व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १८

याकोब हारानला जातो

याकोब हारानला जातो

याकोब ज्यांच्याशी बोलतो आहे, ती माणसं कोण आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? बरेच दिवस प्रवास केल्यानंतर, एका विहिरीपाशी याकोब त्यांना भेटला. ते लोक आपल्या मेंढरांची राखण करत होते. याकोबानं विचारलं, ‘तुम्ही कोठले आहात?’

ते म्हणाले, ‘हारान.’

‘तुम्हाला लाबान माहीत आहे का?’ याकोबानं विचारलं.

‘होय,’ ते उत्तरले. ‘पहा, त्याची मुलगी राहेल, त्याच्या मेंढरांच्या कळपाबरोबर येत आहे.’ दूरवर राहेल येत असलेली, तुम्हाला दिसते का?

याकोबानं आपला मामा लाबान याच्या मेंढरांसह राहेलीला पाहिलं तेव्हा, मेंढरांना पाणी पिता यावं म्हणून, त्यानं विहिरीवरचा धोंडा बाजूला लोटला. मग राहेलीचा मुका घेऊन, आपण कोण आहोत, ते याकोबानं सांगितलं. तिला खूप आनंद झाला, आणि तिनं घरी जाऊन आपले वडील लाबान यांना सांगितलं.

याकोबाला ठेवून घेण्यात लाबानाला अतिशय आनंद वाटला. आणि याकोबानं राहेलीशी लग्न करण्याची परवानगी मागितली तेव्हा, लाबान खूष झाला. परंतु लाबानानं, राहेलीकरता याकोबाला आपल्या शेतात सात वर्षं काम करायला सांगितलं. राहेलीवर त्याचं अतिशय प्रेम असल्यानं, याकोबानं ते केलं. पण लग्नाची वेळ आल्यावर काय झालं, तुम्हाला माहीत आहे का?

लाबानानं राहेलीऐवजी याकोबाला आपली मोठी मुलगी लेआ दिली. याकोबानं लाबानासाठी आणखी सात वर्ष काम करण्याचं कबूल केल्यावर, लाबानानं त्याला राहेलही बायको म्हणून दिली. त्या काळी, देवानं माणसांना एकापेक्षा जास्त बायका करू दिल्या. परंतु आता, बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे, एका माणसाला एकच बायको असली पाहिजे.