व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६

एक चांगला आणि एक वाईट मुलगा

एक चांगला आणि एक वाईट मुलगा

आता काईन आणि हाबेलाकडे पाहा. ते दोघेही मोठे झाले आहेत. काईन शेतकरी झाला आहे. तो धान्य, फळं आणि भाज्या पिकवतो.

हाबेल मेंढरे वळणारा झाला आहे. लहानग्या कोकरांची काळजी घेणं त्याला आवडतं. ती वाढून मोठी मेंढरं होतात. तेव्हा लवकरच, राखण करण्यासाठी हाबेलापाशी मेंढरांचा एक मोठा कळप असतो.

एका दिवशी काईन आणि हाबेल देवाला भेट आणतात. त्यानं पिकवलेलं काही धान्य काईन आणतो. आणि हाबेल त्याच्याजवळचं सर्वात चांगलं मेंढरु आणतो. हाबेल व त्याच्या भेटीवर यहोवा प्रसन्‍न आहे. पण काईन आणि त्याच्या भेटीवर तो प्रसन्‍न नाही. का, ते तुम्हाला माहीत आहे का?

काईनाच्या भेटीपेक्षा हाबेलाची भेट अधिक चांगली आहे म्हणूनच नव्हे, तर हाबेल हा चांगला माणूस आहे. यहोवावर व त्याच्या भावावर त्याचं प्रेम आहे. पण काईन वाईट आहे; त्याचं आपल्या भावावर प्रेम नाही.

त्यामुळे देव काईनाला त्याची वागणूक बदलायला सांगतो. पण काईन ऐकत नाही. देवाला हाबेल जास्त आवडल्यानं त्याला अत्यंत संताप आला आहे. म्हणून काईन हाबेलाला म्हणतो, ‘चल, आपण शेतात जाऊ.’ तिथं, ते एकांतात असताना, काईन त्याच्या भावाला मारतो. तो इतक्या जोरात मारतो की त्याला ठार करतो. काईनानं असं करणं भयंकर नव्हतं का?

हाबेल मेला तरी, देवाला त्याची अजूनही आठवण आहे. हाबेल चांगला होता. आणि अशा प्रकारच्या व्यक्‍तीला यहोवा कधीही विसरत नाही. त्यामुळे, एका दिवशी यहोवा देव हाबेलाला परत जिवंत करील. तेव्हा हाबेलाला कधीही मरावं लागणार नाही. तो या पृथ्वीवर अनंत काळ जगू शकेल. हाबेलासारख्या व्यक्‍तींशी ओळख होणं किती चांगलं असेल, नाही का?

परंतु काईनासारख्या व्यक्‍तींवर देव प्रसन्‍न होत नाही. त्यामुळे, काईनानं आपल्या भावाला ठार केल्यावर, त्याच्या कुटुंबातल्या इतर लोकांपासून दूर पाठवून, देवानं त्याला शिक्षा केली. पृथ्वीच्या दुसऱ्‍या भागात राहण्यासाठी काईन निघून गेला तेव्हा, त्यानं आपल्या एका बहिणीला बरोबर नेलं; आणि ती त्याची बायको झाली.

काही काळानं काईन आणि त्याच्या बायकोला मुलं व्हायला लागली. आदाम व हव्वेच्या इतर मुलांनी व मुलींनी लग्नं केली. आणि त्यांनाही मुलं झाली. लवकरच पृथ्वीवर अनेक लोक झाले. चला, त्यातल्या काहींबद्दल आपण शिकू या.