व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६१

दाविदला राजा करतात

दाविदला राजा करतात

शौल परत दाविदाला धरण्याचा प्रयत्न करतो. आपल्या उत्तम सैनिकांच्यातले ३,००० जण घेऊन, तो त्याच्या शोधात जातो. ही गोष्ट दाविदाला कळल्यावर, त्या रात्री शौल व त्याच्या माणसांनी कोठे तळ दिला आहे, याची माहिती काढण्यासाठी, तो हेर पाठवतो. मग दावीद आपल्या माणसांमधल्या दोघांना विचारतो: ‘शौलाच्या छावणीत माझ्या बरोबर तुमच्यापैकी कोण येईल?’

‘मी येईन,’ अबीशय उत्तर देतो. अबीशय हा दाविदाची बहीण सरुवा हिचा मुलगा आहे. शौल आणि त्याची माणसं झोपलेली असताना, दावीद आणि अबीशय गुपचूप छावणीत शिरतात. शौलाच्या उशाशी असलेला त्याचा भाला व पाण्याचा तांब्या ते उचलतात. सर्वजण गाढ झोपलेले असल्यामुळे, त्यांना कोणी पाहात नाही, की कोणाला त्यांची चाहूल लागत नाही.

आता दावीद आणि अबीशयकडे पाहा. ते निसटून एका टेकडीच्या माथ्यावर सुरक्षित आहेत. तिथून, खाली असलेल्या इस्राएलाच्या सेनापतीला दावीद मोठ्याने आवाज देतो: ‘अबनेरा, तू आपल्या धन्याचं रक्षण का करत नाहीस? पाहा, त्याचा भाला आणि पाण्याचा तांब्या कोठे आहेत?’

शौल जागा होतो. तो दाविदाचा आवाज ओळखतो आणि विचारतो: ‘दावीदा, हा तूच आहेस का?’ तिकडे खाली, शौल आणि अबनेर तुम्हाला दिसतात का?

दावीद शौलाला उत्तर देतो: ‘होय, महाराज.’ दावीद विचारतो: ‘तुम्ही मला धरण्याचा प्रयत्न का करता आहात? मी कोणती वाईट गोष्ट केली आहे? महाराज, हा पाहा तुमचा भाला. हा घेऊन जायला एखाद्या सेवकाला पाठवा.’

‘मी अपराध केला आहे. मी मूर्खासारखा वागलो आहे,’ शौल कबूल करतो. तेव्हा दावीद आपल्या वाटेनं निघून जातो. आणि शौल घरी परत जातो. पण दावीद आपल्या मनाशी म्हणतो: ‘असाच एका दिवशी शौल मला मारील. तेव्हा, फिलिस्टीन लोकांच्या देशात पळून जावं, हे बरं.’ आणि तो तसंच करतो. दावीद फिलिस्टीन्यांना फसवतो व आपण त्यांच्या पक्षाचे असल्यासारखं भासवतो.

काही वेळानंतर, फिलिस्टीनी इस्राएलांशी लढायला जातात. त्या लढाईत, शौल आणि योनाथान, दोघे मारले जातात. त्यामुळे दावीद फार कष्टी होतो. तो एक सुंदर गीत रचतो. त्यात तो म्हणतो: ‘माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्यासाठी विव्हळतो आहे. तू माझा किती लाडका होतास!’

यानंतर दावीद इस्राएलात हेब्रोन गावाला परत येतो. शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला राजा म्हणून निवडणारे आणि दाविदाला राजा म्हणून निवडणारे, यांच्यामध्ये लढाई होते. पण अखेरीस दाविदाची माणसं जिंकतात. दाविदाला राजा करतात तेव्हा, तो ३० वर्षांचा असतो. तो साडेसात वर्षं हेब्रोनात राज्य करतो. तिथे त्याला झालेल्या काही मुलांची नावं, अम्नोन, अबशालोम आणि अदोनीया आहेत.

पुढे, दावीद आणि त्याचे लोक जेरूसलेम नावाचं सुंदर नगर सर करायला जातात. दाविदाची बहीण सरुवा हिचा आणखी एक मुलगा यवाब लढाईत पुढाकार घेतो. त्यामुळे, दावीद यवाबाला आपला सेनापती करतो. आता दावीद जेरूसलेम नगरात राज्य करू लागतो.