व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७१

देव परादीसाचं वचन देतो

देव परादीसाचं वचन देतो

यशया नावाच्या आपल्या संदेष्ट्याला देवानं दाखवलं असावं, तशा परादीसाचं हे चित्र आहे. योनानंतर थोड्याच काळात यशया होऊन गेला.

परादीस म्हणजे “बाग” किंवा “उद्यान.” त्यानं, आपण या पुस्तकात आधीच पाहिलेल्या एखाद्या गोष्टीची तुम्हाला आठवण होते का? यहोवा देवानं आदाम आणि हव्वेसाठी बनवलेल्या सुंदर बागेसारखंच ते खूपसं दिसतं, नाही का? पण सबंध पृथ्वी कधी परादीस होईल का?

देवाच्या लोकांसाठी येऊ घातलेल्या नव्या परादीसाबद्दल लिहायला, यहोवानं त्याचा संदेष्टा यशया याला सांगितलं. तो म्हणाला: ‘लांडगे आणि मेंढरं शांतीनं एकत्र राहतील. लहान वासरं आणि सिंहाचे छावे एकत्र चरतील, आणि लहान मुलं त्यांना वळतील. विषारी सापाशेजारी तान्हं मूल खेळलं तरी, त्याला इजा होणार नाही.’

अनेक जण म्हणतील, ‘असं कधीच होणार नाही. जगात नेहमीच त्रास होता आणि तो नेहमी राहीलच.’ पण विचार करा: देवानं आदाम आणि हव्वेला कशा प्रकारचं घर दिलं होतं?

देवानं आदाम आणि हव्वेला एका परादीसात ठेवलं होतं. केवळ देवाची अवज्ञा केली म्हणूनच, त्यांनी आपलं सुंदर घर गमावलं; ते म्हातारे झाले व मेले. देवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांना, आदाम व हव्वेनं जे गमावलं, तेच तो देईल, असं वचन देव देतो.

येणाऱ्‍या परादीसात कोणीही अपाय वा नाश करणार नाही. तिथे परिपूर्ण शांती असेल. सर्व लोक आरोग्यसंपन्‍न आणि आनंदी असतील. सुरवातीपासून देवाला जसं हवं होतं, तसंच ते असेल. पण, देव हे कसं घडवून आणील, ते आपण पुढे शिकू.