होता.
कथा १०९
पेत्र कर्नेल्याला भेट देतो
देव कोणत्याही राष्ट्राला किंवा जातीला दुसऱ्या राष्ट्र किंवा जातीपेक्षा उच्च समजतो का?
कथा १११
झोपी गेलेला मुलगा
पौलने पहिलं भाषण दिलं तेव्हा युतुखला झोप लागली पण दुसऱ्या भाषणाला नाही. या दोन्ही भाषणांच्या मधल्या काळात जे घडलं ते चमत्कारापेक्षा काही कमी नव्हतं.
कथा ११२
जहाज फुटून बेटाला लागणं
जगण्याची कोणतीच आशा दिसत नसताना देव स्वर्गदूताद्वारे एक संदेश देतो आणि पौलला धीर मिळतो.
कथा ११४
सर्व दुष्टपणाचा शेवट
हर्मगिदोनचं युद्ध लढण्यासाठी देवाने येशूला स्वर्गातलं सैन्य घेऊन का पाठवलं?
कथा ११५
पृथ्वीवर एक नवं परादीस
एके काळी लोक पृथ्वीवरच्या परादीसमध्ये राहीले होते, आणि भविष्यातही राहतील.
कथा ११६
आपल्याला अनंतकाळ कसं जगता येईल
यहोवा आणि येशूबद्दल माहिती घेणंच पुरेसं आहे का? नाही. मग आपण आणखी काय करणं गरजेचं आहे?
बायबल कथांचं माझं पुस्तक अभ्यासासाठी प्रश्न
बायबल कथांमधून मुलांना जास्तीत जास्त शिकता यावं म्हणून प्रत्येक कथेवर आधारित काही प्रश्न आणि वचनं देण्यात आली आहेत.