व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८१

देवाच्या मदतीवर भिस्त ठेवणं

देवाच्या मदतीवर भिस्त ठेवणं

कित्येक हजार लोक, बॅबिलोनपासून जेरूसलेमपर्यंतचा लांबचा प्रवास करतात. पण ते पोहंचतात तेव्हा, जेरूसलेम पडीक अवस्थेत असते. तिथे कोणी राहात नाही. इस्राएलांना सर्व पुन्हा बांधावं लागतं.

अगदी सुरवातीला ते ज्या गोष्टी बांधतात, त्यातली एक आहे, वेदी. यहोवाला प्राण्यांचे बळी अथवा भेटी देण्याची ही एक जागा आहे. त्यानंतर काही महिन्यांनी इस्राएल मंदिर बांधायची सुरवात करतात. पण त्यांनी ते बांधावं, असं जवळपासच्या देशातल्या शत्रूंना वाटत नाही. म्हणून त्यांना थांबायला लावण्यासाठी, ते त्यांना घाबरवतात. अखेरीस बांधकाम थांबवण्यासाठी, हे शत्रू, पर्शियाच्या नव्या राजाला एक कायदा करायला लावतात.

अनेक वर्षं उलटतात. आता इस्राएलांना बॅबिलोनहून परतल्याला १७ वर्षं झाली आहेत. लोकांना बांधकाम परत सुरु करायला सांगण्यासाठी यहोवा, हाग्गय आणि जखऱ्‍या या आपल्या संदेष्ट्यांना पाठवतो. लोक देवाच्या मदतीवर भिस्त ठेवतात; आणि संदेष्ट्यांची आज्ञा पाळतात. त्यांनी बांधकाम करू नये, असं कायदा म्हणत असला तरी, ते परत बांधकाम करू लागतात.

त्यामुळे, ततनइ नावाचा एक पर्शियन अधिकारी येतो, आणि मंदिर बांधण्याचा त्यांना काय अधिकार आहे, असं इस्राएलांना विचारतो. इस्राएल लोक त्याला सांगतात की, ते बॅबिलोनमध्ये असताना कोरेश राजानं त्यांना सांगितलं: ‘यरुशलेमेला जा, आणि तुमचा देव यहोवा याचं मंदिर बांधा.’

कोरेश आता मरण पावलेला आहे. ततनइ बॅबिलोनला पत्र पाठवून विचारतो की, कोरेशानं खरोखरच तसं म्हटलं होतं का? लवकरच पर्शियाच्या नव्या राजाकडून पत्राचं उत्तर येतं. त्यात म्हटलं आहे की, कोरेशानं खरोखरच तसं म्हटलं. आणि म्हणून राजा लिहितो: ‘इस्राएलांना त्यांच्या देवाचं मंदिर बांधू द्या. आणि माझी आज्ञा आहे की, तुम्ही त्यांना मदत करा.’ साधारण चार वर्षांत मंदिर बांधून होतं; आणि इस्राएलांना खूप आनंद होतो.

आणखी अनेक वर्षं जातात. मंदिर बांधून झाल्याला आता जवळपास ४८ वर्षं लोटली आहेत. जेरूसलेममधले लोक गरीब आहेत; व शहर आणि देवाचं मंदिर यांना अवकळा आली आहे. देवाच्या मंदिराला दुरुस्तीची गरज असल्याचं, एज्रा नावाच्या इस्राएली माणसाला तिकडे बॅबिलोनमध्ये कळतं. तेव्हा तो काय करतो, ते तुम्हाला माहीत आहे का?

एज्रा, पर्शियाचा राजा अर्तहशश्‍त याला भेटायला जातो. आणि तो चांगला राजा, जेरूसलेमला नेण्यासाठी एज्राला खूपशा भेटी देतो. त्या वाहून नेण्यात मदत करण्यासाठी एज्रा बॅबिलोनमधल्या इस्राएलांना विनंती करतो. जवळपास ६,००० लोक जायला तयार होतात. त्यांना बरंच सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान गोष्टी सोबत न्यायच्या आहेत.

वाटेत दुष्ट माणसं असल्यानं एज्राला काळजी वाटत आहे. ती त्यांचं सोनं आणि चांदी हिरावून घेऊन त्यांना मारूनही टाकतील. त्यामुळे, तुम्हाला चित्रात दिसतं तसं, एज्रा लोकांना एकत्र जमवतो. मग, जेरूसलेमला करायच्या लांबच्या प्रवासात त्यांना संरक्षण देण्यासाठी, ते यहोवाची प्रार्थना करतात.

यहोवा त्यांचं रक्षण करतो. आणि मग, चार महिने प्रवास केल्यावर, ते जेरूसलेमला सुखरूप येऊन पोहचतात. मदतीकरता जे त्याच्यावर भिस्त ठेवतात, त्यांचं रक्षण यहोवा करू शकतो, असं यावरून दिसून येत नाही का?