व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रस्तावना

प्रस्तावना

हे सत्य कथांचं पुस्तक आहे. जगातल्या सर्वश्रेष्ठ पुस्तकातून, बायबलमधून, त्या घेतलेल्या आहेत. देवानं निर्मितीची सुरवात केली तेव्हापासून, थेट आपल्या काळापर्यंतचा इतिहास, या कथांमध्ये आहे. एवढंच काय, भविष्यात जे करण्याचं वचन देव देतो, तेही त्या सांगतात.

बायबल कशाबद्दल आहे, याची कल्पना हे पुस्तक तुम्हाला देतं. बायबलमधले लोक आणि त्यांनी केलेल्या कामांबद्दल ते सांगतं. त्या शिवाय, देवानं मानवांना दिलेल्या, परादीस पृथ्वीवरल्या अनंत जीवनाच्या उदात्त आशेबद्दलही ते सांगतं.

ह्‍या पुस्तकात ११६ कथा आहेत. त्यांचे आठ भाग केलेले आहेत. प्रत्येक भागाच्या सुरवातीला एका पानावर, त्या भागातला मजकूर थोडक्यात सांगितला आहे. इतिहासातल्या घटनांच्या क्रमानं कथा आल्या आहेत. त्यामुळे, इतर घटनांच्या संदर्भात इतिहासामध्ये गोष्टी कधी घडल्या, हे कळायला तुम्हाला मदत होते.

या कथा सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. मुलांनो, तुमच्यातल्या अनेकांना स्वतःहून त्या वाचता येऊ शकतील. पालकांनो, तुमच्या लहानग्या मुलांना, त्या पुनः-पुन्हा वाचून दाखवलेल्या आवडतील, असं तुम्हाला आढळेल. लहान नि थोर अशा दोघांनाही आवडेल असं बरंच काही या पुस्तकात असल्याचं तुम्हाला दिसून येईल.

प्रत्येक कथेच्या शेवटी बायबलमधली शास्त्रवचनं दिलेली आहेत. ज्यांच्यावर त्या आधारल्या आहेत, ते बायबलचे भाग जरुर वाचा.