व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४१

पितळेचा साप

पितळेचा साप

खांबाला विळखा घालून बसलेला तो साप खरा असल्यासारखा दिसतो का? तो खरा नाही, पितळेचा बनवलेला आहे. लोकांनी त्याच्याकडे पाहून जिवंत राहावं, म्हणून त्याला खांबावर लावण्यासाठी यहोवानं मोशेला सांगितलं. पण जमिनीवरचे इतर साप मात्र खरे आहेत. त्यांनी लोकांना दंश करून आजारी केलं आहे. का, ते तुम्हाला माहीत आहे?

त्याचं कारण, इस्राएल लोक देव आणि मोशे यांच्याविरुद्ध बोलले आहेत. ते तक्रार करतात: ‘मिसरातून (इजिप्त) तुम्ही आम्हाला या अरण्यात मरण्यासाठी का आणलंत? इथे अन्‍न किंवा पाणी नाही. आणि आमच्यानं हा मान्‍ना आता खाववत नाही.’

पण मान्‍ना उत्तम अन्‍न आहे. यहोवानं चमत्कारानं तो त्यांना दिला आहे. व चमत्कारानं त्यानं त्यांना पाणीही दिलं आहे. पण देवानं त्यांची ज्याप्रकारे काळजी घेतली, त्याबद्दल लोक कृतज्ञ नाहीत. त्यामुळे, इस्राएलांना शिक्षा देण्यासाठी यहोवा हे विषारी साप पाठवतो. ते त्यांना चावतात नि अनेक जण मरतात.

शेवटी, मोशेकडे येऊन लोक म्हणतात: ‘यहोवा आणि तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केलं आहे. आता, हे साप काढून टाकण्यासाठी यहोवाला प्रार्थना कर.’

त्यामुळे मोशे लोकांसाठी प्रार्थना करतो. तेव्हा, पितळेचा एक साप करून एका खांबावर लावावा, नि ज्या कोणाला साप चावला असेल त्यानं त्याच्याकडे पहावं, असं यहोवा मोशेला सांगतो. देवानं सांगितल्याप्रमाणे मोशे करतो. मग दंश झालेले लोक सापाकडे पाहतात आणि परत बरे होतात.

यातून आपल्याला धडा शिकता येतो. आपण सर्व एका प्रकारे, साप चावलेल्या त्या इस्राएलांसारखे आहोत. आपण सगळे मरणाच्या दशेत आहोत. सभोवताली पाहा, म्हणजे तुम्हाला असं दिसेल की, लोक म्हातारे होतात, आजारी पडतात आणि मरतात. याचं कारण, पहिले पुरुष आणि स्त्री, आदाम व हव्वा, यहोवापासून दूर झाले. आणि आपण सगळे त्यांची मुलं आहोत. परंतु आपल्याला अनंत काळ जगता येईल असा मार्ग यहोवानं काढला आहे.

यहोवानं त्याचा मुलगा, येशू ख्रिस्त, पृथ्वीवर पाठवला. येशू वाईट आहे, असं अनेक लोकांना वाटल्यामुळे, तो खांबावर खिळला गेला. पण खरं तर, आपल्याला वाचवण्यासाठी यहोवानं येशू दिला. आपण त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या मागे गेलो, तर आपल्याला अनंत जीवन मिळू शकेल. पण याबद्दल अधिक आपण पुढे शिकू.