परिशिष्ट
दानीएलाची भविष्यवाणी मशीहाच्या आगमनाविषयी भाकीत करते
दानीएल संदेष्टा येशूच्या जन्माच्या ५०० वर्षांआधी हयात होता. तरीपण, येशूला मशीहा किंवा ख्रिस्त म्हणून केव्हा अभिषिक्त केले जाईल तो काळ दर्शवता यावा म्हणून यहोवाने दानीएलाला काही माहिती प्रकट केली. दानीएलाला असे सांगण्यात दानीएल ९:२५.
आले: ‘हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त, अधिपति, असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटतील.’—मशीहाच्या आगमनाचा काळ ठरवण्यासाठी आधी आपण मशीहापर्यंत घेऊन जाणाऱ्या काळाची सुरुवात कोठून झाली हे पाहिले पाहिजे. भविष्यवाणीनुसार, ती “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून” आहे. ही “आज्ञा” केव्हा देण्यात आली? बायबल लेखक नहेम्या याच्यानुसार, जेरुसलेमभोवती तट पुन्हा बांधण्याची आज्ञा “अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी” देण्यात आली. (नहेम्या २:१, ५-८) सा.यु.पू. ४७४ वर्ष, अर्तहशश्त राजाचे शासक म्हणून त्याचे पहिले पूर्ण वर्ष होते, याला इतिहासकार दुजोरा देतात. यास्तव, सा.यु.पू. ४५५ साल हे त्याच्या राज्याचे २० वे वर्ष होते. आता आपल्याकडे, मशीहाविषयी दानीएलाच्या भविष्यवाणीसाठी सुरुवातीचे वर्ष आहे, सा.यु.पू. ४५५.
“अभिषिक्त, अधिपति” याच्या आगमनाआधी किती काळ लोटेल, हे दानीएल सूचित करतो. भविष्यवाणीत, ‘सात सप्तके आणि बासष्ट सप्तके’ म्हणजे एकूण एकोणसत्तर सप्तकांचा उल्लेख करण्यात आला आहे. किती समयाचा हा कालावधी आहे? अनेक बायबल भाषांतरे अशी नोंद करतात, की ही सात दिवसांची सप्तके नसून वर्षांची सप्तके आहेत. म्हणजे, प्रत्येक सप्तक सात वर्षांना सूचित करते. सप्तकांच्या वर्षांच्या किंवा सात सात वर्षांच्या तुकड्यांची कल्पना, प्राचीन काळच्या यहुद्यांच्या परिचयाची होती. जसे की, प्रत्येक सातव्या वर्षी ते शब्बाथ वर्ष पाळायचे. (निर्गम २३:१०, ११) यास्तव, भविष्यसूचक ६९ सप्तके, ही प्रत्येकी ७ वर्षांच्या एकूण ६९ विभागांइतकी म्हणजेच एकूण ४८३ वर्षांची आहेत.
आता आपण मोजणी केली पाहिजे. आपण सा.यु.पू. ४५५ पासून ४८३ वर्षे पुढे मोजली तर आपण सा.यु. २९ मध्ये येतो. आणि नेमके याच वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाला व तो मशीहा बनला! * (लूक ३:१, २, २१, २२) बायबल भविष्यवाणीची ही किती उल्लेखनीय पूर्णता आहे, नाही का?
^ परि. 2 सा.यु.पू. ४५५ पासून सा.यु.पू. १ पर्यंत ४५४ वर्षे होतात. सा.यु.पू. १ पासून सा.यु. १ पर्यंत एक वर्ष होते. (शून्य वर्ष नाही.) आणि सा.यु. १ पासून सा.यु. २९ पर्यंत २८ वर्षे होतात. या तिन्ही आकड्यांची बेरीज केल्यावर आपल्याला एकूण ४८३ वर्षे मिळतात. सा.यु. ३३ साली, वर्षांच्या सत्तराव्या सप्तकादरम्यान, येशूचा “वध” होऊन तो मरण पावला. (दानीएल ९:२४, २६) दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) अध्याय ११ आणि शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड २, पृष्ठे ८९९-९०१ पाहा. ही दोन्ही पुस्तके यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहेत.