व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १

देव वस्तू घडवू लागतो

देव वस्तू घडवू लागतो

आपल्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या वस्तू देवापासून आहेत. आपल्याला दिवसा प्रकाश देण्यासाठी त्यानं सूर्य बनवला, आणि रात्रीही थोडाबहुत प्रकाश मिळावा म्हणून चंद्र व तारे बनवले. आणि आपल्याला राहण्याकरता देवानं पृथ्वी बनवली.

परंतु चंद्र, सूर्य, तारे आणि पृथ्वी, या देवानं बनवलेल्या पहिल्या वस्तू नव्हेत. पहिली गोष्ट कोणती होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का? देवानं प्रथम आपल्यासारख्याच व्यक्‍ती बनवल्या. जसं आपण देवाला पाहू शकत नाही, तसंच आपण त्या व्यक्‍तींनाही पाहू शकत नाही. बायबलमध्ये त्या व्यक्‍तींना देवदूत म्हटलं आहे. स्वतःबरोबर स्वर्गात राहण्यासाठी देवानं त्या देवदूतांना बनवलं.

देवानं बनवलेला सर्वात पहिला देवदूत अगदी खास होता. तो देवाचा पहिला मुलगा होता. त्यानं त्याच्या वडिलांबरोबर काम केलं. इतर सर्व गोष्टी करण्यात त्यानं देवाला मदत केली. चंद्र, सूर्य, तारे आणि आपली पृथ्वी देखील बनवण्यात त्यानं देवाला मदत केली.

तेव्हा पृथ्वी कशी होती? सुरवातीला पृथ्वीवर कोणीही राहू शकत नव्हतं. पृथ्वीवर सगळीकडे पाण्याच्या महासागराशिवाय काहीही नव्हतं. पण लोकांनी पृथ्वीवर राहावं अशी देवाची इच्छा होती. म्हणून तो आपल्यासाठी तयारी करायला लागला. त्यानं काय केलं?

सर्वात आधी पृथ्वीला प्रकाशाची गरज होती. म्हणून त्यानं, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडेल व त्यामुळे दिवस आणि रात्र दोन्ही होतील असं केलं. त्यानंतर महासागरातल्या पाण्याच्या वर जमीन येईल असं देवानं केलं.

सुरवातीला जमिनीवर काहीही नव्हतं. या चित्रात तुम्हाला दिसते, तशी ती होती. तिथे फुलं, झाडं किंवा प्राणी नव्हते. नि महासागरात कोणतेही मासे नव्हते. पृथ्वी, प्राणी आणि माणसांना राहण्याजोगी छान होण्यासाठी देवाला अजून खूप काम करायचं होतं.