व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २५

कुटुंब इजिप्तला स्थलांतर करतं

कुटुंब इजिप्तला स्थलांतर करतं

आता मात्र योसेफाला आपल्या भावना आवरता येत नाहीत. तो आपल्या सर्व नोकरांना खोलीतून बाहेर जायला सांगतो. त्याच्या भावांबरोबर एकांतात असताना, योसेफ रडायला लागतो. त्याच्या रडण्याचं कारण माहीत नसल्यानं, त्याच्या भावांना किती आश्‍चर्य वाटत असेल, याची आपण कल्पना करू शकतो. अखेरीस तो म्हणतो: ‘मी योसेफ आहे. आपले वडील अजून हयात आहेत का?’

त्याचे भाऊ इतके आश्‍चर्यचकित झाले आहेत की, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नाही. ते घाबरले आहेत. परंतु योसेफ म्हणतो: ‘अंमळ जवळ या.’ ते जवळ आल्यावर तो म्हणतो: ‘तुम्ही ज्याला इजिप्तमध्ये विकलं, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे.’

योसेफ त्यांच्याशी प्रेमानं बोलतो: ‘तुम्ही मला इकडे विकल्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. लोकांचे प्राण वाचावे म्हणून मला इथे पाठवणारा, खरं तर देवच होता. फारोनं मला संपूर्ण देशाचा अधिपती केलं आहे. म्हणून, तातडीनं माझ्या वडिलांकडे परतून त्यांना हे सांगा. आणि इकडे येऊन राहायलाही त्यांना सांगा.’

मग योसेफ त्याच्या भावांना कवटाळतो. तो त्या सर्वांना मिठ्या मारतो नि त्यांचे मुके घेतो. योसेफाचे भाऊ आले असल्याचं फारोच्या कानावर जातं तेव्हा, तो योसेफाला सांगतो: ‘त्यांना गाडे नेऊ दे. आणि त्यांचे वडील आणि त्यांच्या कुटुंबांना घेऊन इकडे परतू दे. मी त्यांना मिसरातली (इजिप्त) सर्वात चांगली जमीन देईन.’

त्यांनी तेच केलं. आपल्या सर्व कुटुंबासकट याकोब इजिप्तला आला तेव्हा, योसेफ त्याच्या वडिलांना भेटत असलेला तुम्हाला दिसतो.

याकोबाचं कुटुंब खूप मोठं झालं होतं. इजिप्तला स्थलांतर केलं तेव्हा, याकोब, त्याची मुलं व नातू धरून एकूण ७० जण होते. पण त्याशिवाय बायका आणि बहुधा अनेक दासही होते. ते सर्व इजिप्तमध्ये स्थाईक झाले. त्यांना इस्राएली म्हणत. कारण देवानं याकोबाचं नाव बदलून इस्राएल ठेवलं होतं. इस्राएली, देवाचे विशेष लोक झाल्याचं आपल्याला पुढे दिसेल.